Thursday 23 February 2017

NEWS 23.2.2017 DIO BULDANA



जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे निकाल जाहीर
बुलडाणा, दि. 23 : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 60 गटांकरीता आणि पंचायत समित्यांच्या 120 गणांकरीता दि. 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान पार पडले. या निवडणूकीची मतमोजणी आज 23 फेब्रुवारी 2017 घेण्यात आली.  मतमोजणीची सुरूवात सकाळी 10 वाजेपासून प्रत्येक तालुक्यात झाली. जिल्ह्यातील 60 जिल्हा परिषद गट व 120 पंचायत समिती गणांकरीता जाहीर झाले असून ते पुढीलप्रमाणे आहेत .

 जिल्हा परिषद :

 तालुकानिहाय एकूण जागा,पक्षनिहाय बलाबल व जिल्हा परिषद सदस्यपदी विजयी झालेले उमेदवार 
    बुलडाणा : एकूण जागा 6, पक्षीय बलाबल – भाजप 0, राष्ट्रवादी काँग्रेस 2, काँग्रेस 3, शिवसेना 1
विजयी उमेदवार – देऊळघाट – दत्तात्रय श्रीराम लहाने (रा.काँ), सावळा – सविता गणेश बाहेकर (रा.काँ), साखळी – जयश्रीताई शेळके (काँग्रेस), मासरूळ – कमलबाई जालींदर बुधवत (शिवसेना), रायपूर – साधना दिलीप जाधव (काँग्रेस), धाड – सौदाग हीना मोहम्मद रिजवान (काँग्रेस)
 चिखली : एकूण जागा 7, पक्षीय बलाबल – भाजप 3, राष्ट्रवादी काँग्रेस 0, काँग्रेस 2, शिवसेना 1, अपक्ष 1
विजयी उमेदवार : उंद्री – श्वेता महाले (भाजप), अमडापूर – शाम पठाडे (भाजप), केळवद – डॉ. नंदनी खेडेकर (अपक्ष), इसोली – गोदावरी सुधाकर धमक (काँग्रेस), सवणा- शरद दत्तात्रय हाडे (शिवसेना), मेरा खु – सुनंदा हरीदास शिनगाने (भाजप), मेरा बु – अशोक पडघान (काँग्रेस).
 देऊळगांव राजा : एकूण जागा 3, पक्षीय बलाबल – भाजप 0, राष्ट्रवादी काँग्रेस 1, काँग्रेस 1, शिवसेना 1
विजयी उमेदवार : दे. मही- रियाजखाँ पठाण (राष्ट्रवादी काँग्रेस), सिनगांव जहागीर – शिला धनशीराम शिपणे (शिवसेना), सावखेड भोई – मनोज देवानंद कायंदे (काँग्रेस).
मलकापूर : एकूण जागा 3, पक्षीय बलाबल – भाजप 2 , राष्ट्रवादी काँग्रेस 1, काँग्रेस 0, शिवसेना 0
विजयी उमेदवार : नरवेल – मंगलाबाई संतोष रायपूरे (राष्ट्रवादी काँग्रेस), देवधाबा – केदार एकडे (भाजपा), दाताळा – उमाताई शिवचंद्र तायडे (भाजपा).
सिंदखेड राजा : एकूण जागा 5, पक्षीय बलाबल – भाजप 1 , अपक्ष 1, राष्ट्रवादी काँग्रेस 3, काँग्रेस 0, शिवसेना 0
विजयी उमेदवार : किनगांव राजा – सरस्वती लक्ष्मण वाघ (भाजपा), साखरखेर्डा – राम जाधव (रा.काँ), शेंदूर्जन – दिनकर देशमुख (रा.काँ), दुसरबीड – सिंधुताई खंडारे (रा.काँ), सोनोशी – पुनम विजय राठोड (अपक्ष).
मेहकर : एकूण जागा 6, पक्षीय बलाबल – भाजप 1 , राष्ट्रवादी काँग्रेस 0, काँग्रेस 1, शिवसेना 4
विजयी उमेदवार : सोनाटी –  मनीषा संतोष चनखोरे (शिवसेना), अंजनी बु- आशिष खराटे (शिवसेना), घाटबोरी – तेजराव जाधव (शिवसेना), जानेफळ – मनिषा नितीन पवार (काँग्रेस), दे. माळी- संजय वडदकर (भाजपा), डोणगांव – राजू पळसकर (शिवसेना).
खामगांव : एकूण जागा 7, पक्षीय बलाबल – भाजप 7 , राष्ट्रवादी काँग्रेस 0, काँग्रेस 0, शिवसेना 0
विजयी उमेदवार : घाटपूरी - जयश्री विनोद टिकार (भाजपा), सुटाळा बु – मालुबाई ज्ञानदेव मानकर (भाजपा), पि.राजा -  पुंडलीक भिकाजी बोंबटकर (भाजपा), कुंबेफळ – रेखा महाले (भाजपा), लाखनवाडा – वर्षा उंबरकर (भाजपा), अटाळी – आशा चिमणकर (भाजपा), अंत्रज – डॉ. गोपाल गव्हाळे (भाजपा).
संग्रामपूर : एकूण जागा 4, पक्षीय बलाबल – भाजप 2 , राष्ट्रवादी काँग्रेस 0, काँग्रेस 1, शिवसेना0, भारीप 1
विजयी उमेदवार : सोनाळा – प्रमोद खोद्रे (भाजपा), पातुर्डा – ज्ञानदेव भारसाकळे (भाजपा), पळशी झांशी- भगतसिंग पवार (भारीप), बावनबीर – मिनाक्षी हागे (काँग्रेस).
नांदुरा : एकूण जागा 4, पक्षीय बलाबल – भाजप 1 , राष्ट्रवादी काँग्रेस 0, काँग्रेस 2, शिवसेना0, अपक्ष 1
विजयी उमेदवार : निमगांव – मधुकर गोपाळ वडोदे (भाजपा), दहीवडी – यशोदाबाई बलदेवराव चोपडे (काँग्रेस), चांदूर बिस्वा – संतोष गुलाब पाटील (काँग्रेस), वडनेर भोलजी – सुनंदा वसंतराव भोजने (अपक्ष)
शेगांव : एकूण जागा 3, पक्षीय बलाबल – भाजप 2 , राष्ट्रवादी काँग्रेस 0, काँग्रेस 0 , शिवसेना0, भारीप  1
विजयी उमेदवार : माटरगांव – ज्योती देवचे (भाजपा), अळसणा – राजाभाऊ भोजने (भारीप), चिंचोली कारफार्मा – उषा पांडुरंग सावरकर (भाजपा).
जळगांव जामोद : एकूण जागा 4, पक्षीय बलाबल – भाजप 4 , राष्ट्रवादी काँग्रेस 0, काँग्रेस 0 , शिवसेना 0,
 जामोद – रूपाली काळपांडे  (भाजपा), वडशिंगी – राजेंद्र उमाळे (भाजपा), आसलगांव – मंजूषा तिवारी (भाजपा), पिंपळगाव काळे – श्रीराम अवचार (भाजपा).
मोताळा : एकूण जागा 4, पक्षीय बलाबल – काँग्रेस 3, भाजप 1.
विजयी उमेदवार : कोथळी – जयश्री खाकरे (काँग्रेस), पिंप्री गवळी - महेंद्र सावंत गवई (काँग्रेस), रोहीणखेड –उज्ज्वला गणेश मोरे (काँग्रेस), धामणगांव बढे –  निरंजन नामदेव वाढे (भाजपा),
लोणार : एकूण जागा 4, पक्षीय बलाबल – शिवसेना 2, भाजप 0 , राष्ट्रवादी काँग्रेस 1, काँग्रेस 1,
विजयी उमेदवार : सुलतानपूर – रेणुका दिलीप वाघ (शिवसेना), वढव – राजेश श्रीराम मापारी (काँग्रेस), किनगांव जट्टू- गुलाब इंगळे (रा.काँ), पांग्रा डोळे – गोदावरी भगवान कोकाटे (शिवसेना),

पंचायत समिती गण : पक्षीय बलाबल
बुलडाणा : एकूण जागा 12, पक्षीय बलाबल : शिवसेना 2, काँग्रेस 5, भाजपा 2, भारीप 1, स्वाभीमानी शेतकरी संघटना 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1. खामगांव : एकूण जागा 14, पक्षीय बलाबल : भाजपा 10, काँग्रेस 4. जळगाव जामोद : एकूण जागा 8, पक्षीय बलाबल – काँग्रेस 2, भाजपा 4, भारीप 1, शिवसेना 1, चिखली : एकूण जागा  14, पक्षीय बलाबल : भाजपा 7, काँग्रेस 5, अपक्ष 1, शिवसेना 1, दे. राजा : एकूण जागा 6, पक्षीय बलाबल : शिवसेना 1, राष्ट्रवादी काँग्रेस 4, भाजपा 1.  सिंदखेड राजा : एकूण जागा 10, पक्षीय बलाबल : राष्ट्रवादी काँग्रेस 4, शिवसेना 3, भाजपा 3, लोणार : एकूण जागा 8, पक्षीय बलाबल : काँग्रेस 2, राष्ट्रवादी काँग्रेस 2, शिवसेना 4 . मेहकर : एकूण जागा 12, पक्षीय बलाबल : शिवसेना 9, काँग्रेस 2, भाजपा 1, शेगांव : एकूण जागा 6, पक्षीय बलाबल : भाजप 1, भारीप 3, काँग्रेस 2. संग्रामपूर : एकूण जागा 8, पक्षीय बलाबल : भाजपा 4, भारीप 2, शिवसेना 1, काँग्रेस 1. मोताळा : एकूण जागा 8, पक्षीय बलाबल : काँग्रेस 4, शिवसेना 2, भाजपा 1, भारीप 1 . नांदुरा : एकूण जागा 8, पक्षीय बलाबल : काँग्रेस 4, शिवसेना 2, भाजपा 1, अपक्ष 1. मलकापूर : एकूण जागा 6, पक्षीय बलाबल : भाजपा 4, राष्ट्रवादी काँग्रेस 2.  
                                                                        ****
श्रमिक संघटनांनी वार्षिक अहवाल सादर करण्याचे आवाहन
           बुलडाणा, दि. 23 : नोंदणीकृत श्रमिक संघटनांनी त्यांचा वार्षिक अहवाल सादर करावेत, असे आवाहन नागपूर येथील श्रमिक संघाचे उपनिबंधक यांनी केले आहे.
            श्रमिक संघ अधिनियम 1926 अंतर्गत नोंदणीकृत श्रमिक संघटनांनी त्यांच्या संघटनांचे 31 डिसेंबर 2016 अखेरचा वार्षिक अहवाल नमुना आय मध्ये 30 एप्रिल 2017 पर्यंत उपनिबंधक, श्रमिक संघ, नागपूर अपर कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. या कालावधीत वार्षिक विवरणपत्रक सादर केले नसल्यास संबंधित संघटनेविरूद्ध श्रमिक संघ अधिनियम 1926 च्या कलम 10 (ब) अंतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी नागपूर येथील उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
                                                                                    ******

सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी नाशिकला प्रशिक्षण
बुलडाणा, दि. 23 : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे एसएसबी प्रशिक्षण नाशिक येथे दि. 6 ते 15 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी गुरूवारी, दि. 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
            या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क व्यवस्था केली आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना PCTC Training च्या Google Plus पेजवरील दिलेल्या चेकलिस्टप्रमाणे सर्व कागदपत्रे आणि महत्त्वाच्या तारखांचे अवलोकन करावे. तसेच त्याच्या दोन प्रतीमध्ये माहिती भरून सादर करावे. याबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दूरध्वनी क्रमांक 0253-2451031, 2451032 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  किशोर पेठकर यांनी केले आहे.
            प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळविण्यासाठी कंबाईंड डिफेंस सर्विसेस परिक्षा. नॅशनल डिफेंस ॲकेडमी परिक्षा, पास झालेली असावी.  त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी सी सर्टीफिकेतट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे आणि एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे लागणार आहे.

                                                                        ****

Wednesday 22 February 2017

news 22.2.2017 dio buldana

 957 उमेदवारांच्या भाग्याचा आज निर्णय
·        185 टेबलवर मतमोजणी
·        597 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
·        मतमोजणी होणार 209 फेऱ्या
बुलडाणा, दि. 22 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीकरीता पहिल्या टप्प्यात 16 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्ह्यात मतदान झाले. जिल्ह्यात जिल्हा परिषद गटासाठी 574 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. त्यापैकी 228 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. तसेच पंचायत समिती गणांसाठी जिल्ह्यात एकूण 1067 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी 456 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. अशाप्रकारे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांसाठी 957 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद गटासाठी 346 व पंचायत समिती गणांसाठी 611 उमेदवारांचा समावेश आहे. या 957 उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय आज 23 फेब्रुवारी 2017 रोजी लागणार आहे.
    मतमोजणीकरीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून 185 टेबलवर मतमोजणी होणार आहे. सर्वत्र मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. जिल्ह्यात तेराही मतमोजणी केंद्रावर मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. बुलडाणा येथे मतमोजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे होणार आहे. त्याचप्रमाणे चिखली येथे तालुका क्रीडा संकूल, दे.राजा येथे टाऊन हॉल, सिं. राजा येथे नगर परिषद टाऊन हॉल, मेहकर येथे वखार महामंडळाचे गोदाम डोणगांव रोड, लोणार येथे तहसील कार्यालय सभागृह, खामगांव येथे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला सरकारी धान्य गोदाम, शेगाव येथे ग.भि मुरारका महाविद्यालय, मोताळा येथे तहसील कार्यालयाचे जुने सभागृह, मलकापूर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था जुनी इमारत नांदुरा रोड, नांदुरा येथे तहसील कार्यालय सभागृह, जळगांव जामोद येथे शासकीय धान्य गोदामाचा पश्चिमेकडील भाग आणि संग्रामपूर येथील मतमोजणी तहसील कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे.  
               मतमोजणीसाठी तालुकानिहाय असलेली टेबल, कर्मचारी आणि होणाऱ्या फेऱ्यांची संख्या
  बुलडाणा : टेबल 16, कर्मचारी 48 आणि मतमोजणी फेरी 30, चिखली : टेबल 15, कर्मचारी 75 आणि मतमोजणी फेरी 3 आणि मतमोजणी फेरी 3, दे.राजा : टेबल 12, कर्मचारी 48 आणि मतमोजणी फेरी 16, सिंदखेड राजा :  टेबल 16, कर्मचारी 48 आणि फेरी 18, मेहकर : टेबल 18, कर्मचारी 54 आणि फेरी 19, लोणार : टेबल 12, कर्मचारी 36 आणि फेरी 12, खामगांव : टेबल 15 , कर्मचारी 45 आणि फेरी 28, शेगांव : टेबल 15, कर्मचारी 45 आणि फेरी 12, मोताळा : टेबल 16, कर्मचारी 48 आणि फेरी 11, मलकापूर : टेबल 14, कर्मचारी संख्या 42 आणि फेरी 13, नांदुरा : टेबल 14, कर्मचारी संख्या 42 आणि फेरी 20, जळगांव जामोद : टेबल 10, कर्मचारी संख्या 30 आणि फेरी 22, संग्रामपूर : टेबल 12, कर्मचारी 36 आणि फेरी 5.  
                                                                        *****
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी 28 फेब्रुवारी 2017 रोजी चाचणीचे आयोजन
बुलडाणा, दि. 22 : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील युवक – युवतींकरीता सैन्य, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेतंर्गत शारीरिक मापदंड चाचणीचे आयोजन 28 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11 वाजता सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.
    या चाचणीकरीता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहीवासी व अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील असावा, वय 18 ते 25 दरम्यान असावे, पुरूष उमेदवाराची उंची 265 से.मी व महिला उमेदवारांची उंची 155 से.मी असावी, पुरूष उमेदवारांसाठी छाती 79 से.मी आणि फुगवून 84 से.मी असावी, उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातंर्गत नाव नोंदणी दाखला व ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील. उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.
                                                            *********
विधी साक्षरता शिबिर संपन्न
बुलडाणा, दि. 22 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने न्याय सेवा सदन हॉल, जिल्हा न्यायालय, बुलडाणा येथे नुकतेच दावा न्यायाधिकरण मान्य प्रक्रिया व असंघटीत कामगार क्षेत्रबाबतीत तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना या विषयावर विधी साक्षरता शिबिर संपन्न झाले.
   या दोन्ही कार्यक्रमांना अध्यक्ष म्हणून सहदिवाणी न्यायाधीश एस.सी सिरसाट, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर.एन हिवसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा वकील संघाचे सचिव ॲड सै. हारूण यांनी केले. उपस्थितांना मान्यवरांनी मोटार अपघात न्यायाधिकरण प्रक्रिया व असंघटीत कामगारांसाठी शासनाच्या योजना या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
  संचलन व आभार प्रदर्शन ॲड अमर इंगळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस.एस अवचार, आर.आर इंगळे, मु. ग तायडे आदींनी सहकार्य केले. शिबिरांना बहुसंख्येने न्यायालयातील पक्षकार उपस्थित होते, असे अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी कळविले आहे.
********
विक्रीसाठी असलेल्या नवीन बारदान्याची लिलाव प्रक्रिया रद्द
बुलडाणा, दि. 22 : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिपत्याखालील जिल्ह्यात 9 शासकीय गोदाम आहेत. या गोदामांमध्ये रिकामा बारदाना विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याकरीता ई-लिलाव प्रक्रिया सुरू करण्याबाबत जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे सदर निवीदा सुचना व निवीदाबाबत सविस्तर कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या www.buldhana.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही ई-लिलाव सुचना तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात येत आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
*******
पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या कार्यशाळेचे आयोजन
·        www.jdatam.blogspot.in या संकेतस्थळावर थेट प्रेक्षपण
बुलडाणा, दि. 22 : नालंदा विद्यापीठाचे कुलपती तथा उन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचा सत्कार सोहळा व मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन 23,24 व 25 फेब्रुवारी 2017 रोजी लेखा व कोषागार भवन, विद्यापीठ रोड, अमरावती येथे दुपारी 3 वाजता करण्यात आले आहे.

   या कार्यशाळेत राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण संस्थांच्या मदतीने राज्यातील विविध सामाजिक, विकासाच्या दैनंदिन जीवनातील समस्यांची उकल करून त्यावरील तोडगा यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच उन्नत भारत अभियानातंर्गत राज्य शासनाच्या विविध योजना, कृषि विकास व ग्राम विकास, अर्थसंकल्पीय व कॅशलेस मोहिमेबद्दल जागरूकता व संधी याबाबत डॉ. विजय भटकर मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण www.jdatam.blogspot.in या संकेतस्थळावर 23,25 व 25 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे. या संधीचा उपयोग करून मार्गदर्शन प्राप्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Thursday 9 February 2017

news 9.2.2017,1 dio buldana

जिल्हा परिषदेच्या विभागीय क्रीडा स्पर्धा बुलडाण्यात
·         11 ते 13 फेब्रुवारी 2017 दरम्यान आयोजन
·         आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिलाषा म्हात्रे व अजित लाकरा राहणार उपस्थित
बुलडाणा, दि.9 - जिल्‍हा परिषदेच्‍यावतीने जिल्‍हा क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्‍हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्‍या अमरावती विभागीय क्रीडा स्‍पर्धा व सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाचे दिनांक 11 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्‍यात आले आहे. राज्‍याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित उदघाटन समारंभास आंतरराष्‍ट्रीय खेळाडू  अभिलाषा म्‍हात्रे व अजित लाकरा यांची विशेष उपस्थिती या स्‍पर्धांचे मुख्‍य आकर्षण ठरणार आहे.
    जिल्‍हा परिषदेअंतर्गत कर्मचा-यांच्‍या जिल्‍हा स्‍तरीय क्रीडा स्‍पर्धा या वर्षी आयोजीत करण्‍यात आल्‍या होत्‍या. या पार्श्‍वभूमीवर गेल्‍या  कित्‍येक वर्षानंतर बुलडाणा जिल्‍ह्याला विभागीय क्रीडा स्‍पर्धा व सांस्‍कृतीक महोत्‍सवाच्‍या  आयोजनाचा बहुमान मिळालेला आहे. मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांच्‍या पुढाकाराने आयोजन बुलडाणा येथे करण्‍यात आले आहे.
    क्रीडा स्‍पर्धांचे औचित्‍य लक्षात घेता  आंतरराष्‍ट्रीय खेळाडू  अभिलाषा म्‍हात्रे व अजित लाकरा यांना या समारंभासाठी उदघाटक व विशेष अतिथी म्‍हणून दिपा मुधोळ यांनी निमंत्रित केले आहे. अभिलाषा म्‍हात्रे ह्या सन 2015 या वर्षीच्‍या अर्जून पुरस्‍कार विजेत्‍या कबड्डीपटू आहेत. आशियाई तसेच कबड्डी विश्‍वचषक आदी  विविध आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धामध्‍ये त्‍यांचे नावे पाच सुवर्णपदकांची नोंद आहे. राष्‍ट्रीय स्‍पर्धा तसेच फेडरेशन चषक स्‍पर्धांमध्‍ये त्‍यांनी व्‍यक्तिगत व सांघिक कामगिरीसाठी सुवर्ण, रजत व कास्‍ंय अशी एकूण 10 पदक प्राप्‍त केलेली आहेत. सद्य:स्थितीत दूरचित्रवाणीवर लोकप्रिय ठरत असलेल्‍या प्रो कबड्डीमध्‍ये सहभागी असलेल्‍या तीन महिला संघांपैकी एका संघाच्‍या कर्णधार म्‍हणून सुध्‍दा त्‍यांची कामगिरी उल्‍लेखनीय आहे. अजित लाकरा हे हॉकीचे आंतरराष्‍ट्रीय व जेष्‍ठ खेळाडू आहेत. छत्रपती पुरस्‍कार विजेते लाकरा यांनी 1989 च्‍या आशियाई क्रीडा स्‍पर्धेत रजत पदक आपल्‍या नावे नोंदविल्‍यानंतर ते प्रकाशझोतात आले होते. त्‍यानंतर 1990 चा पाकीस्‍तनमध्‍ये खेळल्‍या गेलेला विश्‍वचषक व 1992 मधील बार्सिलोना ऑ‍लपिंक स्‍पर्धेत सुध्‍दा भारतीय हॉकी संघातील खेळाडू म्‍हणून त्‍यांची कामगिरी उल्‍लेखनीय होती. सद्य:स्थितीत अजित लाकरा हे हॉकीपटूंचे प्रशिक्षक म्‍हणून बालेवाडी येथे कार्यरत आहेत.
  दरम्‍यान जिल्‍हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्‍या अमरावती विभागीय क्रीडा स्‍पर्धा व सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून बुलडाणेकरांना  दिनांक 11 ते 13 फेब्रुवारी या तीन दिवसीय कालावधीत विविध प्रकारच्‍या सांघिक व वैयक्तिक तसेच महिला व पुरूष गटातील एकूण  40 प्रकारच्‍या स्‍पर्धांचा आनंद घेता येणार आहे. विशेष उल्‍लेखनीय असे की, मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ ह्या स्‍वतः बॅडमिंटन या खेळात महिला दुहेरी स्‍पर्धेमध्‍ये बुलडाणा जिल्‍ह्याचे प्रतिनिधीत्‍व करणार आहेत, असे जिल्हा परिषदेच्यावतीने कळविण्यात आले आहे.
                                                            ******
नांदुरा येथील परिवहन विभागाचे शिबिर 22 फेब्रुवारी रोजी होणार

बुलडाणा, दि.9: नांदुरा येथे आयोजित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे तालुका शिबीर 17 फेब्रुवारी 2017 रोजी होणार होते. मात्र  प्रशासकीय कारणास्तव सदर शिबिर आता  22 फेब्रुवारी 2017 रोजी आयोजित करण्यात येणार आहे, असे  उपप्रादेशीक परीवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

news 9.2.2017 dio buldana

                      
         दबावाला बळी न पडता मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा
-         ज.स. सहारीया
·         जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तयारीया आढावा
·         मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची माहिती देणारे फ्लेक्स
·         ट्रु वोटर ॲप्सचा उपयोग करावा
·         बॅलेट पेपरवरील ‘फॉन्ट साईज’ वाढविली
·         आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी करावी
बुलडाणा, दि.9 - जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका पहिल्या टप्प्यात घेण्यात येत असून या निवडणूकीला 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होत आहे.  जिल्हा परिषदेसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व उपायोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी आज येथे दिल्या.
              जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियेाजन समिती सभागृहात निवडणुकीसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूर्व तयारीचा आढावा ज. स. सहारिया यांनी घेतला. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप बिष्णोई, निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक संजीवकुमार बावीस्कर, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दिपा मुधोळ, अप्प्र जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती श्वेता खेडेकर आदी उपस्थित होते.
    आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करतांना मतदारांवर प्रभावासाठी दारु, रोख रक्कम अथवा वस्तूरुपाने साहित्य वाटप होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना करीत राज्य निवडणूक आयुक्त श्री. सहारिया म्हणाले, पहिल्यांदाच रेल्वे, वन विभाग, बँक तसेच आयकर विभागांच्या अधिकाऱ्यांची मदत घेणार असून इतर राज्यातून येणारे रेल्वे व इतर वाहतुकीवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र संगणकाच्या सहाय्याने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे उमेदवारांना त्यांच्या सोयीप्रमाणे नामनिर्देशन पत्र भरता आले. यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी तब्बल 70 हजार  नामांकन पत्र दाखल झाले. त्याचप्रमाणे नामनिर्देशन पत्र नामंजूर होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून निवडणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी पोलीस विभागानेही आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. बॅलेट पेपरवरील उमेदवारांची नावे सहज वाचता येण्यासाठी या निवडणूकीपासून  अक्षर आकार 16 वरून 24 वर करण्यात आला आहे. सर्व यंत्रणांनी, राजकीय पक्षांनी आदर्श आचार संहितेची कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  .
           जिल्ह्यात पंचायत समितीचे 120 नग व जिल्हा परिषदेचे 60 गट मतदारंसघात मतदान होत असल्याचे सांगत निवडणूक आयुक्त म्हणाले,  आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणीसाठी 13 पथके निर्माण केली आहेत. तसेच 13 नाका तपासणी पथके निर्माण करण्यात आली आहे. यावेळी सर्वप्रथम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी राज्यात मतदान केंद्र ठिकाणी फ्लेक्सवर उमेदवारांची माहिती देण्यात येणार आहे. ही माहिती उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्रावर आधारीत असेल.  यामध्ये उमेदवारांचे शिक्षण, स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, असलेले गुन्हे, झालेली शिक्षा व प्रलंबित असलेले गुन्ह्यासंदर्भात माहितीचा समावेश राहणार आहे. मतदारांनी आयोगाने विकसित केलेल्या ट्रु वोटर ॲपचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
          ते पुढे म्हणाले, उमेदवारांना खर्चाची माहिती देणे बंधनकारक असून एक महिन्याच्या आत उमेदवारांनी खर्च सादर करावा. यावेळी राज्याचे विशेष पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी यावेळी विविध सूचना केल्या. बैठकीला उपजिल्हाधिकारी निवडणूक एस.एस खांदे, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार आदींसह संबंधीत यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.    

Friday 3 February 2017

news 3.2.16 dio buldana

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी जिल्ह्यात अंदाजे 67.44 टक्के मतदान
·        मतदान सर्वत्र शांततेत
·        46 मतदान केंद्रांवर मतदान
·        23 हजार 551 मतदारांनी बजाविला मतदानाचा हक्क
बुलडाणा, दि‍.3 - विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीकरीता आज 3 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान पार पडले. मतदान सर्वत्र शांततेत झाले. या निवडणूकीसाठी जिल्ह्यात 46 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्रावरती आज सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत पदवीधर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यात एकूण पदवीधर पुरूष मतदार 26 हजार 666, स्त्री मतदार 8 हजार 253  मतदार आहेत. अशाप्रकारे एकूण मतदार जिल्ह्यात 34 हजार 919 आहेत. त्यापैकी 18 हजार 641 पुरूष मतदारांनी, तर 4 हजार 910 स्त्री मतदारांनी मतदान केले आहे. अशाप्रकारे अंदाजे एकूण 23 हजार 551 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती उज्ज्वला झाडे यांनी शिवाजी विद्यालय, बुलडाणा येथे आपल्या मतदानाचा हक्क बजाविला.
   जिल्ह्यात तालुकानिहाय एकूण केंद्र, पुरूष मतदार व स्त्री मतदार : मलकापूर – मतदान केंद्र 3, पुरूष 1708, स्त्री  651,एकूण 2359, जळगांव जामोद – मतदान केंद्र 2, पुरूष 1414, स्त्री 515, एकूण 1929, संग्रामपूर – मतदान केंद्र 2, पुरूष 840, स्त्री 239 व एकूण 1079, शेगांव – मतदान केंद्र 3, पुरूष 1561, स्त्री 656, एकूण 2217, नांदुरा – मतदान केंद्र 2, पुरूष 1363, स्त्री 431, एकूण 1794, मोताळा – मतदान केंद्र 2, पुरूष 1042, स्त्री 431, एकूण 1264, बुलडाणा – मतदान केंद्र 9, पुरूष 5543, स्त्री 1957 व एकूण 7500, खामगांव – मतदान केंद्र 5, पुरूष 2815, स्त्री 1214, एकूण 4029, चिखली – मतदान केंद्र 5, पुरूष 3632, स्त्री 969, एकूण 4601, मेहकर – मतदान केंद्र 5, पुरूष 2528, स्त्री 548 व एकूण 2985, दे. राजा – मतदान केंद्र 3, पुरूष 1528, स्त्री 369, एकूण 1897, सिं. राजा – मतदान केंद्र 3, पुरूष 1389, स्त्री 221 व एकूण 1610, लोणार – मतदान केंद्र 2, पुरूष 1394, स्त्री 261 व एकूण 1655 मतदार आहेत.