Monday 28 February 2022

DIO BULDANA NEWS 28.2.2022

 



वीज देयकाची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे

- ऊर्जामंत्री  डॉ नितीन राऊत

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरल्याने महावितरण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे प्रत्येक वीज ग्राहकाने आपल्याकडील देयकाची थकबाकी असल्यास ती भरावी. देयकाची थकबाकी भरल्यास महावितरण  आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल.तरी वीज देयकांची थकबाकी भरून महातिवरणला सहकार्य करावे, असे आवाहन  राज्याचे ऊर्जा मंत्री ना डॉ. नितीन राऊत यांनी आज विद्युत भवन, खामगांव येथे आयोजित कार्यक्रमात केले.

   महापारेषणच्या 220 के.व्ही. धरणगाव ता. मलकापूर वीज उपकेंद्राचे लोकार्पण आणि महावितरणच्या ३३/११ के. व्ही मनसगाव ता. शेगांव येथील वीज उपकेंद्राचे भूमीपूजन ना डॉ. राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी  व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, आमदार राजेश एकडे, माजी आमदार दिलीप सानंदा, राहुल बोंद्रे, महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये, महापारेषणचे मुख्य अभियंता भीमराव राऊत, महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. आकोडे आदी  उपस्थित होते.

    बोलताना ते पुढे म्हणाले, महावितरणला देखील बाहेरून पैसे देऊन वीज खरेदी करावी लागते. त्यामुळे प्रत्येक वीज ग्राहकाने देयकाची अदायगी करून सहकार्य करावे. महापारेषण व महावितरणचे नवीन वीज उपकेंद्र झाल्याने जिल्ह्यातील सुमारे  पाच हजार वीज ग्राहकांना लाभ होणार आहे. शेतकरी बांधवांना दर्जेदार आणि खात्रीशीर वीज पुरवठा यामुळे मिळणार आहे. या वीज उपकेंद्राच्या उभारणीवर 144 कोटी रुपये खर्च झाले आहे, यात 1 हजार एमव्हीए क्षमतेचे दोन रोहित्र लावले आहे. यावेळी  महापारेषण, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Sunday 27 February 2022

DIO BULDANA NEWS 27.2.2022

 


पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते बालकांना पाजला पोलीओ डोस

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 :  जिल्ह्यात आज 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलीओ लसीकरण मोहिमेतंर्गत पोलीओचा डोस पाजण्यात आला. जिल्हास्तरीय शुभांरभ पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिल्हा सामान्य रूग्णालयात उपस्थित बालकाला पोलीओ लसीचे दोन थेंब पाजूण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, बाह्य संपर्क अधिकारी डॉ यास्मीना चौधरी, अधिसेविका श्रीमता कुलकर्णी, सहायक अधिसेविका श्रीमता कुरसिंगे, परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या श्रीमती खेडकर आदी उपस्थित होते.  

*************

ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांचा जिल्हा दौरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा काय्रक्रम पुढीलप्रमाणे : 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.45 वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा खामगांव येथे आगमन व पुतळ्यास माल्यार्पण, दु 2 वा शासकीय विश्रामगृह खामगांव येथे आगमन व राखीव, दु 2.30 शासकीय विश्राम गृह येथे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आमदार, जि.प अध्यक्ष, सदस्य, जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी संवाद, दु 3 वा खामगांव विद्युत भवन येथे आगमन व धरणगांव ता. मलकापूर येथील 220 केव्ही पूर्ण झालेल्या अति उच्च दाब उपकेंद्राचे लोकार्पण व मनसगांव ता शेगांव येथील महावितरणच्या एचव्हीडीएस योजनेतंर्गत 33/11 केव्ही उपकेंद्राचे आभासी पद्धतीने व्हीसीद्वारे भूमीपुजन, दु. 3.45 वा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सचिव धनजंय देशमुख यांच्या निवास स्थानी भेट, सायं 4 वा मंगलमूर्ती नगर घाटपुरी रोड, खामगांव येथे काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे पदाधिकारी, डॉ. बाबासाहेब सोशल फोरम, आंबेडकरी कलावंत व सुशिक्षीत बेरोजगार तरूणांचा मेळाव्यास उपस्थिती, सायं 4.30 वा खामगांव येथून उंद्री ता. चिखली कडे प्रयाण, सायं 5 वा उंद्री येथे आगमन व 1958 च्या धम्म दिक्षा कायक्रमाच्या स्मृती स्तंभाची पायाभरणी कार्यक्रम, जल जीवन मिशनच्या कामाचे भूमीपुजन समारंभ व भूमीहिनांच्या मेळाव्यास उपस्थिती, सायं 6 वा उंद्री येथून चिखलीकडे प्रयाण, सायं 6.45 वा शासकीय विश्रामगृह चिखली येथे आगमन व राखीव, सायं 7 वा जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे राखीव, सायं 7.45 वा चिखली येथून लोणारकडे प्रयाण, रात्री 9 वा लोणार शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.

    दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 10 वाजता लोणार येथे जिल्हा उर्जा विभागाची आढावा बैठक, पांगरी ता बुलडाणा येथील महावितरणच्या एचव्हीडीएस योजनेतंर्गत 33/11 केव्ही उपकेंद्राचे आभासी पद्धतीने व्हीसीद्वारे भूमीपुजन, सकाळी 11.15 वा नगर परिषद मार्फत आठवडी बाजार व छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ग्राहक मेळाव्यास मार्गदर्शन, दु 12 वाजता यात्री निवास लोणार सरोवरजवळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या राज्य शाखेच्यावतीने राज्यस्तरीय साहित्य लेखन स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ व विदर्भ विभागीय मातंग समाज मेळावा कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 1 वा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद, दु 1.30 वा लोणार येथून सिं.राजाकडे प्रयाण, दु 2.15 वा सिं.राजा येथे आगमन व राजमाता जिजाऊ जन्मस्थळास अभिवादन व भेट, दु. 2.30 वा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आगमन व माल्यार्पण, दु 2.40 वा सिं.राजा विश्राम गृह येथे आगमन व राखीव, दु 3.40 वा सिं. राजा येथून औरंगाबादकडे प्रयाण करतील.

******

Thursday 24 February 2022

DIO BULDANA NEWS 24.2.2022

 


कोरोना अलर्ट : प्राप्त 441 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 07 पॉझिटिव्ह

  • 21 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 448 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 441 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 07 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील 06 व रॅपीड चाचण्यांमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 113 तर रॅपिड टेस्टमधील 328 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 441 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  बुलडाणा शहर : 3, सिं. राजा शहर : 1, परजिल्हा :  अशाप्रकारे जिल्ह्यात 07 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 21 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 798522 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98105 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98105 आहे.  आज रोजी 888 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 798522 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98891 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98105 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 98 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

******

पल्स पोलीओचा 27 फेब्रुवारी रोजी मिळणार डोस

· 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना देण्यात येणार लस

· 2 लक्ष 58 हजार 289 अपेक्षीत बालके

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : देशातून पोलीओचे समुळ उच्चाटन झालेले आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीत पोलीओ देशात, राज्यात परत येवू नये, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. त्या अनुषंगानेच 27 फेब्रुवारी 2022 रोजी 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पल्स पोलीओचे लसीकरण करण्यात येणार आहे. पोलीओ डोस पाजण्याची व्यवस्था, प्रत्येक गावांत, वॉर्डात, रेल्वे स्टेशन व बस स्थानके या ठिकाणी सुद्धा करण्यात आली आहे.

    पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील 2 लक्ष 58 हजार 289 अपेक्षीत बालकांना लस देण्यात येणार आहे. ही लाभार्थी संख्या आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 1 लक्ष 94 हजार 888, तर शहरी भागातील 63 हजार 401 बालकांचा समावेश आहे. तरी सर्व पालकांनी 27 फेब्रुवारी 2022 रोजी आपल्या नजीकच्या पोलीओ लसीकरण बुथवर बालकाला नेवून पोलीओचा डोस पाजावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

                                                                                                                ********



धुम्रपान प्रतिबंध व कोटपा कायद्यातंर्गत दंडात्मक कारवाईची मोहिम सुरू

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षातंर्गत जिल्हा अंमलबजावणी पथकाने धुम्रपान प्रतिबंध व कोटपा कायद्यातंर्गत धडक दंडात्मक कारवाईची मोहिम 24 फेब्रुवारीपासून सुरू केली आहे. ही मोहिम जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या आदेशान्वये, जिल्हा शल्य चिकित्सक, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा शहरात राबविण्यात आली. या मोहिमेतंर्गत विविध ठिकाणी कारवाई करीत 4 हजार 400 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. या दंडात्मक कारवाईमुळे प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सदर कार्यवाहीसाठी जिल्हा अंमलबजावणी पथकामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी श्री. सोळंकी, श्री. वसावे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. गवारगुरू, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. भोसले, समुपदेशक श्री. सरकटे, सामाजिक कार्यकर्ता श्री. आराख यांचा समावेश होता.

                                                                        ************* 

--

Tuesday 22 February 2022

DIO BULDANA NEWS 22.2.2022

 कोरोना अलर्ट : प्राप्त 405 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 09 पॉझिटिव्ह

  • 9 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 414 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 405 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 9 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड चाचण्यांमधील 09 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 25 तर रॅपिड टेस्टमधील 380 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 405 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  बुलडाणा शहर : चांडक ले आऊट 1, खामगांव तालुका : मादनी 1, अटाळी 1, खामगांव शहर : 2,   अशाप्रकारे जिल्ह्यात 09 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 09 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 797698 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98056 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98056 आहे.  आज रोजी 901 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 797698 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98881 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98056 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 137 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

******

श्री. संत गजानन महाराज प्रगटदिन उत्सव सोहळा साध्या पद्धतीने

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : सध्याची परिस्थिती पाहता अद्यापपावेतो कोविड 19 या आजाराचा नवीन व्हेरीएंट ओमिक्रॉन या आजाराचा धोका टळलेला नसून सदरचा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी शासनाने काही निर्बंध घातलेले आहे. त्याबाबत आदेशदेखील पारित केले आहे. त्यानुसार कुठल्याही प्रकारच्या रॅली, मिरवणूका, मोटार रॅली, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याचे नमूद आहे. श्री संत गजानन महाराज यांचा 144 वा प्रगटदिन उत्सव सोहळा 23 फेब्रुवारी 2022 रोजी कुठल्याही प्रकारची मिरवणूक न काढता मंदीराचे आतील परिसरातच नियमानुसार साजरा करण्याबाबत परवानगी देण्यात येत आहे. या सोहळ्याकरीता उपस्थितांना मास्क वापरणे बंधनकारक राहील. सदर व्यक्तींची थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी करणे बंधनकारक असणार आहे. कार्यक्रमात उपस्थित व्यक्तींनी आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक राहील. सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी. शासनाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.

                                                                        ******

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास मुदतवाढ, 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत

* अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास प्राचार्य जबाबदार राहणार

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच बहुजन कल्याण इतर मागास विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागासप्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो.

    सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास विभागाच्या https:// mahadht.mahit.gov.in या पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. सदर प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 14 फेब्रुवारी पासुन उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. बुलडाणा जिल्ह्याची महाडिवीटो पोर्टल वरील 18 फेब्रुवारी पर्यंतची स्थिती पाहता जिल्हा अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणी मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले आहे. त्यासाठी महाविद्यालयांच्या वारंवार ऑनलाईन बैठका घेण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देखील ऑनलाईन बैठक घेवून महाविद्यालयांचे प्राचार्यांना सूचना देण्यात आल्या.  मात्र तरीही महाविद्यालयांचे प्राचार्य शिष्यवृत्ती अर्जाची नोंदणी करण्यास उदासिन आहे.  

  जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची केवळ 71 टक्के नोंदणी झालेली आहे. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय विभागामार्फत मंजूर करण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून मागील वर्षाच्या तुलनेत नोंदणी 100 टक्के करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महाविदयालयातील मागासवर्गीय विदयार्थी अर्ज भरण्यापासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी. तरी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्म भरण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

या महाविद्यालयांची नोंदणी मागील वर्षाच्या तुलनेत अत्यंत कमी

कादरीया कॉलेज ऑफ एज्युकेशन बुलडाणा, व्यवसाय प्रशासन महाविद्यालय आरास ले आऊट बुलडाणा, अभिनव महाविद्यालय बुलडाणा, वसंतप्रभा कॉलेज ऑफ नर्सिंग बुलडाणा, रामभाऊजी लिंगाडे पॉलीटेक्नीक कॉलेज बुलडाणा, यशवंत अध्यापक विद्यालय बुलडाणा, डॉ. राजेंद्र गोडे अध्यापक विद्यालय बुलडाणा, राजर्षी शाहू महाराज अध्यापक विद्यालय माळविहीर, प्रगती अध्यापक विद्यालय येळगांव, महाराणा प्रताप ज्यु. कॉलेज धाड, विवेकानंद विद्यालय सव, लेट नारायणराव जानराव देशमुख सिनीअर कॉलेज अमडापूर, श्री शिवाजी सायन्स अँड आर्ट कॉलेज चिखली, श्री. शिवशंकर विद्यालय भरोसा ता. चिखली, श्री. ज्ञानेश्वर विद्यालय पेठ ता. चिखली, श्री. व्यंकटेश आर्ट अँड कॉमर्स कॉलेज दे. राजा, दे. राजा ज्युनिअर कॉलेज दे. राजा, व्यंकटेश सिनीअर कॉलेज दे.राजा, श्रीपाद कृष्णा कोल्हटकर महाविद्यालय जळगांव जामोद, शासकीय आटीआय जळगांव जामोद, सेठ तुळशीरामजी ढोकणे ज्यु. कॉलेज जळगांव जामोद, श्रीमती सुरजादेवी रामचंद मोहता महिला महाविद्यालय खामगांव, ए. के नॅशनल ज्यु. कॉलेज खामगांव, जि.प मराठी उप प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुलींचे विद्यालय खामगांव, लेट कृष्णराव रामजी पाटील विद्यालय अँड ज्यु. कॉलेज बोरी अडगांव ता. खामगांव, डॉ. आर एन लाहोटी महिला सायन्स महाविद्यालय लोणार, शासकीय आटीआय लोणार, डॉ. के. बी मापारी इन्स्टीट्युट ऑफ नर्सिंग लोणार, महाराणा प्रताप हायस्कूल लोणार, सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल लोणार, डी. ई. एस ज्युनिअर कॉलेज दाताळा ता. मलकापूर, नगरपालिका उप प्राथमिक, माध्यमिक अँड उच्च माध्यमिक मलकापूर, लिलाधर भोजराज चांडक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज मलकापूर, भिवसन पाटील शिंदे शिक्षण ग्रामीण विकास आणि बहु संस्था, शिंदे पॉलीटेक्नीक अंजनी बु ता. मेहकर, एमईएस कॉलेज ऑफ फार्मसी मेहकर, श्री. संत गजानन बाबा महाविद्यालय मोताळा, एमईएस हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज धा. बढे ता. मोताळा, कोठारी अध्‍यापक विद्यालय नांदुरा, वासंतीदेवीकाबरा ज्यु. कॉलेज नांदुरा, जिजामाता महिला कॉलेज ऑफ एज्युकेशन सिं. राजा, उत्कर्ष आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सिं.राजा, लेट विजय मखामळे इन्स्टीट्युट ऑफ आरजीएनएम स्कूल, रामेश्वर ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन सिं.राजा, नुतन मिडल विद्यालय सिं.राजा, जिजामाता सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल सिं.राजा, हॉनेबल विलासराव देशमुख डि. एड कॉलेज निवाणा ता. संग्रामपूर, जि.प मराठी उप प्राथमिक, माध्यमिक अँड उच्च्‍ माध्यमिक पातुर्डा ता. संग्रामपूर,श्री संत गुलाबबाबा विद्यालय अँड ज्यु. कॉलेज संग्रामपूर, बी.डी विद्यालय कवठळ ता. संग्रामपूर, बी.डी विद्यालय निवाणा ता. संग्रामपूर,  लेट उत्तमराव देशमुख अध्यापक विद्यालय शेगांव, शरद पवार अध्यापक विद्यालय शेगांव, पुर्णा आर्ट कॉमर्स अँड सायन्स ज्यु. कॉलेज शेगांव, सातपुडा मिडल विद्यालय शेगांव, दिपस्तंभ महाविद्यालय शेगांव.

                                                                                    *****

तीन गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि.22: बुलडाणा तालुक्यातील पिंपरखेड, वरवंड व चिखली तालुक्यातील असोला बु गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. पिंपरखेड येथील लोकसंख्या 625 असून टँकरद्वारे गावाला दररोज 14 हजार लीटर्स, वरवंड गावच्या 3789 लोकसंख्येला 76 हजार 960 लीटर्स व असोला बु येथील 1350 लोकसंख्येकरीता 37 हजार 500 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. 


--

Saturday 19 February 2022

DIO BULDANA NEWS 19.2.2022

 महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावे

*समाज कल्याण विभागाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. १९: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच बहुजन कल्याण इतर मागास विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागासप्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो.
    सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास विभागाच्या https:// mahadht.mahit.gov.in या पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. सदर प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा १४ फेब्रुवारी पासुन उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. बुलडाणा जिल्ह्याची महाडिवीटो पोर्टल वरील १८ फेब्रुवारी पर्यंतची स्थिती पाहता जिल्हा अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणी मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले आहे. त्यासाठी महाविद्यालयांच्या वारंवार ऑनलाईन बैठका घेण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देखील ऑनलाईन बैठक घेवून महाविद्यालयांचे प्राचार्यांना सूचना देण्यात आल्या.  
  जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची केवळ ७१ टक्के नोंदणी झालेली आहे. त्याअनुषंगाने  सामाजिक न्याय  विभागामार्फत मंजूर करण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून मागील वर्षाच्या तुलनेत नोंदणी १०० टक्के करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महाविदयालयातील मागासवर्गीय विदयार्थी अर्ज भरण्यापासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी. तरी https://mahadbt mahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्म भरण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
*****
कामाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे बंधन कारक
बुलडाणा, (जिमाका) दि. १९: कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात इतर खाजगी क्षेत्र, इन्टरप्रायजेस, सहकारी संस्था, क्रिडा संकुले,प्रेक्षागृहे,मॉल्स,अशासकीय संघटना, ट्रस्ट, रुग्णालये, सुश्रू शालये,  क्रिडा संस्था, वाणिज्य शैक्षणिक,औदयोगिक कार्यालय, संस्थेत इत्यादीमध्ये १० पेक्षा जास्त कर्मचारी असल्यास अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे बंधनकारक केले आहे. अंतर्गत समिती स्थापन न करणा-या कार्यालयांचे परवाना रद्द किंवा व्यवसाय पुढे सुरु ठेवण्यास मज्जाव करण्यात येईल. अंतर्गत तक्रार समितीमध्ये किमान ०५ सदस्य असावेत, समितीची अध्यक्ष महिलाच असावी, समितीमध्ये ५०टक्के पेक्षा जास्त महिलांचा समावेश असावा व एका अशासकीय सदस्याचा समावेश करण्यात यावा.
  कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध,मनाई व निवारण ) अधिनियम २०१३ मधील कलम २६ नुसार जर एखादया मालकाने (अ) अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही (ब) कलम १३,१४,२२ नुसार कारवाई केली नाही (क) या कायदयातील नियमातील विविध तरतुदींचे व जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यास मालकाला ५० हजार रुपयापर्यंत दंड होईल. तसेच हाच प्रकार पुन्हा केल्यास परवाना रद्द, दुप्पट दंड अशी तरतुद आहे. अधिनियमाची अंमलबजावणी व कार्यवाही करण्या जिल्हाधिकारी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांची नेमणुक केली आहे.तसेच निवासी उप जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक तालुका स्तरावर संरक्षण अधिकारी यांना समन्वयक अधिकारी म्हणून घोषित केले आहे. तेव्हा तालुकास्तरावर महिला व बाल विकास विभाग, संरक्षण अधिकारी कार्यालयात जावून नियुक्त केलेल्या संरक्षण अधिकारी यांचेकडे अंतर्गत तक्रार समिती गठीत केल्याचा अहवाल सादर करावा. समिती गठीत करण्यास काही तांत्रिक व इतर अडचण आल्यास बुलडाणा तालुका कार्यक्षेत्रासाठी ईमेल
protectionofficer.wed.bul@gmail.com संपर्क क्र. व whatsapp no ९७६३७९१५८८ वर संपर्क साधावा, असे आवाहन रामेश्वर वसु,संरक्षण अधिकारी,महिला व बाल विकास विभाग,अभय केंद्र,संरक्षण अधिकारी कार्यालय,बुलडाणा यांनी केले आहे.
******


जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन 
बुलडाणा, (जिमाका) दि. १९: जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 
******

Friday 18 February 2022

DIO BULDANA NEWS 18.2.2022

 कोरोना अलर्ट : प्राप्त 482 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 26 पॉझिटिव्ह

  • 61 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 508 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 482 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 26 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 25 व रॅपिड चाचण्यांमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 161 तर रॅपिड टेस्टमधील 321 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 482 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  शेगावं शहर : 1, बुलडाणा शहर : 2, चिखली शहर : 12, चिखली तालुका : अमडापूर 2, कोलारा 1, बेराळा 1, वळती 1, सांगवी 1, चांधई 1,  मेहकर तालुका : लव्हाळा 1, कळमेश्वर 1, खामगां तालुका : बोर जवळा 1, खामगांव शहर : 1,   अशाप्रकारे जिल्ह्यात 26 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 61 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान बुलडाणा येथील 54 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 796459 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 97835 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 97835 आहे.  आज रोजी 1105 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 796459 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98819 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 97835 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 297 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 687 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

******


नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज परतावा योजनेचा लाभ द्या

- खासदार प्रतापराव जाधव

*दिशा समिती बैठक

*चिखली-धाड रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करा

*भिंगारा गावाच्या रस्त्यासाठी वन विभागाने आपल्या अधिकार क्षेत्रात परवानगी द्यावी

*जनधन योजनेच्या खातेधारकांना विम्याचा लाभ द्यावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : शेतकरी दरवर्षी खरीप हंगाम, रब्बी हंगामासाठी पिक कर्ज घेत असतो. शेतकरी आपल्या पीक कर्जाचे 30 जुनच्या आत नियमित परतफेडही करतो. अशा शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या 4 टक्के व्याज परतावा योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना केंद्रीय ग्रामीण विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी आज दिल्या.

    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात दिशा (जिल्हा विकास समन्वयन व सनियंत्रण समिती) समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना खासदार श्री. जाधव बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प अध्यक्ष मनीषा पवार, बुलडाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. इंगळे  उपस्थित होते. तसेच सभागृहात जि.प सभापती राजेंद्र पळसकर, सि.राजा नगराध्यक्ष सतिष तायडे, मोताळा नगराध्यक्ष माधुरी देशमुख आदींसह विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

    जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांची कामे दर्जेदार करण्याच्या सुचना करीत खासदार म्हणाले, रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. दर्जाबाबत कुठलीही तडजोड चालणार नाही. रस्ता काम करताना कंत्राटदाराने सुरक्षा नियम पाळावेत. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना जनतेच्या तक्रारींचे निरसन करावे. रस्ता कामामुळे शेतीचे नुकसान झाल्यास त्यांना कंत्राटदराने नुकसान भरपाई द्यावी. काम पूर्ण झाल्यानंतरच कंत्राटदराला देयकाची अदायगी करावी. चिखली – धाड रस्त्याचे काम बऱ्याच वर्षापासून खोळंबले आहे. या रस्त्यावर अपघात होत असून गतीने या रस्त्याचे काम पूर्ण करावे. रस्त्यासाठी देण्यात आलेल्या उत्खननाच्या परवानग्या तपासण्यात याव्या. दोषींवर दंडात्मक कारवाई करावी.  खामगांव- चिखली रस्त्यावरील पेठ जवळील पूलाचे काम मार्गी लावावे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी.

    अतिदुर्गम भिंगारा गावाच्या रस्ता कामासाठी वन विभागाने परवानगी देण्याच्या सूचना देत खासदार श्री. जाधव म्हणाले, भिंगारा गावाच्या रस्त्यासाठी एक हेक्टर पर्यंत जमिनीचा प्रस्ताव तयार करावा. वन विभागाने या रस्त्यासाठी आपल्या अधिकार क्षेत्रात येणारी परवानगी तातडीने द्यावी. हा रस्ता पाच मीटर रूंदीचा करण्यात यावा. जिल्ह्यात मनरेगा योजनेतून कामांची संख्या वाढवावी. त्यासाठी 60 : 40 चा रेशो जिल्हा, तालुका स्तरावर ठेवावा. अकुशल कामाची संख्या वाढवून यामधून ग्रामपंचायत भवन, शाळा खोल्या, तलाठी कार्यालय, अंगणवाडी बांधकाम सारखी कामे करावी. यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची मर्यादा नाही. त्यामुळे जिल्ह्यात मनरेगाची कामे वाढवावी. मजूरांच्या मस्टरची ऑनलाईन नोंदणी आठवड्याच्या आतच करावी. मस्टर नोंदणीसाठी लॉगीन आयडी रोजगार सेवकाकडे द्यावे. जेणेकरून मस्टर नोंदणी वेगाने होईल. भारतनेट प्रकल्पातंर्गत ग्रामपंचायत पर्यंत इंटरनेट जोडणी असल्याबाबत खात्री करावी. ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट जोडणी देवून नागरीकांना सुविधा देण्यात याव्यात.

  ते पुढे म्हणाले, जिगांव प्रकल्पातंर्गत पुनर्वसन होत असलेल्या गावांमध्ये घरांचा मोबदला द्यावा. घरांचा मोबदला तातडीने दिल्यास नागरिक नवीन पुनर्वसित गावात राहायला जातील. पुनर्वसनाची कामे गतीने पुर्ण करावी. जल जीवन मिशन अंतर्गत प्रगती पथावरील कामे कालमर्यादेत पूर्ण करावी. तसेच नवीन कामांचेही नियोजन करावे. पुढील खरीप हंगामाचे पीक कर्ज वाटपास विलंब न करता एप्रिल महिन्यापासूनच पीक कर्जाचे वाटप सुरू करावे. त्यामुळे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होईल. जिल्ह्यातील जन धन खातेधारक नागरिकांना 2 लक्ष रूपयांचा अपघाती विमा मिळतो. मात्र याबाबत जनजागृती नाही. तरी बॅकांनी जनधन खातेधारकाला खातेधारकाचा मृत्यू झाल्यास मिळत असलेल्या 2 लक्ष रूपये विम्याचा लाभ द्यावा. गावांमध्ये कृषि सहायकांनी गावातील एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्याकडील जन धन खात्याची माहिती घेवून संबंधित बँकेकडे विम्याच्या प्रदानासाठी प्रयत्न करावे.  तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये प्रपत्र ड ची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये बरीच गरजू लाभार्थ्यांची नावे वगळली आहे. तरी याबाबत पुर्नसर्वे करण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा.  

    बैठकीला प्रकल्प संचालक श्री. इंगळे यांनी माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                                                                ******************

शासकीय हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

  • जिल्ह्यात 9 खरेदी केंद्रांना मान्यता ; 5230 रूपये प्रति क्विंटल हमी भाव

बुलडाणा,(जिमाका) दि. 18 : जिल्ह्यात चालू हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी हमीदर 5230 रुपये प्रती क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी 16 फेब्रुवारी 2022 पासून शासकीय हरभरा खरेदी सुरू करण्यात आली आहे.

     हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात 9 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातंर्गत बुलडाणा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, देऊळगांवराजा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, लोणार तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, मेहकर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, शेगांव तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, संत गजानन कृषी विकास शेतकी उत्पादन कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोडयुसर कंपनी सुलतानपुर केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, मॉ जिजाऊ फार्मर प्रोडयुसर कंपनी केंद्र सिंदखेडराजा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली केंद्र उंद्री ता. चिखली, अशी 9 खरेदी केंद्रांना हरभरा खरेदी करीता मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात 16 फेब्रुवारी 2022 रोजी पासून नोंदणी सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

हरभरा खरेदी नोंदणी करण्याकरीता शेतकऱ्यांनी आधारकार्ड, 7/12 ऑनलाईन पिक पेरासह, बँक पासबुकाची आधार लिंक केलेली झेरॉक्स, मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रांसह संबंधित खरेदी केंद्रावर जाऊन खरेदी करीता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

                                                                                    *****

जिल्ह्यात ज्वारी व मका खरेदीला मुदतवाढ

· 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार खरेदी

बुलडाणा,(जिमाका) दि.18 : जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनाच्यावतीने हमी दराने मका व ज्वारी खरेदी 31 जानेवारीपर्यंत सुरू होती. मात्र या खरेदीस मुदतवाढ देण्यात आली असून आता 28 फेब्रुवारी पर्यंत खरेदी सुरु राहणार आहे.शेतकऱ्यांची नोंदणी यापूर्वी झालेली आहे. मात्र त्यांची खरेदी करण्यात आलेली नाही, अशा शेतकऱ्यांच्या मका व ज्वारी शेतमालाची खरेदी होणार आहे. या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची नवीन नोंदणी होणार नाही.

   तसेच जिल्ह्यामध्ये मका व ज्वारी खरेदीसाठी 16 केंद्रांना मान्यता दिली आहे. यामध्ये तालुका शेतकी सह. खरेदी विक्री समिती मर्या. बुलडाणा, मेहकर, लोणार, संग्रामपूर, मलकापूर, दे. राजा, जळगाव जामोद व खामगाव यांचा समावेश आहे. तसेच संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल अँग्रो प्रोड्युसर कंपनी, सुलतानपुर केंद्र- साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्या. चिखली, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी नारायणखेड केंद्र - सिंदखेडराजा, नांदुरा अँग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी नांदुरा केंद्र- वाडी व पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी मोताळा / मलकापूर या केंद्रांना मान्यता दिलेली आहे.

     संबंधित संस्थांनी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या 7/12 वरील पूर्ण क्षेत्रावर खरेदी न करता पिक पेरानुसारच खरेदी करण्यात यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी हमीदराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

Thursday 17 February 2022

DIO BULDANA NEWS 17.2.2022

 कोरोना अलर्ट : प्राप्त 407 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 23 पॉझिटिव्ह

  • 192 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 430 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 407 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 23 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 16 व रॅपिड चाचण्यांमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 160 तर रॅपिड टेस्टमधील 247 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 407 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  बुलडाणा शहर : 1, बुलडाणा तालुका : धाड 1, लोणार शहर : 2, लोणार तालुका : महारचिकना 1, कुंबेफळ 2, चोरपांग्रा 4, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, चिखली शहर : 8, चिखली तालुका : चंदनपूर 1, भालगांव 1,   मलकापूर शहर : यशोधाम 1,   अशाप्रकारे जिल्ह्यात 23 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 192 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 795977 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 97774 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 97774 आहे.  आज रोजी 1198 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 795977 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98793 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 97774 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 333 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 686 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

******

पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन

·        पाच प्रकारच्या स्पर्धा; प्रवेशिका स्वीकारण्याची मुदत 15 मार्चपर्यंत

       बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्त्व विषद करण्याकरिता भारत निवडणूक आयोगाने माझे मत माझे भविष्य  एका मताचे सामर्थ्य या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वीपद्वारे मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमांतर्गत निवडणूक आयोग हा नेहमीच लोकांच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर करून लोकशाही बळकट करत असतो.

            भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन केले असूनयात एकूण पाच प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यात प्रश्नमजुंषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, गीत गाण्याची स्पर्धा, व्हिडिओ तयार करण्याची स्पर्धा आणि भित्तिचित्र स्पर्धेचा समावेश आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी असून स्पर्धेच्या प्रवेशिका 15 मार्च 2022 पर्यंत स्वीकारण्यात येतील.

            गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धेकरिता श्रेणी ठरविण्यात आली असूनसंस्थात्मक श्रेणीअंतर्गत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा राज्य किंवा केंद्र सरकारच्या नोंदणीकृत संस्थांना या संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल. व्यावसायिक श्रेणीअंतर्गत ज्या व्यक्तिंचे उदरनिवार्हाचे मुख्य स्त्रोत गायन/ व्हिडिओ मेकिंग/भित्तीचित्र असा आहे, अशी व्यक्ती व्यावसायिक श्रेणीत गणली जाईल. हौशी श्रेणीअंतर्गत गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र हा छंद म्हणून करत असलेली व्यक्ती हौशी म्हणून गणण्यात येईल.

            गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धेकरिता तीन श्रेणीत वर्गीकरण करण्यात आले असून संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी या श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक श्रेणीला विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिकेही दिली जाणार आहे. संस्थात्मक श्रेणीमध्ये 4 विशेष उल्लेखनीय तर व्यावसायिक आणि हौशी श्रेणीसाठी 3 विशेष उल्लेखनीय पारितोषिके देण्यात येणार आहे.

            गीत स्पर्धा : संस्थात्मक श्रेणी प्रथम पारितोषिक रूपये एक लाख, द्वितीय पारितोषिक रूपये 50 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 30 हजार तसेच विशेष उल्लेखनीय 15 हजार रूपयेव्यावसायिक श्रेणीसाठी प्रथम पारितोषिक रूपये 50 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 30 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 20 हजार तसेच विशेष उल्लेखनीय 10 हजार रूपयेहौशी श्रेणीसाठी प्रथम पारितोषिक रूपये 20 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 10 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 7 हजार 500 तसेच विशेष उल्लेखनीय 3 हजार रूपये,

            व्हिडिओ मेकिंग स्पर्धा : संस्थात्मक श्रेणी प्रथम पारितोषिक रूपये दोन लाख, द्वितीय पारितोषिक रूपये एक लाख, तृतीय पारितोषिक रूपये 75 हजार तसेच विशेष उल्लेखनीय 30 हजार रूपयेव्यावसायिक श्रेणीसाठी प्रथम पारितोषिक रूपये 50 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 30 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 20 हजार तसेच विशेष उल्लेखनीय 10 हजार रूपयेहौशी श्रेणीसाठी प्रथम पारितोषिक रूपये 30 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 20 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 10 हजार तसेच विशेष उल्लेखनीय 5 हजार रूपये,

            भित्तिचित्र स्पर्धा : संस्थात्मक श्रेणी प्रथम पारितोषिक रूपये 50 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 30 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 20 हजार तसेच विशेष उल्लेखनीय 10 हजार रूपयेव्यावसायिक श्रेणीसाठी प्रथम पारितोषिक रूपये 30 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 20 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 10 हजार तसेच विशेष उल्लेखनीय 5 हजार रूपयेहौशी श्रेणीसाठी प्रथम पारितोषिक रूपये 20 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 10 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 7 हजार 500 तसेच विशेष उल्लेखनीय 3 हजार रूपये,

            घोषवाक्य : स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक रूपये 20 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 10 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 7 हजार पाचशे तसेच सहभागी होणाऱ्यापैकी 50 स्पर्धकांना प्रत्येकी 2 हजार रूपये उल्लेखीनय पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहे.

            प्रश्नमंजुषा स्पर्धेकरिता भाग घेणाऱ्या विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येणार असून तीसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्रे देण्यात येतील.

            या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच स्पर्धेचे नियम, अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेच्या http://ecisveep. nic.in/contest/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्याचप्रमाणे स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी सर्व प्रवेशिका दि. 15 मार्च 2022 पर्यंत voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठवाव्यात तसेच ईमेल करताना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा, असे उपजिल्हाधिकारी निवडणूक गौरी सावंत यांनी कळविले आहे.

                                                            *******

नेहरु युवा केंद्राव्दारा राष्ट्रीय युवा संसदचे आयोजन

* जिल्हास्तरीय युवा संसदसाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन

       बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्रा संगठन व्दारा तिसरा राष्ट्रीय युवा संसद उत्सव 2021-22  पुढील महिन्यात मार्च 2022 मध्ये  नवी दिल्ली येथे होणार आहे. युवांच्या नेतृत्व आणि वक्तृत्व गुणांना वाव देण्यासाठी नेहरू युवा केंद्रातर्फे राष्ट्रीय युवा संसद उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. या युवा संसद उत्सवात राष्ट्रीय स्तरावर विजयी होणाऱ्या स्पर्धकांना  अनुक्रमे प्रथम दोन लाख, व्दितीय दीड लाख आणि तृतीय एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.  

  जिल्हास्तरावर विजयी स्पर्धक राज्यस्तरावर व राज्यस्तरावरील विजयी स्पर्धक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र ठरणार आहे.  जिल्हयाच्या  जिल्हास्तरीय युवा संसद उत्सवाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे.    या करीता पात्रता – स्पर्धकाचे वय  13 फेब्रुवारी रोजी 15 ते 29 वयोगट दरम्यान असावे. स्पर्धेकरीता वेळ 4 मिनिट असून इंक्रेडीबल इंडिया, आयुष्यमान भारत, बेटी बचाव, बेटी पढाव, स्किल इंडिया, डिजीटल इंडिया, स्वच्छ भारत- स्वस्थ भारत या पैकी एका विषयांवर चार मिनिटात आपले वक्तृत्व  ऑनलाईन पध्दतीने सादर करता येणार आहे.

   वक्तृत्व स्पर्धेची भाषा हिंदी, इंग्रजी व मराठी आहे. जिल्हास्तरीय युवा संसदेसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत 21 फेब्रुवारी आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी फोटो आणि वयाच्या पुराव्यासह विहित नमून्यातील अर्ज नेहरू युवा केंद्र, बुलडाणा, फ्लॅट क्रमां 202, डीएसडी सीटी मॉल, बुलडाणा कार्यालयात सादर करावे. तसेच https://drive.google.com/ file/d/1wtIVo_-mtYXYIaVcDBHke5s0NLM4Q g0l/view?usp=sharing लिंकवर विहित नमून्यातील अर्ज  मिळेल. तरी युवक-युवतींनी  राष्ट्रीय युवा संसद उत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नेहरु युवा केंद्र बुलडाणाचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.

                                                                        ******

औद्योगिक आवेदनपत्रधारक घटकांनी डेटा अपडेट करावा

            बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने  25 मार्च 2021 पासून आयईएम अर्ज भरण्यासाठी एक सुधारित जी 2 बी पोर्टल (http://services.dipp.gov.in/lms) सुरू केले आहे. एका आयईएम कंपनी, व्यावसायिक घटकाच्या नावे त्याच्या युनिटच्या स्थानाचा विचार न करता केवळ एकच आयईएम जारी केला जात आहे. या करीता अर्जदारांना पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या आयईएम संदर्भात डेटा अपडेट अथवा पुनर्प्रमाणित करण्यासाठी   दि.15.07.2021 पासून जी 2 बी पोर्टलमध्ये एक वेगळी विंडो प्रदान करण्यात आली आहे. अर्जदारांना ऑनलाईन प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी वापरकर्ता मॅन्युअल आणि व्हिडिओ ट्यूटोरियल जी 2 बी पोर्टलवर उपलब्ध करून दिले आहेत.

            जरी संबंधित आयईएम (औद्योगिक आवेदनपत्र धारक) घटकामध्ये कोणताही बदल नसला तरीही सर्व आयईएम धारकांना नव्याने उपलब्ध करुन दिलेल्या पोर्टलवर पुन्हश्च अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या करीता कोणतेही शुल्क आकरले जाणार नाही. सर्व अर्जदारांना आवश्यक तेथे आधारभूत कागदपत्रे जोडावी लागणार असून अशा सर्व अर्जांची पुन्हश्च पडताळणी करताना अर्जदारांना एक क्यु.आर.कोड आधारीत पोचपावती दिली जाणार असल्याचे नमूद केले आहे.

           जिल्हयातील सर्व उद्योग घटक, औद्योगिक संघटना, आय.ई.एम.धारक यांचे पर्यंत याबाबतची माहिती पोहचण्या करीता स्थानिक पातळीवर जनजागृती होणे आवश्यक आहे तसेच प्रत्यक्षात उत्पादनात गेलेल्या उद्योग घटकांकडून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर संपर्क साधून त्वरीत IEM पार्ट ‘बी’ भरुन घेणे आवश्यक आहे. उत्पादनापुर्वीच्या इतर टप्प्यातील IEM धारक उपक्रमांनी नव्या संकेतस्थळावर पार्ट ‘A’ बाबतची नोंदणी करावी, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी केले आहे.

                                                                        *********

बाल न्याय मंडळाच्या फिरत्या बैठकीचे लोणार येथे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये बाल न्याय मंडळाच्या फिरत्या, तात्पुरत्या बैठकीचे आयोजन 18 फेब्रुवारी 2022 रोजी आशा बालकाश्रम, हिरडव रोड लोणार येथे करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियम 6 पोटनियम 1 मधील प्रावधानानुसार विषयांवर चर्चा करण्यात येईल. तरी नागरिकांनी बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन बाल न्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी अमोलकुमार देशपांडे यांनी प्रसिद्धीर पत्रकान्वये केले आहे.

                                                                        ********

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाचे स्थलांतरण

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : बांधकाम कामगारांच्या कल्याणाकरीता शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडाळाअंतर्गत 90 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेल्या बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण करण्यात येते. यानंतर नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रदान करण्यात येतो. यासाठी जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाचे कार्यालय, सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, हॉल क्रं 4 अ, बस स्थानकासमोर, बुलडाणा येथे सुरू होते. मात्र मंडळाकरीता जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

    सदर कार्यालय पद्माकर पाटील यांचे घर, प्लॉट क्रमांक 156, रामनगर, चिंचोले चौक, बुलडाणा येथे सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 8263056533 आहे. तरी सर्व बांधकाम कामगारांनी मंडळाशी संबंधित कामकाजासाठी पद्माकर पाटील यांचे घर, प्लॉट क्रमांक 156, रामनगर, चिंचोले चौक, बुलडाणा या कार्यालयाशी संपर्क साधून आपले कामकाज करून घ्यावे, असे आवाहन उपकार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, तथा सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा यांनी केले आहे.  

                                                                                                ******