सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखक पदांसाठी मुदतवाढ ऑनलाईन अर्जासाठी पर्यायी वेबलिंक व QR कोड उपलब्ध

 

बुलढाणा, (जिमाका) दि. 05 : सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत सरळसेवेने भरण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक (गट-क) पदांच्या भरतीसाठी दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार तसेच दि. 07 डिसेंबर 2025 च्या शुद्धीपत्रकानुसार उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विभागाच्या संकेतस्थळावर वेबलिंक उपलब्ध करून देण्यात आली होती.

मात्र, सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ तांत्रिक कारणामुळे दि. 26 डिसेंबर 2025 पासून निष्क्रीय झाल्याने इच्छुक उमेदवारांना अर्जासाठी आवश्यक असलेल्या वेबलिंकपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. ही अडचण लक्षात घेता उमेदवारांच्या सोयीसाठी अर्ज सादर करण्यासाठी पर्यायी वेबलिंक व QR कोड (https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32786/96173/Index.html) उपलब्ध करून देण्यात आला आहे.

त्यानुसार, उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबलिंक किंवा QR कोडचा वापर करून आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत. तसेच, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत वाढविण्यात येऊन दि. 9 जानेवारी 2026 रोजी रात्री 23.59 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती सैनिक कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित कालावधीत अर्ज सादर करावे, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या