प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात हप्ते वितरण सुरळीत Ø निधीची कमतरता नाही
बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : केंद्रशासन स्तरावरून देशामध्ये निधी
वितरणाच्या प्रणालीमध्ये सुधारणा करून नवीन एसएनए-स्पर्श प्रणाली कार्यान्वित करण्यात
आली आहे. या प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदानाचे हप्ते वितरीत करण्याची कार्यवाही
पंचायत समिती स्तरावरून सुरू करण्यात आली असून ती सुरळीतपणे सुरू आहे.
बुलढाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2.0 अंतर्गत सन
2024-25 व 2025-26 या कालावधीसाठी 1 लाख 3 हजार 456 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली
आहे. त्यापैकी आतापर्यंत 90 हजार 114 लाभार्थ्यांना पहिला हप्ता, 33 हजार 202 लाभार्थ्यांना
दुसरा हप्ता, तर 19 हजार 398 लाभार्थ्यांना तिसरा हप्ता पंचायत समिती स्तरावरून वितरीत
करण्यात आला आहे. उर्वरित लाभार्थ्यांना देखील टप्प्याटप्प्याने हप्ते वितरणाची कार्यवाही
सुरू आहे.
Ø घरकुलांसाठी
निधी उपलब्ध
सद्यस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2.0 अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यासाठी
एसएनए-स्पर्श प्रणालीवर 196.43 कोटी रुपये निधी उपलब्ध असून, त्यापैकी 56.99 कोटी रुपये
निधी खर्च करण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यासाठी 136.44 कोटी रुपये निधी शिल्लक
आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात घरकुल बांधकामासाठी अनुदान वितरीत करण्यास निधीची
कोणतीही कमतरता नसून, लाभार्थ्यांनी बांधकामाच्या प्रगतीनुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण
करून हप्त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment