नाशिक छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती; मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 05 : युपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या Combined Defence Services (CDS) Examination-2026 च्या तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे तज्ज्ञ प्राध्यापकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक तज्ज्ञ प्राध्यापकांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

तज्ज्ञ प्राध्यपकांची नियुक्ती 300 रुपये प्रती तासिका या मानधनावर करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधी सीडीएस-66 कोर्ससाठी दि. 19 जानेवारी ते 3 एप्रिल 2026 तर सीडीएस-67 कोर्ससाठी दि. 15 जून ते 28 ऑगस्ट 2026 राहिल. 

इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान-I (सामान्य ज्ञान, भूगोल, इतिहास, भारतीय राजकारण) तसेच सामान्य विज्ञान-II (अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) या विषयांमध्ये तज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.  प्राध्यापक पदसाठी शैक्षणिक अर्हता संबंधित विषयातील पदवीधर अथवा पदव्युत्तर तज्ञ प्राध्यापक असणे आवश्यक असून, स्पर्धा परीक्षांच्या अध्यापनाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.

अर्हता पूर्ण करणाऱ्या तज्ञ प्राध्यापकांनी संपूर्ण कागदपत्रांसह दि. 9 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता मुलाखतीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे उपस्थित राहावे, असे आवाहन ले. कर्नल विलास शंकर सोनवणे (नि.), प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9156073306 किंवा दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या