नोकरदार महिलांसाठी बुलढाण्यात ‘सखी निवास’ वसतिगृह
महिलींनी योजनेचा लाभ घ्यावा
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांचे आवाहन
बुलढाणा, दि. 29 (जिमाका) : केंद्र व राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या
वतीने कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाऊंडेशन बुलढाणा या स्वयंसेवी संस्थेच्यामार्फत जिल्हा
महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणाखाली बुलढाण्यातील लव्ह ट्रस्ट समोर
खामगाव रोड येथे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ‘सखी निवास’ हे वसतिगृह सुरु करण्यात आले आहे.
या
वसतीगृहामध्ये शासकीय, निमशासकीय, किंवा खाजगी नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सर्व सोयीसुविधांनी
युक्त निवास स्थान उपलब्ध आहे. या वसतीगृहा मध्ये निवास स्थानासाठी सुसज्य व प्रशस्त
इमारत, इमारती मध्ये अत्याधुनिक सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची निगराणी, इमारतीसाठी सुरक्षा
रक्षक, पिण्यासाठी शुद्ध व थंड पाण्याची व्यवस्था, २४ तास गरम पाणी,महिलांना फिरायला
मोकळी जागा असणार आहे.
याकरिता
बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, किंवा खाजगी नोकरी करणाऱ्या महिलांसाठी महिला
बालविकास विभागाच्या या योजनेचा जास्तीत जास्त निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनी लाभ घेवून
सखी निवासच्या व्यवस्थापक मिनाक्षी झिने, कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाऊंडेशन बुलढाणा
यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी
केले आहे.
०००
Comments
Post a Comment