मृत महिलाची (सरस्वती मालटे) ओळख पटविण्याबाबत आवाहन

 



बुलडाणा, (जिमाका) दि. 14:  बुलढाणा (ग्रामीण) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरवंड येथील दिव्य प्रकल्प आश्रमात वास्तव्यास असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला असून, तिची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आश्रमाचे संचालक अशोक काकडे यांनी सदर मृत महिलेचे नाव सरस्वती प्रल्हाद मालटे, वय 46 वर्षे, रा. दिव्या फाउंडेशन, वरवंड, ता.जि. बुलढाणा असे सांगितले आहे. मात्र ही महिला बेवारस असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मृत महिलाचे नातेवाईक अथवा ओळखीची व्यक्ती असल्यास पोलीस स्टेशन, बुलढाणा(ग्रामीण) येथे किंवा तपास अधिकारी  8888811714 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या