Tuesday 30 June 2020

DIO BULDANA NEWS 30.6.2020

अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला
  • ओळख पटविण्याचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.30 : एका अनोळखी इसमाचा मृतदेह भवन निवास, ढासाळवाडी तलावासमोर, ढासाळवाडी येथे आढळून आलेला आहे. या मृतकाच्या अंगावर लाल – पांढऱ्या रंगाचे चौकडीचे शर्ट, शर्टाचे आत काळ्या – भुरकट रंगाची टी शर्ट व निळ्या रंगाची कॉटन पॅन्ट घातलेली आहे. मृतकाचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष आहे. याप्रकरणी ढासाळवाडी येथील पोलीस पाटील सौ. रेखा अजय शेवाळे यांनी रायपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार रायपूर पोलीसांनी मर्ग दाखल केला आहे. तरी वर नमूद वर्णन केलेल्या इसमाची ओळखीचा असल्यास त्यांनी तात्काळ रायपूर पोलीस स्टेशनला किंवा 07262-270030 क्रमांकावर संपर्क करावा,  असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून रायपूर पोलीस स्टेशनने केले आहे.
*****
                           जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेवर अशासकीय सदस्यांची निवड करण्यात येणार
बुलडाणा,(जिमाका) दि.30 : जिल्ह्यातील ग्राहक सरंक्षण परीषदेवर रिक्त असलेल्या अशासकीय सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध प्रवर्गातील पात्र संस्था व व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्जाचा नमुना व पात्रतेबाबतचे निकष जिल्ह्याच्या www.buldhana.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले आहे. तरी इच्छूकांनी प्रसिद्धीच्या 30 दिवसाचे आत अर्ज सादर करावयाचे आहे.
   सदर अर्ज जिल्हा पुरवठा कार्यालय, बुलडाणा येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.45 ते सायं 6.15 वाजेपर्यंत स्वीकृत केले जाणार आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही किंवा विचारात घेतले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. जिल्ह्यातील अशासकीय सदस्यांची पदे भरण्यासाठी यापूर्वी काढण्यात आलेल्या सर्व जाहीरातीच्या अनुषंगाने प्राप्त झालेले सर्व अर्ज रद्द करण्यात येत आहे .नव्याने फेरप्रक्रिया राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे, अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
प्रवर्गनिहाय रिक्त पदे : जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवर्गातून 2 पदे रिक्त, नगर परिषदेचे सदस्य प्रवर्गातून 2 पदे रिक्त, पंचायत समितीचे सदस्य प्रवर्गातून 2 पदे रिक्त, कृषि उत्पन्न बाजार समिती सदस्य प्रवर्गातून 2 पदे रिक्त, ग्राहक संघटना / अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी प्रवर्गातून 10 पदे रिक्त, शाळा / महाविद्यालयाचे प्रतिनिधी प्रवर्गातून प्रत्येकी एक प्रमाणे 2 पदे रिक्त, वैद्यकीय व्यवसायांचे प्रतिनिधी प्रवर्गातून 2 पदे रिक्त, पेट्रोल व गॅस विक्रेत्यांचे प्रतिनिधी प्रवर्गातून प्रत्येकी एक प्रमाणे 2 पदे रिक्त, व्यापार व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी प्रवर्गातून प्रत्येकी एक प्रमाणे 2 पदे रिक्त आणि शेतकरी प्रतिनिधी प्रवर्गातून 2 पदे रिक्त आहेत. अशाप्रकारे 28 पदे रिक्त आहेत.
                                                            ******
सांख्यिकी कार्यालयात राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा
बुलडाणा,(जिमाका) दि.30 : विश्वविख्यात संख्या शास्त्रज्ञ स्व. प्रा. प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन 29 जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा सांख्यिकी कार्यालयात शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा सांख्यिकी अधिकारी रा. गं ढोकणे यांनी दिपप्रज्वलन  करून महालनोबिस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
   यावर्षीच्या राष्ट्रीय सांख्यिकी दिनाची मध्यवर्ती संकन्ल्पना ‘शाश्वत विकास ध्येय व कोरोना विषाणू संसर्ग’ अशी होती. या दिनानिमित्ताने राज्य व केंद्र शासनातर्फे विविध कार्यक्रमाद्वारे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करण्यात आले. तसेच राज्याचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक रा.र शिंगे यांच्या अध्यक्षतेखाली गुगल मिटद्वारे कार्यक्रम पार पडला. यावेळी  शाश्वत विकास ध्येय अंतर्गत आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे , लिंग समानता व स्त्रीया – मुलींचे सक्षमीकरण करणे शाश्वत विकास ध्येय -2030 हा उपक्रम राज्य स्तरावर राबविण्याकरीता संचालनालयाची राज्य शासनाद्वारे राज्य नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे शासनाच्या विविध विभागातर्फे शाश्वत विकास ध्येय राबविण्याकरीता विविध योजनांमार्फत सदर ध्येय साध्य करण्यासाठी कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हा कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
                                                                                ******
--

Saturday 27 June 2020

DIO BULDANA NEWS 27.6.2020

केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स सशर्त सुरु करण्यास परवानगी
·          जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
·        प्रतिबंधीत क्षेत्रात परवानगी नाही
बुलडाणा, दि.27 (जिमाका): जिल्ह्यातील केशकर्तनालये, सलून्स व ब्युटी पार्लर्स काही अटी व शर्तीस अधिन राहून सुरु करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी  दिले आहेत.
     दिनांक 14 मार्च 2020 पासून कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. 
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 1 जुन 2020 रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यात लॉकडाऊनची मुदत दिनांक 30 जून 2020 रोजी रात्री 12 वा. पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.  या आदेशामध्ये केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटीपार्लर्स प्रतिबंधित करण्यात आलेली होती.  मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या दिनांक 25 जून 2020 आदेशामध्ये केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स काही अटी व शर्तीस अधिन राहून प्रतिबंधित क्षेत्र वगळून उर्वरीत जिल्ह्यात दिनांक 28  जुन 2020 पासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी जिल्ह्यातील  केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स खालील अटी व शर्तींना अधिन राहून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार  सलून्स, ब्युटी पार्लर व केशकर्तनालये यामध्ये केवळ निवडक सेवा जसे की, केस कापणे, केसांना रंग (डाय) करणे, वॅक्सींग, थ्रेडींग आदी सेवांनाच परवानगी असेल. त्वचेशी संबंधित सेवांना परवानगी असणार नाही. या सेवा दिल्या जाणार नाहीत असा फलक दुकानामध्ये दर्शनी भागामध्ये सर्वांना दिसेल असा लावण्यात यावा.
  दुकान, ब्युटी पार्लर चालक / कर्मचाऱ्यांनी संरक्षक साधने जसे की, हातमोजे (हॅन्ड ग्लोव्हज), ॲप्रन व मास्क वापरणे बंधनकारक असेल. ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा यासारखी प्रत्येक वस्तू सॅनीटज्ञईज करावी लागेल. अशा दुकानातील वापराचा सर्वसाधारण भाग, पृष्ठभाग हा दर दोन तासांनी सॅनीटाईज करणे बंधनकारक असेल.     
   टॉवेल, नॅपकीन्स यांचा वापर एका ग्राहकासाठी एकाचवेळी करणे बंधनकारक राहील.  दुसऱ्या ग्राहकासाठी त्याचा वापर करण्यात येवू नये. . नॉन डिस्पोजेबल साधने प्रत्येक वापरानंतर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल. प्रत्येक दुकानात ग्राहकांच्या माहितीसाठी वरील सर्व खबरदारीच्या सूचना दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. शहरी भागात मुख्याधिकारी व ग्रामीण भागात ग्रामसेवक यांनी वेळोवेळी पाहणी करून आदेशाचे पालन होत नसल्यास संबंधीतांवर तात्काळ शॉप ॲक्ट व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कार्यवाह करावी व परवाना रद्द करावा.  उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही यात म्हटले आहे.
*****************
                   



            कोरोना अलर्ट : प्राप्त 50 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 15 पॉझिटिव्ह
  • एका रूग्णाची  कोरोनावर मात
बुलडाणा,(जिमाका) दि.27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 65 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 50 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 15 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये धामणगांव बढे ता. मोताळा येथील 75 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगी, 47 वर्षीय महिला व 42 वर्षीय महिला रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे धा. बढे येथे 6 रूग्ण आढळले आहे.
    तसेच  मोहनपुरा मलकापूर येथील 30 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरूण, 37 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय पुरूष संशयीत रूग्ण पॉझीटीव्ह आले आहे. तसेच मलकापूर येथील 45 वर्षीय पुरूष, मँगो हॉटेल, मेहकर येथील 22 वर्षीय पुरूष, घासलेटपुरा नांदुरा येथील 6 वर्षीय मुलगा, 43 वर्षीय पुरूष व दाल फैल खामगांव येथील 75 वर्षीय वृद्ध पुरूष रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. अशाप्रकारे 15 अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहे.
  तसेच आज 1 रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे त्याला वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये चाळीस बिघा मलकापूर येथील 60 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे.  तसेच आजपर्यंत 2418 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 139 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 139 आहे.  तसेच आज 27 जुन रोजी 68 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 15 पॉझीटीव्ह, तर 50 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 101 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2418 आहेत.
      जिल्ह्यात आजअखेर एकूण 198 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 139 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 48 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 11 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Friday 26 June 2020

DIO BULDANA NEWS 26.6.2020

ढाई अखर पत्रलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर
  • एडेड हायस्कूलच्या अतुल राठोडला राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक
बुलडाणा,(जिमाका) दि.26 : भारतीय डाक विभागाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने सर्व वयो गटातील विद्यार्थ्यांसाठी ढाई अर पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा विषय प्रिय बापू, आप अमर है.. हा होता. बुलडाणा डाक विभागातून या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. या स्पर्धेमध्ये बुलडाणा येथील एडेड हायस्कूलचा वर्ग 10 वीचा विद्यार्थी अतुल रोहीदास राठोड याने महाराष्ट्र स्तरावरील प्रथम क्रमांकाचे 25 हजार रूपयांचे पारितोषिक पटकाविले आहे.
    बुलडाणा डाक विभागाचे अधिक्षक मनोहर पत्की यांनी स्वत: स्वयंस्फुर्तीने या विद्यार्थ्यांचा एडेड हायस्कूलमध्ये जावून गौरव केला. यावेळी बुलडाणा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे, सोसायटीचे सचिव ॲड बाळासाहेब कविमंडन, मुख्याध्यापक आर. ओ पाटील, बुलडाणा डाक विभागाचे निरीक्षक निलेश वायाळ, सुनील हिवराळे, कर्मचारी प्रमोद रिंढे, नितीन उमाळे, रामेश्वर सोळंकी, विद्यार्थ्याचे वडील रोहीदास राठोड आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी एडेड हायस्कूल व बुलडाणा डाक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले,असे अधिक्षक, डाक कार्यालय, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
************
जिल्हाधिकारी कार्यालयात
राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन
बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला त्यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन केले. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
********

कोरोना अलर्ट : प्राप्त 15 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 13 पॉझिटिव्ह
  • तीन रूग्णांनी केली कोरोनावर मात
बुलडाणा,(जिमाका) दि.26 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 28 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 15 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 13 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल सुलतानपूर ता. लोणार येथील 42 वर्षीय महिला, काळीपूरा मलकापूर येथील 74 वर्षीय वृद्ध पुरूष, बावनबीर ता. संग्रामपूर येथील 27 वर्षीय पुरूष संशयीत रूग्णाचा आहे. तसेच शादीखाना शेगांव येथील 60 वर्षीय पुरूष, अळसना ता. शेगांव येथील 45 वर्षीय पुरूष, खामगांव येथील 27 वर्षीय महिला, रामदास पेठ अकोला येथील 20 वर्षीय तरूण, 8 वर्षीय मुलगी व 12 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्याचप्रमाणे नांदुरा येथील 10 वर्षीय मुलगी, 12 वर्षीय मुलगी, 13 वर्षीय मुलगी व 24 वर्षीय पुरूष संशयीत रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आहे. अशाप्रकारे 13 अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहे.
  तसेच आज 3 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये जळगांव जामोद येथील 56 वर्षीय पुरूष, भिमनगर मलकापूर येथील 23 वर्षीय महिला व मलकापूर येथीलच 58 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.  
     तसेच आजपर्यंत 2368 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 138 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 138 आहे.  तसेच आज 26 जुन रोजी 28 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 13 पॉझीटीव्ह, तर 15 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 68 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2368 आहेत.
      जिल्ह्यात आजअखेर एकूण 183 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 138 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 34 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 11 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Thursday 25 June 2020

DIO BULDANA NEWS 25.6.2020



पोलीस दलाच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हिसीद्वारे केले मार्गदर्शन
बुलडाणा,(जिमाका) दि.25 : जिल्हा पोलीस दलाच्यावतीने कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय यांच्या तातडीच्या वैद्यकीय औषधोपचारासाठी स्व. दिपक जोग स्मृती भवन येथे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरचे फित कापून उद्घाटन आज 25 जुन रोजी जानेफळ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस काँन्स्टेबल पुजा राजपूत यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले, पोलीस उपअधिक्षक (गृह) बळीराम गिते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंके, पोलीस कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक  गिरीष ताथोड आदींची उपस्थिती होते.  
    तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी येथे व्हिसीच्या माध्यमातून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी कोविड केअर सेंटरविषयी माहिती दिली. सेंटरचे चित्रीकरणही यावेळी दाखविण्यात आले. दरम्यान, गृहमंत्री यांनी पॉस्को अंतर्गत दाखल असलेल्या केसमध्ये दोन वेळा अकोला सामान्य रूग्णालयात जावून आलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल पुजा राजपूत यांच्याविषयी चौकशी केली. त्यांच्या धाडसाचे त्यांनी कौतुक केले. त्यांच्याचहस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्याच्या सूचना देत त्यांच्यासमोर त्यांनी ऑनलाईन उद्घाटन करायला लावले.  त्यानुसार महिला काँन्स्टेबल पुजा राजपूत यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
  त्यानंतर रविकांत तुपकर यांच्याहस्ते कोविड केअर सेंटरच्या पलिकडील भागात असलेल्या उपहारगृहाचे भूमिपुजन करण्यात आले. तसेच कोविड केअर सेंटरसाठी घेण्यात आलेल्या विंधन विहीरीच्या पाण्याचे जलपूजनही करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                                                                                                ******
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध
  • दोषींवर कायदेशीर कारवाई
बुलडाणा,(जिमाका) दि.25 : साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदींच्या अधिन राहून कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास, थुंकण्यास व ई सिगारेटसह धुम्रपानास प्रतिबंध करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विद्रुप होते व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. तसेच यामुळे कर्करोग, पुनरूत्पादन संस्थेचे आजार, पचन संस्थेचे आजार, क्षयरोग, न्युमोनिया यांसारख्या प्राणघातक आजारांचा फैलाव होतो. आता तर कोविड महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपान करणे कटाक्षाने टाळावे.
   तरी जिल्ह्यातील सर्व इन्सीडेंटर कमांडर, सर्व नायब तहसिलदार, सर्व नगर पालिका, नगर पंचायत चे मुख्याधिकारी, सर्व पोलीस उपनिरीक्षक व सर्व पोलीस अधिकारी, सर्व कार्यालयांचे कार्यालय प्रमुख यांना दंडनीय कारवाई करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी घोषीत केले आहे. कुणीही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपान करताना आढळल्यास त्याविरूद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेशान्वये कळविले आहे.

                                                                   असा आहे दंड
मुंबई पोलीस अधीनियम, 1951 चे कलम 116 नुसार दंड : पहिला गुन्हा केल्यास 1000 रूपये दंड व 1 दिवस सार्वजनिक सेवा, दुसरा गुन्हा केल्यास 3000 रूपये दंड व 3 दिवस सार्वजनिक सेवा, तिसरा व त्यानंतर गुन्हा केल्यास 5000 रूपये दंड व 5 दिवस सार्वजनिक सेवा. भारतीय दंडसंहीता 1860 चे कलम 268,270,272 व 278 नुसार दंड : कलम 268 नुसार दंड, कलम 269 नुसार 6 महिने शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम 270 नुसार 2 वर्ष शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम 272 नुसार 6 महिने शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम 278 नुसार 500 रूपयापर्यंत दंड. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहीरात प्रतिबंध, व्यापार विनियमन आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण) कायदा 2003 नुसार दंड : कलम 4 अन्वये 200 रूपयापर्यंत दंड, कलम 5 अन्वये पहिला गुन्हा 1000 रूपये दंड किंवा 2 वर्ष शिक्षा किंवा दोन्ही, दुसरा गुन्हा 5000 रूपयापर्यंत दंड किंवा 5 वर्ष शिक्षा किंवा दोन्ही, कलम 6 अ, 6 ब अन्वये 200 रूपये दंड, कलम 7 अन्वये उत्पादकाचा पहिला गुन्हा असल्यास 5000 रूपये दंड किंवा दोन वर्ष शिक्षा किंवा दोन्ही, दुसरा गुन्हा असल्यास 10000 रूपये दंड किंवा 5 वर्षाची शिक्षा, विक्रेत्याचा पहिला गुन्हा असल्यास 1000 रूपये पर्यंत दंड किंवा 1 वर्ष शिक्षा, दुसरा गुन्हा असल्यास 3000 रूपयापर्यंत दंड किंवा 2 वर्ष शिक्षा.
********
हाराष्ट्र जमिन महसूल नियम 1971 च्या कलम 11 मध्ये होणार सुधारणा
  • राजपत्र प्रसिद्ध, हरकती व सुचना असल्यास 30 जुनपर्यंत सादर करण्याचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.25 : महाराष्ट्र जमिन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम 1971 च्या नियम 11 मध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे.  सदर राजपत्राद्वारे  महसूल व वन विभागाच्या अंतर्गत अधिसूचना प्रकाशित केली आहे. या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात येणाऱ्या नियमांचा मसुदा देण्यात आला आहे. त्यानुसार या नियमांना ‘महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) (द्वितीय सुधारणा) नियम, 2020’ असे म्हणावे आणि महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, 1971 मधील नियम 11 च्या पोट नियम (5) मध्ये शब्द आणि अंकात ‘रूपये 35,000’ या मजकुराऐवजी ‘रूपये 8,00,000’ हा मजकूर दाखल करण्यात येईल, असा मसुदा आहे.
  तरी या सुधारणांच्या अनुषंगाने काही हरकती व सुचना असल्यास सदर हरकती व सुचना जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 30 जुन 2020 पर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व विभागाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.
                                                                                *******
जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या सभेचे आयोजन
बुलडाणा,(जिमाका) दि.25 : जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या सभेचे आयोजन 30 जुन 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींना भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी व गाऱ्हाणी दाखल करावयाच्या असतील त्यांनी प्रतिज्ञापत्रावर तक्रार स्पष्ट शब्दात सबळ पुराव्यानिशी समितीसमोर दाखल कराव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                            *******
कोरोना अलर्ट : प्राप्त 27 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि.25 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 28 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 27 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हा मंगलगेट मलकापूर येथील 67 वर्षीय महिलेचा आहे. सदर महिला काल 24 जुन रोजी मृत पावली असून या महिलेचा अहवाल आज पॉझीटीव्ह आला आहे.
     तसेच आतापर्यंत 2353 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 135 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 135 आहे.  तसेच आज 25 जुन रोजी 28 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 1 पॉझीटीव्ह, तर 27 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 53 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2353 आहेत.
      जिल्ह्यात आजअखेर एकूण 170 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 135 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 24 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 11 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Tuesday 23 June 2020

DIO BULDANA NEWS 23.6.2020

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2019-20
खातेदार शेतकरी व कुटुंबातील एका सदस्यास योजनेचा लाभ
बुलडाणा, दि. 23 : अपघातग्रस्त शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस आर्थिक लाभ देण्याकरिता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते. सन 2019-20 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढवून योजनेमध्ये सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही एका सदस्यासह, कुटुंबातील 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभ देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी दिली.
या योजनेनुसार खातेदार शेतकऱ्यांकरिता शासन स्वत: विमा हप्ता भरणार असून अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता सुमारे 19 लाख 13 हजार वहिती खातेदार शेतकरी व वहिती खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयातील सुमारे 38 लाख 26 हजार लाभार्थ्यांच्या या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या अधिक माहिती करिता जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे विभागीय कृषि सहसंचालक  सुभाष नागरे यांनी कळविले आहे.
**********
कोरोना अलर्ट : प्राप्त 19 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि.23 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 20 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 19 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हा  मोमीनपुरा, मलकापूर येथील 55 वर्षीय महिलेचा आहे. सदर महिलेचा आज 23 जुन रोजी मृत्यू झाला आहे. तसेच काल 22 जुन रोजी कोरोनाबाधीत काळीपूरा, मलकापूर येथील 70 वर्षीय महिला उपचारादरम्यान रूग्णालयात मरण पावली.       
       तसेच आतापर्यंत 2273 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 166 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी 10 मृत आहे. आतापर्यंत 122 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 122 आहे.  सध्या रूग्णालयात 34 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.
    तसेच आज 23 जुन रोजी 20 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 01 पॉझीटीव्ह, तर 19 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 44 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2273 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
******
                       महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांचा दौरा
बुलडाणा,(जिमाका) दि.23 : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर दि. 24 जुन रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 24 जुन रोजी सकाळी 9.45 वाजता नांदुरा येथे आगमन व मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश पंडीतराव एकडे यांचे वडीलांचे दु:खद निधन झाल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी भेट, सकाळी 10.45 वा नांदुरा येथून खामगांव-चिखली-दे.राजा- मार्गे मुंबईकडे प्रयाण करतील.
                                                                        ******
                     

                      कुशल व अकुशल कामगारांनी नाव नोंदणी करावी
  • जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.23 : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातून मजूर व कामगार वर्ग औद्योगिक आस्थापनेवरून स्वत:च्या गावी परतला आहे. त्यामुळे औद्योगिक आस्थापनांवरील मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी गरजू बेरोजगार उमेदवारांनी रोजगारासाठी आपली नाव नोंदणी तातडीने विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर करावी. उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व अनुभवानुसार उमेदवाराला नोकरीची संधी मिळेल. कुशल व अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता असलेल्या आस्थापनाचे व्यवस्थापक किंवा संचालक आवश्यक मनुष्यबळाची मागणी संकेतस्थळावर किंवा ॲपवर नोंदवू शकतात. तरी उमेदवारांनी तातडीने नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सु. रा. झळके यांनी केले आहे.
                                                            ******

Monday 22 June 2020

DIO BULDANA NEWS 22.6.2020

कोरोना अलर्ट : प्राप्त 83 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 08 पॉझिटिव्ह
  • 08 रुग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 91 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 83 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 08 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे धामणगांव बढे ता. मोताळा येथील 22 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 5 वर्षाची मुलगी व 65 वर्षीय पुरूष रूग्णाचे आहेत. तसेच मलकापूर येथील 52 वर्षीय पुरूष, 70 वर्षीय वृद्ध महिला, नांदुरा येथील 37 वर्षीय महिला व समर्थ नगर खामगांव येथील 53 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तसेच मलकापूर येथील 19 जुन 2020 रोजी दाखल 52 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला होता. सदर मयत रूग्णाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आहे. त्यामुळे जिल्ह्याची मृत्यूसंख्या 8 झाली आहे.
    जिल्ह्यामध्ये मलकापूर व संग्रामपूर तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. तसेच लोणार, सिंदखेड राजा, दे.राजा, चिखली व बुलडाणा तालुक्यात सध्या एकही क्रीयाशील कोरोना रूग्ण नसल्यामुळे हे तालुके कोरोनामुक्त आहे. मलकापूर येथे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसांची संचारबंदी पाळण्यात येत आहे.
   त्याचप्रमाणे आज 08 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार त्यांना आज सुट्टी देण्यात आली. शेगांव कोविड रूग्णालयातून पातुर्डा ता. संग्रामपूर येथील 22 वर्षीय पुरूष, 33 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय महिला यांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच खामगांव कोविड रूग्णालयातून चिखली, ता. खामगांव येथील 25 वर्षीय पुरूष रूग्णाला डिस्जार्ज देण्यात आला. तर बुलडाणा कोविड केअर सेंटर येथून भीमनगर, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरूष, 20 वर्षीय तरूण, 60 वर्षीय पुरूष आणि 9 वर्षीय मुलाला सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे आठ रूग्णांनी आज कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
       तसेच आतापर्यंत 2254 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 165 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी आठ मृत आहे. आतापर्यंत 122 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 122 आहे.  सध्या रूग्णालयात 35 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.
    तसेच आज 22 जुन रोजी 91 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 08 पॉझीटीव्ह, तर 83 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 12 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2254 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
                                                ******
प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 30 जुन 2020 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा,(जिमाका) दि‍ 22 - राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जुलै 2020 चे नियतनातील प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजने करीता गहू व तांदूळ धान्याची भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 30 जुन 2020 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे दर गहू 2 रूपये व तांदूळ 3 रूपये प्रतिकिलो,  तर परिमाण प्रति लाभार्थी 3 किलो गहू व तांदूळ 2 किलो आहेत.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी.   चिखली गोदामासाठी गहू 4342 क्विंटल व तांदूळ 2894 क्विंटल, बुलडाणा : गहू 5113  क्विंटल व तांदूळ 3408,  दे.राजा गोदामाकरीता गहू 2124 तांदूळ 1416, अमडापूर : गहू 1412 क्विंटल व तांदूळ 941, मोताळासाठी गहू 3010 क्विंटल व तांदूळ 2006, नांदुरासाठी गहू 3049 क्विंटल व तांदूळ 2033, खामगांव गोदामकरीता गहू 5558 व तांदूळ 3705, शेगांवकरीता गहू 2676 व तांदूळ 1784, जळगांव जामोदकरीता गहू 2795 व तांदूळ 1863, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 2600 व तांदूळ 1733,  मेहकरसाठी गहू 3785 व तांदूळ 2524 , लोणारकरीता गहू 2514 व तांदूळ 1676, सिंदखेड राजाकरीता गहू 1696 क्विंटल व तांदूळ 1130,  मलकापूर : गहू 3069 व तांदूळ 2046, साखरखेर्डा गहू 1287 व तांदूळ 858 आणि डोणगांव करीता गहू 1340 क्विंटल व तांदूळ 893 असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 46370 क्विंटल व तांदूळ 30910  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
********
अंत्योदय लाभार्थ्यांसाठी धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 30 जुन 2020 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा,(जिमाका) दि‍ 22 - राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जुलै 2020 चे नियतनातील अंत्योदय लाभार्थी योजनेकरीता गहू व तांदूळ धान्याची भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 30 जुन 2020 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे दर गहू 2 रूपये व तांदूळ 3 रूपये प्रतिकिलो,  तर परिमाण प्रति कार्ड 20 किलो गहू व तांदूळ 15 किलो आहेत.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी.   चिखली गोदामासाठी गहू 681 क्विंटल व तांदूळ 512 क्विंटल, बुलडाणा : गहू 1392  क्विंटल व तांदूळ 1043,  दे.राजा गोदामाकरीता गहू 567 तांदूळ 426, अमडापूर : गहू 232 क्विंटल व तांदूळ 175, मोताळासाठी गहू 1169 क्विंटल व तांदूळ 876, नांदुरासाठी गहू 1209 क्विंटल व तांदूळ 907, खामगांव गोदामकरीता गहू 1002 व तांदूळ 751, शेगांवकरीता गहू 606 व तांदूळ 454, जळगांव जामोदकरीता गहू 1005 व तांदूळ 753, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 1210 व तांदूळ 907, मेहकरसाठी गहू 841 व तांदूळ 631 , लोणारकरीता गहू 1293 व तांदूळ 969, सिंदखेड राजाकरीता गहू 555 क्विंटल व तांदूळ 417,  मलकापूर : गहू 904 व तांदूळ 678, साखरखेर्डा गहू 309 व तांदूळ 231 आणि डोणगांव करीता गहू 265 क्विंटल व तांदूळ 200 असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 13240 क्विंटल व तांदूळ 9930  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.



Friday 19 June 2020

DIO BULDANA NEWS 19.6.2020


प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करावे
-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
·        कृषी व महसुल प्रशासनाला दिल्या सुचना
बुलडाणा,(जिमाका)दि. 19 : सिंदखेड राजा तालुक्यामध्ये  नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील अनेक गांवातील शेतकऱ्यांच्या शेडनेटचे नुकसान झाले आहे. तसेच शेडनेटमधील पिकांप्रमाणे इतर पिकांचे तालुक्यात 11.85 हेक्टरवर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिगंणे यांनी  तालुका कृषी अधिकारी व महसुल प्रशासनास दिल्या आहे.
 पालकमंत्री यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील शेलगांव राऊत, विझोरा, उगला पिंपळगांव लेंडी यासह अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष जावुन नुकसानीची पाहणी केली आहे. 
   सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खचून न जाता प्रशासनास सहकार्य करून आपल्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास मदत करावी आणि प्रशासनाने कुणीही नुकसानग्रस्त शेतकरी यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. नुकसानीचे पंचनामे करून शासनास पाठविल्या जाणार आहे.  शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.
    सिंदखेड राजा तालुक्यामध्ये अचानक अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेडनेट मध्ये असलेला पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते आहे. अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना आधार देणे व त्यांच्या मागे ठामपणे उभं राहणं हे शासनाचे व प्रशासनाचे काम आहे, अशी प्रतिक्रियाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.  यावेळी उपविभागीय अधिकारी विवेक काळे, तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर , कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांच्यासह मंडळ अधिकारी , तलाठी कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.
******
कोरोना अलर्ट : प्राप्त 97 कोरोना अहवाल 'निगेटीव्ह'; तर 6 पॉझीटीव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि.19 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी तब्बल 103 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 97 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे मलकापूर येथील 60 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय पुरूष, 23 वर्षीय महिला, जळगांव जामोद येथील 50 वर्षीय पुरूष, शेगांव येथील 58 वर्षीय महिला व नांदुरा येथील 45 वर्षीय पुरूष रूग्णाचे आहे.
   जिल्ह्यात सध्या सिंदखेड राजा, बुलडाणा, मोताळा, चिखली, दे.राजा तालुके कोरोनामुक्त असून या तालुक्यात कोरोनाचा एकही रूग्ण उपचार घेत नाही. आतापर्यंत 95 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 95 आहे.  सध्या रूग्णालयात 48 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.
  तसेच आतापर्यंत 2049 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 148 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे.   तसेच आज 19 जुन रोजी 103 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 6 पॉझीटीव्ह, तर 97 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  98 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2049 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
******

6 वा आंतरराष्ट्रीय योग दिवसाला  घर घर योग साजरा करावा
  • जिल्हा प्रशासनाचे आवाहन
  • 21 जुन रोजी सकाळी 7 ते 7.45 वाजेदरम्यान घरातूनच योग दिन साजरा करावा
 बुलडाणा, (जिमाकादि. 19 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नातुन सन 2015 पासुन 21 जून हा दिवस संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचे निश्चीत केले आहे.   त्याअनुषंगाने भारतातच नव्हे तर संपुर्ण जगात 21 जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दिनांक 21 जुन 2020 रोजी 6 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे “घर घर योग” या घोष वाक्याच्या अनुषंगाने घराघरात साजरा करावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने केले आहे.
   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांचे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा भारती, योग भारती,  जिल्हा पतंजली योग समिती, नेहरु युवा केंद्र, शिक्षण विभाग, आर्ट ऑफ लिव्हींग, योगक्षेत्रात कार्यरत विविध क्रीडा मंडळ, महिला मंडळे, विविध संस्था तसेच जिल्हा योग संघटना बुलडाणा, जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना यांचे सहकार्यातुन सदर योग दिवस मोठ्या उत्साहात प्रत्येकाने साजरा करावयाचा आहे. 
    योगदिनाच्या निमित्ताने नियमित योग क्रीयांसोबतच प्राणायाम जे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयोगी ठरते.  योगनिद्रा (प्रत्याहार) हे रिलॅक्सेशनसाठी उपयोगी ठरते.  ध्यान (मेडीटेशन) जे मन:शांतीसाठी अत्यंत उपयोगी ठरते असे सर्वांगसुंदर शारीरिक व मानसीक व्यायाम व मन:शांतीसाठी योगा ही जीवनशैली बनली पाहिजे. सन 2020 च्या जागतीक योग दिनाचे ब्रिदवाक्य आहे.  घर घर मे योग म्हणजे घरी राहुनच तुम्ही स्वत: तुमच्या कुटूंबासोबत सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन योगा करावयाचा आहे.  घरी राहुनच योगा केल्याने कोरोनाच्या संक्रमणापासुन बचाव तर होईलच त्याच बरोबर योगा केल्याने तुमची व तुमच्या कुटुंबाचे आरोग्य देखील चांगले राहतील.  त्यासाठी रविवार, दिनांक 21 जून, 2020 रोजी सकाळी 7 ते 7.45 या कालावधीत विविध माध्यमांवर उपलब्ध योगा प्रोटोकॉल नुसार, सहकुटूंब आपण सर्वांनी योगा करुन जागतीक योग दिन साजरा करावा. 
माय लाईफ माय योगा व्हीडीओ ब्लॉगींग स्पर्धा
  त्याचबरोबर माय लाईफ माय योगा व्हीडीओ ब्लॉगींग कॉम्पीटीशन अंतर्गत ऑनलाईन योग कॉम्पीटीशन केंद्र सरकारच्या अखत्यारितील आयुष मंत्रालयाने आयोजित केली आहे.  या स्पर्धेची नियमावली http://www. Mylife myyoga 2020. com/home या लिंकवर उपलब्ध आहे.  प्रत्येकाने आपआपल्या घरी राहून सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन, वैयक्तीकरित्या सकाळी 7 ते 7.45 या वेळेत योगाचे प्रात्यक्षीक करुन केलेल्या प्रात्यक्षीकाचे व्हीडीओ  http:// www. My lifemyyoga2020.com/home या लिंकवर डाऊनलोड करावयाचे आहेत.  तसेच युट्युब, फेसबुक आणि इन्स्टाग्राम, ट्विटर यावर सुध्दा अपलोड करावयाचे आहे.  अधिक माहिती करीता वरील लिंकला भेट द्यावी. 
    तरी रविवार, 21 जून, 2020 रोजी जागतीक योग दिन वैयक्तीक रित्या घरातच साजरा करण्यासाठी व ऑनलाईन योग कॉम्पीटीशनमध्ये जिल्ह्यातील सर्व खेळाडू, शिक्षक, संघटक, योगप्रेमी, पालक, नागरीक, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा व जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले आहे.
****

                  कोरेानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 67 बंद्यांना जमानतीवर कारागृहातून सोडले
बुलडाणा,(जिमाका) दि.19 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग जिल्ह्यातील कारागृहात होवू नये तसेच तेथील कैद्यांना कोरोनाची लागण होवू नये म्हणून मा. सर्वोच्च न्यायालयाने Suo Moto Writ Petition (C) No. 1/2020  यात आदेश दिले. या आदेशाप्रमाणे मा. उच्च न्यायालयात उच्चस्तर शक्ती प्रदत्त समिती गठीत करण्यात आली होती.  त्यानुसार कारागृहामध्ये असलेल्या बंदी कच्च्या कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचे आदेश प्राप्त झाले. त्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी स्वत: बुलडाणा जिल्हा कारागृहात तात्काळ भेट देवून जिल्हा कारागृह अधिक्षक सोबत बैठक घेतली. तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात येणाऱ्या बंदी कैद्यांची यादी तयार करून ती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत सर्व संबंधीत न्यायालयाकडे पाठविली. बुलडाणा कारागृहातून एकूण 67 बंद्यांना जमानतीवर सोडण्यात आले आहे.
   सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सात वर्षाच्या आत शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील कैद्याची यादी तयार करण्यात आली. अंतरिम जामिनाच्या योग्य त्या आदेशास्तव ते सर्व अर्ज संबंधित न्यायालयाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर उच्चस्तर शक्ती प्रदान समितीच्या आदेशाप्रमाणे संबंधित न्यायबंदी कैद्याची यादी तयार करण्यात आली. योग्य त्या आदेशास्तव संबधित न्यायालयाकडे पाठविण्यात आले. त्यानुसार 23 मार्च ते 15 जुन 2020 पर्यंत एकूण 181 अर्ज अंतरिम जामिनासाठी प्राप्त झाले होते. त्यापैकी 179 अर्ज 15 जुन 2020 च्या आत निकाली काढण्यात आले. बुलडाणा कारागृहातील 67 बंदी जमानतीवर सोडण्यात आले. तसेच 17 मे 2020 पर्यंत 48 कैदी सोडण्यात आले, तर 18 मे ते 21 मे 2020 पर्यंत 9 कैदी सोडण्यात आले. त्याचप्रमाणे 22 मे ते 31 मे 2020 पर्यंत 3 कैदी सोडण्यात आले.
   तसेच 1 जुन ते 15 जुन दरम्यान 7 कैदी जामिनावर सोडण्यात आले. बुलडाणा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव साजिद आरीफ सैय्यद यांनी कारागृह प्रशासन तथा जिल्ह्यातील सर्व न्यायालयांशी वांरवार संपर्क साधून ही प्रक्रिया पुर्ण केली आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
*******
वन महोत्सव कालावधीत सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध
  • वृक्षारोपणासाठी रोपे रोपवाटीकांमधून घेवून जाण्याचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.19 : राज्यात 15 जुन ते 30 सप्टेंबर हा कालावधी वन महोत्सवाचा कालावधी म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना प्रेरीत करण्यासाठी शासनामार्फत सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. त्याअनुषंगाने सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये वन महोत्सव कालावधीत 9 महिन्याचे प्रती रोप 8 रूपये तसेच 18 महिन्याचे प्रती रोप 40 रूपये या दराप्रमाणे मिळणार आहे. यामध्ये 9महिन्याचे रोप हे लहान पिशवीत तर 18 महिन्याचे रोप हे मोठ्या पिशवीमध्ये मिळणार आहे. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये रोप वाटीकांमध्ये सागवान, बांबु, फळझाडे, शोभीवंत झाडे आदी प्रजातींची रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.
  तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी, वृक्षप्रेमी, निसर्गप्रेमी, शासकीय यंत्रणा व आस्थापना तसेच निमशासकीय यंत्रणांनी येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी  संबधीत तालुक्याचे वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण यांचेशी साधुन रोपे उपलब्ध करून घ्यावीत, असे विभागीय वनाधिकारी एस.ए पार्डीकर यांनी केले आहे.
                                                                                ******

Thursday 18 June 2020

DIO BULDANA NEWS 18.6.2020

बँकांनी पात्र शेतकऱ्यांना 30 जुनपर्यंत संपूर्ण पीक कर्ज वाटप करावे
-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
  • 30 जुन नंतर पात्र शेतकऱ्यांना कर्ज वाटप न करणाऱ्या बँकांविरूद्ध कारवाई
  • हेअर कटचे पैसे शेतकऱ्यांकडून घेतले असल्यास परत करावे
  • ई चलानद्वारे मुद्रांक शुल्क घ्यावे, कापूस खरेदी पूर्ण करावी
बुलडाणा, दि. 18 (जिमाका) : खरीप हंगाम सुरू झालेला आहे. सुरूवातीला पाऊस बऱ्यापैकी आल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. तसेच उर्वरित शेतकरी पेरणी करीत आहे. त्यामुळे बँकांनी आता पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी. पीक कर्ज वाटप या बाबीला प्राधान्य देवून पात्र सभासद शेतकऱ्यांना 30 जुनपर्यंत संपूर्ण पीक कर्ज वाटप करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात खरीप हंगाम पीक कर्ज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, तसेच सभागृहात आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमूलकर, ॲड आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेताताई महाले, राजेश एकडे आदी उपस्थित होते.
   जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेकडे असलेले पात्र सभासद शेतकऱ्यांना कर्ज माफी योजनेतून प्राप्त झालेल्या निधीमधून कर्ज देण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना व पात्र सभासद शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने प्राधान्याने कर्ज द्यावे. कर्जमाफीचा पैसा पीक कर्जासाठी उपयोगात आणावा. तसेच  कर्ज माफीमध्ये बँकांना प्राप्त झालेल्या निधीमधून हेअर कट लागला असल्यास त्याची जबाबदारी बँकांची आहे. हेअर कटचा पैसा बँकांनी शेतकऱ्यांकडून घेवू नये. घेतला असल्यास तो परत करण्यात यावा. कर्जमाफी झालेला व पात्र एकही सभासद पीक कर्जापासून वंचित राहू नये. बँकामध्ये पिक कर्ज वितरणासाठी सुरू असलेली दलालशाही थांबवावी. यामधून शेतकरी आर्थिक लुबाडणूकीस सामोरे जात आहे.
  ते पुढे म्हणाले, बँकांनी त्यांच्याकडील सामान्य ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) अर्थात एकरकमी योजनेत त्यांच्या तरतूदीनुसार शेतकऱ्यांकडून व्याज माफ करीत मुद्दलच्या रक्कमेच्या तुलनेत 45 ते 55 टक्के वसूली करावी. उर्वरित कर्ज माफ करता येते. त्यानुसार बँकांनी यावर्षासाठी अशा प्रकारची योजना असल्यास त्याची माहिती पात्र शेतकऱ्यांना द्यावी. त्याचप्रमाणे बँकांनी कटाक्षाने कुठल्याही योजनेचे आलेले खात्यातील पैसे कर्ज खात्यात वळते करू नये. तसेच मुद्रांक पेपरसाठी शेतकऱ्यांची होत असलेला त्रास लक्षात घेता बँकांनी ई चलानद्वारे मुद्रांक शुल्क घ्यावा. या पद्धतीचा अवलंब केल्यास कुणाही शेतकऱ्याला मुद्रांक पेपर आणण्याची गरज भासणार नाही.  
 कापूस खरेदी पूर्ण करण्याच्या सुचना करीत पालकमंत्री म्हणाले, पणन महासंघ व सीसीआयने नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा कापूस खरेदी करावा. त्यासाठी करार केलल्या जिनिंगला कापूस घेण्यास बाध्य करावे. माल साठवणूकीच्या पुर्ण क्षमतेने कापूस घेतल्यास उर्वरित शेतकऱ्यांचाही कापूस खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय देता येईलशेतकऱ्यांचा माल खरेदी करावा, व्यापारी शेतकऱ्यांचा 7/12 घेवून आपला माल विक्री करीत आहेत. यावर आळा घालण्यात यावा.  
   खासदार प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले, बँकांनी कर्जमाफी झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शाखानिहाय प्रसिद्ध कराव्यात. हेअर कटचे पैसे शेतकऱ्याकडून मागणी न करता स्वत: जबाबदारी घेवून भरावे. जिल्हा बँकेने कर्जमाफीत प्राप्त पैसा यावर्षी पिक कर्ज देण्यासाठी वापरावा.  जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक उत्तम मनवर यानी माहिती देताना सांगितले, कर्ज प्रकरण बँकेच्या शाखेत दिल्यानंतर बँकेने प्रत्येक शेतकऱ्याला ‘रिसीव्युड’ द्यावी. तसा नियमच आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ओटीएसद्वारे कर्जमाफी झालेला शेतकरी यावर्षी कर्ज घेण्यास पात्र आहे. बँकानी हेअर कटचे पैसे शेतकऱ्यांकडून घेण्याची गरज नाही. बँकांनी आपल्या ओटीएस योजनेनुसार थकीत शेतकऱ्यांना माहिती देवून त्यांच्याकडून एकरकमी रक्कम भरून उर्वरित कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी.
   यावेळी आमदार महोदयांनी पीक कर्ज वितरणाबाबत विविध प्रश्न मांडले व पीक कर्ज वितरण गतीने पुर्ण करण्याची मागणी केली.  याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक श्री. चव्हाण, जिल्हा बँकेचे श्री. खरात, विविध बँकांचे प्रतिनिधी, नोडल अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी यांनी केले.
                                                                        *******
कोरोना अलर्ट : प्राप्त 38 कोरोना अहवाल 'निगेटीव्ह'; तर 1 पॉझीटीव्ह
  • 8 रूग्णांनी केली कोरोनावर मात, मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 38 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हा पातुर्डा ता. संग्रामपूर येथील 66 वर्षीय पुरूष रूग्णाचा आहे.
  तसेच आज 8 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना कोविड केअर सेंटर येथून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये खामगांव येथून मलकापूर येथील 45 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरूणी, 65 वर्षीय वृद्ध महिला व शेगांव येथील 30 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे. तसेच बुलडाणा कोविड केअर सेंटर येथून मलकापूर येथील हनुमान चौक परीसरातील 55 वर्षीय महिला, भीमनगर मलकापूर येथील 62 वर्षीय पुरूष, 29 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे. अशाप्रकारे आज कोरोनावर मात करीत 8 रूग्णांनी घर गाठले आहे.   आतापर्यंत 95 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 95 आहे.  सध्या रूग्णालयात 43 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.
  तसेच आतापर्यंत 1952 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 143 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे.   तसेच आज 18 जुन रोजी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 1 पॉझीटीव्ह, तर 38 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  138 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1952 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे