जिल्ह्यातील १४२० गावांची अंतिम पैसेवारी जाहीर जिल्ह्याची सरासरी ४७ टक्के पैसेवारी

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 01: सन २०२५–२६ या खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील एकूण १४२० गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी नोंदविण्यात आली असून, ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेले एकही गाव नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिली आहे.

या  तालुकानिहाय गावांच्या संख्येनुसार  बुलढाणा ९८ गावे, चिखली (१४४), देऊळगाव राजा (६४), मेहकर (१६१), लोणार (९१), सिंदखेड राजा (११४), मलकापूर (७३), मोताळा (१२०), नांदुरा (११२), खामगाव (१४६), शेगाव (७३), जळगाव जामोद (११९) आणि संग्रामपूर (१०५), या सर्व तालुक्यांतील एकूण १४२० गावांमध्ये पैसेवारी ५० पैशांखाली नोंदविण्यात आली आहे.

जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ४७ पैसे इतकी असून, चिखली, जळगांव जामोद व शेगाव तालुक्यांची सरासरी पैसेवारी ४९ पैसे, तर लोणार व सिंदखेड राजा तालुक्यांची ४५ पैसे नोंदविण्यात आली आहे. उर्वरित तालुक्यांची सरासरी पैसेवारी ४६ ते ४८ पैशांच्या दरम्यान आहे.

या अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील शासकीय सवलती, मदत व नुकसानभरपाई प्रक्रियेबाबत दिशा स्पष्ट होणार आहे.

000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या