बुलढाणा तालुक्यातील अवसायनातील सहकारी संस्थांबाबत जाहीर सूचना; 36 संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
बुलढाणा, (जिमाका) दि. ०५
: बुलढाणा तालुक्यातील विविध सहकारी संस्था दीर्घकाळापासून अवसायनात असून, त्यांच्या
नोंदणी रद्द करण्याची वैधानिक प्रक्रिया सहकार विभागाकडून सुरू आहे. महाराष्ट्र सहकारी
संस्था अधिनियम १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये सदर कार्यवाही करण्यात
येत असून, संबंधित संस्थांचे व्यवहार अधिकृतपणे बंद करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची
पायरी आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम ८९ (४) नुसार,
अवसायनात असलेल्या सहकारी संस्थांविरुद्ध ज्या कोण्या व्यक्ती, संस्थांचे विरुद्ध काही
दावे असतील, त्यांनी जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत
आपले दावे लेखी स्वरूपात, पुराव्यासह संबंधित नोंदणी कार्यालयास सादर करणे बंधनकारक
आहे.
सहकार विभागाने स्पष्ट
केले आहे की, ठराविक कालावधीत कोणताही दावा किंवा लेखी खुलासा प्राप्त न झाल्यास, त्यानंतर
सादर होणाऱ्या दाव्यांची दखल घेतली जाणार नाही. तसेच अशा उशिरा दाखल होणाऱ्या दाव्यांची
जबाबदारी सहकार विभाग अथवा संबंधित अवसायकावर राहणार नाही.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ नुसार
या सर्व संस्थांना अंतिम अवसायनात घेण्यात आले आहे. संबंधित संस्थांवर अवसायकाची नियुक्ती
यापूर्वीच करण्यात आली असून, संस्थांची मालमत्ता, देणी-घेणी व कागदपत्रांची तपासणी
पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित वैधानिक बाबी पूर्ण झाल्यानंतर नोंदणी रद्द करण्याची
अंतिम कार्यवाही केली जाणार आहे.
नोंदणी रद्द होण्याच्या प्रक्रियेत बुलढाणा तालुक्यातील
विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचा समावेश आहे. यामध्ये जि.प. माध्य. शिक्षक व कर्मचारी
सह. पत बुलडाणा र.न.२०४, सिंगगड गृहनिर्माण सह.संस्था म. बुलढाणा, सन्मित्र शिक्षक
व शिक्षेकेत्तर कर्म. सह. पतसंस्था. म. बुलडाणा ३१०, औंदुबर गृहनिर्माण सह.संस्था म.
बुलडाणा, पिपल्स अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसा.म. बुलडाणा र.न.३१, सिंधुदुर्ग गृहनिर्माण
सह.संस्था म. बुलडाणा, विवेकानंद नागरी सहकारी पत संस्था, म.बुलडाणा र.न.३२२, लो-इन.
गृप गृहनिर्माण सह.संस्था म. बुलडाणा, शिवप्रताप ग्रामिण बिगर शेती सहकारी पत संस्था
म. बुलडाणा, शिवाजी गृहनिर्माण सहकारी संस्था म. बुलडाणा, भाग्योदय ग्रामिण बिगर शेती
सह. पत संस्था. म. देऊळघाट र.न.३३८, तिरुपती नं.१ गृहनिर्माण सह.संस्था म. बुलडाणा,
धनलक्ष्मी नागरी सहकारी पत संस्था, म.बुलडाणा र.न.३४३, माँ.जगदंबा आदिवासी उपसा जलसिंचन
सह. संस्था, कामेश्वर ग्रामिण बिगर शेती सह. पत संस्था, म. वरवंड र.न.३५२, आदर्श सुशिक्षीत
बेरोजगार सेवा सह.संस्था म.बुलडाणा, विदर्भ नागरी सहकारी पत संस्था, म. बुलडाणा र.न.३५८.
जगदंबा सुशिक्षीत बेरोजगार सेवा सह.संस्था म.बुलडाणा, जयजवान
जय किसान सहकारी ग्राहक भांडार, लोक कल्याणी महिला नागरी सहकारी पत संस्था. म. बुलडाणा
र.न.३६०, अहिल्या पगारदार सेवकांच्य सहकारी पतसंस्था म. बुलडाणा, महात्मा ज्योतीबा
फुले ग्रामिण बिगर शेती सह. पतसंस्था म. रायपूर, प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी पतसंस्था
म. बुलडाणा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मा. औद्यो.सह.संस्था म. बुलडाणा, शेतकरी गृहनिर्माण
सह.संस्था म. बुलडाणा, जिजाऊ महिला ओद्यो.सह.संस्था म. बुलडाणा, राजे छत्रपती हमाल
कामगार सह. संस्था म. बुलडाणा, जगदिश्वर गृहनिर्माण सहकारी संस्था, म.बुलडाणा र.न.
३५४, व्यंकटेश गृहनिर्माण सहकारी संस्था, म.माळविहीर र.न.३४६., तारकेश्वर गृहनिर्माण
सहकारी संस्था, म.बुलडाणा र.न.३५५, तिरुपती गृहनिर्माण सहकारी संस्था, म.माळविहीर र.न.३४७,
गगनगिरी गृहनिर्माण सहकारी संस्था, म.बुलडाणा र.न.३५६, व्यंकटेश १ गृहनिर्माण सहकारी
संस्था, म.माळविहीर र.न.३४९, स्वस्तिक शॉ अॅण्ड फ्लैट ओनर्स को. ऑप. हाऊ. सो. लि. बुलडाणा
र.न.३७९, बालाजी १ गृहनिर्माण सहकारी संस्था, म.माळविहीर र.न.३५, ममलेश्वर गृहनिर्माण
सहकारी संस्था, म.बुलडाणा र.न.३५३ अशा एकूण ३६ सहकारी संस्था या कारवाईच्या कक्षेत
आहेत.
सहकार विभागामार्फत ही जाहीर सूचना अधिकृत सही व शिक्क्यानिशी
प्रसिद्ध करण्यात आली असून, संबंधित सर्व सभासद, हितसंबंधित नागरिक, कर्जदार व ठेवीदार
यांनी या सूचनेची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत
दावा सादर न केल्यास भविष्यात कोणतीही तक्रार अथवा मागणी ग्राह्य धरली जाणार नाही,
असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment