Monday 31 May 2021

DIO BULDANA NEWS 31.5.2021

प्रतिकूल परिस्थितीतही रेशीम शेतीतून आणली समृद्धी • कल्याणा ता. मेहकर येथील 11 शेतकऱ्यांनी मिळून केली रेशीम शेती बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : सगळीकडे कोरोनाची दहशत असताना शेतकरी राजा मात्र काळ्या मातीत राब राब राबत होता. कृषी क्षेत्र गतीमान ठेवून अर्थचक्र फिरवित होता. यामध्ये जिल्ह्यातील शेतकरीही मागे नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतीतून समृद्धी आणण्याचा प्रयत्न बळीराजाचा सुरूच होता. जिल्ह्यातही याचे उदाहरणे समोर आली. मेहकर तालुक्यातील कल्याणा येथील 11 शेतकऱ्यांनी एकत्र येत रेशीम शेती केली. त्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीतून रेशीम शेतीतून समृद्धी आणली आहे. रेशीम शेती मधील किटक संगोपनाची कामे साधारणतः उन्हाळ्यात बंद असतात. परंतु या वर्षी प्रतिकूल परिस्थिती सुद्धा कल्याणा ता. मेहकर येथील 11 शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत रेशीम कीटक संगोपन घेतले. तसेच यशस्वीपणे पुर्ण केले. अंदाजे 650 ते 700 किलो ग्रॅम कोष उत्पादन त्यांना होणार आहे. सध्या रु.280 ते 310 प्रति किलोग्रॅम भाव कोषबाजारात आहे. या उत्पादनातून सदर शेतकऱ्यांना अंदाजे रु 1.5 ते 2 लक्ष रूपयांचे उत्पन्न निश्चितच मिळणार आहे. अवघ्या 18 दिवसात त्यांनी कोषाचे संगोपन पूर्ण केले आहे. तुती लागवड करून तुती पानांचा रेशीम कीटकांना खाद्य म्हणून उपयोग केला जातो. त्यापासून रेशीम कोष निर्मिती होते. असे कोष जालना, पूर्णा, पाचोड व इतर कोष खरेदी करणारे व्यापारी यांना विक्री केली जाते. सन 2020-21 मध्ये कल्याणा येथील युवा शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम विकास प्रकल्प राबविण्याचे ठरविले. या 11 लाभार्थ्यांनी रेशीम अधिकारी कार्यालयात नोंदणी केली. उद्योगाची परिपूर्ण माहिती घेतली. माहे जून 2020 मध्ये तुती लागवड रोपांद्वारे करून नोव्हेंबर 2020 मध्ये रेशीम कीटक संगोपन गृह बांधकाम केले. मनरेगा अंतर्गत कामा नुसार यथायोग्य मजुरी व तुती लागवडीच्या रोपांची रक्कम मिळाली. पहिले पीक हिवाळ्यात घेतले, परंतु पहिले पीक, त्यात ऋतुमानानुसार येणाऱ्या अडचणींमुळे सरासरी उत्पन्न मिळाले. परंतु इतक्यावरच समाधान न मानता उन्हाळ्यातील प्रतिकूल परिस्थितीत रेशीम कीटक संगोपन घेण्याचे त्यांनी ठरविले. साधारणतः उन्हाळ्यात 40-43 डीग्री से.ग्रे तापमानात रेशीम किटक संगोपन घेतले जात नाही. परंतु तापमान कमी करण्याच्या सर्व उपाययोजना करण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यासाठी संगोपन गृहाच्या नेटला पोते बांधून ड्रीपच्या पाईप ने पाणी सोडण्याची व्यवस्था केली. त्यासाठी गणेश उर्फ राजू नरहरी ठाकरे यांनी संगोपन गृहाशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडावर सिंटेक्स टाकी चढवली व त्यातून ठिबक च्या पाईप द्वारे पाणी पोत्यांवर सोडले. पूर्ण संगोपन होई पर्यंत 30 ते 33 से ग्रे तापमान कायम राखले. बुलडाणा येथील जगदीश गुळवे यांचे कडून बाल किटक (चॉकी म्हणजे दोन अवस्था पूर्ण झालेले रेशीम कीटक) घेतले. त्यानंतर प्रौढ किटक संगोपन 15 ते 20 दिवसांचे ऐन उन्हाळ्यात सुरू केले. वेळोवेळी रेशीम कार्यालयाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. सर्वांनी अतिशय मेहनतीने, जिद्द व चिकाटीने किटक संगोपन पूर्ण केले. सर्वांचे रेशीम कोष तयार झाले असून कोष विक्री साठी 15 दिवसात तयार झाले आहेत. उन्हाळ्यात कोष उत्पादन कमी होत असल्याने रेशीम कोषाचे दर वधारले आहेत. त्याचा फायदा नक्कीच या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना होईल. अंदाजे 650 ते 700 कि ग्रॅम कोष उत्पादन झाले आहे. सध्या 280 ते 310 रु प्रति कि.ग्रॅम दर असून त्यांना 1.5 लक्ष ते 2 लक्ष रूपये उत्पन्न 15 दिवसांच्या मेहनतीने त्यांना नक्कीच मिळणार आहे. या यशस्वी संगोपनाची श्रेय ते महेंद्र ढवळे, सहायक संचालक, विभागीय कार्यालय, अमरावती यांना देतात. तसेच मनरेगा अंतर्गत वेळोवेळी सहकार्य केल्याबाबत डॉ गरकल, तहसीलदार, मेहकर आणि करोना काळातही प्रत्यक्ष क्षेत्रीय भेट देउन मार्गदर्शन केल्या बद्दल सु.प्र. फडके, रेशीम विकास अधिकारी यांना देतात. ************ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच उपस्थित नायब तहसिलदार श्री. पाटील यांनी पुष्प अर्पण केले. तसेच उपस्थितांनी पुष्प अर्पण करीत अभिवादन केले. ******* पाणी टंचाई निवारणार्थ पिंपळखुटा खु गावासाठी टँकर मंजूर बुलडाणा, (जिमाका) दि.31 : मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा खु येथील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. येथील 507 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सदर टँकर गावाला दररोज 19 हजार 480 लीटर पाण्याचा पुरवठा करणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी (महसूल) बुलडाणा यांनी कळविले आहे. ***** पाणी टंचाई निवारणार्थ 20 विंधन विहीरी • 18 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना बुलडाणा, दि.31 (जिमाका) : पाणीटंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील 14, लोणार तालुक्यातील 4 गावांसाठी 20 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. एकूण 20 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे. विंधन विहीरी मेहकर तालुक्यातील शेलगांव देशमुख, हिवरा खु, पिंपळगांव उंडा, माळेगांव, वर्दडा, पेनटाकळी, अंबाशी, मोहखेड, पारखेड, उटी, नायगांव देशमुख, शेंदला, लव्हाळा, चिंचाळा, लोणार तालुक्यातील शिवणी पिसा, नांद्रा, सुलतानपूर व गोवर्धननगर या गावांसाठी मंजूर करण्यात आली आहे. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. ***** कोरोना अलर्ट : प्राप्त 2281 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 113 पॉझिटिव्ह • 901 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.31 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2394 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2281 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 113 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 71 व रॅपीड टेस्टमधील 42 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1080 तर रॅपिड टेस्टमधील 1201 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2281 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 13, बुलडाणा तालुका : सागवन 1, केसापूर 1, भादोला 1, येळगांव 1, मोताळा तालुका : पुन्हई 1, तळणी 1, अंत्री 1, खामगांव शहर :5, खामगांव तालुका : हिवरा 2, टाकळी 1, जयपूर लांडे 1, जनुना 1, शिर्ला 3, नागापूर 9, निळेगांव 1, शेगांव शहर : 5, शेगांव तालुका : भास्तन 1, चिखली शहर : 4, चिखली तालुका : सोमठाणा 2, रोहडा 2, शेलगांव आटोळ 2, खैरव 1, गांगलगांव 2, कव्हळा 1, मुरादपूर 2, मलकापूर शहर :1 , मलकापूर तालुका : भाडगणी 1, उमाळी 1, दे. राजा शहर : 2 , दे. राजा तालुका : बोराखेडी 1, खल्याळ गव्हाण 1, संग्रामपूर तालुका : काकनवाडा 2, अकोली 4, निरोड 1, सिं. राजा शहर :1, सिं. राजा तालुका : चांगेफळ 1, सुलजगांव 1, असोला 2, ताडशिवणी 2, लिंगा 1, मेहकर शहर :5, मेहकर तालुका : घाटबोरी 3, जळगांव जामोद तालुका : उसरा 1, काजेगांव 1, सुनगांव 1, नांदुरा शहर :1, नांदुरा तालुका : नायगांव 1, तांदुळवाडी 2, वळती 1, लोणार शहर :2 , लोणार तालुका : दे. कोळ 2, परजिल्हा भोकरदन 1, तेल्हारा 1, बाळापूर 2, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 113 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान इसोली ता. चिखली येथील 75 वर्षीय महिला, चिखली येथील 55 वर्षीय महिला, सुटाळा ता. खामगांव येथील 28 वर्षीय पुरूष, जिगांव ता. नांदुरा येथील 75 वर्षीय महिला, मेहकर येथील 75 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 901 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 480996 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 82343 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 82343 आहे. आज रोजी 364 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 480996 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 84778 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 82343 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1829 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 606 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Thursday 27 May 2021

DIO BULDANA NEWS 27..2021

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन • उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डच्या लॉग ईन आयडीतून अर्ज करावे • 30 मेपर्यंत चालणार मेळावे बुलडाणा,(जिमाका)दि.27 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 27 ते 30 मे 2021 पर्यंत चालणार आहे. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www. mahaswayam.gov.in व www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर भरावे. या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, नर्सिग पदविका, (ए.एन. एम.,जी.एन.एस.) आय. टी. आय. पास, पदव्युत्तर, पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपले लॉगईन मधुन ऑनलाईन अर्ज करुन सहभाग नोंदणी करुन रोजगार प्राप्त करावा. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर व पासवर्ड चा वापर करुन आपल्या लॉगइन मधुन ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात. पात्र असलेल्या पुरुष, महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदाकरिता सुध्दा ऑनलाईन अर्ज करु शकतात. या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना रोजगार संधी सोबतच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाचे प्रसारण वेबिनार द्वारे करण्यात येणार आहे. रोजगार मेळाव्याचे उद्घाटन समारंभ 27 मे 2021 रोजी सायंकाळी 4.00 वाजता. आयोजित करण्यात आला आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशलय विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा. जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑनलाईन सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सु. रा झळके, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. ****** कोरोना अलर्ट : प्राप्त 3533 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 338 पॉझिटिव्ह • 766 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3871 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3533 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 338 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 251 व रॅपीड टेस्टमधील 87 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1512 तर रॅपिड टेस्टमधील 2021 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3533 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 27, बुलडाणा तालुका : पळसखेड 1, साखळी 1, येळगांव 2, अजिसपूर 2, सागवन 2, सुंदरखेड 3, पांगरी 1, जांभरून 1, नांद्राकोळी 4, दहीद 1, अंत्री तेली 1, रूईखेड 1, रायपूर 2, गोंधनखेड 1, मातला 1, मोताळा शहर : 4, मोताळा तालुका : सारोळा पीर 6, मोलखेड 1, वाघजळ 1, गुगळी 1, लोणघाट 1, पिं. नाथ 2, गिरोली 1, कोथळी 2, इब्राहिमपूर 6, बोराखेडी 1, घुसर 1, खामखेड 3, रोहीणखेड 1, कोल्ही गवळी 1, चिंचखेड 1, वरूड 1, राजूर 1, महाल पिंप्री 1, धा. बढे 1, खामगांव शहर :15, खामगांव तालुका : लाखनवाडा 1, पिं. राजा 1, कवडगांव 1, घारोड 1, कारेगांव 1, बोथा 2, पिं. गवळी 1, नांद्रा 1, वर्णा 2, उंबरा 1, हिवरखेड 1, पारखेड 1, नायदेवी 1, शेगांव शहर :20, शेगांव तालुका : तिंत्रव 4, पहुरजिरा 2, बोंद्री 3, जवळा 2, तिव्हाण 1, तरोडा 4, सांगवा 1, सवर्णा 1, खातखेड 1, माटरगांव 1, चिखली शहर : 11, चिखली तालुका : इसोली 1, डोंगर शेवली 1, हातनी 1, लोणी 1, सावरगांव डु 1, धोत्रा भणगोजी 1, मेरा बु 4, चांधई 1, कोलारा 2, येवता 1, कोनड 1, मलकापूर शहर : 8, मलकापूर तालुका : वरखेड 2, लासूरा 2, माकनेर 1, रणगांव 1, वडजी 1, दे. राजा शहर : 14, दे. राजा तालुका : सावखेड भोई 2, उंबरखेड 3, नंदखेड 1, किन्ही 1, सातेगांव 2, पिंपळगांव 1, टाकरखेड भा 1, नागणगांव 1, पांगरी 4, साठेगांव 1, सिनगांव जहा 4, गिरोली 1, कुंभारी 2, शिराळा 1, अंढेरा 1, जवळखेड 1, गोंधनखेड 2, कुंबेफळ 2, संग्रामपूर शहर : , संग्रामपूर तालुका : वानखेड 1, पळशी 1, धामणगाव 1, वरवट 2, सिं. राजा शहर : 5, सिं. राजा तालुका : विझोरा 1, झोटींगा 3, आगेफळ 2, धंदरवाडी 1, आंचली 1, असोला 1, बोराखेडी 2, डावरगांव 4, रूमना 1, वडाळी 1, शेंदुर्जन 1, सुलजगांव 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, जानेफळ 3, चोंढी 1, भोसा 1, मुलखेड 1, वर्दडी 2, मोहदरी 1, शहापूर 1, बोरी 1, जळगांव जामोद शहर : , जळगांव जामोद तालुका : पळशी सुपो 1, अकोला खु 2, पि. काळे 3, वडगांव गड 1, सुनगांव 3, काजेगांव 1, गाडेगांव 1, झाडेगांव 1, खांडवी 1, नांदुरा शहर :1, नांदुरा तालुका : वसाडी 1, टाकरखेड 1, वडगांव डिघी 1, गाडेगांव 1, लोणवडी 1, हिंगणा बाळापूर 1, बरफगाव 1, शेलगांव मुकुंद 1, आमसरी 2, इसापूर 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : उटी 1, कोलखेड 1, साखरा 1, वढव 2, चिखला 2, सोमठाणा 1, दे. कोळ 1, भुमराळा 1, परजिल्हा सोयगांव 1, खरगोन (मध्य प्रदेश) 1, बाळापूर 3, तेल्हारा 1, अकोला 1, दर्यापूर 1, जाफ्राबाद 1, सेनगांव जि. हिंगोली 1, पातुर 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 338 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान पारखेड ता. खामगांव येथील 65 वर्षीय महिला, जुनागांव बुलडाणा येथील 67 वर्षीय महिला, धाड ता. बुलडाणा येथील 60 वर्षीय महिला, गजानन नगर चिखली येथील 33 वर्षीय पुरूष, चांडोळ ता. बुलडाणा येथील 65 वर्षीय महिला, मंगरूळ ता. चिखली येथील 71 वर्षीय महिला, नांदुरा येथील 27 वर्षीय महिला, म्हसला ता. बुलडाणा येथील 30 वर्षीय महिला व मिस्कीनवाडी ता. मेहकर येथील 53 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 766 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 465282 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 79379 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 79379 आहे. आज रोजी 2093 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 465282 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 84070 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 79379 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 4102 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 589 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ******

Tuesday 25 May 2021

DIO BULDANA NEWS 25.5.2021

खत विक्रेत्यांनी जुन्याच दरांनी खत विक्री करावी कृषी विभागाचे आवाहन बुलडाणा,(जिमाका) दि.25 : जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून येणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. माहे एप्रिल 2021 पासून युरीया वगळता इतर रासायनिक खतांची दरवाढ खत उत्पादक कंपन्यांनी केली होती. केंद्र शासनाने 20 मे 2021 च्या निर्देशानुसार या कंपन्यांना वाढीव किंमतीसाठी अनुदान देण्याचे घोषीत केले आहे. त्यामुळे खत विक्रेता दुकानदारांनी खते जुन्याच दराने विक्री करावयाची आहे. तरी काही खत विक्रेते वाढीव दराप्रमाणेच छापील किंमतीवर खते विक्री करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. ज्या खत विक्रेत्यांकडे वाढीव दरातील खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यांनी सुधारीत दराप्रमाणेच खते विक्री करावी. शेतकऱ्यांनी सुद्धा सुधारीत दरांप्रमाणेच खते खरेदी करावी. सुधारीत दरांपेक्षा वाढीव दराने खतांची विक्री होत असल्यास किंवा तसे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी आपल्या संबंधीत तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी, पंचायत समितीचे कृषि अधिकारी किंवा जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा कक्षातील अरूण इंगळे यांच्या 7588619505 आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक व मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद बुलडाणा येथील विजय खोंदील यांच्या 7588041008 मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन खते परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे. असे आहेत रासायनिक खत कंपनीचे सुधारीत विक्री दर (प्रति बॅग 50 किलो) खताचा प्रकार ग्रेड : डिएपी – इफ्फको 1200 रू, जीएसएफसी 1200 रू, जय किसान 1200 रू, कोरोमंडल 1200 रू, महाधन 1200 रू, कृभको 1200 रू, 10:26:26 - इफ्फको 1175 रू, जीएसएफसी 1175 रू, जय किसान 1375 रू, कोरोमंडल 1300 रू, महाधन 1390 रू, कृभको 1300 रू, 12:32:16 - इफ्फको 1185 रू, जीएसएफसी 1185 रू, जय किसान 1310 रू, महाधन 1370 रू, कृभको 1310 रू, 20:20:0:13 - इफ्फको 975 रू, जय किसान 1090 रू, कोरोमंडल 1050 रू, आरसीएफ 975 रू, महाधन 1150 रू, कृभको 1050 रू, 19:19:19 - जय किसान 1575 रू. 28:28:00 - जय किसान 1475 रू, कोरोमंडल 1450 रू, 14:35:14 - जय किसान 1365 रू, कोरोमंडल 1400 रू, 24:24:0:85 - कोरोमंडल 1500 रू, महाधन 1450 रू, 15:15:15:09 - कोरोमंडल 1150 रू, 16:20:0:13 – कोरोमंडल 1000 रू, 15:15:15 – आरसीएफ 1060 रू, 14:28:00 – महाधन 1280 रू, 16:16:16 – महाधन 1125 रू, MOP - कृभको 850 रूपये. ***** कोरोनाबाधीतांसाठी गृह अलगीकरण नाहीच; संस्थात्मक अलगीकरणाचा पर्याय जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश बुलडाणा,(जिमाका) दि.25 : जिल्ह्यात कोविड 19 या संसर्गजन्य आजाराचा वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील कोविड 19 बाधीत रूग्ण आढळून येत आहे. सदर रूग्ण गृह अलगीकरण झाल्यानंतर अलगीकरणात न राहता गावात मुक्त संचार करीत असल्याने गा्रमीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोविड बाधीत रूग्ण आढळून येत असून रूग्ण गंभीर होत आहेत. त्यावरील उपाययोजनांचा भाग म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना ग्रामीण भागामध्ये आयसोलेशन सेंटर उभारण्याबाबत निर्देशीत करण्यात आले. त्यांच्याद्वारे ग्रामीण भागात आयसोलेशन केंद्र उभारून कार्यान्वीत करण्यात आले आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपायोजनेचा भाग म्हणून शहरी व ग्रामीण भागातील ज्या कोविड बाधीत रूग्णांना लक्षणे जाणवत नाहीत. त्यांना गृह अलगीकरण हा पर्याय न देता त्यांना सोयीस्कर अशा संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही स्वरूपात गृह अलगीकरण राहण्याकरीता परवानगी देण्यात येवू नये. जेणेकरून कोविड बाधीत रूग्णांपासून इतरांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एस रामामूर्ती यांनी दिले आहे. ****** कोरोना अलर्ट : प्राप्त 4769 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 478 पॉझिटिव्ह 615 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.25 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5247 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4769 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 478 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 320 व रॅपीड टेस्टमधील 158 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1114 तर रॅपिड टेस्टमधील 3655 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4769 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :29, बुलडाणा तालुका : नांद्राकोळी 4, कोलवड 1, दुधा 1, अंत्री तेली 1, चांडोळ 1, दे. घाट 1, म्हसला 1, पिंपरखेड 1, रायपूर 1, मोताळा शहर :1 , मोताळा तालुका : सिंदखेड 1, माकोडी 1, लपाली 1, लिहा 1, पिं. नाथ 2, तांदुळवाडी 1, बोराखेडी 1, डिडोळा 3, अंत्री 1, किन्होळा 2, कोऱ्हाळा 1, पान्हेरा 1, खामगांव शहर : 8, खामगांव तालुका : लोणी गुरव 1, अंबोडा 4, हिवरखेड 1, पारखेड 2, नागापूर 1, अटाळी 1, जनुना 1, पिं. राजा 1, शेगांव शहर : 11, शेगांव तालुका : जवळा 2, भोनगांव 1, खेर्डा 1, जवळा 2, दगडखेड 2, माटरगांव 1, भास्तन 1, पहुरजिरा 1, चिखली शहर :26, चिखली तालुका :किन्होळा 2, येवता 1, बोरगांव काकडे 2, दहीगांव 1, मेरा बु 2, लोणी लव्हाळा 1, उंद्री 1, सावरखेड 1, मंगरूळ 2, कनारखेड 1, कव्हाळा 4, टाकरखेड मु 1, मेरा खु 2, चांधई 1, खोर 2, बेराळा 1, अंचरवाडी 1, तेल्हारा 1, सावरगांव डु 2, वळती 4, शिंदी हराळी 1, काटोडा 2, मलकापूर शहर : 11, मलकापूर तालुका : वडोदा 1, वाकोडी 2, घिर्णी 1, वाघुड 2, धोंगर्डी 4, भाडगणी 3, वडजी 1, उमाळी 3, वरखेड 1, माकनेर 1, दे. राजा शहर :5, दे. राजा तालुका : दिग्रस 1, शिवणी आरमाळ 1, सावखेड नागरे 2, असोला 1, कुंभारी 1, पांगरी 2, दे. मही 3, बायगांव 1, सरंबा 1, अंढेरा 1, गुंजाळा 2, संग्रामपूर शहर : 4, संग्रामपूर तालुका : धामणगाव 1, वरवट 6, पळशी 9, वडगांव 1, चोंढी 1, काहोडी 1, अकोली 2, निवाणा 40, चांगेफळ 1, उमरा 3, काकनवाडा 1, मारोड 13, दानापूर 3, मनार्डी 1, काकनवाडा 1, मोमीनाबाद 1, जस्तगांव 1, खिरोडा 1, दुर्गादैत्य 5, वानखेड 5, आवार 1, पलसोडा 2, सिं. राजा शहर :2 , सिं. राजा तालुका : बाळसमुद्र 1, दुसरबीड 1, साखरखेर्डा 4, ताडशिवणी 1, आंचली 1, बोरखेडी 1, रूमना 1, असोला 1, मलकापूर पांग्रा 1, रताळी 1, वाघाळा 1, शेंदुर्जन 1, गुंज 1, मेहकर शहर :5 , मेहकर तालुका : डोणगांव 2, रायपूर 1, पाथर्डी 1, अकोला ठाकरे 2, बोरी 3, कल्याणा 3, लव्हाळा 2, अंजनी बु 1, नायगांव दे. 1, लोणी 1, आरेगांव 1, खामखेड 1, कोयाळी 1, गोहेगांव 1,धोडप 1, जानेफळ 2, चौंढी 2, आंध्रुड 2, गोभणी 1, मोहना 1, विश्वी 10, भोसा 12, जळगांव जामोद शहर : 9, जळगांव जामोद तालुका : हिंगणा बाळापूर 1, निंभोरा 1, वडशिंगी 1, सुलज 1, आसलगांव 1, वडगांव गड 2, जामोद 6, पिं. काळे 9, हिंगणा 1, हाशमपूर 2, चावरा 2, नांदुरा शहर :7, नांदुरा तालुका : मामुलवाडी 1, महाळुंगी 1, पोटळी 1, वाडी 1, दादगांव 1, निमगांव 2, वडाळी 1, खुरकुंडी 1, वसाडी 1, अंबोडा 1, धानोरा 1, लोणार शहर : 6, लोणार तालुका : शारा 1, जांभूळ 1, चिखला 9, सरस्वती 1, टिटवी 2, बिबी 1, कि. जट्टू 1, परजिल्हा मोलखेडा ता. सोयगांव 1, बाळापूर 2, अकोला 2, रिसोड 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 478 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान वडशिंगी ता. जळगांव जामोद येथील 54 वर्षीय महिला, लाखनवाडा ता. खामगांव येथील 38 वर्षीय पुरूष, मलकापूर पांग्रा ता. सिं. राजा येथील 83 वर्षीय पुरूष, मिर्झा नगर बुलडाणा येथील 70 वर्षीय पुरूष, चिखली येथील 75 वर्षीय महिला व शिवनगर नांदुरा येथील 70 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 615 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 456297 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 78109 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 78109 आहे. आज रोजी 2733 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 456297 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 83241 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 78109 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 4559 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 573 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Sunday 23 May 2021

DIO BULDANA NEWS 23.5.2021

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांनी सज्ज राहावे - पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे * कथित आरोपांनी डॉक्टरांनी निराश होऊ नये * रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील संयम पाळत डॉक्टरांचा सन्मान करावा बुलडाणा, (जिमाका) दि. २३ - चिखली शहरातील खासगी कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर झालेल्या कथित आरोपांनी डॉक्टरांनी निराश होऊन न जाता संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. संपूर्ण जगात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाची देशात दुसरी लाट सुरू असून तज्ज्ञांच्या माहितीनुसार लवकरच तिसरी लाट देखील येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये चिखली शहरातील खासगी कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांची महत्वपूर्ण बैठक स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासगी हॉस्पिटलला व डॉक्टरांना येणाऱ्या अडीअडचणी पालकमंत्री महोदयांनी जाणून घेतल्या. डॉक्टरांवर व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले यापुढे खपवून घेतले जाणार नाही असे म्हणत डॉक्टर मंडळी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या या संकट काळात रुग्णसेवा देत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी, नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी डॉक्टरांचा योग्य तो सन्मान करावा असे आवाहन पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी केले. यावेळी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी काय काय उपाय योजना केल्या पाहिजे याबाबत डॉक्टरांकडून माहिती जाणून घेतली. तिसरी लाट ही लहान मुलांकरिता त्रासदायक ठरू शकते त्यामुळे बालरोगतज्ज्ञांनी यासाठी आपापले रुग्नालय सज्ज ठेवावे, त्यांच्यावर आवश्यक तो औषधोपचार करून योग्य प्रकारे त्यांचा उपचार होईल याची काळजी घ्यावी अशा सूचना ना डॉ शिंगणे यांनी दिल्या. यावेळी चिखली मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॅा सुहास खेडेकर, डॅा सुहास तायडे, डॅा शिवशंकर खेडेकर, डॅा रामेश्वर दळवी, डॅा संतोष सावजी, डॅा भारत पानगोळे, डॅा पंढरी इंगळे, डॅा कृष्णा खंडागळे, डॅा प्रियेश जैस्वाल, डॅा निलेश गोसावी, डॅा मंगेश मिसाळ, डॅा अजय अवचार, डॉ प्रकाश शिंगणे, डॉ सुशांत पाटील उपस्थित होते.

Saturday 22 May 2021

DIO BULDANA NEWS 22.5.2021

मोबाईल मेडीकल युनीट वाहनाची पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली पाहणी मोबाईल युनीट वाहन जनतेच्या आरोग्य सेवेत रूजु लोणार, खामगांव व मेहकर तालुक्यातील दुर्गम भागात जावून देणार सेवा बुलडाणा,(जिमाका) दि.22 : राज्यात सर्व जिल्ह्यामध्ये मोबाईल मेडीकल युनीट प्रकल्पासाठी दुर्गम आणि अतिदुर्गम भागांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातही मोबाईल मेडीकल युनीट वाहन मंजूर झाले असून हे वाहन मेहकर, लोणार व खामगांव तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये वैद्यकीय सेवा देणार आहे. या वाहनाची आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी वाहनांमधील वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. तसेच सुविधांविषयी माहिती घेतली. या मेडीकल युनीटचा जिल्ह्यात दुर्गम भागातील नागरिकांच्या वैद्यकीय गरजांसाठी पुरेपूर उपयोग करावा. कोविडच्या काळात युनीटमधील वैद्यकीय सेवांचा लाभ द्यावा. लसीकरण व कोरोना तपासणीसाठी युनीटचा वापर करण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी यावेळी दिल्या. सदर मोबाईल मेडीकल युनीट चालविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ व वाहन चालक भरण्यात आला असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या युनीटमध्ये रक्त चाचणी, ताबडतोब अहवाल आदींसह अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत, अशी माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे यांनी दिली. *************** वेळेत निदान व उपचार केल्यास म्युकर मायकोसिस पुर्ण बरा होतो जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांची माहिती घाबरू नका.. जागरूक रहा बुलडाणा,(जिमाका) दि.22 : कोविड बाधीत रूग्णांमध्ये म्युकर मायकोसिस अर्थात काळी बुरशी हा आजार दिसून येत आहे. म्युकर मायकोसिस हा एक सामान्यत: दुर्मिळ असा बुरशीजन्य आजार आहे. या आजारावर वळेत निदान व उपचार केल्यास हा आजार पुर्णपणे बरा होतो. त्यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी जागरूक राहून उपचार घ्यावेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे यांनी आज दिली. म्युकर मायकोसिस हा आजार म्युकर नावाच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी जमिनीत, खतामध्ये, सडणाऱ्या फळांत व भाज्यांत, तसेच हवेत आणि अगदी निरोगी व्यक्तीच्या नाकांत व नाकाच्या स्त्रावात देखील आढळते. ज्या व्यक्तीमध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, अशा रूग्णांमध्ये म्युकर मायकॉसिसची बाधा होण्याचे प्रमाण अधिक असू शकते. ह्या आजाराचा धोका अधिक कुणाला आहे : ज्यांना स्टेरॉईड औषधे दिली जात आहेत आणि त्यामुळे त्यांची रोग प्रतिकारकशक्ती कमी झाली आहे, ज्यांचा मधुमेह अनियंत्रीत आहे, ज्यांना कर्करोग आहे किंवा ज्यांचे नुकतेच अवयव प्रत्यारोपण झाले आहे. ज्यांना इम्युनमोड्युलेटर्स अर्थात रोग प्रतिकारकशक्तीत फेरफार करणारी औषधे दिली जात आहेत, जे प्रदीर्घ काळ आयसीयू म्हणजे अतिदक्षता कक्षात दाखल आहेत, ज्यांना प्रदीर्घ काळापासून ऑक्सिजन थेरपी दिली जात आहे, ज्यांना जुनाट किडनी किंवा लिवरचा आजार आहे. म्युकर मायकोसिस टाळण्यासाठी हे करा : रक्तातील साखरेची, एचबीए१सीची तपासणी करा, रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवा, कोविड नंतर रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह यांचे निरीक्षण करा, स्टेरॉईडचा वापर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा, घरी ऑक्सिजन घेतला जात असल्यास स्वच्छ ह्युमिडीफायर मध्ये निर्जंतुक पाण्याचाच वापर करा, अँटिबायोटिक / अँटीफंगल औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. हे करू नका : आजाराची चिन्हे व लक्षणे याकडे दुर्लक्ष करू नका, बंद असणारे नाक हे बॅक्टेरीयल सायनुसायटिसमुळे असावे असा विचार करू नका (विशेषत: इम्युनोसप्रेशन झालेले आणि कोविडमुळे ज्यांना इम्युनोमॉड्युलेटर्स चे उपचार दिले गेले आहेत) या आजाराची तपासणी करून घेण्यास आग्रही राहून दुर्लक्ष करू नका. धोकादायक परिणाम टाळण्यासाठी या लक्षणांवर लक्ष ठेवा : डोळे दुखणे, डोळ्यांच्या बाजूला लाली येणे, नाक चोंदणे, सुज येणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला, दात, हिरड्या दुखणे व दात ढिले होणे, श्वास घेण्यास त्रास, रक्ताची उलटी होणे व मानसिक स्थितीवर परिणाम. तरी वेळीच उपचार, निदान केल्यास म्युकर मायकोसिस पुर्णपणे बरा होतो. नागरीकांनी घाबरून न जाता जागरूक राहून उपचार घ्यावेत, असे आवाहनही डॉ कांबळे यांनी केले आहे. ****************** कृषी सेवा केंद्र सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा* दूध विक्री केंद्र सकाळी 6 ते 9, सायं 6 ते रात्री 8 पर्यंत सुरू बुलडाणा, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र, कृषी निगडित दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात 1 जून 2021 पर्यंत सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आदेशात अंशत : बदल करण्यात आला आहे. तसेच या वेळे व्यतिरिक्त सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तू दुकाने, किराणा,स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने यांना घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकाळी 7 ते सायं 7 पर्यंत मुभा देण्यात येत आहे. तसेच दूध व दुग्ध जन्य पदार्थ विक्री सकाळी 6 ते सकाळी 9 आणि सायं 6 ते रात्री 8 सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. घरपोच दूध विक्री नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष एस. रामामुर्ती यांनी दिले आहेत. **** जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील रुग्णालयांना 375 रेमडेसिवीरचे वितरण बुलडाणा, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक 22 मे रोजी 375 रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिली. आज 22 मे रोजी रुग्णालयांना बेड व रूग्ण संख्येनुसार वितरण करण्यात आलेले रेमडेसिवीर याप्रमाणे – बुलडाणा : लद्धड हॉस्पीटल 7 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पीटल 19, रविदीप हार्ट केअर हॉस्पीटल 3, निकम हॉस्पीटल 8, जाधव पल्स हॉस्पीटल 0, सहयोग हॉस्पीटल 5, आशिर्वाद हॉस्पीटल 26, सिद्धीविनायक हॉस्पीटल 8, काटकर हॉस्पीटल 0, शिवसाई हॉस्पीटल 7, संचेती हॉस्पीटल 6, सिटी हॉस्पीटल 0, सोळंकी हॉस्पीटल 2, खरात हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर 1, सुश्रुत हॉस्पिटल 2, बुलडाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 0, रेड्डी हॉस्पीटल 1, कोठारी हॉस्पीटल 0, न्यू लाईफ कोविड हॉस्पीटल 4, चिखली : योगीराज हॉस्पीटल 29, हेडगेवार हॉस्पीटल 4, गुरूकृपा हॉस्पीटल 2, तायडे हॉस्पीटल 18, दळवी हॉस्पीटल 18, पानगोळे हॉस्पीटल 10, खंडागळे हॉस्पीटल 16, गंगाई हॉस्पीटल 3, जैस्वाल हॉस्पीटल 0, ओम गजानन हॉस्पिटल 2, सावजी हॉस्पीटल 24, अनुराधा मेमोरियल 8, तुळजाई हॉस्पीटल 0, मलकापूर : झंवर हॉस्पीटल 7, ऑक्सीजन कोविड केअर सेंटर 0, मुरलीधर खर्चे हॉस्पिटल 15, आशिर्वाद हॉस्पीटल 26, सिटी केअर 10, नांदुरा : स्वामी समर्थ कोविड सेंटर 17, श्री गजानन कोविड हॉस्पिटल 0, शेगांव : श्री गजानन कोविड हेल्थ केअर 18, सोळंके कोविड केअर हॉस्पीटल 7, शामसखा हॉस्पीटल 14, खामगाव : श्रीराम हॉस्पीटल 0, आईसाहेब मंगल कार्यालय कृष्णअर्पण 18, चव्हाण 0, अश्विनी नर्सिंग हॉस्पीटल 0, साई 0, झिऑन हॉस्पीटल 2, मेहकर : मातोश्री हॉस्पीटल 0, मापारी हॉस्पीटल 0, गिताई सुश्रूत हॉस्पीटल 0, गोविंद क्रिटीकल 5, श्री. गजानन हॉस्पीटल 0, अजंता हॉस्पीटल 3, मेहकर मल्टीस्पेशालीटी 0, राठोड हॉस्पिटल 0, दिवठाणे 0, दे. राजा : बालाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 5, संत गाडगेबाबा हॉस्पीटल 8, मी अँड आई हॉस्पीटल 0, तिरुपती कोविड सेंटर 1, सिं. राजा : जिजाऊ हॉस्पीटल 6, आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बिबी ता. लोणार 2, विवेकानंद हॉस्पीटल हिवरा आश्रम ता. मेहकर 12, असे एकूण 375 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्राप्त झालेल्या साठ्यापैकी 10 टक्के राखीव साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र पुरवठा झालेल्या इंजेक्शन ची संख्या बघता राखीव कोट्यातील इंजेक्शन चा पुरवठा सुध्दा रुग्णालयांना करण्यात येत आहे. सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी सदर औषधाचा वापर हा योग्यरित्या व अत्यावश्यक असलेल्या रूग्णांकरीताच प्राधान्याने वापरण्यात यावा. यापूर्वी वापरलेल्या कुपी सॅनीटाईज करून तहसिल कार्यालयात प्रमाणपत्रासह जमा करून सुरक्षीत ठेवाव्यात. गैरवापर होणार नाही याची स्वत: तहसिलदार यांनी दक्षता घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कळविले आहे. ************

Friday 21 May 2021

DIO BULDANA NEWS 21.5.21

लहान मुलांवरील कोविड उपचारांसाठी बाल रोग तपासणी कक्ष तयार ठेवावे - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक म्युकर मायकोसिसवरील उपचारासाठी सामान्य रूग्णालयात विशेष शस्त्रक्रीया कक्षाची व्यवस्था बुलडाणा,(जिमाका) दि.21 : देशात पुढील सहा ते सात महिन्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेमध्ये लहान मुले प्रादुर्भावग्रस्त होणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने लाटेपासूल लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी आतापासून तयारीला लागावे. त्यासाठी जिल्ह्यातील रूग्णालयांमध्ये विशेष बाल रोग तपासणी कक्ष तयार करण्यात यावे, तसेच बेडची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी कोविडबाबत आढावा बैठकीचे आयोजन केले. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आदी उपस्थित होते. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते. ऑक्सिजन दिलेल्या कोविड बाधीत रूग्णांना म्युकर मायकोसिस (काळी बुरशी) हा बुरशीजन्य आजार होत असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, म्युकर मायकोसिस आजाराबाबत सध्या बाधीत रूग्णांवर प्रभावी उपचार करावे. या आजारावरील इंजेक्शन व औषधांचा मागणीनुसार पुरवठा सनियंत्रीत करावा. कुठेही औषधाविना रूग्णांचे हाल होवू नये. म्युकर मायकोसिस आजाराबाबत रूग्णालयांना स्वच्छतेबाबत सुचीत करावे. सर्व शासकीय व खाजगी रूग्णालयांमध्ये स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. म्युकर मायकोसिस उपचाराकरीता जिल्हा सामान्य रूग्णालयात शस्त्रक्रीया कक्षाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. तिसऱ्या लाटेत लहान मुलांवरील उपचारांसाठी बाल रोग तज्ज्ञांची समिती तयार करावी. त्यांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. जिल्ह्यात बऱ्याच गावांनी लोकांच्या पुढाकारातून विलगीकरण कक्ष स्थापन केलेले आहे. या कक्षात गावातील संशयीत रूग्णांना आणून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे गावातील संसर्गाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असे कक्ष जिल्हा परिषदेने गावागावात सुरू करण्यात यावेत, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात सध्या लागू असलेले निर्बंध शासनाच्या आदेशानुसार कायम ठेवावे. निर्बंधामुळे जिल्ह्यातील रूग्णसंख्येत घट झालेली दिसून आली आहे. पोलीस विभागाने निर्बंधाचे काटेकोर पालन करण्याची कार्यवाही करावी. नागरिकांनी लसीकरण झालेले असले तरी कोरोना संसर्ग सुरक्षेची त्रि सुत्रीचे पालन करावे. घराबाहेर विनामास्क पडू नये, हात वारंवार धुवावे किंवा सॅनीटाईज करावे, गर्दीमध्ये जाणे टाळावे व सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी यावेळी केले. याप्रसंगी त्यांनी मे महिन्यातील रूग्णवाढ, मृत्यू, झालेल्या एकूण तपासण्या, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर बेड, कोविड केअर सेंटरवरील भोजन, पाणी, स्वच्छता, जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची सद्यस्थिती आदींचाही आढावा घेतला. सध्या जिल्ह्यात म्युकर मायसिसचे 27 रूग्ण आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील एकूण गावांपैकी 640 गावांमध्ये कोरोना रूग्ण आढळून आले असून 130 गावांमध्ये आजपावेतो एकही कोरोना रूग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती जि.प उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी दिली. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी उपस्थित होते. ***** म्युकर मायकोसीस आजारावर महात्मा फुले जनारोग्य अभियानातून उपचाराची सुविधा बुलडाणा,(जिमाका) दि.21 : म्युकर मायकोसीस या आजाराच्या उपचारावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रूग्णालयांमध्ये उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आजारावर उपचाराकरीता महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतगंर्त सर्जीकल पॅकेज 11 व मेडीकल पॅकेज 8 उपलब्ध आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत प्रति कुटूंब प्रति वर्ष 1.50 लक्ष रूपये एवढे विमा संरक्षण आहे. तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये प्रति कुटूंब प्रति वर्ष 1.50 लक्ष रूपये पर्यंत विमा संरक्षण आहे. त्यापुढे हमी तत्वावर 5 लक्ष रूपया पर्यंत संरक्षण आहे. तसेच म्युकर मायकोसीस आजारावरील या आजारापूर्वी बाधीत व्यक्तीवर अथवा त्याच्या कुटूंबातील व्यक्तीवर उपलब्ध विमा संरक्षणापैकी काही रक्कम खर्च झालेली असू शकते. म्युकर मायकोसिस आजारावरील उपचाराकरीता योजनेतील विविध पॅकेज एकत्रितरित्या व वारंवार पुर्नवापर करावा लागण्याची शक्यता आहे. या दोन्ही आरोग्य योजनांमध्ये अनुज्ञेय विमा संरक्षणापेक्षा अधिक खर्च आल्यास अधिकचा खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्वावर भागविण्यात येणार आहे. या आजारावरील उपचारामध्ये अँटी फंगल औषधे हा महत्वाचा भाग आहे. संबंधित औषधे कमी प्रमाणात उपलब्ध असून महागडी आहेत. शासनाच्या प्रचलित नियमानुसार विहीत कार्यपद्धती अनुसरून संबंधित प्राधिकरणाकडून उपलब्ध करून घेण्यात यावीत व अंगीकृत रूग्णालयास पात्र लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावीत. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचेमार्फत सनियंत्रण केले जाईल. म्युकर मायकोसिस आजाराची तीव्रता जास्त प्रमाणात असून याकरीता बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासते. तसेच याकरीता येणारा खर्च ही जास्त आहे. यामुळे खाजगी रूग्णालयातील उपचारावरील खर्चामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे या आजारावरील उपचार योजनांच्या अंगीकृत रूग्णालयातून करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. **********

Thursday 20 May 2021

DIO BULDANA NEWS 20.5.2021

कोरोना अलर्ट : प्राप्त 4946 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 591 पॉझिटिव्ह • 759 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.20 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5537 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4946 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 591 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 367 व रॅपीड टेस्टमधील 224 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 952 तर रॅपिड टेस्टमधील 3994 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4946 अहवाल निगेटीव्ह आहेत. तालुका निहाय पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 63, बुलडाणा तालुका : साखळी बु 1, साखळी खु 1, सुंदरखेड 1, पिं. सराई 2, चांडोळ 2, करडी 2, देवपूर 1, वरूड 1, धाड 4, शिरपूर 1, डोंगर खंडाळा 1, हतेडी 2, केसापूर 1, सागवन 1, खुपगांव 1, इजलापूर 1, कुलमखेड 1, पाडळी 1, वरवंड 1, रायपूर 1, मोताळा तालुका : लिहा 1, पिं देवी 2, दाभाडी 1, घुसर 1, उबाळखेड 5, चावर्दा 1, खामगांव शहर :21 , खामगांव तालुका : भालेगांव 1, पारखेड 2, वर्णा 1, पळशी बु 1, शिरजगांव दे 3, नायदेवी 1, टेंभुर्णा 1, उमरा 1, करमाळा 2, राजनखेड 1, माळेगांव 1, शेगांव शहर :32, शेगांव तालुका : चिंचोली 2, पहुरजिरा 5, आडसूळ 2, पहुरपूर्णा 1, जलंब 1, जोगलखेड 1, गायगाव 4, जवळा 1, तिंत्रव 1, भास्तन 19, वरूड 1, नागझरी 1, शिरसगांव निळे 1, कळंबी 2, टाकळी धारव 2, बोंद्री 2, मच्छींद्रखेड 1, चिखली शहर : 25, चिखली तालुका : किन्होळा 3, मेरा बु 6, बोरगांव काकडे 1, करणखेड 1, शेलूद 1, भालगांव 1, पिं. उंडा 1, पेठ 1, दे. घुबे 1, लोणी लव्हाळा 2, चांधई 1, करतवाडी 1, वळती 1, वर्दडा 2, माळशेंबा 1, वाडी 1, मेरा खु 1, किन्ही सवडत 1, जांभोरा 1, मलकापूर शहर :17 , मलकापूर तालुका : भाडगणी 3, लासुरा 1, झोडगा 3, वाघुड 12, वरखेड 2, माकनेर 2, लोणवडी 3, बेलाड 1, मोरखेड 1, तांदुळवाडी 3, दे. राजा शहर :2 , दे. राजा तालुका : पिंपळगांव 1, निमखेड 1, सावखेड भोई 1, सिनगांव जहा 1, अंभोरा 2, जांभोरा 1, अंचरवाडी 1, दे. मही 2, निमागांव वायाळ 1, असोला 1, सिं. राजा शहर :3 , सिं. राजा तालुका : लिंगा 1, गुंज 4, साखरखेर्डा 1, ताडेगांव 2, रूमना 3, चांगेफळ 1, देवखेड 1, सेलू 3, पिं. लेंडी 1, बोरखेडी 1, हिवरा गडलिंग 2, पिं. सोनारा 1, मेहकर शहर :5 , मेहकर तालुका : डोणगांव 1, लोणी 5, गजरखेड 1, आरेगाव 1, भोसा 14, मिस्कीनवाडी 4, नागझरी 1, बाऱ्हई 1, करंजी 1, घाटबोरी 1, लोणी गवळी 1, सोमठाणा 2, मारोती पेठ 1, शहापूर 3, हिवरा साबळे 1, थार 2, कळपविहीर 1, हिवरा आश्रम 1, अंजनी 1, मुंदेफळ 1, उमरा दे. 1, संग्रामपूर शहर : 2, संग्रामपूर तालुका : कथरगांव 1, काकनवाडा 4, वरवट 2, पळशी 4, काटेल 1, चौंढी 1, शेवगा 6, सगोडा 1, चांगेफळ 2, जस्तगांव 1, दानापूर 1, सोनाळा 2, टुनकी 1, वसाडी 1, बोरखेड 2, बावनबीर 1, उमरा 1, वानखेड 1, तिवाण 1, जळगांव जामोद शहर :12, जळगांव जामोद तालुका : मांडवा 5, पिं. काळे 1, वडशिंगी 3, वडगाव गड 1, सुनगाव 3, मि. गवळी 1, इलोरा 1, चावरा 3, धानोरा 1, खांडवी 1, खेर्डा 1, करणवाडी 1, हिंगणा नवे 1, भेंडवळ 2, मडाखेड 1, कुरणगड 7, निंभोरा 12, नांदुरा शहर :13, नांदुरा तालुका : पिं. खुटा 2, खडतगांव 1, दादगांव 1, सावंगा 1, पिं. देशमुख 2, शेंबा 1, पातोंडा 1, महाळुंगी 3, शेलगांव मुकूंद 1, फुली 1, तिकोडी 1, खैरा 3, पिं. अढाव 1,निमगांव 2, मामुलवाडी 1,माहुली 1, पलसोडा 1, वळती 4, लोणार शहर :5 , लोणार तालुका : पळसखेड 2, शारा 3, चिखला 4, दाभा 1, दे. कोळ 3, सरस्वती 2, सोमठाणा 1, कारेगांव 1, वडगांव 2, पिं. खुटा 1, टिटवी 3, पिंपळनेर 3, आरडव 1, वडगांव तेजन 2, सुलतानपूर 1, परजिल्हा बाळापूर 8, अकोला 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 591 रूग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान पारपेठ मलकापूर येथील 50 वर्षीय महीला, एकलारा ता. शेगाव येथील 60 वर्षीय महिला, सुनगांव ता. जळगांव जामोद येथील 55 वर्षीय पुरूष व मेहकर येथील 44 वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 759 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 436175 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 74668 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 74668 आहे. आज रोजी 3398 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 436175 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 80535 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 74668 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 5331 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 536 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. *************** कोविड १९ या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या मुलांसाठी जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना बुलडाणा,(जिमाका) दि.20 : कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व बालकांचे संरक्षण करण्यासठी राज्य सरकारने जिल्हास्तरावर टास्क फोर्स नेमण्याची सूचना केली आहे. शासन निर्णयास अनुसरून जिल्ह्यात या कृती दलाची जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली. याबाबत टास्क फोर्सची गुगल मीटच्या माध्यमातून १९ मे रोजी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. बैठक जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक मारवाडी, ‍जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे आदींसह जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आई वडिलांचे छत्र गमावलेल्या बालकांचा व ज्यांचे आई वडील किंवा पालक कोरोना या आजाराच्या संक्रमणामुळे रुग्णालयात दाखल असून निवारा आणि मदतीची अत्यावश्यक गरज आहे अशा बालकांचा शोध घेण्याचे आदेश यावेळी देण्यात आले जिल्ह्यात अशा बालकांसाठी ० ते ०६ या वयोगटासाठी शिशुगृह व ०६ ते १८ वयोगटासाठी बालगृह निश्चित करण्याचे आदेश जिल्हा महिला व बाल विकास विभागाला जिल्हाधिकारी यांनी दिले. संकटात सापडलेल्या अशा बालकांची माहिती चाईल्ड हेल्प लाईन १०९८ वर देण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले. तसेच बालकांच्या संविधानिक व बाल हक्कांच्या संरक्षणासाठी कृती दलामार्फत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पोलीस विभाग यांना सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रुग्णालये, खाजगी दवाखाने तसेच कोविड सेन्टर येथे महिला व बाल विकास विभागाचे मदत क्रमांक दर्शनी भागात प्रदर्शित करण्याचे आवाहन या कृती दला मार्फत करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी कोरोना काळात संकटात सापडलेल्या बालकांची माहिती खालील क्रमांकावर द्यावी. इतर संस्था, व्यक्ती किंवा खोट्या संदेशांना बळी पडू नये. दोन्ही पालक मृत्यू पावलेले व ज्यांना अत्यावश्यक निवाऱ्याची गरज आहे, अशा बालकांची माहिती तात्काळ नजीकच्या जिल्हा बाल कल्याण समितीला व चाईल्ड लाईन टोल फ्री १०९८ क्रमांकावर द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. बालकांसाठी जिल्हा स्तरावर कार्यरत यंत्रणा चाईल्ड हेल्प लाईन १०९८ (२४ तास), महिला व बालविकास विभाग मदत संपर्क - ८३०८९९२२२२ / ७४०००१५५१८, बाल कल्याण समिती बुलडाणा - ८३८०९४०७७८, ८८०५५२०३०८, ९४२३७४८०१९, ९४२१६५५७१४५, बालगृह- ९९६०३३८०००, शिशुगृह- ९४२२८८१९३२, ७४९८५४३६३५, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ८९७५६००६३१, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय बुलडाणा – ९४२१५६६८३४. ******** रूग्णवाहिकांचे दर निश्चित; अवाजवी दर आकारल्यास कारवाई बुलडाणा, (जिमाका) दि. 20 - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रूग्णवाहिकांची मागणी वाढली आहे. रूग्ण वाहिका धारकांकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्यया तक्रारी येत आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, बुलडाणा यांच्याकडून रूग्णवाहिकांचे अधिकृत दर निश्चित करण्यात आले आहे. प्राधिकरणाने निश्चित केलेल्या दरापेक्षा रूग्णवाहिका धारकाने जादा दर आकारल्यास तात्काळ उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ईमेल आयडी mh28@mahatranscom.in वर तक्रार नोंदवावी. त्याचप्रमाणे सर्व रूग्णवाहिका धारकांनी वाहनात नोंदवही ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये रूग्णाचे नाव, पत्ता, दिनांक, मोबाईल क्रमांक, आकारलेले भाडे व रूग्णासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. वाहन यांत्रिकदृष्ट्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी वाहन मालकाची आहे. सदर भाडे दरपत्रक रूग्णवाहिकेच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे चालक व मालकास बंधनकारक आहे. खाली दिलेल्या भाडे दरापेक्षा जास्त दर आकरणी करणाऱ्या वाहन मालकावर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, बुलडाणा यांचे आदेशानुसार प्रस्तावीत दंडात्मक तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. असे आहे अधिकृत दर रूग्ण्वाहिका (चार चाकी करीता) : भाडे दर इंधन विरहीत 300 कि. मी पर्यंत 24 तासांकरीता (चालक व मदतनीस सहीत) 300 कि.मी च्या वरचे प्रति कि. मी दर, विना वातानुकूलीत रूग्णवाहिकेसाठी 1000 रूपये प्रति कि.मी 4 रूपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 1100 रूपये प्रति कि.मी 5 रूपये प्रमाणे, भाडे दर 12 तास / 80 कि.मी साठीचा एकूण दर (इंधन चालक व मदतनीस सहीत) 80 कि.मी च्या वरचे प्रति कि.मी दर विना वातानुकूलीत रूग्णवाहिकेसाठी 1600 रूपये प्रति कि.मी 20 रूपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 1700 रूपये प्रति कि. मी 21 रूपये प्रमाणे, भाडे दर 24 तास / 120 कि.मी साठीचा एकूण दर (इंधन, चालक व मदतनीस सहीत) 120 कि.मी च्या वरचे प्रति कि. मी दर विना वातानुकूलीत रूग्णवाहिकेसाठी 2400 रूपये प्रति कि.मी 20 रूपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 2500 रूपये प्रति कि. मी 21 रूपये प्रमाणे रूग्ण्वाहिका (सर्व सुविधा उपलब्ध असणारी) : भाडे दर इंधन विरहीत 300 कि. मी पर्यंत 24 तासांकरीता (चालक व मदतनीस सहीत) 300 कि.मी च्या वरचे प्रति कि. मी दर, विना वातानुकूलीत रूग्णवाहिकेसाठी 2100 रूपये प्रति कि.मी 5 रूपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 2100 रूपये प्रति कि.मी 5 रूपये प्रमाणे, भाडे दर 12 तास / 80 कि.मी साठीचा एकूण दर (इंधन चालक व मदतनीस सहीत) 80 कि.मी च्या वरचे प्रति कि.मी दर विना वातानुकूलीत रूग्णवाहिकेसाठी 3100 रूपये प्रति कि.मी 38.75 रूपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 3100 रूपये प्रति कि. मी 38.75 रूपये प्रमाणे, भाडे दर 24 तास / 120 कि.मी साठीचा एकूण दर (इंधन, चालक व मदतनीस सहीत) 120 कि.मी च्या वरचे प्रति कि. मी दर विना वातानुकूलीत रूग्णवाहिकेसाठी 4600 रूपये प्रति कि.मी 38.75 रूपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 4600 रूपये प्रति कि. मी 38.75 रूपये प्रमाणे दर असतील. 00000 जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील रुग्णालयांना 422 रेमडेसिवीरचे वितरण बुलडाणा, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक 20 मे रोजी 422 रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिली. आज 20 मे रोजी रुग्णालयांना बेड व रूग्ण संख्येनुसार वितरण करण्यात आलेले रेमडेसिवीर याप्रमाणे – बुलडाणा : लद्धड हॉस्पीटल 7 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पीटल 15, रविदीप हार्ट केअर हॉस्पीटल 6, निकम हॉस्पीटल 7, जाधव पल्स हॉस्पीटल 0, सहयोग हॉस्पीटल 10, आशिर्वाद हॉस्पीटल 25, सिद्धीविनायक हॉस्पीटल 12, काटकर हॉस्पीटल 0, शिवसाई हॉस्पीटल 7, संचेती हॉस्पीटल 0, सिटी हॉस्पीटल 0, सोळंकी हॉस्पीटल 2, खरात हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर 1, सुश्रुत हॉस्पिटल 3, बुलडाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 8 , रेड्डी हॉस्पीटल 0, कोठारी हॉस्पीटल 0, न्यू लाईफ कोविड हॉस्पीटल 6, चिखली : योगीराज हॉस्पीटल 30, हेडगेवार हॉस्पीटल 5, गुरूकृपा हॉस्पीटल 0, तायडे हॉस्पीटल 19, दळवी हॉस्पीटल 21, पानगोळे हॉस्पीटल 15, खंडागळे हॉस्पीटल 10, गंगाई हॉस्पीटल 0, जैस्वाल हॉस्पीटल 10, ओम गजानन हॉस्पिटल 4, सावजी हॉस्पीटल 23, अनुराधा मेमोरियल 10, तुळजाई हॉस्पीटल 0, मलकापूर : झंवर हॉस्पीटल 4, ऑक्सीजन कोविड केअर सेंटर 7, मुरलीधर खर्चे हॉस्पिटल 8, आशिर्वाद हॉस्पीटल 2, सिटी केअर 9, नांदुरा : स्वामी समर्थ कोविड सेंटर 20, श्री गजानन कोविड हॉस्पिटल 0, शेगांव : श्री गजानन कोविड हेल्थ केअर 20, सोळंके कोविड केअर हॉस्पीटल 10, शामसखा हॉस्पीटल 13, खामगाव : श्रीराम हॉस्पीटल 0, आईसाहेब मंगल कार्यालय कृष्णअर्पण 9, चव्हाण 7, अश्विनी नर्सिंग हॉस्पीटल 16, साई 0, झिऑन हॉस्पीटल 2, मेहकर : मातोश्री हॉस्पीटल 0, मापारी हॉस्पीटल 0, गिताई सुश्रूत हॉस्पीटल 5, गोविंद क्रिटीकल 9, श्री. गजानन हॉस्पीटल 0, अजंता हॉस्पीटल 2, मेहकर मल्टीस्पेशालीटी 0, राठोड हॉस्पिटल 0, दिवठाणे 2, दे. राजा : बालाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 2, संत गाडगेबाबा हॉस्पीटल 8, मी अँड आई हॉस्पीटल 5, तिरुपती कोविड सेंटर 1, सिं. राजा : जिजाऊ हॉस्पीटल 0, आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बिबी ता. लोणार 4, विवेकानंद हॉस्पीटल हिवरा आश्रम ता. मेहकर 0, असे एकूण 422 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्राप्त झालेल्या साठ्यापैकी 10 टक्के राखीव साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र पुरवठा झालेल्या इंजेक्शन ची संख्या बघता राखीव कोट्यातील इंजेक्शन चा पुरवठा सुध्दा रुग्णालयांना करण्यात येत आहे. सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी सदर औषधाचा वापर हा योग्यरित्या व अत्यावश्यक असलेल्या रूग्णांकरीताच प्राधान्याने वापरण्यात यावा. यापूर्वी वापरलेल्या कुपी सॅनीटाईज करून तहसिल कार्यालयात प्रमाणपत्रासह जमा करून सुरक्षीत ठेवाव्यात. गैरवापर होणार नाही याची स्वत: तहसिलदार यांनी दक्षता घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कळविले आहे. ******* पाणी टंचाई निवारणार्थ दोन गावांसाठी टँकर मंजूर बुलडाणा, (जिमाका) दि.20 : बुलडाणा तालुक्यातील सुंदरखेड व नांदुरा तालुक्यातील कोलासर, सांगवा या दोन गावांमधील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सुंदरखेड येथील 13317 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सदर टँकर गावाला दररोज 2 लक्ष 62 हजार 940 लीटर पाण्याचा पुरवठा करणार आहे. कोलासर, सांगवा येथील 934 लोकसंख्येसाठी एक टँकर 18 हजार 680 लीटर पाणी पुरवठा करणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी (महसूल) बुलडाणा व मलकापूर यांनी कळविले आहे. ******

Wednesday 19 May 2021

DIO BULDANA NEWS 19.5.2021

जिल्ह्यात सुट दिलेल्या सेवांसह निर्बंध लागू किराणा, भाजीपाला व फळे, सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने सकाळी 7 ते 11 खुली राहणार कृषी निगडीत सेवा, दुकाने व पावसाळी हंगाम साहित्य दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत, सर्व बँक, वित्तीय संस्था सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : राज्य शासनाने कोविड च्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन आदेश लागू केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातही 20 मे 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 1 जुन रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंधासह प्रतिबंधात्मक जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आदेश परित केले आहे. जिल्ह्यात सुट दिलेल्या सेवांसह हे निर्बंध लागू राहणार आहेत. या आदेशानुसार सर्व किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, मिठाई दुकाने, तसेच सर्व प्रकारची खाद्य पदार्थाची दुकाने (चिकन,मटन,पॉल्ट्री,मासे आणि अंडी दुकाने, स्वीट मार्ट), पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकाने, पेट्रोल पंप, डिझेल पंप, सीएनजी गॅस पंप सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असणार आहे. तसेच दुध व दुग्धजन्य विक्री पदार्थ (डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी) आदी दुकाने सकाळी 6 ते सकाळी 9 व संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहतील. तसेच घरपोच दुध विक्री नियमित वेळेनुसार सुरू राहील. कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने, कृषि प्रक्रिया, उद्योग गृहे, शेती अवजारे व शेतातील उत्पादनाशी निगडीत दुकाने, पावसाळी हंगाम सामग्री संबंधित दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील. सदर ठिकाणी सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर, सॅनीटायझर आदी नियमांचे काटेकोर पालन करावे. पेट्रोल पंपावर सकाळी 11 ते रात्री 8 या कालावधीत शासकीय मालवाहतूक, रूग्णवाहिका अत्यावश्यक वाहनांकरीता तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे व मालाची वाहतुक करण्याकरीता शहानिशा करून ट्रॅक्टर घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना डिझेल इंधन पुरवठा करता येणार आहे. एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग, हायवेवरील पंप नियमित वेळेनुसार सुरू राहतील. मद्य विक्री नमुना एफएल 2, फॉर्म – ई, फॉर्म ई 2 व एफएलडब्ल्यु 2 या अनुज्ञप्तीतून घरपोच प्रकाराने मद्य विक्री करता येईल. नमुना सीएल 3 अनुज्ञप्तीतून केवळ सीलबंद बाटलीतून घरपोच प्रकाराने मद्य विक्री करता येईल. घरपोच सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत चालु ठेवण्यास परवानगी राहील. कोणत्याही परिस्थीतीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. सर्व वकीलांची कार्यालये , चार्टड अकाऊंट यांची कार्यालये सकाळी 10 ते संध्या 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. ऑप्टीकल्सची दुकाने सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत उघडण्यास मुभा असेल. सराफा व्यावसायिकांना दुकाने उघडुन तपासणी करण्याकरीता दुकान सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत सुरू ठेवता येईल. जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील सीएससी केंद्र सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण सुरू राहील. वृत्तपत्रांची घरपोच सेवा करता येईल. सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, बिगर बॅकिंग वित्तीय संस्था, सुक्ष्म वित्तीय संस्था, सहकारी संस्था, पतपेढी, विमा, पोस्ट पेमेंट बँक सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. बँकांचे कार्यालयीन कामकाज नियमित वेळेनुसार सुरू राहील. बँकांनी ग्राहकांना घरपोच सेवा द्याव्यात, एटीएममध्ये 24 तास रक्कम उपलब्ध राहील, याबाबत बँकांनी नियोजन करावे. खरीप हंगाम सुरू होत असल्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांची पीक कर्जाची कामे प्राधान्याने पुर्ण करावी. हॉटेल, रेस्टारंट, खानावळ यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थीतीत ग्राहकास हॉटेल, रेस्टारंट, खानावळ येथे स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. सदर ठिकाणी ग्राहक आढळुन आल्यास संबंधीत आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. शिवभोजन थाळी नियमित वेळेनुसार सुरू राहील. जिल्हयातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या 23 मे 2021 पर्यंत बंद राहतील. त्यापुढे टोकन पद्धतीने नियोजनाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक सह. संस्था यांची राहणार आहे. आठवडी बाजार बंद राहतील. बॅटरी, इन्व्हर्टर, युपीएस आदी साहित्याची दुकाने आरोग्य यंत्रणेच्या अत्यावश्यक कामासाठी उघडता येतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत दुकान उघडून मालाची विक्री करता येणार नाही. नगर पालिका व नगर पंचायत हद्दीतील टायर पंक्चरची दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत सुरू राहतील. तसेच हद्दीबाहेरील दुकाने नियमित वेळेनुसार सुरू राहतील. सार्वजानिक, खाजगी क्रिडांगणे, मोकळया जागा,उदयाने,बगीचे पुर्णत: बंद राहील. तसेच सार्वजानिक ठिकाणी मॉर्निंग वॉक व इवेनिंग वॉक करण्यास बंदी राहील. याबाबत संबधीत नगरपालिका तसेच पोलीस विभाग यांनी आवश्यक तपासणी करुन संबधीतांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी. सर्व केशकर्तनालये,सलुन,स्पा,ब्युटी पार्लर संपुर्णत: बंद राहील. शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था,प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारची शिकवणी वर्ग संपुर्णत: बंद राहतील तथापी ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील. नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी सबंधीत शिक्षणाधिकारी (प्राथमीक/माध्यमीक) यांची राहील. सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल हे पुर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पध्दतीने घरगुती स्वरुपात करण्यात यावा. लग्नामध्ये मिरवणुक, जेवणावळी,बँड पथक यांना परवानगी राहणार नाही. लग्न समारंभाकरीता केवळ 25 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल व सदरचा लग्न सोहळा 2 तासापेक्षा जास्त चालणार नाही याची दक्षता घ्यावी. विवाह सोहळा बेकायदेशीररित्या पार पडणार नाही याची दक्षता शहरी भागात संबधीत मुख्यधिकारी नगर पालिका तसेच ग्रामीण भागात संबधीत गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी घ्यावी व नियमानुसार त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी. लग्न समारंभाबाबतचे नियोजन व नियंत्रण संबधीत स्थानीक स्वराज्य संस्था,पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची राहील. सर्व चित्रपटगृहे,व्यायामशाळा,जलतरण तलाव,करमणुक व्यवसाय नाटयगृहे, कलाकेंद्र,प्रेषक गृहे, सभागृहे संपुर्णत: बंद राहील. सर्व खाजगी व सार्वजानिक वैदयकीय सेवा, पशु चिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरु राहतील. गॅस एजन्सीज मार्फत घरपोच गॅस सिलेंडरचे वितरण सकाळी 7 ते सायं 6 या वेळेत करण्यात यावे. परंतु ग्राहकांनी गॅस एजन्सी मध्ये प्रत्यक्ष येऊन गॅस नोंदणी करण्यास अथवा सिलेंडर घेण्यास प्रतिबंध राहील. गॅस एजन्सी येथे ग्राहक आढळुन आल्यास संबधीत एजन्सी कारवाईस पात्र राहील. सदर पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील. सर्व शासकीय, निमशासकीय,खाजगी कार्यालये व आस्थापना सदर कालावधीत बंद राहतील. वित्त व्यवसायाशी निगडीत सर्व कार्यालये यांचा देखील समावेश राहील. या सर्व कार्यालयांना आपले कामकाज सुरु ठेवायचे असल्यास ते केवळ ऑनलाईन पध्दतीने सुरु ठेवता येईल आणि सर्व विभाग प्रमुखांनी त्यांचे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती ही ऑनलाईन नोंदवावी. केवळ अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचेशी संबधीत शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरु राहतील. सर्व आपले सरकार सेवा केंद्रे व सेतु केंद्रे नगारीकांकरीता बंद ठेवण्यात येत आहेत तथापी नागरीकांना ऑनलाईन स्वरुपात वेगवेगळया प्रमाणपत्र व सुविधांकरीता अर्ज सादर करता येतील. उक्त कालावधीत नागरीकांसाठी दस्त नोंदणीचे काम पुर्णपणे बंद राहील. MIDC, उदयोग, कारखाने, सुतगिरणी येथे केवळ in-situ पध्दतीने कामकाज सुरु राहील. याबाबत सनियंत्रणाची जबाबदारी व्यवस्थापक,जिल्हा उदयोग केंद्र बुलडाणा यांची राहील. शासकीय यंत्रणामार्फत मान्सुन पुर्व विकास कामे आवश्यक पाणी पुरवठा व टंचाई विषयक कामे चालु राहतील. संबंधीत शासकीय यंत्रणांना या करीता वेगळया परवानगीची आवश्यकता नाही. याकरीता त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधु नये. सर्व शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी पुर्णत: बंद ठेवण्यात येत आहेत. निवेदन/अर्ज केवळ ऑनलाइन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. ई कॉमर्स मार्फत घरपोच सेवा सुरु राहतील तसेच स्थानीक दुकानदार, हॉटेल यांचे मार्फत घरपोच सेवा पुरविणारे कामगार यांचे कडे ग्राहकांच्या घरी जातांना बिल व संबंधीत दुकानदारामार्फत देण्यात येणार ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. याबाबतचे नियोजन संबधीत स्थानीक स्वराज्य संस्था यांनी करावी. संबधीत कर्मचा-यांना निगेटिव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील, सदर अहवालाची वैधता 7 दिवसांकरीता असेल. सर्व सार्वजानिक तसेच खाजगी बस वाहतुक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने यांची वाहतुक नागरीकांना फक्त अत्यावश्यक कामाकरीता अनुज्ञेय राहील. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. तसेच रुग्णांकरीता रिक्षा व खाजगी वाहनांस परवानगी राहील. याबाबतीत नियंत्रण व नियोजनाची जबाबदारी पोलीस वाहतुक शाखेकडे राहील. जिल्हयाच्या सर्व सिमा या आदेशाद्वारे सिल करण्यात येत असुन, मालवाहतुक व रुग्णवाहतुक करणा-या वाहनास व शासकीय वाहनास केवळ बुलडाणा जिल्हयात प्रवेश देण्यात येईल. याकरीता वेगळया स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही. अत्यावश्यक वेळेस जिल्हा पोलीस अधिक्षक बुलडाणा यांचे कडुन रितसर परवागनी प्राप्त करुन घ्यावी. जिल्हयाच्या मालवाहतुक व रुग्णवाहतुक करणा-या वाहनास व शासकीय वाहनास स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही. तथापी मालवाहतुक साठा, खत साठा इत्यादी बाबतीत फक्त लोडिंग व अनलोडिंग करण्यास परवानगी राहील. इतर कारणांकरीता व अत्यावश्यक वैदयकीय कारणांकरीता जिल्हयाबाहेर वाहतुक करावयाची असल्यास http: //covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवरुन ई-पास काढुन वाहतुक करता येईल. पावसाळयापुर्वी राष्ट्रीय महामार्गाचे कामे पुर्ण होण्याच्या दृष्टीने केवळ in-situ पध्दतीने सुरु राहील. पाणी टंचाई तसेच पाणी पुरवठा संबधीत कामे सुरु राहतील. प्रसामाध्यमांशी संबंधीत व्यक्ती/पत्रकार तसेच प्रसारमाध्यमांचे कार्यालय, सर्व प्रकारचे दैनिक नियतकालिके, वृत्तपत्रांचे वितरण तसेच टि.व्ही. न्युज चॅनल सुरु राहतील. उक्त निर्देशांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शहरी भागात संबधीत मुख्याधिकारी नगरपालिका/नगर पंचायत तसेच ग्रामीण भागाकरीता संबधीत गटविकास अधिकारी यांची राहील व या सर्व प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी हि संबधीत तालुक्याचे incident commander तथा तहसिलदार व पोलीस विभाग यांची राहील. वरील प्रमाणे आदेश सर्व आस्थापनांना काटेकोरपणे लागु होतील तसेच कोणत्याही क्षेत्रास, संस्थेस, व्यक्तीस कामकाज सुरु ठेवण्याकरीता विशेष परवानगी दिनांक 1 जुन 2021 पर्यंत देण्यात येणार नाही. सर्व आस्थापना यांनी कोरोना संक्रमण साखळी तोडण्याकरीता आप आपल्या स्तरावरुन त्रिसुत्री पध्दतीची अमलबजावणी करावी. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे. ****** रासायनिक खते छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास कारवाई करणार कृषी विभागाचा इशारा विक्रेत्यांनी जादा दराने खते विक्री करू नये बुलडाणा,(जिमाका) दि. 19 : सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून येणारा खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीचे लगबग सुरू असून माहे एप्रिल 2021 पासून युरिया वगळता इतर रासायनिक खताच्या किमतीमध्ये रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी वाढ केलेली आहे. तरी खत विक्रेत्यांनी छापील दरापेक्षा जादा दर शेतकऱ्यांना आकारू नये, असे निदर्शनास आल्यास विक्रेत्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषि विभागाने दिला आहे. जिल्ह्यामध्ये एप्रिल 2021 पूर्वीचा व त्यानंतर पुरवठा झालेला डीएपी, एमओपी, 10:26:26, 12:32:16, 20:20:0:13, 19:19:19, 24:24:0 तसेच सिंगल सुपर फॉस्फेट इत्यादी रासायनिक खते बाजारात उपलब्ध आहेत. जुन्या व नवीन दराचे रासायनिक खते बाजारात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी करताना खताचे गोणी वरील किरकोळ कमाल विक्री किंमत (एम.आर.पी) पाहूनच खतांची खरेदी करावी. तसेच रासायनिक खत विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये जुन्या व नवीन रासायनिक खताचे दर वेगवेगळे नोंदविलेल्या असल्याने शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना ही ई-पॉस मशीनची पावती विक्रेत्याकडून घ्यावी व त्यावरून रासायनिक खताचे किमतीचे पडताळणी करता येईल, केंद्रशासनाच्या एन.बी.एस (न्यूट्रीयंट बेस्ड सबसिडी) धोरणानुसार युरिया वगळता इतर खताचे दर निश्चित करण्याचा अधिकार खत उत्पादक कंपनीचे असल्याने बाजारामध्ये एकाच प्रकारचे खताचे वेगवेगळ्या कंपनीचे भाव वेगवेगळे असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी वेळी वरील बाबींची खात्री करावी. तसेच काही विक्रेत्याकडे जुन्या दराचे रासायनिक खत उपलब्ध असून देत नसल्यास किंवा जास्त पैशाची मागणी करत असल्यास व इतर रासायनिक खत, बियाणे व कीटकनाशक बाबत तक्रारी असल्यास आपल्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती व जिल्हा स्तरावर कृषी निविष्ठा कक्षातील श्री अरुण इंगळे जिल्हा गुणवंत नियंत्रण निरीक्षक यांच्या 7588619505 व विजय खोंदील, मोहिम अधिकारी जि.प यांच्या 7588041008 या मोर्बाइल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक व कृषी विकास अधिकारी श्रीमती अनिसा महाबळे यांनी केले आहे. ***** महाडिबीटी पोर्टलवर बियाणे घटकासाठी अर्ज करण्यास 20 मे पर्यंत मुदतवाढ बुलडाणा,(जिमाका) दि. 19 :  महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना”या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे. राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना” या शीर्षकाअंतर्गत “बियाणे” या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थीनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी आदी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2021 कळविण्यात आली होती. परंतु क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व पदाधिकारी यांच्या मागणी नुसार बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांन अर्ज करण्याच्या प्रक्रियेस दिनांक 20 मे 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. असा करा महाडीबीटी पोर्टलवर अर्ज महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. “वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा- डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा- डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. **** खरीप हंगाम 2021 मध्ये शेतक-यांनी घरचेच सोयाबीन बियाणे वापरावे *कृषि विभागाचे आवाहन *गावनिहाय बियाण्याची माहिती कृषी विभागाच्या www.buldanaagriculture.com संकेतस्थळावर उपलब्ध बुलडाणा,(जिमाका) दि. 19 : सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातुन येणारे बियाणे पुढील 2 वर्षापर्यंत वापरात येते. शेतक-यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. मागील दोन वर्षात शेतकयांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासुन उत्पादित झालेले सोयाबीन चालु वर्षी बियाणे म्हणून शेतकरी वापरु शकतात. गावनिहाय बियाणे उपलब्धता जाणून घेण्यासाठी कृषी विभागाच्या www.buldanaagriculture.com संकेतस्थळाला भेट द्यावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजुक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे त्याची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळतांना काळजी घ्यावी, बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यापेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लास्टीक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवतांना सोयाबीनची सातपेक्षा जास्त थर बियाण्याची पोती एकमेकावर ठेवू नये. बियाणे उन्हात ठेवू नये. बियाणे हाताळतांना जास्त प्रमाणात आदळ आपट होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पेरणीसाठी राखून ठेवलेल्या सोयाबीनची उगवण क्षमता तपासावी. शेतकऱ्यांनी 60 टक्के पेक्षा जास्त उगवण क्षमता असलेल्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीन निवड करताना बाजारातून आणायचे असल्यास कोरडवाहू शेतीसाठी एम ए यू एस 71, एम ए यू एस 158, फुले कल्याणी, जे.एस 95, जे. एस 9305 या वाणांची निवड करावी. पेरणीच्या एक पूर्ण दिवस पूर्वी कार्बोकजिम 37.5 टक्के अधिक थायरम 37.5 टक्के ग्रॅम / किलो बियाण्यास लावावे. पेरणीच्या दोन तास पूर्वी 20 ग्रॅम रायझोबियम किंवा 6 मि.ली पि.एस.बी व ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम किंवा 6 मी ली /किलो बियाण्यास लावावे. यापैकी जी पद्धत उपलब्ध असेल त्याचा बीजप्रक्रिया करण्यासाठी वापर करावा. बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकाची पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीचा वापर करावा. ते शक्य नसल्यास प्रत्येक 4 ते 6 ओळी मागे 1 ओळ सोडावी म्हणजेच पट्टा पद्धतीने पेरणी करावी. बियाणे 3 ते 5 से मी पर्यंत खोल पडल्याची खात्री करावी. रात्रीच्या वेळी पेरणी करू नये. बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे नंतर त्याची पेरणी करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. बियाण्याची उगवण क्षमतेनुसार एकरी बियाण्याचा वापर उगवण क्षमता 70 टक्के बियाणे एकरी 30 किलो, उगवण क्षमता 69 टक्के बियाणे एकरी 30.50 किलो, उगवण क्षमता 68 टक्के बियाणे एकरी 31 किलो, उगवण क्षमता 67 टक्के बियाणे एकरी 31.50 किलो, उगवण क्षमता 66 टक्के बियाणे एकरी 32 किलो, उगवण क्षमता 60 टक्के बियाणे एकरी 35 किलो. ****** पाणी टंचाई निवारणार्थ तीन गावांसाठी टँकर मंजूर बुलडाणा, (जिमाका) दि.19 : बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा, चौथा व देव्हारी या तीन गावांमधील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. डोंगरखंडाळा येथील 8630 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सदर टँकर गावाला दररोज 2 लक्ष 2 हजार 600 लीटर पाण्याचा पुरवठा करणार आहे. देव्हारी येथील 649 लोकसंख्येसाठी एक टँकर 35 हजार 580 लीटर, चौथा येथील 2000 लोकसंख्येकरीता एक टँकर 52 हजार 440 लीटर पाणी पुरवठा करणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी (महसूल) बुलडाणा यांनी कळविले आहे. *****

Tuesday 18 May 2021

DIO BULDANA NEWS 18.5.2021,1

कोविड नियंत्रणासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून चाचण्यांचे प्रमाण वाढवा - विभागीय आयुक्त पियुष सिंग बुलडाणा,(जिमाका) दि. 18 : कोविड या साथरोगाची दुसरी लाट आपल्या शिखरावर आहे. विभागातील जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये कोविड रूग्णसंख्या वाढून मृत्यू देखील वाढले आहेत. तरी यंत्रणेने बाधीत रूग्णाच्या निकट व बाह्य संपर्कातील व्यक्ती ट्रेस करून कोरोना चाचणी करावी. कोविड नियंत्रणासाठी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवून कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कोविड संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना विभागीय आयुक्त बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर मीना, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, अप्पर जिल्हाधिकारी श्री. गोगटे, निवासी उप जिल्हाधिकारी दिनेश गीते आदी उपस्थित होते. स्वॅब घेण्याचे प्रमाण जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये वाढविण्याचे आदेशीत करीत विभागीय आयुक्त म्हणाले, ग्रामीण भागातही स्वॅब घेण्याचे प्रमाण वाढवावे. बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील कुणीही सुटता कामा नये. बाधीत रूग्णांना कोविड केअर सेंटरलाच भरती करून घ्यावी. प्राणवायूचा गरजेनुसार पुरवठा करावा. कुठेही प्राणवायू कमी पडू नये. प्राणवायू निर्मिती प्रकल्प आता कार्यान्वित होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातच प्राणवायू मिळत आहे. तरी निर्माणाधिन प्राणवायू निर्मिती प्रकल्प पूर्ण करावे. ज्या रूग्णांकडे विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था आहे, अशा रूग्णांना होम आयसोलेशनची सुविधा द्यावी. आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांचे टेस्टींग करून घ्यावे. कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा असाव्यात. जेवणाचा दर्जा चांगला ठेवावा. स्वच्छतेच्या बाबत कुठलीही तडजोड नसावी. दुर्धर आजाराने ग्रस्त रूग्णांचे आठवड्याला तपासणी करून घ्यावी. लसीकरणाबाबत आढावा घेताना विभागीय आयुक्त म्हणाले, आरोग्य यंत्रणेतील सर्वांचे लसीकरण करून घ्यावे. सुपर स्प्रेडरच्या कोविड चाचण्या बंधनकारक कराव्यात. शासकीय कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांच्या नियमित कोरोना चाचण्या कराव्यात. सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टसिंगचा नियम पाळावा व हात वारंवार धुवावे या त्रि सुत्रींचा कटाक्षाने पालन झाले पाहिजे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडनीय कारवाई करण्यात यावी. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात रेमेडिसिविर औषांधांचा पुरवठा सुरळीत करावा. या इंजेक्शन च्या मागणीनुसार पुरवठा प्रत्यक्ष रुग्णालयांना करावा. काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. बैठकीला संबंधीत विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पॉझीटीव्ही रेट, मृत्यू दर, ऑक्सीजन बेड, आयसीयु बेड आदींचाही आढावा विभागीय आयुक्त यांनी घेतला.

Monday 17 May 2021

DIO BULDANA NEWS 17.5.2021

महात्मा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतंर्गत 996 उपचारांचा लाभ गंभीर अवस्थेतील कोरोना बाधीत रूग्णांवर 20 पॅकेजखाली उपचार 6 खाजगी रूग्णालयांना कोविड उपचारासाठी मान्यता बुलडाणा,(जिमाका) दि.17 : महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य या एकत्रित योजनांतंर्गत राज्यात 996 उपचारांचा लाभ सर्व नागरिकांना देण्यात येत आहे. या योजनांअंतर्गत उपचारासाठी केवळ शिधापत्रिका किंवा तहसीलदारांचा दाखला किंवा शासन मान्य छायाचित्र ओळखपत्र आवश्यक आहे. कोविड 19 साथरोगाच्या गंभीर अवस्थेतील रूग्णांना या योजनांमध्ये उपचाराचा लाभ मिळतो. अशा गंभीर रूग्णांना व्हेंटिलेटरसह व व्हेंटीलेटरविना देण्यात येणाऱ्या 20 पॅकेजखाली उपचार मिळत आहे. कोविडवरील उपचारादरम्यान पॅकेजचा कालावधी संपला व उपचार पूर्ण झाला नसल्यास रूग्णाच्या कुंटूबाचे 1.50 लक्ष रूपये संपेपर्यंत उपचाराचा कालावधी लांबविता येतो. जर कुंटूंबातील सर्व सदस्य रूग्णालयात दाखल असतील व लॉकडाऊन सुरू असल्यास कागदपत्रे सादर करता न आल्यामुळे उपचार थांबणार नाही. अशा परिस्थितीत फोन करूनही उपचार सुरू करता येतो. लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत लाभार्थी कागदपत्रे सादर करू शकतात. इतर उपचारांसाठी हा कालावधी 7 दिवसांचा असेल. शिधापत्रिकेचा व्हॉटसॲपवर पाठविलेला फोटोही नोंदणीसाठी स्वीकारला जाणार आहे. कोविड च्या रूग्णाच्या उपचाराचा समावेश योजनेतील पॅकेजमध्ये होत असल्यास व त्याची पूर्वपरवानगी मिळाल्यास कोविड चाचणीचा खर्च पॅकेजमध्ये अंतर्भूत असणार आहे. जिल्ह्यात 6 खाजगी कोविड आजारावरील उपचारांना योजना अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ दोन्ही योजनांच्या अंगीकृत रूग्णालयांमध्ये किंवा कोविड उपचासाठी अंगीकृत केलेल्या रूग्णालयांमध्ये मिळणार असून अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक किंवा विभागीय व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा. तसेच टोल फ्री क्रमांक 155388 किंवा 18002332200 क्रमांकावर संपर्क साधावा. सर्व खाजगी व सरकारी अंगीकृत रूग्णालयांमध्ये 120 शासकीय राखीव प्रोसिजरवर उपचार केले जात आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य योजनेची 67 पैकेजेस सर्व अंगीकृत खाजगी रूग्णालयात मोफत उपलब्ध करण्यात आलेली आहे. योजनेमध्ये अंगीकृत नसलेल्या खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्णाला जास्त रकमेचे देयक अदा करण्यास सांगितले असल्यास अशावेळी रूग्णाने complaints.healthcharges@jeevandayee.gov.in या ईमेलवर व संबंधित जिल्हाधिकारी किंवा जिल्हा समन्वयक यांच्या ईमेलवर तक्रार नोंदवावी. उपचार सुरू असताना महागड्या इंजेक्शनचा खर्च योजनेच्या पॅकेजमध्ये समाविष्ट नसल्यामुळे तो खर्च रूग्णास करावा लागणार आहे, असे राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सहाय्यक संचालक व जिल्हा समन्वयक यांनी कळविले आहे. ही आहेत खाजगी रूग्णालये मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मेहकर, राठोड मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मेहकर, मेहेत्रे हॉस्पीटल बुलडाणा, संचेती हॉस्पीटल बुलडाणा, सिटी हॉस्पीटल बुलडाणा, तुळजाई हॉस्पीटल चिखली . ************** कोविड साथरोगावरील आवश्यक उपाय योजनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या बुलडाणा,(जिमाका) दि.17 : कोविड 19 या साथरोगावरील विविध आवश्यक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर संबंधित कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये ऑक्सिजन पुरवठा संबंधित कामे, ऑक्सिजन बेड, आयसीयु बेड संबंधित सर्व कामांची माहिती ठेवणे, खाजगी व शासकीय डेडीकेटेड कोविड हेल्थ हॉस्पीटल मधील मनुष्यबळ व्यवस्थापन करणे आदी कामांसाठी उपजिल्हाधिकारी भूषण अहीरे व सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश घोलप यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लसीकरणासाठी जिल्ह्यात होणारा लसींचा साठा व वितरण, लसीकरणाबाबत तक्रारी व त्यांचा निपटारा करणे आदी कामांची जबाबदारी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरवर भोजन, पाणी व स्वच्छतेबाबत नियोजन करणे, जिल्ह्यातील व इतर राज्यातील कामगार अथवा मजूर यांच्यासंदर्भातील सोपविलेली कामे यासाठी उपजिल्हाधिकारी अभिजीत नाईक यांना नोडल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व आरटीपीसीआर, रॅपिड चाचणी संबंधित कामे व याबाबत असलेल्या तक्रारींचा निपटारा करणे, प्रतिबंधीत क्षेत्र व काँन्टॅक्ट ट्रेसिंग बाबतचे सर्व काम, मेडीको ॲडमिनीस्टरीअल डेथ ऑडीट करणे यासाठी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे नोडल अधिकारी आहेत. जिल्ह्यातील वार रूम, कोविड समर्पित रूग्णालये, कोविड समर्पित आरोग्य केंद्र व कोविड केअर सेंटर आदी संबंधित इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे आदेश निर्गमीत करणे, जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची कोविड तपासणी करणे याबाबतील कामे यासाठी नायब तहसीलदार विजय पाटील यांना नोडल करण्यात आले आहे. औषध कंपनीकडून रेमडेसिवीरचा होणारा पुरवठा व वाटप यावर नियंत्रण ठेवणे, तसेच काळाबाजार थांबविण्यासाठी कार्यवाही करणे तसेच इतर उपाययोजना करणे या कामासाठी उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे व सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन अशोक बर्डे यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी कळविले आहे. ************ नवीन प्राणवायू निर्मिती उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांनी माहिती द्यावी *जिल्हा उद्योग केंद्राचे आवाहन बुलडाणा, (जिमाका) दि. 17: शासनाने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ऑक्सिजन उत्पादकांसाठी धोरणाला मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यात याबाबतचा शासन निर्णय निर्गमित होणार आहे. आपल्या जिल्ह्यात नवीन ऑक्सिजन युनिट सुरु करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उद्योजकांनी आपल्या नवीन ऑक्सिजन प्लांट ची उत्पादन क्षमता ( कॅपसिटी ), ठिकाण, संभाव्य गुंतवणूक व मनुष्यबळ, उद्योजकांचे नाव आणि मोबाईल क्रमांक आदी माहिती didic.buldhana @maharashtra.gov.in या ईमेल वर अथवा उद्योग अधिकारी सुनील पाटील यांच्या 7588616768 / 8788654257 व्हाट्सअप्प क्रमांकावर कृपया त्वरित पाठवावी. तरी अधिकाधिक नवउद्योजक यांनी माहिती पाठवावी जेणेकरुन प्राणवायू निर्मिती धोरणाचा लाभ देता येईल, असे आवाहन उद्योग अधिकारी सुनील पाटील यांनी केले आहे. ***** जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील रुग्णालयांना 459 रेमडेसिवीरचे वितरण बुलडाणा, दि. 17 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक 17 मे रोजी 459 रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिली. आज 17 मे रोजी रुग्णालयांना बेड व रूग्ण संख्येनुसार वितरण करण्यात आलेले रेमडेसिवीर याप्रमाणे – बुलडाणा : लद्धड हॉस्पीटल 4 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पीटल 12, रविदीप हार्ट केअर हॉस्पीटल 2, निकम हॉस्पीटल 2, जाधव पल्स हॉस्पीटल 7, सहयोग हॉस्पीटल 7, आशिर्वाद हॉस्पीटल 15, सिद्धीविनायक हॉस्पीटल 16, काटकर हॉस्पीटल 0, शिवसाई हॉस्पीटल 7, संचेती हॉस्पीटल 9, सिटी हॉस्पीटल 0, सोळंकी हॉस्पीटल 7, खरात हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर 0, सुश्रुत हॉस्पिटल 8, बुलडाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 6 , रेड्डी हॉस्पीटल 3 , कोठारी हॉस्पीटल 0, न्यू लाईफ कोविड हॉस्पीटल 4, चिखली : योगीराज हॉस्पीटल 16, हेडगेवार हॉस्पीटल 6, गुरूकृपा हॉस्पीटल 21, तायडे हॉस्पीटल 6, दळवी हॉस्पीटल 22, पानगोळे हॉस्पीटल 18, खंडागळे हॉस्पीटल 17, गंगाई हॉस्पीटल 5, जैस्वाल हॉस्पीटल 13, ओम गजानन हॉस्पिटल 2, सावजी हॉस्पीटल 16, अनुराधा मेमोरियल 8, तुळजाई हॉस्पीटल 0, मलकापूर : झंवर हॉस्पीटल 5, ऑक्सीजन कोविड केअर सेंटर 6, मुरलीधर खर्चे हॉस्पिटल 15, आशिर्वाद हॉस्पीटल 4, सिटी केअर 8, नांदुरा : स्वामी समर्थ कोविड सेंटर 15, श्री गजानन कोविड हॉस्पिटल 0, शेगांव : श्री गजानन कोविड हेल्थ केअर 13, सोळंके कोविड केअर हॉस्पीटल 12, शामसखा हॉस्पीटल 16, खामगाव : श्रीराम हॉस्पीटल 0, आईसाहेब मंगल कार्यालय कृष्णअर्पण 0, चव्हाण 8, अश्विनी नर्सिंग हॉस्पीटल 13, साई 0, मेहकर : मातोश्री हॉस्पीटल 11, मापारी हॉस्पीटल 2, गिताई सुश्रूत हॉस्पीटल 0, गोविंद क्रिटीकल 8, श्री. गजानन हॉस्पीटल 5, अजंता हॉस्पीटल 6, मेहकर मल्टीस्पेशालीटी 16, राठोड हॉस्पिटल 0, दिवठाणे 2, दे. राजा : बालाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 0, संत गाडगेबाबा हॉस्पीटल 6, मी अँड आई हॉस्पीटल 6, तिरुपती कोविड सेंटर 1, सिं. राजा : जिजाऊ हॉस्पीटल 9, आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बिबी ता. लोणार 7, विवेकानंद हॉस्पीटल हिवरा आश्रम ता. मेहकर 8, असे एकूण 683 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्राप्त झालेल्या साठ्यापैकी 10 टक्के राखीव साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र पुरवठा झालेल्या इंजेक्शन ची संख्या बघता राखीव कोट्यातील इंजेक्शन चा पुरवठा सुध्दा रुग्णालयांना करण्यात येत आहे. सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी सदर औषधाचा वापर हा योग्यरित्या व अत्यावश्यक असलेल्या रूग्णांकरीताच प्राधान्याने वापरण्यात यावा. यापूर्वी वापरलेल्या कुपी सॅनीटाईज करून तहसिल कार्यालयात प्रमाणपत्रासह जमा करून सुरक्षीत ठेवाव्यात. गैरवापर होणार नाही याची स्वत: तहसिलदार यांनी दक्षता घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कळविले आहे.

Saturday 15 May 2021

DIO BULDANA NEWS 15.5.2021,2

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील रुग्णालयांना 716 रेमडेसिवीरचे वितरण बुलडाणा, दि. 15 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक 15 मे रोजी 716 रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिली. आज 15 मे रोजी रुग्णालयांना बेड व रूग्ण संख्येनुसार वितरण करण्यात आलेले रेमडेसिवीर याप्रमाणे – बुलडाणा : लद्धड हॉस्पीटल 7 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पीटल 20, रविदीप हार्ट केअर हॉस्पीटल 8, निकम हॉस्पीटल 7, जाधव पल्स हॉस्पीटल 12, सहयोग हॉस्पीटल 11, आशिर्वाद हॉस्पीटल 24, सिद्धीविनायक हॉस्पीटल 14, काटकर हॉस्पीटल 0, शिवसाई हॉस्पीटल 11, संचेती हॉस्पीटल 2, सिटी हॉस्पीटल 0, सोळंकी हॉस्पीटल 0, खरात हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर 0, सुश्रुत हॉस्पिटल 5, बुलडाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 13 , रेड्डी हॉस्पीटल 6 , कोठारी हॉस्पीटल 0, न्यू लाईफ कोविड हॉस्पीटल 8, चिखली : योगीराज हॉस्पीटल 22, हेडगेवार हॉस्पीटल 10, गुरूकृपा हॉस्पीटल 19, तायडे हॉस्पीटल 27, दळवी हॉस्पीटल 21, पानगोळे हॉस्पीटल 22, खंडागळे हॉस्पीटल 24, गंगाई हॉस्पीटल 14, जैस्वाल हॉस्पीटल 17, ओम गजानन हॉस्पिटल 8, तुळजाई हॉस्पिटल 0, सावजी हॉस्पीटल 23, अनुराधा मेमोरियल 17, मलकापूर : झंवर हॉस्पीटल 18, ऑक्सीजन कोविड केअर सेंटर 3 , मुरलीधर खर्चे हॉस्पिटल 12, आशिर्वाद हॉस्पीटल 8, सिटी केअर 20, नांदुरा : स्वामी समर्थ कोविड सेंटर 22, श्री गजानन कोविड हॉस्पिटल 0, शेगांव : श्री गजानन कोविड हेल्थ केअर 15, सोळंके कोविड केअर हॉस्पीटल 4, शामसखा हॉस्पीटल 20, खामगाव : श्रीराम हॉस्पीटल 0, आईसाहेब मंगल कार्यालय कृष्णअर्पण 9, चव्हाण 18, अश्विनी नर्सिंग हॉस्पीटल 16, मेहकर : मातोश्री हॉस्पीटल 15, मापारी हॉस्पीटल 8, गिताई सुश्रूत हॉस्पीटल 0, गोविंद क्रिटीकल 12, श्री. गजानन हॉस्पीटल 27, अजंता हॉस्पीटल 9, मेहकर मल्टीस्पेशालीटी 19, राठोड हॉस्पिटल 0, दिवठाणे 8, दे. राजा : बालाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 6, संत गाडगेबाबा हॉस्पीटल 12, मी अँड आई हॉस्पीटल 6, तिरुपती कोविड सेंटर 6, सिं. राजा : जिजाऊ हॉस्पीटल 17, आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बिबी ता. लोणार 16, विवेकानंद हॉस्पीटल हिवरा आश्रम ता. मेहकर 18, असे एकूण 716 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्राप्त झालेल्या साठ्यापैकी 10 टक्के राखीव साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र पुरवठा झालेल्या इंजेक्शन ची संख्या बघता राखीव कोट्यातील इंजेक्शन चा पुरवठा सुध्दा रुग्णालयांना करण्यात येत आहे. सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी सदर औषधाचा वापर हा योग्यरित्या व अत्यावश्यक असलेल्या रूग्णांकरीताच प्राधान्याने वापरण्यात यावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कळविले आहे. ********* विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा बुलडाणा, दि. 15 (जिमाका) : विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस दि. 16 मे 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दिनांक 16 मे रोजी दुपारी 2.30 वाजता अकोला येथून मोटारीने चिखली जि. बुलडाणा कडे प्रयाण, दुपारी 4 वाजता चिखली येथे आगमन व कोविड केअर सेंटर उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, सायं 5 वाजता औरंगाबाद कडे प्रयाण करतील.

DIO BULDANA NEWS 15.5.2021

प्राणवायू निर्मितीमध्ये जिल्ह्याला स्वंयपूर्ण करणार -पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे  *कोविड समर्पित रुग्णालयातील प्राणवायू निर्मिती प्रकल्प कार्यान्वित बुलडाणा, (जिमाका) दि. 15 :  कोरोनाने थैमान घातले असताना सक्रिय रुग्णांना प्राणवायू ची वाढती गरज भासू लागली. अशा परिस्थितीत अन्य जिल्ह्यांमधून प्राणवायू चा पुरवठा जिल्ह्याला होत होता. मात्र अनेकवेळा गरजेपेक्षा कमी प्राणवायू मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातच प्राणवायू निर्मिती करून जिल्ह्याचे याबाबत अन्य जिल्ह्यावरील परावलंबत्व संपुष्टात आणणे गरजेचे आहे. पुढील काळात जिल्ह्याला प्राणवायू निर्मितीत स्वयंपूर्ण करणार येऊन जिल्हा याबाबत स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज व्यक्त केला. जिल्हयात प्राणवायू तुटवड्यावर निदान म्हणून प्राणवायू निर्मिती प्रकल्प पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात ठिकठिकाणी उभारण्यात येत आहेत. आज १५ मे रोजी येथील स्त्री रुग्णालय समर्पित जिल्हा कोविड रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे पलकमंत्री ना. डॉ. शिंगणे यांच्या हस्ते हवेतून प्राणवायू निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाची ओपचारिकता रद्द करत फक्त पाहणी करून सदर प्रकल्प कार्यान्वित झाला असल्याची घोषणा केली. जिल्ह्याला दररोज जवळपास १६ मे.टन ऑक्सिजन लागतो. आता या प्रकल्पा व्दारे  ८० जम्बो सिलींडर हवेतील ऑक्सिजन २४ तासात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे सिलिंडरचा वापर न करता, थेट प्लांटपासून रुग्णांच्या बेडला ऑक्सिजन पाइपलाईन अटॅच करुन रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे. देऊळगावराजा, खामगाव, मलकापूर व इतरही ठिकाणी प्राणवायु निर्मिती प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. तिसऱ्या कोरोना लाटेच्या शक्यतेमुळे राज्य स्वंयपूर्ण होत असतांना बुलडाणा जिल्हा देखील सर्वार्थाने स्वंयपूर्ण करणार असल्याचा विश्वास अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला.यावेळी प्र. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, डॉ. वासेकर आदी उपस्थित होते. **** जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन बुलडाणा, (जिमाका) दि. 15 : आद्य समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या दि. 14 मे रोजी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नायब तहसिलदार श्री. साठे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

Wednesday 12 May 2021

DIO BULDANA NEWS 12.5.2021,2

 



प्राणवायु निर्मिती प्रकल्पाचे काम तातडीने पुर्ण करावे

-         जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

बुलडाणा, (जिमाका) दि.12 : सक्रीय रूग्णांची लक्षात घेता प्राणवायूची गरज भविष्यातही अशाच पद्धतीने लागणार आहे. त्यामुळे स्थानिक सामान्य रूग्णालयात प्राणवायू निर्मिती  प्रकल्प असणे गरजेचे आहे. तरी या प्रकल्पाचे काम तातडीने पुर्ण करून रूग्णांच्या सेवेत रूजू करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केल्या आहे.

   जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी आज खामगांव सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आढावा बैठकही घेतली. बैठकीत आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी  रूग्णालयातील कोविड वार्ड, डायलेसीस विभाग, पाकगृह, कोविड प्रयोगशाळा व नव्याने प्रस्तावित प्राणवायू प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी वैदयकीय अधीक्षक यांचे दालनात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, प्रभारी तहसीलदार सुरेखा जगताप, न.प.मुख्याधिकारी श्री. आकोटकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश टापरे, गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत, तालुका वैदयकीय अधिकारी दिनकर खिरोडकर, डॉ.सोनटक्के आदी उपस्थित होते.

   जिल्हाधिकारी यांनी यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चाचण्या वाठविण्याचे निर्देश दिले. कोरोना चाचणी, विलगीकरण कक्ष व इतर सुविद्या रूणांना पुरविण्यासाठी आवश्यक सुविधा नागरिकांकडून लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केले. रूग्णालयात प्राणवायू प्रकल्पाचे काम सध्या सुरु आहे. या कामाची पाहणी त्यांनी केली. येथील रुग्णालयात आर टी पी सी आर प्रयोगशाळा सुरु करण्यात येत आहे. त्याचा आढावा देखील त्यांनी घेतला. शोध, उपचार आणि लसीकरण या त्रिसूत्रीवर जास्तीत जास्त भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. लसीकरणाचे योग्य नियोजन करण्यासही त्यांनी सांगितले. याशिवाय सामान्य रुग्णालयाला जर काही अडचणी,समस्या असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

DIO BULDANA NEWS 12.5.2021

 अत्यावश्यक सेवांमध्ये सवलतीसह कडक निर्बंध लागू

बुलडाणा, (जिमाका) दि 12 : कोविड -19 च्या अनुषंगाने दिनांक 10 मे 2021  ते दिनांक 20 मे 2021 पर्यंत कडक निर्बंधाबाबत आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेशामध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये सवलती देवून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. 

 पेट्रोलपंप : ग्रामीण तसेच शहरी भागातील पेट्रोल पंपावरुन केवळ शेतक-यांना त्यांच्या शेतातील मशागतीची (नांगरणी, वखरणी, गाळ टाकणे व इत्यादी) कामे तसेच मालाची वाहतुक करण्याकरिता ट्रॅक्ट्रर्सना डिझेल इंधन पुरवठा करता येईल. कोर्टाची कार्यालयीन कामे सुरु असल्याने वकीलांना पेट्रोल/डिझेल देण्यात यावे. बँकिंग:  रुग्णालये, गॅस वितरण सेवा, ऑक्सीजन पुरवठा, औषधी दुकाने, यांचेकडे तसेच पेट्रोल पंपावरील जमा होणारी रक्कम बँकेत जमा करणे या करिता संबंधित कंपनीच्या नावाने व्यवहार करण्याकरिता दिनांक 10 मे ते दिनांक 20 मे पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यानचा वेळ देण्यात येत आहे.

  अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत कर्मचारी :  दुरसंचार, टेलिकॉम सेवा (मोबाईल रिचार्ज सेंटर वगळता) विदयुत पारेषण इत्यादी सेवा सुरळीतपणे राहावी या करिता सदर सेवा पुरविणारे कर्मचारी यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांना कामे करता येईल. संबंधित आस्थापना यांनी त्यांना वितरीत केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. धान्य वितरण प्रणाली सुरळीत सुरु राहण्याचे दृष्टीने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतची वाहतुक व वाटप अनुज्ञेय राहील.  हॉटेल, रेस्टारंट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 10 ते दुपारी 12 व रात्री 7 ते रात्री 9 या दरम्यान सुरु राहील.  अत्यावश्यक कामकाजाकरिता व कोविड च्या अनुषंगाने कामकाज करण्याकरिता आवश्यक असणारे विभाग/ कार्यालये सुरु राहतील.

   सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिका-यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी दिले आहे

*****

 रमजान ईद साध्या पद्धतीने साजरा करावी

  • राज्य शासनाकडून मार्गदर्शक सुचना जारी

बुलडाणा,(जिमाका) दि.12 : राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. यावर्षी दि. 14 एप्रिल पासून पवित्र रमजान महिना सुरू झाला असून 13 किंवा 14 मे चंद्रदर्शनानुसार रमजान ईद साजरी केली जाणार आहे. मात्र सध्या कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना कोरोना रूग्णसंख्येचा विचार करता रमजान ईद साधेपणाने साजरा करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

       कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करीता मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार साठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करून ब्रेक द चेन आदेशाचे काटेकोर पालन करावे. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. कोविड या विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने राज्यात कलम 144 लागू आहे. त्यामुळे संचारबंदी कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नये. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.

    रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी.  रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टंन्सिगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. कोवीड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या काळात अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे, असे राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद आहे.

--

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 4539 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 1143 पॉझिटिव्ह

  • 456 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.12 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5682 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4539 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1143 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 920 व रॅपीड टेस्टमधील 223 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 2304 तर रॅपिड टेस्टमधील 2235 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4539 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर व  तालुका : 117,  खामगांव शहर  व  तालुका : 114, शेगांव शहर  व  तालुका : 74, दे. राजा शहर व तालुका : 82, चिखली शहर व  तालुका :79, मेहकर शहर व  तालुका : 98, मलकापूर शहर व  तालुका : 47, नांदुरा शहर व  तालुका :137, लोणार शहर व  तालुका : 110, मोताळा शहर व  तालुका :62, जळगाव जामोद शहर व  तालुका :81, सि.राजा शहर व  तालुका :91, संग्रामपूर शहर व  तालुका : 51. अशाप्रकारे 1143 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान सुटाळा बु खामगांव येथील 65 वर्षीय महिला, बोथाकाजी ता. खामगांव येथील 56 वर्षीय महिला, भालखेड ता. मेहकर येथील 64 वर्षीय पुरूष, जळगाव जामोद येथील 80 वर्षीय पुरूष व 50 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 456 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 394659 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 68626 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  68626 आहे. 

  आज रोजी 2996 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 394659 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 73878 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 68626 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 4762 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 490 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 

****************

महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके

व बियाणे मिनिकीट या घटकासाठी अर्ज करावे

 बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके अंतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण,पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनिकीट या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी दि. २० मे, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दि. २० मे, २०२१ पर्यंत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाईल. शेतकरी बांधवांनी mahadbtit या पोर्टलवर अर्ज करावे.  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके राबविण्यात येत आहे.

         जिल्ह्याकरीता कडधान्य पिके, तृणधान्य, गळीत धान्य, व्यापारी पिके (कापूस), बियाणे वितरण  केलेल्या जिल्ह्यांमध्ये भात बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. २०/- प्रती किलो, १० वर्षावरील वाणास रु. १०/- प्रती किलो. कडधान्य बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. 5०/- प्रती किलो, १० वर्षावरील वाणास रु. २५/- प्रती किलो. संकरीत मका व बाजरी बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. १००/- प्रती किलो, ज्वारी व बाजरी सरळ वाणाचे बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. ३०/- प्रती किलो, १० वर्षावरील वाणास रु. 15/- प्रती किलो. सोयाबीन बियाण्यासाठी १० ते १५ वर्षाचे वाणास रु.१२/- प्रती किलो. एकूण किंमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

   पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे,जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार रु. २०००/- ते ४०००/- प्रती एकर मर्यादेत DBT तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.

   सोयाबीन,बाजरी,ज्वारी, कापूस, मका या पिकांमध्ये मिनिकीट कडधान्याचे आंतरपीक घेणे अनिवार्य आहे. बियाणे मिनिकीट मध्ये जिल्ह्यात तूर, मूग, उडीद या पिकासाठी असणार आहे.  निवड झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२१ मध्ये तूर, मुग आणि उडीद यापैकी एका पिकाचे ४ किलोचे एक बियाणे मिनिकीट देण्यात येईल. शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे, तरी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

अशी आहे मिनीकीट

     तूर - रु. ४१२/- प्रती ४ किलो मिनिकीट, मुग - रु. ४०७/- प्रती ४ किलो मिनिकीट, उडीद - रु. ३४९/- प्रती ४ किलो मिनिकीट प्रमाणे अनुदान देय असून बियाणे मिनिकीटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्यांनी अदा करावयाची आहे.