Saturday 30 October 2021

DIO BULDANA NEWS 30.10.2021

 कर्ज मेळाव्यात 1846 खातेदारांना 60.92 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर

* बुलडाणा येथे कर्ज मेळावा उत्साहात 
बुलडाणा, (जिमाका) दि. ३०: वित्त मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार देशामध्ये 7 ते 30 ऑक्टोंबर 21 पर्यंत क्रेडिट आऊट रिच अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये दिनांक २९ ऑक्टोंबर रोजी स्थानिक  गर्दे हॉल मध्ये दुपारी 12 वाजता कर्ज मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले.  कर्ज मेळाव्यात अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती होते, तर आमदार संजय गायकवाड,  मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नाबार्डचे विक्रम पठारे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक खरात, जिल्हा उद्योग केन्द्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश इंगले उपस्थित होते. या कर्ज मेळावामध्ये सर्व बँकांनी मिळून 1846 खातेदारांना 60 कोटी 92 लक्ष 46 हजार 870 रूपये एवढे कर्ज मंजूर करण्यात आले. 
 अग्रणी बँक सेंट्रल बँक ऑफ़ इंडियाच्या पुढाकराने भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.  यामध्ये बुलडाणा येथील सर्व सरकारी व खाजगी बँकेद्वारे विविध सरकारी योजनांमध्ये कर्ज वाटप केले गेले.  यापैकी बऱ्याचशा खातेदारांना आमदार   संजय गायकवाड यांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले, तर काही खातेदारांना वाहनाच्या च्याव्या देण्यात आल्या.
   याप्रसंगी आमदार संजय गायकवाड़ म्हणाले,  सर्व बँकांनी मिळून असा कर्ज मेळावा घेणे ही खरोखर कौतुकाची बाब आहे. बँका कर्ज वाटपमध्ये आता सकारात्मक आहे, मात्र काही शाखामध्ये अजूनही ग्राहकांना नाहक त्रास दिल्या जातो, ते चित्र बदलायला पाहिजे. आधी प्रत्येकाला असे वाटायचे की ५ हजार रुपयांची नौकरी असली तरी चालेल पण आता चित्र बदलत आहे मराठी माणूस सुद्धा व्यावसायिक होत आहे. तेव्हा बँकांनी सहजरीत्या त्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे. बुलडाणा येथे 2500 दुकानांचा प्रोजेक्ट सुरु करण्यात येणार आहे.  तेव्हा बँकांनी त्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे.
  आपल्या प्रस्ताविकामध्ये स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक सुहास ढोले म्हणाले, यावर्षी जिल्ह्याचा वार्षिक कर्ज आराखडा हा 3710 कोटीचा असून आतापर्यंत 3000 कोटी पेक्षा जास्त कर्ज वाटप झालेले आहे. डिसेंबर 2021 च्या अखेरपर्यंत उद्दीष्ट पूर्ण करण्यात येणार. त्यांनी बँकेच्या विविध योजना व शासकीय योजनांमध्ये बँकेचे भागीदारी याविषयी माहिती दिली. बँकेचे ओ टी एस योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.  संचालन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी तर आभार प्रदर्शन अग्रणी बँकेचे विजय गवळी यांनी केले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी वैशाली गायकवाड व राजू पोपलघाट यांनी प्रयत्न केले. 
*********
               कृषी  योजनांच्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे महाडीबिटी पोर्टलवर अपलोड करावी
बुलडाणा, (जिमाका) दि. ३०: डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील जिल्ह्यात सन 2020- 21, 2021-22 करिता 4 हजार 853 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड महाडीबिटीद्वारे नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इतर लाभ यासाठी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे.  त्यापैकी अद्याप 1 हजार 715 लाभार्थ्यांचे कागदपत्रे अपलोड करणे बाकी आहे. निवड झाल्यापासून ३० दिवसाच्या आत सर्व कागदपत्रे ऑनलाईन करणे अनिवार्य आहे. तरी लाभार्थ्यांनी लाभापासून वंचित राहू नये यासाठी तातडीने आवश्यक कागदपत्रे जसे ७/१२, ८ अ, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, आधार कार्ड संलग्नित बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, करारनामा व सामायिक जमीन असल्यास रेशन कार्ड, संमतीलेख सादर करावीत,  असे आवाहन कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांनी केले आहे.

Friday 29 October 2021

DIO BULDANA NEWS 29.10.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 313 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह  

·         1 रूग्णाला मिळाली सुट्टी     

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 314 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 313 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड अँटीजेन चाचणीतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 70 तर रॅपिड टेस्टमधील 243 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 313 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  चिखली तालुका : गोद्री 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे. तसेच उपचाराअंती वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार 1 रूग्णाला सुट्टी देण्यात आली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 730677 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86931 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86931 आहे.  आज रोजी 84 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 730677 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87610 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86931 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 05 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                            *********

                   तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन करावे

·         कृषी विभागाद्वारे उपाययोजना जाहीर

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे सध्याही जमीनीत ओल आहे. त्यामुळे तूरीचे पीक चांगले आहे. काही ठिकाणी फुलोऱ्यावर तर काही ठिकाणी शेंगा धरलेल्या आहेत. तूर पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र मागील दोन-तीन दिवसापासून असणारे ढगाळ वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. अशा वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहणी करुन वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवश्यक आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमध्ये खालील प्रकारच्या अळ्यांचा समावेश होतो.

  शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा) या कीडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते, अंड्यातून निघालेल्या अळ्या तूरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पुर्ण वाढ झालेली अळी 30 ते 40 मि.मि. लांब पोपटी रंगाची असून पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करुन आतील दाणे पोखरुन खातात.

 पिसारी पतंग या पतंगाची अळी 12.5 मि.मि. लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते. व बाहेर राहून दाने पोखरते. शेंगे माशी- या पतंगाची अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाने अर्थवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.

   या तिन्ही किडी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात. पहिली फवारणी न केल्यास तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पहिली फवारणी निंबोळी अर्क 5 टक्के किंवा ॲझाडिरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली किंवा अझाडीरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली किंवा एच.एन.पी.व्ही.एच (1 x 100 पिओबी / मिली) 500 एल. ई / हे. किंवा बॅसिलस थुरींजीएंसिस 15 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. इमामेक्टिन बेंझोएट 5 टक्के 3 एसजी ग्रॅम, लॅमडा सायहॅलोमेथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मिली किंवा क्लोरॅट्रॅनिलीप्रोल 18.5 टक्के एस. पी प्रवाही 2.5 मिली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील त्या गोळा करुन नष्ट कराव्यात. शेंगा पोखणाऱ्या अळ्यांसाठी वेळीच नियंत्रणाचे उपाय योजना न केल्यास तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू शकते,  असे उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी कळविले आहे.

                                                            **********

        केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचा दौरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे 31 ऑक्टोंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथून खाजगी हेलीकॉप्टरने चिखलीकडे प्रयाण, दु. 1 वा चिखली येथे श्री. अंबिका अर्बन को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी हेलीपॅड येथे आगमन व डॉ. आशुतोष गुप्ता यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण, दु 2 वा रानवारा मंगल कार्यालय, गुप्ता गार्डन, जाफ्राबाद रोड चिखली येथे दि. चिखली अर्बन को. ऑपरेटीव्ह बँक लि. चिखली द्वारे आयोजित उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबिरास उपस्थिती, दु. 3.30 वा रानवारा मंगल कार्यालय येथून मोटारीने श्री. अंबिका अर्बन को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी हेलीपॅडकडे प्रयाण, दु. 3.45 वा श्री. अंबिका अर्बन को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी हेलीपॅड येथे आगमन व खाजगी हेलीकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करतील.

                                                                                    **********   

मका, ज्वारी व बाजरीच्या शासकीय खेदीसाठी नाव नोंदणी करावी

• 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मुदत, जिल्हा पणन अधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : शासनाच्या आदेशान्वये पणन हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाची आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हमी दराने मका, ज्वारी, बाजरी या शेतमालाची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी जिल्ह्यात 14 खरेदी केंद्रांना मान्यताही देण्यात दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात मका, ज्वारी व बाजरी खरेदीसाठी नाव नोंदण्याकरीता 31 ऑक्टोंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. हमी दराने मका प्रती क्विंटल 1870, ज्वारी प्रती क्विंटल 2738 व बाजरी शेतमालासाठी 2250 रुपये हमी दर आहे.

  जिल्ह्यात तालुका खरेदी विक्री संघ बुलडाणा, दे. राजा, खामगांव, लोणार, मेहकर, संग्रामपूर, मलकापूर, जळगांव जामोद व शेगांव, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी अंजनी खु केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, मा. जिजाऊ कृषि विकास शेतकरी कंपनी नारायणखेड केंद्र सिं.राजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी नांदुरा केंद्र वडी ता. नांदुरा या खरेदी केंद्रांना मान्यता मिळाली आहे. या ठिकाणी ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी आधार कार्ड, सन 2021-22 चा पीक पेरा, बँक पासबुक झेरॉक्स, जनधन योजनेचे बँक खाते असल्यास देण्यात येवू नये, चालु वर्षाच सात बारा अशा संपूर्ण कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील संस्थेशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे यांनी केले आहे.

                                                            *******


तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी

-      अप्पर जिल्हाधिकारी

·         एचआयव्ही बाधीतांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : तंबाखूचे सेवन अलिकडे तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तरूणांना तंबाखूच्या सेवनापासून परावृत्त करणे हे मोठे आव्हान आहे. तंबाखू सेवनामुळे मुख कर्करोगाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे तंबाखू सेवनाचे दुष्परीणामांबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, तंबाखूमुक्त शाळा, कोटपा कायद्याची अंमलबजावणी प्रभावीरित्या करावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिल्या आहेत.  तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व एड्स नियंत्रण कार्यक्रम आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक श्री. टाले, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. लता बाहेकर आदी उपस्थित होते. एचआयव्ही बाधीतांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याच्या सूचना करीत अप्पर जिल्हाधिकारी म्हणाले, याबाबत काही अडचणी असल्यास तालुका स्तरीय यंत्रणांशी समन्वय साधून सोडवाव्यात.

   संजय गांधी निराधार योजना लाभ देण्यासाठी उत्पन्न दाखल्याची अट, ऑनलाईन दुर्धर आजार प्रमाणपत्र आदींच्या अडचणी बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संबंधित तहसिलदार यांच्याशी संपर्क करून अडचण सोडवावी. सेक्स वर्कर यांचे नियमित एचआयव्ही तपासणी करावी. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे लाईनवर गावांमध्ये लिंक वर्करच्या तपासण्या कराव्यात. जेणेकरून एखादा एचआयव्ही बाधीत तपासणी न करता रोगाचा वाहक बनू नये.मातृ वंदन योजनेच्या लाभार्थ्यांसाइी आधार बंधनकारक आहे. आधार नसल्यास आधार केंद्र चालकांशी संपर्क साधून आधार कार्ड बनवून घ्यावे. बैठकीत श्री. टाले, डॉ. लता बाहेकर यांनी सादरीकरण केले. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                            ***********

        


सायकलिंग खेळाच्या प्रवेशाकरीता
 क्रीडा नैपुण्य चाचणी उत्साहात

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जा खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवीण्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे.  क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने (खेलो इंडीया एक्सलन्स सेंटर) राज्य निपुणता केंद्र मंजुर करण्यात आलेले आहेत.  यानुसार ॲथलेटीक्स, शुटींग व सायकलींग या तीन खेळांचे निपुणता केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे.

सायकलींग या खेळाच्या प्रवेशाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन 29 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे करण्यात आले होते.  याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.प्रमोद जाधव मेहकर, राजेश डिडोळकर, अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक यांचे हस्ते मैदानाचे पुजन करुन उद्घाटन करण्यात आले.

निवड प्रक्रीयेकरीता जिल्ह्यातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मोठ्या संख्येने मुले व मुलींनी सहभाग घेतला होता.  या निवड चाचणी प्रक्रीयेमध्ये खेळाडू मुलांकरीता 1600 मि. धावणे, उभी लांब उडी, उभी उंच उडी, खेळाडूची उंची  या चार बाबींचा तर मुलींकरीता 800 मी. धावणे, उभी लांब उडी, उभी उंच उडी, खेळाडूची उंची या चार बाबींचा समावेश होता.  याप्रसंगी सायकलींग या खेळाची राष्ट्रीय खेळाडू कु.गुंजन जतकर यांचे हस्ते क्लॅपर देऊन मुलींच्या 800 मी. चाचणीला सुरुवात करण्यात आली.  संचलन अनिल इंगळे यांनी केले.  याप्रसंगी डी.डी.लोढे, वसंत राठोड, सौ.मंजुषा जाधव, राजु पडघान, मोहम्मद सुफीयान, सारा पवार, दिक्षा हिवाळे, किरण तायडे, दिपक जाधव, वैभव काळवाघे, समाधान टेकाळे, सौ. वैशाली हिंगे, हर्षल काळवाघे, विराज तोटे, संकेत इंगळे, गजानन नागवे, यश बट्टू आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी बी.आर.जाधव क्रीडा अधिकारी, आर.आर.धारपवार, महेश खर्डेकर राज्य क्रीडा मार्गदर्शक, विजय बोदडे, सौ.मनिषा ढोके, सुरेशचंद्र मोरे व्यवस्थापक, जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे, भिमराव पवार यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        ****

Thursday 28 October 2021

DIO BULDANA NEWS 28.10.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 234 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह         

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 235 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 234 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड अँटीजेन चाचणीतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 44 तर रॅपिड टेस्टमधील 190 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 234 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  लोणार तालुका : बिबी 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे. 

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 730364 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86930 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86930 आहे.  आज रोजी 76 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 730364 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87609 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86930 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 05 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                            *********

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी पदभरती    

  • 3 नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी करावी   

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून राज्यात 7425 सुरक्षा रक्षक नियुक्त करावयाचे आहेत. त्या अनुषंगाने सदर पदाकरीता इच्छुक सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या व पात्रता पूर्ण करीत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिकांनी लवकरात लवकर 3 नोव्हेंबर पर्यंत आपल्या डिस्जार्ज बुक, ओळखपत्र व रोजगार कार्डसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन नाव नोंदवावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर निंबाजी पडघान यांनी केले आहे.

   या पदाकरीता माजी सैनिक 30 सप्टेंबर 1976 च्या अगोदरचा जन्म झालेला नसावा. शिक्षण कमीत कमी 8 वा वर्ग पास मात्र 12 वी उत्तीर्ण नसावा, सैन्य दलातील सेवा कमीत कमी 15 वर्ष झालेली असावी, सैन्यदलातील हुद्दा जास्तीत जास्त हवालदार किंवा त्यापेक्षा कमी असावा, सैन्य दलातील चारित्र्य कमीत कमी गुड असावे, तसेच सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर उमेदवाराला कोणताही आजार, अपंगत्व नसावे. तो शारिरीकदृष्ट्या सक्षम असावा, तरी जास्तीत जास्त माजी सैनिकांनी नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

                                                                        *************   

खामगांव एमआयडीसीमध्ये खाद्यतेलाचा साठा जप्त; एफडीएची कारवाई

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे अन्न आस्थापना तपासणी व अन्न नमुने घेण्याची मोहिम सुरू आहे. या मोहिमेतंर्गत रियुज्ड टिनचा वापर तसेच भेसळीच्या संशयावरून खामगांव एमआयडीसीमधील मे. फॅमिली ऑईल पॅकिंग या आस्थापनेकडून 27 ऑक्टोंबर रोजी रिफाईन सोयाबीन ऑईल (पी.एच.गोल्ड), आर. बी.डी पॉमोलीन ऑईल, रिफाईन सोयाबीन ऑयल (संस्कार), रिफाईन इडीबल ऑईल (लोटस) या सर्व खाद्यतेलाचे एकूण 5 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून उर्वरित 5,79,057 रूपये किमतीचा एकूण 3833.06 कि. ग्रॅम साठा रियुज्ड टिनचा पॅकिंगसाठी वापर केल्यावरून व त्यांचा दर्जाबाबत संशय आल्यावरून जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री. सोळंके, श्री. वसावे, दक्षता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. घोसलवाड, श्री. महाल्ले, श्री. महागडे, श्री. विशे, श्री. दहातोंडे यांचे पथकाने केली, असे सहायक आयुक्त स.द केदारे यांनी कळविले आहे.

                                                                                                                *******

Wednesday 27 October 2021

DIO BULDANA NEWS 27.10.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 500 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह       

•       2 रुग्णांना मिळाली सुट्टी                                                                          

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 501 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 500 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 131 तर रॅपिड टेस्टमधील 369 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 500 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : वाडी 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे.  तसेच उपचाराअंती 2 रुग्णांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.                                          

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 730130 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86930 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86930 आहे.  आज रोजी 18 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 730130 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87608 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86930 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 04 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                            *********

           ‘ऑन फार्म ट्रेनिंग’मधून कृषि विकासाला संधी

  • शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांकडून 1 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागविले

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील मनुष्यबळ विकास कार्यक्रमातंर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम अर्थात ऑन फार्म ट्रेनिंग राबविण्यात येत आहे. फलोत्पादन तसेच कृषि क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या संशोधन संस्था, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेतंर्गत संशोधन संस्था, कृषि विज्ञान केंद्र, पुणे, अहमदनगर, व सोलापूर या ठिकाणी कार्यरत आहेत. तसेच फलोत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रात काम करणारे शेतकरी, प्रक्रिया केंद्र याठिकाणी भेट देवून प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी शेतकरी अभ्यास दौरा व प्रशिक्षणाचे नियोजन उपविभागीय कृषि अधिकारी, खामगांव कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.

    या 5 दिवशीय प्रशिक्षण दौऱ्यासाठी शासनामार्फत अनुदानावर सहलीसाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत राबविलेल्या उपक्रमाची पाहणी करून शेती क्षेत्रात उत्पन्न वाढीसाठीच्या संधीचा अभ्यास शेतकऱ्यांना करता येणार आहे. फळबाग लागवड, कांदाचाळ, संरक्षीत शेती, काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया याबाबत लाभ घेतलेल्या तसेच लाभ घेवू इच्छित असलेल्या शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, खामगांव येथे 1 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज प्रत्यक्ष अथवा कार्यालयाच्या sdaokhamgaon1@gmail.com  या इमेलवर सादर करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी दिपक पटेल यांनी केले आहे.

                                                                        ***********

नोव्हेंबर महिन्याचा लोकशाही दिन होणार ई लोकशाही दिन

  • मोबाईल क्रमांक 7249093265 वर ऑनलाईन तक्रारी कराव्यात
  • व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क

बुलडाणा,(जिमाका) दि.27: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्ग पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा लोकशाही दिन 1 नोव्हेंबर रोजी ई- लोकशाही दिन पद्धतीने करण्यात येणार आहे. हा लोकशाही दिन 1 वाजेनंतर होणार आहे.

   या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 7249093265 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ फाईल तयार करून तक्रारी द्याव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांना दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.

   तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील लोकशाही दिनात व विभागीय लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज सादर करता येईल. अर्ज विहीत नमुन्यात असावा, चारही स्तरांवरील लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, जे अर्ज लोकशाही दिनाकरीता स्वीकृत करता येवू शकणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        *********

 

 


मिठाई व नमकीन उत्पादनांवर बेस्ट बिफोर तारीख नमूद करावी

-          स. द. केदारे

  • स्वीट मार्ट चालकांची बैठक

बुलडाणा,(जिमाका) दि.27: सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून विविध प्रकारच्या मिठाई व नमकीन पदार्थांची खरेदी होत असते. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार सणा सुदीच्या काळात ग्रहकांना निर्भेळ व चांगल्या दर्जाचे मिठाई, नमकीन व इतर अन्नपदार्थ मिळायला पाहिजे. मिठाई व नमकीन यांचा दर्जा उत्तम असावा. आस्थापनेत स्वच्छता असावी. तसेच मिठाई व नमकीन उत्पादनांवर बेस्ट बिफोर तारीख नमूद करावी, अशा सूचना सहायक आयुक्त अन्न स. द. केदारे यांनी आज दिल्या. स्थानिक बुलडाणा अर्बन रेसिडेंशी क्लब येथे जिल्ह्यातील स्वीट मार्ट चालक – मालक यांची बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी श्री. केदारे बोलत होते. याप्रसंगी अन्न सुरक्षा अधिकारी जी. के. वसावे, र. द्वा. सोळंके आदी उपस्थित होते.

  ते पुढे बोलताना म्हणाले, खाद्यतेलाचा पुर्नवापर अन्न पदार्थ बनविताना करू नये. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 तसेच नियम व नियमन 2011 अंतर्गत विविध तरतूदींची माहिती देऊन त्याचे कसोसीने पालन करावे. बेठकीतील निर्देश, सुचनांचे पालन न केल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला. बैठकीस जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील स्वीट मार्ट चालक उपस्थित होते. यावेळी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अन्न व्यावसायिकांच्या शंकाचे निरसन केले.

                                                            ************

बुलडाणा येथे 29 ऑक्टोंबर रोजी कर्ज मेळाव्याचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार क्रेडिट आऊटरिच अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने गर्दे हॉल, बुलडाणा येथे शुक्रवार, दिनांक 29 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय गायकवाड उपस्थित राहणार आहे. मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते कर्ज वितरण करण्यात येणार आहे. मेळाव्यामध्ये बुलडाणा येथील सर्व सरकारी व खाजगी बँकेद्वारे विविध सरकारी योजनांमध्ये कर्ज वाटप केले जाणार आहे. तसेच याठिकाणी बँका आपला स्टॉल लावून बँकेच्या योजनांची माहिती देणार आहे व कागदपत्रे पूर्ण असल्यास तात्काळ कर्ज मंजूर करणारआहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कर्ज मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक श्री. हेडाऊ यांनी केले आहे.

                                    बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्यांसाठी सफाईगार पदाची कामे मिळणार

·         1 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदुरा येथे कंत्राटी पद्धतीचे 1 सफाईगार पद रिक्त आहे. या पदासाठी नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटपाकरीता कामे प्राप्त झाली आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने सफाईगार पदाची कामे करुन घेणे गरजेचे आहे. सफाईगार पदांची कामे बेरोजगार सोसायटयांकडून ठेका पध्दतीने करुन घ्यावयासाठी कौशल्य विकास कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत सुशिक्षीत बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्या आहेत. नोंदणीकृत सेवा सहकारी संस्था सफाईगार पदांसाठी काम करण्यास इच्छूक असल्यास प्राथमिक छाननी करीता 1 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, बस स्टॅंड समोर, बुलडाणा येथे प्रस्ताव सादर करावा.

    सदर संस्था ही ऑगस्ट 2000 नंतरची सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी, सदर कामासाठी सेवा सहकारी संस्था इच्छुक व पात्र असावी, तशी लेखी सहमती कळवावी. सेवा सहकारी संस्थेचे राष्ट्रीयकृत अथवा सहकारी बँकेत खाते असावे, मागील आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण केलेले असावे, समितीमार्फत काम मिळविण्यासाठी सहकारी सेवा सोसायटी अथवा लेाकसेवा केंद्र किमान 6 महिने कार्यरत असावे. त्यांनी यापूर्वी काम केलेले असणे आवश्यक आहे. सेवा सहकारी संस्थेमधील सदस्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. अर्जासोबत अंकेक्षण अहवाल, नोंदणी प्रमाणपत्र प्रत, संस्थेच्या अनुभवाची कागदपत्रे, बँकेच्या पासबुकाची प्रत सोबत जोडावी. प्राप्त प्रस्तावांचा विचार काम वाटप समितीमार्फत काम वाटपासाठी करण्यात येणार नाही, याबाबत नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था  नांदुरा  येथे संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

मुक्तार मदार शाह यांनी उपोषणापासून परावृत्त होण्याचे उपवनसंरक्षक यांचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : मुक्तार मदार शाह ऊर्फ इमरान शाह, रा. जामोद, ता. जळगांव जामोद हे 21 ऑक्टोंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहे. या उपोषणापासून परावृत्त होण्याबाबत 20 ऑक्टोंबर रोजी पत्र क्रमांक 1262 अन्वये त्यांना विनंती करण्यात आलेली आहे. तथापी तक्रारकर्ते हे उपोषणास बसलेले आहे. मुक्तार मदार शाह करीत असलेले उपोषण योग्य नसल्याने त्यांनी उपोषणापासून परावृत्त व्हावे. उपोषण करीत असताना काही विपरीत घटना घडल्यास यास वनविभाग जबाबदार राहणार नाही. त्यांनी उपोषणापासून परावृत्त व्हावे, असे आवाहन उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी केले आहे.

    त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, तक्रारदार यांचा जळगांव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मानसिक व शारीरिक आर्थिक दिलेल्या त्रासाबाबत व मजूरी हडप केल्याबाबत उचित कार्यवाही होवून कामावर पुन्हा रुजू करून घेण्याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. सदर तक्रारीचे अनुषंगाने तक्रारदार मुक्तार मदार शाह ऊर्फ इमरान शाह यांना 31 मे 2021 रोजी पत्र क्रमांक 222, 18 ऑगस्ट 2021 रोजी पत्र क्रमांक 583, 20 ऑक्टोंबर रोजी पत्र क्रमांक 1262 अन्वये प्रकरणी केलेल्या चौकशी व कार्यवाहीबाबत अवगत केले व उपोषणापासून परावृत्त होण्याबाबत विनंती केली आहे. तक्रारदार यांचे तक्रारीचे अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव जामोद यांनी सादर केलेल्या अहवालावरून तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी प्र. एस. जी. खान यांचे कालावधीत मुक्तार मदार शाह हे मग्रारोहयो अंतर्गत सुरू असलेल्या मेंढामारी रोपवाटीकेत हंगामी मजूर म्हणून कामावर होते, हजर असलेल्या दिवसाची मजूरी मस्टरप्रमाणे त्यांचे बँक खात्यात जमा झालेली आहे. त्यानंतर हंगामी मजूर म्हणून संरक्षणाचे काम त्यांना देण्यात आले होते, सदर कालावधीचे कामाची मजूरी त्यांचे खात्यात जमा केलेली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी बि. डी कटारीया हे रूजू झाल्यापासून तक्रारदार हे कुठल्याही कामावर नाहीत. तक्रारदार यांनी पुन्हा कामाची मागणी केली असता वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव जामोद यांनी तक्रारदारास हंगामी रोजंदारी मजूरीचे कामावर येण्याबाबत मौखिकरित्या कळविले होते. परंतु तक्रारदार कामावर हजर झाले नाही, असे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे अहवालामध्ये नमूद आहे. तक्रारदार मुक्तार मदार शाह यांचे तक्रारीचे अनुषंगाने चौकशी करून केलेल्या कार्यवाहीबाबत त्यांना अवगत केलेले आहे, असे उपवनसंरक्षक श्री. गजभिये यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        **********

महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांदा दौरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अॅड यशोमती ठाकूर 28 ऑक्टोंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे :  दि. 28 ऑक्टोंबर रोजी सकाळी 5.10 वा हावडा एक्सप्रेसने मलकापूर रेल्वे स्थानक येथे आगमन, सकाळी 5.15 वा शासकीय वाहनाने बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब, बुलडाणा कडे प्रयाण, सकाळी 6 वाजता बुलडाणा अर्बन रेसीडेन्सी क्लब येथे आगमन  व राखीव, सकाळी 9 वाजता बुलडाणा रेसीडेन्सी क्लब येथे जिल्हा काँग्रेस कमेटी पदाधिकाऱ्यांसमवेत भेट व चर्चा, सकाळी 10 वा शासकीय वाहनाने चिखली विश्रामगृहाकडे प्रयाण, सकाळी 10.30 वा चिखली विश्रामगृह येथे आगमन व चिखली तालुका काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12 वा शासकीय वाहनाने चिखली येथून डाबकी जहांगीर जि. अकोलाकडे प्रयाण करतील.

                                                                        *********

Tuesday 26 October 2021

DIO BULDANA NEWS 26.10.2021

 

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 05 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 :  पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हावासियांना आज 18 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 05 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 326 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 326 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 63 व रॅपिड टेस्टमधील 263 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 326 अहवाल निगेटीव्ह आहेत.

  त्याचप्रमाणे आजपर्यंत 729630 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86928 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86928 आहे. आज रोजी 67 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 729630 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87607 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86928 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 05 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

******


अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना विनामूल्य पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण मिळणार

• 12 नोव्हेंबर रोजी पोलीस कवायत मैदानावर उपस्थित रहावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : सन 2021-22 मध्ये पोलीस भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेतंर्गत मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शिख, पारसी, जैन आणि ज्यु या अल्पसंख्यांक समाजातील इच्छुक उमेदवारांना शासना मार्फत विनामुल्य पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक समाजातील समाजातील उमेदवारांकडून जिल्ह्यातील प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा पोलीस कवायत मैदान, बुलडाणा येथे अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे.

प्रशिक्षणार्थीचे वार्षिक उत्पन्न 2.50 लक्ष पेक्षा जास्त नसल्याचा पुरावा असावा. उमेदवार हा अल्पसंख्याक समाजातील असावा. उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्ष वयोगटातील असावे. उमेदवाराची उंची 165 से.मी, महिला उमेदवार उंची 155 से.मी असावी. पुरूष उमेदवाराची छाती 79 से.मी व फुगवून 84 से.मी असावी. उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. उमदेवारांनी अर्जासोबत शैक्षणिक अर्हता, आधार कार्ड, रहीवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातंर्गत नाव नोंदणी केलेला दाखला आदी कागदपत्रांच्या सत्यप्रती द्याव्या. उमेदवार हा शारिरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा. निवडलेल्या उमेदवारांना एकूण दोन महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये दररोज तीन तासांचे वर्ग प्रशिक्षण व दोन तासांचे मैदानी प्रशिक्षण देण्यात येईल. निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणादरम्यान 1500 रूपये प्रतीमाह प्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. तसेच मैदानी प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण संस्थेमार्फत चहापाण, अल्पोपहार देण्यात येणार आहे. गणवेश साहित्यासाठी 1 हजार रूपये एवढे एकरकमी अनुदान देण्यात येणार आहे. निवडलेल्या प्रशिक्षणार्थीस निवासाची व्यवस्था स्वत: करावी लागणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

***********

 

 

Monday 25 October 2021

DIO BULDANA NEWS 25.10.2021

   राज्य निपुणता केंद्रातर्गत सायकलिंग खेळाच्या प्रवेशाकरीता क्रीडा नैपुण्य चाचणीचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जा खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांचा शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविध पुरविुन त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे.  क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने (खेलो इंडीया एक्सलन्स सेंटर) राज्य निपुणता केंद्र मंजुर करण्यात आलेले आहेत.  यानुसार ॲथलेटीक्स, शुटींग व सायकलींग या तीन खेळांचे निपुणता केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे.

सायकलींग या खेळाबाबतची निवड चाचणी तज्ञ समितीमार्फत समक्ष गुणानुक्रमे देऊन प्रवेश निश्चीत केली जाणार आहे.  सायकलींग या खेळाच्या प्रवेशाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा मार्फत क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन दि.29 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.

निवड प्रक्रीयेकरीता जिल्हास्तरावर 12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुले व मुली सहभागी होऊ शकतील.  या निवड चाचणी प्रक्रीयेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंकरीता जन्म 2007 ते 2009 या वर्षातील असावा.  तर मुलांकरीता 1600 मि. धावणे, उभी लांब उडी (Standing Broad Jump), उभी उंच उडी (Standing Vertical Jump), खेळाडूची उंची (Players Hight) या चार बाबींचा तर मुलींकरीता  800 मी. धावणे,  उभी लांब उडी (Standing Broad Jump), उभी उंच उडी (Standing Vertical Jump), खेळाडूची उंची (Players Hight) या चार बाबींचा समावेश असणार आहे.  जिल्हास्तर निवड चाचणीकरीता येणाऱ्या खेळाडूंना सोबत आधार कार्ड, जन्माचा दाखला, राज्य / राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्राची छायांकीत प्रत सोबत आणावी.   बुलडाणा जिल्ह्यातील जे खेळाडू सायकलिंग या खेळामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले आहेत अशा खेळाडूंना थेट राज्यस्तर क्रीडा चाचण्यांकरीता पाठविण्यात येईल.  जिल्हास्तर निवड चाचणीमधुन प्रथम 2 मुले व 2 मुली यांची निवड दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी होणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे राज्यस्तर निवड चाचणीकरीता करण्यात येईल.  तसेच वरील कार्यक्रमानुसार बुलडाणा खेळाडूंनी उपस्थित रहावे असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

********

 भ्रष्टाचार विरोधात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : केंद्रीय दक्षता आयोगाच्या सुचनेनुसार प्रतिवर्षी देशामध्ये सर्वत्र दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. त्यानुसार राज्यात 26 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्‍यात येत आहे. या सप्ताह कालावधीत भ्रष्टाचार विरोधातील कारवाई संबंधीत विविध माध्यमाद्वारे नागरिकांशी संपर्क साधुन त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

   भ्रष्टाचार विरोधात महसूल, नगर परिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, विद्युत महामंडळ, व्यवसाय विभाग, आयकर, नगर रचना विभाग, जिल्हा उपनिबंधक, दुय्यम उपनिबंधक, कोषागार, सहकारी पतसंस्था, राज्य परिवहन महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन विभाग, शासनाकडुन अनुदान मिळणाऱ्या सर्व संस्था व शैक्षणिक संस्था, सर्व शासकीय कार्यालय तसेच अन्य सर्व महामंडळे, सर्व लोकसेवक व खाजगी व्यक्ती यांच्या विरूद्ध तक्रार करता येते.

    भ्रष्टाचार मार्गाने अधिकारी, कर्मचारी, लोकसेवकांनी बेहिशोबी संपत्ती जमविण्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यानंतर त्यातील सत्यता व विश्वासर्हता पडताळल्यानंतर कार्यवाही करण्यात येते, तक्रार कर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. जनतेमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्याचे उद्देशाने भ्रष्टाचारासंबधी माहिती असल्यास अथवा लाच मागणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा कार्यालयाच्या 07262-242548, मोबाईल क्रमांक 8888768218, 8668627737 व टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधिक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांनी केले आहे.

                                                            ********

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 05 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 :  पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हावासियांना आज 17 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 05 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 17 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 17 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये रॅपिड टेस्टमधील 17 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 17 अहवाल निगेटीव्ह आहेत.

  त्याचप्रमाणे आजपर्यंत 729304 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86928 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86928 आहे. आज रोजी 20 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 729304 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87607 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86928 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 05 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

******

जागृती ॲग्रो फुड्स इंडिया कंपनीने फसवणूक केली असल्यास संपर्क साधावा

  • आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि. 25 : जागृती ॲग्रो फुड्स इंडिया प्रा.लि. मार्केट यार्ड, चेंबर भवन, सांगली या कंपनीने गुंतवणूकीवरील परताव्याचे पैसे परत न करता विश्वासघात करून फसवणूक केली आहे. अशी फिर्याद 16.9.2015 रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन येथे दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी राज गणपत गायकवाड व इतर 10 आरोपीविरूद्ध कलम 420, 406, 34 भादंवि सह कलम 3, 4 महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनामधील) हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

   तरी राज गणपत गायकवाड व इतर 10 आरोपींनी अन्य जनतेची देखील अशा प्रकारची फसवणूक केल्याची शक्यता आहे. अशा प्रकारची फसवणूक झालेले आणखी जिल्ह्यातील काही व्यक्ती असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे संपर्क साधावा किंवा स्वत: आपला जबाब नोंदविणे कामी आपल्याजवळ असलेल्या मूळ कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, भारत शाळेचे समोर, पोलीस स्टेशन, बुलडाणा शहरचे आवार, बुलडाणा येथे उपस्थित रहावे किंवा मोबाईल क्रमांक 9823327105 व 07262-245989 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अलका निकाळजे आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी केले आहे.

*******


सायकल रॅली काढून जिल्हा परिषदेने दिला पर्यावरण व स्वच्छतेचा संदेश

         बुलडाणा,(जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात पर्यावरण संतुलन प्लास्टिक बंदी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण ची व्यापक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद अंतर्गत आज 25 ऑक्टोंबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा ताई पवार व जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कमलताई बुधवत  यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अर्थ व बांधकाम सभापती रियाजखान पठाण, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. सांगळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंदनसिंग राजपूत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. राठोड,  शिक्षणाधिकारी श्री. मुकुंद व श्री. जगताप  यांची उपस्थिती होती.

    प्रास्ताविक पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंदन सिंग राजपूत यांनी केले. यावेळी त्यांनी सायकल रॅली बाबत पार्श्वभूमी विषद करताना सांगितले पर्यावरण, प्लास्टिक बंदी व स्वच्छतेची मोठ्या प्रमाणात कृती होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदने सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या, निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने आज अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच गावागावात प्रत्येक नागरिकांने शौचालयाचा नियमित वापर करून आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपले योगदान दिले पाहिजे. जिल्हा ओडीएफ प्लस करण्यासाठी प्रत्येक गावाने स्वच्छतेच्या या चळवळीत आपला सहभाग नोंदवावा.

       जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषाताई पवार अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, पर्यावरणाचे संतुलन राखणे ही आज काळाची गरज बनली आहे. एकदा वापरात येणारे प्लास्टिकचा वापर प्रत्येकाने टाळून आपल्या घरातून प्लास्टिकला हद्दपार करणे गरजेचे आहे. गावाने स्वच्छते विषयक संकल्प करून आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नियमितपणे शौचालयाचा वापर करणे, गावात घनकचरा व सांडपाणीचे योग्य व्यवस्थापन करणे यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतल्यास आपण गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. यासाठी प्रत्येकाने पर्यावरण व स्वच्छतेच्या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदवला पाहिजे.

        या रॅलीमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी, प्रबोधन विद्यालय, भारत विद्यालय, जिजामाता महाविद्यालय, नेहरू युवा केंद्र, पर्यावरण ग्रुप बुलडाणा प्राध्यापक, शिक्षक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रॅलीची सुरुवात जिल्हा परिषद येथून 12 वाजता होऊन संगम चौक, राठोड भवन, शासकीय विश्रामगृह, चिंचोले हॉस्पिटल, सर्क्युलर रोड, त्रिषरण चौक, कारंजा चौक, आनंद ज्वेलर्स, बाजार गल्ली, जयस्तंभ चौक या मार्गे जिल्हा परिषदेत रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान स्वच्छ भारत मिशन ग्रामीण चा स्वच्छता रथाद्वरे ध्वनिक्षेपकद्वारे विविध घोषणा देण्यात आल्या. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण व स्वच्छतेच्या या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदवून आपले घर व परिसर स्वच्छ सुंदर ठेवूया असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

                                               महिन्याच्या शेवटच्या कार्यालयीन दिवशी सायकलने कार्यालयात यावे

    रोज वाढणारे प्रदूषणला आळा बसण्यासाठी जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व विभाग व कार्यालयातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी महिण्यातील शेवटच्या कार्यालयीन दिवशी कुठलेही वाहन न वापरता सायकल किंवा पायी कार्यालयात येवून प्रदूषण टाळावे, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.

                                                                                    *********

बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्यांसाठी सफाईगार पदाची कामे मिळणार

  • 1 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव जामोद, सिं. राजा, संग्रामपूर येथे प्रत्येकी कंत्राटी पद्धतीचे 1 सफाईगार पद व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगांव येथे सफाईगारचे दोन पदे असून अशी एकूण 5 पदे रिक्त आहे. या पदासाठी नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटपाकरीता कामे प्राप्त झाली आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने सफाईगार पदाची कामे करुन घेणे गरजेचे आहे. सफाईगार पदांची कामे बेरोजगार सोसायटयांकडून ठेका पध्दतीने करुन घ्यावयासाठी कौशल्य विकास कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत सुशिक्षीत बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्या आहेत. नोंदणीकृत सेवा सहकारी संस्था सफाईगार पदांसाठी काम करण्यास इच्छूक असल्यास प्राथमिक छाननी करीता 1 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, बस स्टॅंड समोर, बुलडाणा येथे प्रस्ताव सादर करावा.

    सदर संस्था ही ऑगस्ट 2000 नंतरची सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी, सदर कामासाठी सेवा सहकारी संस्था इच्छुक व पात्र असावी, तशी लेखी सहमती कळवावी. सेवा सहकारी संस्थेचे राष्ट्रीयकृत अथवा सहकारी बँकेत खाते असावे, मागील आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण केलेले असावे, समितीमार्फत काम मिळविण्यासाठी सहकारी सेवा सोसायटी अथवा लेाकसेवा केंद्र किमान 6 महिने कार्यरत असावे. त्यांनी यापूर्वी काम केलेले असणे आवश्यक आहे. सेवा सहकारी संस्थेमधील सदस्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. अर्जासोबत अंकेक्षण अहवाल, नोंदणी प्रमाणपत्र प्रत, संस्थेच्या अनुभवाची कागदपत्रे, बँकेच्या पासबुकाची प्रत सोबत जोडावी. प्राप्त प्रस्तावांचा विचार काम वाटप समितीमार्फत काम वाटपासाठी करण्यात येणार नाही, याबाबत नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव जामोद, खामगांव, संग्रामपूर व सिं. राजा येथे संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                                                *******

अनुकंपाधारक उमेदवारांची कागदपत्रे तपासणी आता 9 नोव्हेंबर रोजी

बुलडाणा,(जिमाका) दि.25: जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत अनुकंपाधारक उमेदवारांचे एकूण 331 उमेदवारांची ज्येष्ठता यादीतील ज्येष्ठता सूची व शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या व सरळसेवेच्या आरक्षीत रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी यापूर्वी 15.9.2021 रोजी जि.पच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर 20 सप्टेंबर रोजी लेखी आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानुसार तात्पुरत्या निवड यादीवर प्राप्त आक्षेपांची सुनावणी घेवून पडताळणी करण्यात आली आहे. अनुकंपाधारक उमेदवार यांचे शैक्षणिक पात्रतेचे मुळ कागदपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून समुपदेशन प्रक्रिया 26 ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र अपरिहार्य कारणास्तव  पात्र अनुकंपाधारक ही प्रक्रिया 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जि. प बुलडाणा येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                            *********

एसटीच्या रातराणी सेवेसाठी आता सामान्य बस सेवेच्या भाड्याचीच आकारणी !

  • मध्यरात्रीपासून एसटीची 17.17 टक्के भाडेवाढ

बुलडाणा,(जिमाका) दि.25: राज्य परिवहन महामंडळाने आता रातराणी बससेवेच्या भाड्यामधील अतिरिक्त भाडे कमी केले आहे. रातराणी बससेवेला आकारले जाणारे अतिरिक्त भाडे यापूढे आकारण्यात येणार नसून सामान्य बससेवेच्या भाड्याचीच आकारणी यापुढे रातराणी बससेवेला होणार आहे. त्यामुळे निश्चितच प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. इंधन, सुटे भाग याचे वाढते दर लक्षात घेता एस टी महामंडळाने आज मध्यरात्रीपासून बस प्रवास भाड्यात 17.17 टक्के भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून एसटीच्या सर्व बस सेवांसाठी लागू होणार आहे. तरी प्रवाशांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी केले आहे.

                       

****

                      कोविड 19 ने मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना 50 हजार रूपये सानुग्रह अनुदान

  • जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण समिती स्थापन

बुलडाणा,(जिमाका) दि.25: कोविड 19 ने मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना 50 हजार रूपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाचे 30 जुन 2021 रोजीच्या आदेशानुसार कोविड 19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रूपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचीत केले आहे. त्यानुसार प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी त्यांच्या पत्राअन्वये 50 हजार रूपये सानुग्रह अनुदान वाटपासाठी प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे.

   जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. याबाबत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली असून समितीचे सदस्य सचिव जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रूग्णालय,बुलडाणा हे आहेत. याबाबतची तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव हे सर्व कार्यवाही करतील. सानुग्रह अनुदान 50 हजार रूपयांचे वाटप होण्यासाठी मदत व पुनर्वसन विभाग यांच्याकडून अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती लवकरच अधिसूचीत करण्यात येणार आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        ************


पाणी वापर करणाऱ्या यंत्रणांनी थकबाकी तातडीने भरावी

-          जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

  • पाणी आरक्षण समिती सभा

बुलडाणा,(जिमाका) दि.25: जिल्ह्यामध्ये सिंचन व बिगर सिंचनाकरीता पाण्याची मागणी असते. याबाबत विविध पाणी वापर यंत्रणा कार्यरत आहेत. पाणी वापराची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तरी पाणी वापर करणाऱ्या यंत्रणांनी आपल्याकडील थकबाकी तातडीने भरावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पाणी आरक्षण समितीची सभा आज 25 ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, बुलडाणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी प्रविण कथने आदी उपस्थित होते.

     खकडपूर्णा नदीच्या काठावरील 44 गावांकरीता नदीपात्रात पाण्याच्या मागणीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले, खकडपूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संयुक्तरित्या कायमस्वरूपी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवावा.  तसेच मोताळा तालुक्यातील व्याघ्र नाला प्रकल्पात केवळ 35 टक्के पाणीसाठा असल्यामुळे या प्रकल्पातील संपूर्ण पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षणानुसार राखून ठेवावा. बिगर सिंचन थकबाकी बाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, खामगांव यांच्याकडील थकबाकी प्रामुख्याने वसूल करावी. बैठकीचे सादरीकरण, संचलन व आभार प्रदर्शन सहा. अभियंता योगेश तरंगे यांनी केले. जिल्ह्यात बिगर सिंचनाची एकूण थकबाकी 253.04 लक्ष आहे. सभेला उपकार्यकारी अभियंता क्षितीजा गायकवाड, कनिष्ठ अभियंता विजयसिंह राजपूत, व्ही. पी वैराळकर आदींसह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

                                                            असे आहे पिण्याचे पाणी आरक्षण

मोठे प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा 222.69 दलघमी असून बाष्पीभवन वगळून उपलब्ध होणारे पाणीसाठा 155.88 दलघमी आहे. यामध्ये पिण्यासाठी 11.98 दलघमी राखून ठेवण्यात आला आहे. मध्यम प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा 136.11 दलघमी आहे. यामधील बाषीभवन वगळून उपलब्ध होणारा पाणीसाठा 95.27 दलघमी असून पिण्याचे पाण्याचे आरक्षण 8.36 दलघमी आहे. लघू प्रकल्पात 156.82 दलघमी उपलब्ध पाणीसाठा आहे. यामध्ये 109.77 दलघमीचे बाषीभवन वगळून 3.76 दलघमी पिण्यासाठी आरक्षीत आहे.  अशाप्रकारे एकूण 515.62 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामधील 360.92 दलघमी पाणीसाठ्याचे बाषीभवन गृहीत धरण्यात आले आहे. तर 24.11 दलघमी पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत आहे.   

********