जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार प्रशिक्षण व योगसाधना शिबीर उत्साहात संपन्न

 




बुलढाणा, (जिमाका) दि. 13 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा तसेच आहिल्या योग केंद्र व निसर्ग उपचार केंद्र, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी भारत विद्यालय, बुलढाणा येथे जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार प्रशिक्षण-स्पर्धा व योगसाधना शिबीर उत्साहात पार पडले.

छत्रपती योग व क्रीडा प्रशिक्षण केंद्र, ता. अंबड, जिल्हा जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय सूर्यनमस्कार शिक्षक प्रशिक्षण (टी.ओ.टी.) स्पर्धा व दोन दिवसीय योगसाधना शिबिरातून प्रशिक्षित झालेले मास्टर ट्रेनर्स यांच्या तांत्रिक सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सूर्यनमस्काराची शास्त्रशुद्ध पद्धत, योगसाधनेचे महत्त्व व नियमित सरावाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणाचा लाभ भारत विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी घेतला. शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन योगसाधनेकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमास भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड, क्रीडा अधिकारी एस. एस. केळे यांच्यासह तारामती बद्रीनाथ जायभाये, उज्वला विजय शिंदे, सरला देशमुख, कालींदा नागरे (मास्टर ट्रेनर), स्वाती देगुलकर (मास्टर ट्रेनर), नंदा शेजोळ चाटे (मास्टर ट्रेनर), अर्चना फासे (जुमडे), जयश्री देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या