शेगाव येथे भव्य 'पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
बुलढाणा, (जिमाका)
दि. 27 : जिल्ह्यातील नोकरीच्या
शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (मॉडेल करिअर सेंटर), बुलढाणा आणि माऊली कॉलेज
ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी २
फेब्रुवारी २०२६ (सोमवार) रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या
मेळाव्यामध्ये देशातील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून थेट मुलाखतीद्वारे
रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने: भारत फोर्ज, पुणे मरीन
इलेक्ट्रिकल, मुंबई बी. व्ही. जी. इंडिया, पुणे कोअर प्रोजेक्ट इंजिनीअर्स,
अमरावती यांसह ३३ पेक्षा अधिक दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. १०वी, १२वी, ITI,
डिप्लोमा (पदविका) आणि सर्व शाखांचे पदवीधर व तत्सम शैक्षणीक पात्रताधारक
उमेदवारांना हा मेळावा पूर्णपणे निःशुल्क (मोफत) आहे.मेळाव्याचा तपशील
दिनांक: २ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) ठिकाण: माऊली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड
टेक्नॉलॉजी, खामगाव-शेगाव रोड, शेगाव. इच्छुक उमेदवारांनी खालील पोर्टलवर आपली
नोंदणी करणे आवश्यक आहे:राज्य शासन पोर्टल: www.rojgar.mahaswayam.gov.in केंद्र
शासन पोर्टल: www.ncs.gov.in "बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी
या संधीचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे," असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्रचे सहायक आयुक्त, ग. प्र. बिटोडे यांनी
केले आहे.
अधिक
माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास केंद्र, बुलढाणा किंवा माऊली कॉलेज, शेगाव येथे
संपर्क साधावा.
00000
Comments
Post a Comment