१४ व १९ वर्षांखालील मुलींच्या हॉकी संघाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न

 



बुलढाणा, (जिमाका) दि. 05 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा, जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा तसेच सहकार विद्या मंदिर बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व १९ वर्षांखालील मुलींसाठी हॉकी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर दि. २७ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिराच्या आधुनिक एस्ट्रो टर्फ मैदानावर उत्साहात पार पडले.

या प्रशिक्षण शिबिरात निवड झालेल्या दोन्ही वयोगटातील संघ दि. १ जानेवारी २०२६ रोजी मध्यप्रदेश येथील ग्वालियर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना झाले. ज्योती चव्हाण व वैशाली सूड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव देण्यात आला.

संघ रवाना होण्यापूर्वी आयोजित शुभेच्छा कार्यक्रमात सहकार विद्या मंदिरच्या चेअरमन कोमल झंवर, प्राचार्य अलगर स्वामी, जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर, लक्ष्मी शंकर यादव, मुख्याध्यापिका श्रीमती ससे, हॉकी प्रशिक्षक सय्यद आबीद तसेच संघ व्यवस्थापक डॉ. जीवन मोहोळ यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

या प्रशिक्षण शिबिरामुळे जिल्ह्यातील महिला हॉकी खेळाडूंना दर्जेदार सरावाची संधी मिळाल्याने त्यांच्या कामगिरीत निश्चितच सुधारणा होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या