सेसफंड योजना; बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर्ससाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 02 : जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्या सेसफंड योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेतून 75 टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर्स (फवारणी यंत्र) पुरविण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत सिंदखेड राजा, देऊळगाव राजा व मोताळा या तालुक्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून, उर्वरित तालुक्यांमध्ये अद्याप उद्दिष्टपूर्ती झालेली नाही. त्यामुळे उर्वरित तालुक्यातील पात्र व इच्छुक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

 योजने संदर्भात अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील पंचायत समितीमधील कृषी अधिकारी(सामान्य) तसेच विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे दि. 20 जानेवारी 2026 पर्यंत सादर करावेत.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या