Friday 31 December 2021

DIO BULDANA NEWS 31.12.2021


त्पादन शुल्क विभागाचा कारवाईचा धडाका सुरूच

  • डिसेंबर महिन्यात 93 गुन्हे नोंदवित 94 आरोपींना अटक
  • 34 लाख 77 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : राज्य उत्पादन शुल्क विभागार्फत विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे तसेच अधीक्षक श्रीमती भाग्यश्री प.जाधव यांचे मार्गदर्शनाखाली 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये एकूण 93 गुन्हे नोंदविण्यात आले असून 87 वारस गुन्हे, 6 बेवारस गुन्हे नोंदवुन 94 आरोपींना अटक करण्यात आली.  तसेच 10 वाहनांसह एकुण 34 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  जिल्ह्यात 31 डिसेंबरच्या अनुषंगाने 29 डिसेंबर रोजी प्र. निरीक्षक एन. के मावळे, दुय्यम निरीक्षक आर. के फुसे, एस डी चव्हाण यांचे पथकाने शेंदला, ता. मेहकर येथील आरोपी इसम नामे संतोष सरदार यांचे राहते घरी दारूबंदी गुन्ह्याकामी छापा टाकला. त्याठिकाणी गोवा राज्य निर्मित व विक्रीसाठी असलेली, राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेली विदेशी दारू ब्ल्यु 7 एक्स्ट्रा स्मुथ व्हिस्की या ब्रँण्डच्या 750 मिलीच्या 36 बाटल्या, राज्यातील मॅकडॉल क्रमांक 1 व्हिस्की या ब्रँण्डच्या जुन्या बाटल्यामध्ये भरलेल्या बनावटी विदेशी मद्याच्या 223 सिलबंद बाटल्या, मॅकडॉल व्हिस्कीचे बनावट नवीन 1540 बुचे व 424 रिकाम्या जुन्या बाटल्या व एक हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल व आरोपीचे दोन मोबाईल असा एकूण 142815 रूपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी संतोष संपत सरदार ह. मु शेंदला ता. मेहकर व प्रमोद भुजंग सरदार रा. रामनगर, मेहकर यांना अटक करण्यात आली.  त्यांचेविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65, 80, 81, 83, 90 व 108 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या कार्यवाहीत जवान प्रदीप देशमुख, अमोल सुसरे, गणेश मोरे, प्रफुल्ल साखरे, शरद निकाळजे व महिला जवान सौ शारदा घोगरे सहभागी होते.

  जिल्ह्यात 31 डिसेंबरच्या अनुषंगाने 30 डिसेंबर रोजी प्र. निरीक्षक आर. आर उरकुडे, दुय्यम निरीक्षक पी. आर मुंगडे यांचे भरारी पथकाने नागरे हॉस्पीटल जवळ, दे. राजा येथे 121 लीटर देशी मद्यासह महिंद्रा कंपनीची एसयुव्ही कार क्रमांक एम एच 31 इए 9007 जप्त करण्यात आली. या कारवाईत 6 लक्ष 40 हजार 320 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.    या गुन्ह्यातील आरोपी शिवाजी उत्तम शिवणकर, रा. सिनगांव जहागीर व संतोष संपत सरदार शेंदला, ता . मेहकर व प्रमोद भुजंग सरदार रा. रामनगर, मेहकर यांना अटक करण्यात आली.  त्यांचेविरूद्ध  महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65, 80, 81, 83, 90 व 108 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. कारवाईत जवान ए.पी तिवाने, पी. ई चव्हाण, आर. ए कुसळकर सहभागी होते.

    तसेच 27 डिसेंबर रोजी झालेल्या चिखली येथे मोठ्या स्वरूपातील बनावट मद्य व 29 डिसेंबर रोजी मेहकर येथील शेंदला या गावामध्ये गोवा राज्य निर्मित बनावट विदेशी मद्य पकडण्यात आले असून बनावट विदेशीा मद्याचा गुन्हे उघडकीस आल्याने जिल्ह्यात इतरत्र अशा प्रकारचे बनावट विदेशी मद्य वितरीत होण्याची दाट शक्यता आहे. तसेच बनावट मद्य सेवनामुळे यापूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणावर जिवितहानी होऊन शेकडो लोकांचा मृत्यू झालेला आहे. तसेच बनावट मद्यामुळे गंभीर स्वरूपाचे आजार तसेच गंभीर स्वरूपाचे अपंगत्व येण्याची संभावना असते किंवा अन्य दुर्घटना होण्याची दाट संभावना आहे. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाचा मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी व सेवन करावे. त्याचप्रमाणे पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच यांनी बनावट मद्य निर्मिती, वाहतुक, विक्री होत असल्यास या विभागास टोल फ्री क्रमांक 1800833333 वर किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी, असे आवाहन अधिक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.

                                                                                                *******

     कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आणखी निर्बंध लागू

  • लग्न समारंभात 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी

बुलडाणा, (जिमाका) दि. 31: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी निर्बंधाचे आदेश जारी केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात लग्न समारंभात बंदीस्त जागांमध्ये किंवा खुल्या जागेत जास्तीत जास्त 50 व्यक्तींना परवानगी असणार आहे. इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम, मेळावा व मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना 50 व्यक्तींच्या उपस्थिती असणार आहे. अंत्यसंस्कार विधीमध्ये जास्तीत जास्त 20 व्यक्ती उपस्थिती असतील. पर्यटन स्थळे, मोकळी मैदाने व लोकांच्या मोठ्या गर्दीला आकर्षित करणारी इतर स्थळे या सर्व ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 लागू असणार आहे.  

 जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन होत आहे किंवा नाही, याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 145) ये कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व फौजदारी प्रक्रीया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.

**********


जिल्हास्तर युवा महोत्सव उत्साहात

·         आभासी पद्धतीने केले आयोजन

 बुलडाणा, (जिमाका) दि. 31:  राज्याचे युवा धोरण 2012 नुसार युवकांच्या विविध कला गुणांना वाव देवुनत्यांच्यातील सुप्त कला गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातुन प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालयपुणे द्वारा दरवर्षी उपलब्ध करुन दिली जात असते.  क्रीडा व युवक सेवा संचालनालयजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद यांचे विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 31 डिसेंबर 2021 रोजी आभासी पध्दतीने  (ऑनलाईन) उत्सहात करण्यात आले.

            जिल्हास्तरीय ऑनलाईन युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले. यावेळी क्रीडा अधिकारी भास्कर घटाळेरविंद्र धारपवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळेश्रीमती मनिषा ढोके तसेच परिक्षक म्हणून रविकिरण टाकळकरप्रशांत खाचणेटिळक क्षिरसागरप्रा.सुभाष मोरे उपस्थित होते. युवा महोत्सवामध्ये लोकगित व लोकनृत्य या प्रकारांमध्ये स्पर्धंकांनी सहभाग घेतला.

            यामध्ये अंतिम निकाल परिक्षकांनी सादर केल्यानुसार लोकगित या बाबीमध्ये जिजामाता महाविद्यालयबुलडाणा तर लोकनृत्यामध्ये गो.से. कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयखामगांव यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. प्रथम क्रमांकाने निवड झालेल्या स्पर्धंकाची विभागीय क्रीडा संकुलमोर्शी रोड अमरावती येथे दि.04 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या विभागीय महोत्सवासाठी निवड झालेली आहे. विभागीय महोत्सव सुध्दा ऑनलाईन पध्दतीने होणार असूनप्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांना लिंक प्राप्त झाल्यानंतर त्यांना सादरीकरण करावे लागेल.

            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संयोजक श्रीमती मनिषा ढोके, भास्कर घटाळे, रविंद्र धारपवार, अनिल इंगळे, विजय बोदडे, सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, भिमराव पवार, कृष्णा नरोटे यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                **********

जिल्ह्यातील खरीप हंगामाची अंतिम पीक पैसेवारी जाहीर

बुलडाणा, (जिमाका) दि. 31: सन 2021-22 या खरीप हंगामातील जिल्ह्यातील एकूण 1419 गावांची अंतिम पीक पैसेवारी जाहीर झाली आहे. या सर्व गावांची अंतिम पीक पैसेवारी 50 पैशांच्या आत जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत तालुकानिहाय गावे व नजर अंदाज पीक पैसेवारी जाहीर केली आहे.

  तालुकानिहाय अंतिम पीक पैसेवारी पुढीलप्रमाणे आहे : बुलडाणा तालुका : एकूण 98 गावांची अंतिम पीक पैसेवारी 46, चिखली तालुका : एकूण 144 गावांची पैसेवारी 47, दे. राजा तालुका : 64 गावांची पैसेवारी अंतिम पीक पैसेवारी 48, मेहकर तालुका : 161 एकूण गावांची पैसेवारी 47, लोणार तालुका : एकूण 91 गावांची पैसेवारी 47, सिं. राजा तालुका : एकूण 114 गावांमध्ये पैसेवारी 47, मलकापूर तालुका : एकूण 73 गावांची पैसेवारी 46, मोताळा तालुका : एकूण 120 गावांची पैसेवारी 47, नांदुरा तालुका : एकूण 112 गावांची पैसेवारी 45, खामगांव तालुका : एकूण 145 गावांची पैसेवारी 47, शेगांव तालुका : एकूण 73 गावांची 47 पैसे, जळगांव जामोद तालुका : एकूण 119 गावांची पैसेवारी 41 पैसे आणि संग्रामपूर तालुका : एकूण 105 गावांची अंतिम पीक पैसेवारी 45 आहे. अशाप्रकारे जिल्ह्याची एकूण 1419 गावांची अंतिम पीक पैसेवारी 46 आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                            **********

जानेवारी महिन्याचा लोकशाही दिन होणार ई लोकशाही दिन

  • कोरोना संसर्ग पार्श्वभूमीमुळे निर्णय
  • मोबाईल क्रमांक 9823465599 वर पीडीएफ स्वरूपात तक्रारी द्याव्यात
  • व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क

बुलडाणा,(जिमाका) दि.31: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने करण्यात येणार आहे. सोमवार दि. 3 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

    या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 9823465599 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ स्वरूपात तक्रारी कराव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.

   तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                ********

23 रेती घाटांपैकी तीन रेती घाटांची ई निविदा नाही

बुलडाणा,(जिमाका) दि.31: जिल्ह्यातील सन 2021-22 करीता 23 रेतीघाटांची द्वितीय ई निविदा नि ई लिलाव सुचनेचा कार्यक्रम 21 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. तथापि संचालक, भुविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, नागपूर यांनी 23 रेती घाटापैकी गोडेगाव, गोळेगांव खु ता. जळगांव जामोद व इटखेड ता. संग्रामपूर या तीन रेतीघाटांचे मायनिंग प्लॅन नामंजूर केले आहे. त्यामुळे या तीन रेतीघाटांची ई निविदा नि ई लिलाव लावण्यात येणार नाही, असे अप्पर जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                                                                *******

                           ध्वनीक्षेपकांना मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वर्षातील सूट देणारे 12 दिवस जाहीर

बुलडाणा,(जिमाका) दि.31: ध्वनी प्रदुषण नियमन व नियंत्रण नियम 2000 अन्वये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांच्या वापरासाठी श्रोतृगृहे, सामुहिक सभागृहे व मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्यात येणारे दिवस जाहीर करण्यात आले आहे. ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत पुढील वर्षात सुट देण्यात येणारे 12 दिवस जाहीर करण्यात आले आहे. तर उर्वरित 3 दिवस राखीव ठेवण्यात येवून महत्वाच्या वेळी व गरज भासल्यास त्या त्या वेळी निश्चित करण्यता येणार आहे. ध्वनी मर्यादेचे व तरतूदींचे उल्लंघन होणार नाही, याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात यावी. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदुषणासंबंधात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.

सूट देण्यात येणारे हे आहेत 12 दिवस

शिवजयंती, ईद ए मिलाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, गणपती उत्सवातील दुसरा, पाचवा, गौरी विसर्जन व अनंत चतुर्दशीचा दिवस, नवरात्री उत्सवाचे अष्टमी व नवमीचा दिवस, लक्ष्मीपूजन व 31 डिसेंबर 2022.

Thursday 30 December 2021

DIO BULDANA NEWS 30.12.2021

 


    अवैध दारू प्रकरणी 88 गुन्हे नोंद, 89 आरोपींना अटक; 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

  • डिसेंबर महिन्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बुलडाणा, (जिमाका) दि. 30: राज्य उत्पादन शुल्क विभागार्फत विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे  तसेच अधीक्षक श्रीमती भाग्यश्री प.जाधव यांचे मार्गदर्शनाखाली 1 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये एकूण 88 गुन्हे नोंदविण्यात आले असून 82 वारस गुन्हे, 6 बेवारस गुन्हे नोंदवुन 89 आरोपींना अटक करण्यात आली.  तसेच 9 वाहनांसह एकुण 28 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  जिल्ह्यात 31 डिसेंबरच्या अनुषंगाने 29 डिसेंबर रोजी प्र. निरीक्षक एन. के मावळे, दुय्यम निरीक्षक आर. के फुसे, एस डी चव्हाण यांचे पथकाने शेंदला, ता. मेहकर येथील आरोपी इसम नामे संतोष सरदार यांचे राहते घरी दारूबंदी गुन्ह्याकामी छापा टाकला. त्याठिकाणी गोवा राज्य निर्मित व विक्रीसाठी असलेली, राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेली विदेशी दारू ब्ल्यु 7 एक्स्ट्रा स्मुथ व्हिस्की या ब्रँण्डच्या 750 मिलीच्या 36 बाटल्या, राज्यातील मॅकडॉल क्रमांक 1 व्हिस्की या ब्रँण्डच्या जुन्या बाटल्यामध्ये भरलेल्या बनावटी विदेशी मद्याच्या 223 सिलबंद बाटल्या, मॅकडॉल व्हिस्कीचे बनावट नवीन 1540 बुचे व 424 रिकाम्या जुन्या बाटल्या व एक हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल व आरोपीचे दोन मोबाईल असा एकूण 142815 रूपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी संतोष संपत सरदार ह. मु शेंदला ता. मेहकर व प्रमोद भुजंग सरदार रा. रामनगर, मेहकर यांना अटक करण्यात आली.  त्यांचेविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65, 80, 81, 83, 90 व 108 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या कार्यवाहीत जवान प्रदीप देशमुख, अमोल सुसरे, गणेश मोरे, प्रफुल्ल साखरे, शरद निकाळजे व महिला जवान सौ शारदा घोगरे सहभागी होते.

  तसेच यापूर्वी 20 नोव्हेंबर रोजी दे. मही ते दे. राजा रस्त्यावरील हॉटेल निसर्ग धाब्यावर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांमधील आरोपी अमोल तेजराव शिंगणे यांनी नशेमध्ये वाद घालून शिवीगाळ केल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा व सरकारी कर्मचारी यांना मारहाण केल्याप्रकरणी कालपावेतो एकूण 40 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यत आलेली आहे.

  तसेच 27 डिसेंबर रोजी झालेल्या चिखली येथे मोठ्या स्वरूपातील बनावट मद्य व 29 डिसेंबर रोजी मेहकर येथील शेंदला या गावामध्ये गोवा राज्य निर्मित बनावट विदेशी मद्य पकडण्यात आले असून बनावट विदेशीा मद्याचा गुन्हे उघडकीस आल्याने जिल्ह्यात इतरत्र अशा प्रकारचे बनावट विदेशी मद्य वितरीत होण्याची दाट शक्यता आहे. तसेच बनावट मद्य सेवनामुळे यापूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणावर जिवितहानी होऊन शेकडो लोकांचा मृत्यू झालेला आहे. तसेच बनावट मद्यामुळे गंभीर स्वरूपाचे आजार तसेच गंभीर स्वरूपाचे अपंगत्व येण्याची संभावना असते किंवा अन्य दुर्घटना होण्याची दाट संभावना आहे. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाचा मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी व सेवन करावे. त्याचप्रमाणे पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच यांनी बनावट मद्य निर्मिती, वाहतुक, विक्री होत असल्यास या विभागास टोल फ्री क्रमांक 1800833333 वर किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर किंवा  excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी, असे आवाहन अधिक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.

                                                                                                                                *******

 

रब्बी हंगामासाठी पिक स्पर्धेचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 30: शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण याची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पातळीवर पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ 6 पिकांचा समावेश करण्यात आला आहे. पिकस्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पिकाखालील किमान 10 आर (0.10 हेक्‍टर) क्षेत्र आवश्यक आहे.

     तालुक्यामध्ये ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र 1000  हेक्टर हून अधिक आहे, अशा सर्व पिकांकरिता पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरिता भाग घेण्यासाठी रुपये 300 प्रति शेतकरी प्रति पिक या प्रमाणे प्रवेश शुल्क राहील. तालुका पातळीवर वरील स्पर्धेच्या निकालावरून पुढे जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत.

    एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पूर्वी जिल्हाभर राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता ते काढून केवळ तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार त्याची तालुका जिल्हा विभाग व राज्य पातळीवर निवड केली जाणार आहे. रब्बी हंगामासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

पारितोषिकाचा रकमा

स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गटात आहे. तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5000, द्वितीय 3000 व तृतीय बक्षीस 2000 रूपये, जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस 10000 द्वितीय 7000 तृतीय 5000 रूपये, विभाग पातळीवर पहिले बक्षीस 25000 द्वितीय 20000 तृतीय 15000 व राज्य पातळीवर पहिले बक्षीस 50000 द्वितीय 40000 तृतीय 30000 रूपये असणार आहे.

*****

कोविडमुळे पालकत्व गमावलेल्या अनाथ बालकांना शासनाचा मदतीचा हात…

  • जिल्ह्यात 13 बालके अनाथ, 494 बालके एक पालक
  • अनाथ बालकांना 65 लाखांची मदत

बुलडाणा, (जिमाका) दि. 30: कोविडकाळात समाजातील प्रत्येक घटकाला मोठा फटका सहन करावा लागला. कोरोनामुळे समाजाला निरोशेने ग्रासले. या कठीण काळात प्रत्येकाला मदतीची गरज होती.  कोविड काळात मोठे, लहान कुणीही सुटले नाही. त्यामध्ये बालकांचे अपरीमीत नुकसान झाले. राज्यात अनेक बालकांनी आपले आई वडील गमाविले. त्यामध्ये जिल्ह्यातील बालकही सुटले नाही. कोरोनाने जिल्ह्यात 507 बालकांचे बालपण हिरावले. कोरोनाने आई व वडील दोन्ही पालक गेलेले अशी 13 बालके  अनाथ झाली.  तसेच 494 बालकांनी आपले आई किंवा वडील गमाविले. मात्र शासनाने कोविडमुळे पालकत्व गमाविलेल्या बालकांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली.

 जिल्ह्यात कोरोनाने अनाथ झालेल्या 13 बालकांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने 5 लाख रूपयंची मुदत ठेव महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून देण्यात आली. या मुदत ठेव प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे  यांचेहस्ते करण्यात आले. तसेच जिल्ह्यात कोरोना एक पालक झालेल्या बालकांची संख्या 494 असून यापैकी 338 बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला. त्यांना प्रति महिना  1100 रूपये देण्यास मान्यता देण्यात आली. अशाप्रकारे शासनाने पालकत्वाची भूमिका साकारत कोविड काळात पालकत्व गमाविलेल्या बालकांचे संगोपण करण्याचा निर्णय घेतला. केवळ आर्थिक सहाय्य न देता शासनाने अशा बालकांच्या संपत्ती टिकविण्यासाठी कायद्याचा आधार घेत त्याचे संरक्षण करण्याचे कामही केले. तसेच अनाथ झालेल्या बालकांना शासनाने अनाथ प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्यासाठी अनाथ प्रमाणपत्राचे वितरणही केले. त्यामुळे भविष्यात अशा बालकांना अनाथ प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांवर नियुक्ती मिळणे सोयीचे होणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून शासनाने कोविड काळात पालकत्व गमाविलेल्या बालकांच्या पाठीशी उभे राहत माणूसकीचे मुर्तिमंत उदाहरण उभे केले आहे.

                                                                                *******

                      

कोरोना अलर्ट : प्राप्त 538 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 02 पॉझिटिव्ह

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 540 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 538 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 02 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 217 तर रॅपिड टेस्टमधील 321 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 536 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : छत्रपती नगर 1, मलकापूर शहर : 1, अशाप्रकारे जिल्ह्यात 2 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच स्त्री रुग्णालय बुलडाणा येथे देऊळगाव राजा येथील 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 746295 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86984 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86984 आहे.  आज रोजी 410 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 747306 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87674 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86984 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 14 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 676 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                                                                                *********

Wednesday 29 December 2021

DIO BULDANA NEWS 29.12.21

 


जिल्ह्याच्या गरजेनुसार आरोग्य सुविधांवर भर द्यावा

-पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
*आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी निधी
*पांदण रस्यांणासाठी प्राधान्याने निधी देणार
*गाव तिथे वाचनालय संकल्पना राबविणार
बुलडाणा, (जिमाका)दि. 29 : सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा बळकट करावी लागणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शस्त्रक्रियांसाठी लागणारी सामुग्री खरेदी करताना गरजेनुसार आरोग्य सुविधा उपकरणे खरेदीवर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.
   येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन समिती निधी खर्चाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एस. राममुर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया,  जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, उपवसंरक्षक अक्षय गजभिये, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते,आदी उपस्थित होते.
   पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून नवीन पायाभूत सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काळात नवीन संकल्पना आणि योजनांना प्राधान्याने निधी देण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी पांदण रस्यांर्चे महत्व आहे. त्यामुळे पांदण रस्यांन्साठी येत्या वर्षात निधी देण्यात येईल. पांदण रस्यांंकसोबत ग्रामीण रस्यांल्साठी निधी उपलब्ध करून देण्यात येतील. लघु सिंचन योजनेतील प्रकल्पांच्या भूसंपादनांचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे यासाठी निधी देण्यात येईल. भूसंपादनासाठी उपलब्ध करून दिलेला निधी तात्काळ वितरीत करण्यात यावा. कोविडच्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर देण्यात यावा. कोविडच्या बदल्या स्थितीनुसार ओमॅक्रॉनची चाचणी जिल्ह्यात होणे गरजेचे आहे. येत्या काळात ओमॅक्रॉनचा प्रसार कशा प्रकारे होते, हे पाहून आरोग्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. जिल्हास्तरावर मोठ्या शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी लागणारी उपकरणे जिल्हा नियोजनच्या निधीमधून करण्यात यावे. विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत, यासाठीही प्रयत्न करावा. तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचा लाभ अनुसूचित जमातींच्या नागरिकांनी घ्यावा, यासाठी प्रयत्न करावे.   
वाचन संस्कृती रूजविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशिल आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्हा नियोजनमधून गाव तेथे वाचनालय ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक आणि युवकांना स्पर्धा परिक्षांची पुस्तके ठेवण्यात येतील. याचा उपयोग गावातील नागरिक करू शकतील. येत्या वर्षात जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीसाठी नियम आखण्यात आले आहे. आय पास प्रणाली उपयोगात आणण्यासोबत ज्या विभागांना निधी उपलब्ध करण्यात आला आहे, त्यांच्यावर शासन निर्णय उपलब्ध करून घेणे, आय पास प्रणालीवर संबंधित सर्व माहिती अपलोड करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. येत्या वर्षात राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठीचे प्रस्ताव तातडीने सादर करावे. जेणेकरून विभागस्तरावरील बेठकीत जिल्ह्यासाठी जादा निधी मान्य करून घेता येणे शक्य होईल, असेही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी सांगितले.
          आरोग्य सेवेचा आढावा
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी ऑक्सीजनची स्थिती, खाटांची संख्या, खाटांचे नियोजन, औषधी साठा आदी बाबत माहिती दिली.  लसीकरण आणि निर्बंध पाळण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, तसेच निर्बंध पाळत नसलेल्या नागरिक आणि कार्यक्रमावर कार्यवाही करावी. या केलेल्या कार्यवाहीला प्रसिद्धी द्यावी. नागरिकांना कार्यवाहीचा धाक बसावा यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी थडक कार्यवाही करावी. कार्यवाही अभावी नागरिकांकडून निर्बंध पालन होत नसल्यास रुग्णांची संख्या वाढून आरोग्य सुविधावर त्याला त्याचा ताण येईल. ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी स्थानिकस्तरावर यंत्रणा निर्माण करावी. त्यामुळे उपचार तातडीने होण्यास मदत मिळेल. जिल्ह्यात लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणाची गती वाढवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. १५ ते १८ वयोगटातील लसीकरण तसेच बुस्टर डोजचे नियोजन करण्यात यावे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे निर्देशही श्री. शिंगणे यांनी यावेळी दिले.

Monday 27 December 2021

DIO BULDANA NEWS 27.12.2021,1

जुन्या वाहनांच्या नोंदणीचे नुतनीकरण व थकीत पर्यावरण कर भरावा • उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आवाहन बुलडाणा,(जिमाका) दि.27 : ज्या खाजगी संवर्गातील दुचाकी, चारचाकी, तीन चाकी वाहनांची वयोमर्यादा नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष झालेली आहे. अशा वाहनांची नोंदणी 15 वर्षानंतर विधी ग्राह्य नाही. वाहनांच्या नोंदणीचे नुतनीकरण मोटार वाहन नियम 1989 अन्वये अनिवार्य आहे. अन्यथा विधीग्राह्यता संपलेल्या वाहनांवर कार्यालयाचे तपासणी पथकामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच ज्या खाजगी वाहनांना नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष पूर्ण झालेली आहे व परिवहन संवर्गातील मालवाहतूक करणारे लोडींग ॲटो, टेम्पो, ट्रक, बसेस यांना वयोमर्यादा 8 वर्ष पूर्ण झाली आहे. अशा वाहनांना पर्यावरण कर भरणे अनिवार्य आहे. विहीत कालावधीत पर्यावरण कर भरणा न केल्यास 2 टक्के प्रती महिना व्याज आकारण्यात येते. ज्या वाहनांचा पर्यावरण कर थकीत आहे, अशा वाहन धारकांनी तातडीने थकीत कराचा भरणा करून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे भरारी पथकाद्वारे होणारी कार्यवाही टाळावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. ***** शेतकरी प्रशिक्षण प्रक्षेत्र भेटीसाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावे बुलडाणा,(जिमाका) दि.27 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमातंर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावे. फलोत्पादन तसेच कृषि क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या संशोधन संस्था, भारतीय अनुसंधान परीषदे अंतर्गत संशोधन संस्था, कृषि विज्ञान केंद्र पुणे, नगर व सोलापूर येथे कार्यरत आहे. फलोत्पादन व प्रक्रिया क्षेत्रात काम करणारे शेतकरी अभ्यास दौरा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. पाच दिवसीय प्रशिक्षण दौऱ्यासाठी शासनाच्यावतीने अनुदानावर सहलीसाठी इच्छूक शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावे. प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत राबविलेल्या उपक्रमाची पाहणी करून शेती क्षेत्रात उत्पन्न वाढीच्या संधीचा अभ्यास शेतकऱ्यांना करता येणार आहे. फळबाग लागवड, कांदाचाळ, संरक्षीत शेती, काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया याबाबत लाभ घेतलेल्या तसेच लाभ घेवू इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डांबरे यांनी केले आहे. अर्जदारासाठी अटी : प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे निवड करण्यात येईल, शेतकऱ्याच्या नावे 7/12 व नमुना 8 अ असावा, वयोमर्यादा 18 ते 45 असावी, आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स असावी, पासपोर्ट आकराचा एक फोटो असावा. ******
जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन कार्यशाळा उत्साहात बुलडाणा,(जिमाका) दि.27 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात 24 डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिन कार्यशाळा उत्साहात पार पडली. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमातंर्गत अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्काची जाणीव, माहिती होण्यासाठी अल्पसंख्यांक हक्क दिन कार्यशाळेचे कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी जि.प बांधकाम सभापती रियाजखाँ पठाण, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, श्री. चोपडे आदी उपस्थित होते. तसेच अल्पसंख्यांक समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिक, उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ॲड वसीम कुरेशी यांनी पीपीटीद्वारे अल्संख्यांक समाजाच्या विकासासाठी असणाऱ्य योजनांची माहिती सादर केली. प्रास्ताविक सहा जिल्हा नियोजन अधिकारी मोनिका रोकडे यांनी केले. संचलन नायब तहसिलदार अनंता पाटील यांनी तर आभार अधिक्षक श्रीमती शामला खोत यांनी मानले. ***** कॅच द रेन पोस्टरचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन बुलडाणा,(जिमाका) दि.27 : भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय व युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा कॅच द रेन अभियान जिल्हयात राबविण्यात येत आहे. कॅच द रेन अभियाना संदर्भातील जनजागृती पोस्टर्स चे विमोचन जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांच्याहस्ते 24 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, नेहरु युवा केंद्राचे लेखापाल व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक गणेश सुर्यवंशी उपस्थित होते. या कॅच द रेन अभियानाच्या माध्यमातून पावसाचे पाणी जतन करण्याबाबत नेहरु युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा स्वयंसेवक व युवा मंडळाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती अजयसिंग राजपूत यांनी यावेळी दिली. ******** जिल्हास्तर युवा महोत्सवाचे दि. 31 डिसेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने आयोजन बुलडाणा,(जिमाका) दि.27 : राज्याचे युवा धोरण 2012 नुसार युवकांच्या विविध कला गुणांना वाव देवुन, त्यांच्यातील सुप्त कला गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातुन प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा दरवर्षी उपलब्ध करुन दिली जात असते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, बुलडाणा यांचे विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 31 डिसेंबर 2021 रोजी आभासी पध्दतीने (ऑनलाईन) करण्यात आले आहे. सदर युवा महोत्सव मध्ये लोकगीत व लोकनृत्य या दोन कलांचा समावेश राहणार असुन लोकगीत साठी साथसंगत देणाऱ्यासह जास्तीत जास्त दहा स्पर्धक व लोकनृत्य या स्पर्धेमध्ये वीस स्पर्धक सहभागी होऊ शकतील. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होणारे स्पर्धक व साथसंगत देणाऱ्याचे वय हे 15 ते 29 या वयोगटात असणे आवश्यक आहे. लोकनृत्य सादर करणाऱ्या संघाने पुर्वाध्वनीमुद्रीत टेप अथवा रेकॉर्डींगला परवानगी दिली जाणार नाही. तसेच लोकगीत सादर करणाऱ्या संघाचे गीत व लोकनृत्य चित्रपटबाह्य असावे. स्पर्धेसाठी प्रवेशिका दि.30 डिसेंबर 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे सादर करावी. त्यानंतर येणाऱ्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही. वेळेवर कोणत्याही संघास व कलाकारास स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. बाबनिहाय प्रवेश अर्जानुसार स्पर्धकांची वेळ निश्चीत करुन त्या-त्या स्पर्धकांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात येतील. तसेच ज्या स्पर्धकांचे प्रवेश अर्ज प्राप्त होतील, त्यांना लिंकद्वारे कळविण्यात येईल. त्यानुसार ऑनलाईन / व्हर्च्युअल पध्दतीने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येवुन प्रथम क्रमांकाचा स्पर्धक विभागीय युवा महोत्सवाकरीता पात्र होईल. सहभागी कलावंत (स्पर्धक) यांनी आपले प्रवेश अर्ज, मोबाईल नंबर, पत्ता, संस्थेचे नांव, इ. सह या कार्यालयामध्ये नोंदणी करावी. त्यानंतरच कार्यक्रमाची रुपरेषा संबंधितांना कळविण्यात येईल. देशात कोविड-19 महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार होऊन एकत्रीकरण करण्यास मनाई आहे. त्यानुसार जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे. ********* --

DIO BULDANA NEWS 27.12.2021

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.पंजाबराव देशमुख यांना अभिवादन बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात भाऊसाहेब ऊर्फ डॉ. पंजाबराव देशमुख यांना 27 डिसेंबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते व अन्य कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. ********* शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता मिळणार 50 टक्के अनुदान · उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नवीन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान · जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचे लाभ घेण्याचे आवाहन बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : सन 2011-22 या वर्षापासून केंद्र शासनाने पशुसंवर्धन विभागाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजूरी दिली आहे. त्यानुसार या योजनेतंर्गत शेळी, मेंढी, कुक्कुट व वराह पालनाकरीता 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानातंर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादनकरीता सुद्धा 50 टक्के अनुदान मिळणार आहे. अनुदानाची अधिकतम मर्यादा शेळी – मेंढी पालनाकरीता 50 लक्ष रूपये, कुक्कुट पालनाकरीता 25 लक्ष रूपये, वराह पालनाकरीता 30 लक्ष रूपये आणि पशुखाद्य, वैरण विकासासाठी 50 लक्ष रूपये आहे. प्रकल्पाकरीता स्वहिस्स्सा व्यतिरिक्त उर्वरित आवश्यक निधी बँकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करून घ्यावयाचा आहे. सदर योजनेचा लाभ व्यक्तीगत, व्यावसायिक, स्वयं सहायता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेली कंपनी, सहकारी दुध उत्पादक संस्था, सह जोखिम गट, सहकारी संस्था, स्टार्टअप ग्रुप आदी घेवू शकणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल, पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवाशी पुरावा, छायाचित्र, बँकेचा रद्द केलेला चेक आदी ऑनलाईन अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ, आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास सादर करावे. या अभियानाच्या सर्व मार्गदर्शक सुचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://www.nlm.udyammitra.in यावर उपलब्ध आहे. योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. तरी सदर योजनेचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ए बी लोणे यांनी केले आहे. ****** उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर • जानेवारी ते जुलै 2022 दरम्यानचा कार्यक्रम बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : माहे जानेवारी ते जुलै 2022 दरम्यान राबविण्यात येणारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शिबिराच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक व सहायक रोखपाल हजर राहणार आहेत. शिबिर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे – जानेवारी 2022 मध्ये : जळगाव जामोद 3 जानेवारी, शेगाव 5 व 24, मेहकर 7 व 17 , खामगांव 10 व 28, चिखली 14, नांदुरा 20, मलकापूर 11 व 25, सिंदखेड राजा 21, लोणार 19 व देऊळगाव राजा येथे 17 जानेवारी रोजी होणार आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये : जळगाव जामोद 3 फेब्रुवारी, शेगाव 4 व 23, मेहकर 7 व 25, खामगांव 9 व 28, चिखली 14, नांदुरा 21, मलकापूर 11 व 24, सिंदखेड राजा 22, लोणार 18 व देऊळगाव राजा 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मार्च 2022 मध्ये : जळगाव जामोद 2 मार्च, शेगाव 4 व 23, मेहकर 7 व 28, खामगांव 9 व 30, चिखली 14, नांदुरा 21, मलकापूर 11 व 25, सिंदखेड राजा 22, लोणार 17 व देऊळगाव राजा 16 मार्च रोजी होणार आहे. एप्रिल 2022 मध्ये : जळगाव जामोद 4 एप्रिल, शेगाव 6 व 26, मेहकर 7 व 27, खामगांव 8 व 29, चिखली 13, नांदुरा 21, मलकापूर 11 व 25, सिंदखेड राजा 22, लोणार 19 व देऊळगाव राजा 18 एप्रिल रोजी होणार आहे. मे 2022 मध्ये : जळगाव जामोद 4 मे, शेगाव 6 व 26, मेहकर 9 व 27, खामगांव 11 व 30, चिखली 17, नांदुरा 20, मलकापूर 13 व 25, सिंदखेड राजा 23, लोणार 19 व देऊळगाव राजा 18 मे रोजी होणार आहे. जुन 2022 मध्ये : जळगाव जामोद 3 जुन, शेगाव 6 व 27, मेहकर 8 व 28, खामगांव 10 व 30, चिखली 15, नांदुरा 22, मलकापूर 13 व 24, सिंदखेड राजा 23, लोणार 20 व देऊळगाव राजा 17 मे रोजी होणार आहे. याबाबत नागरिकांनी याची नोंद घ्यावी. ज्या शिबिराच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी शिबीर कार्यालय घेण्यात येणार आहे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी केले आहे. ******

Friday 24 December 2021

DIO BULDANA NEWS 24.12.2021

कोविडच्या पार्श्वभूमीवर कलाकार व संस्था यांना मिळणार आर्थिक मदत संबंधित तहसिलदारामार्फत अर्ज सादर करावे बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : कोविड-19 च्या पार्क्ष्वभुमिवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकार/ संस्था यांना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर अर्थसहाय्य एकरकमी एकदाच पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यास्तव सदर प्रयोगात्मक क्षेत्रातील एकल कलावंत यांनी परिशिष्ट-ब-1 एकल कलाकार (वैयक्तीक) अर्ज नमुन्यात वृत्त प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसाच्या आत संबंधीत तालुक्यातील तहसिलदारामार्फत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे मार्फत करण्यात योत आहे. यासाठी अर्जदाराने लाभार्थी कलाकाराचे नाव, पत्ता, जन्म दिनांक, संपर्क क्रमांक, राज्यातील वास्तव्य, आधार कार्ड, लाभार्थी कलाकाराचा बँक खात्याचा तपशिल व खाते क्रमांक, कलेच्या क्षेत्रात किती वर्षापासून कार्यरत आहे, लाभार्थी कलाकाराचे वार्षिक उत्पन्न आदी अर्जामध्ये देणे आवश्यक आहे. अर्जासोबत विहीत नमुन्यातील अर्ज, महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तव्याचा रहीवासी दाखला, (स्थानिक स्वराज्य संस्थेचाही दाखला ग्राह्य) तहसिलदारांकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला, कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, आधार कार्ड व बँक खाते तपशिल, शिधापत्रीका सत्यप्रत पात्रता आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील प्रयोगात्मक कलेतील केवळ गुजराण असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलाकार असावा, महाराष्ट्र 15 वर्ष वास्तव्य असलेला असावा, कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असलेला असावा, वार्षिक उत्पन्न 48 हजार रूपयांच्या कमाल मर्यादेत असावे, केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतुन मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तीक शासकीय अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. वर्तमानपत्रात वृत्त प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसात अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे. 00000000 विद्यार्थ्यांच्या भोजन, निवासाचा खर्च शासन उचलणार • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना • अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योजना बुलडाणा, (जिमाका) दि. 24: अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भेजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: खर्च करून घ्याव्या लागतात. महाविद्यालयांची संख्या व तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नाही. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात मर्यादा येतात. त्यसाठी राज्य शासनाने अनूसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेला विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही वार्षिक रक्कम असणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच बुलडाणा नगर पालिका हद्दीपासून 5 कि.मी च्या परीसरात असलेली महाविद्यालये किंवा शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. कोविड च्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 व 2021-22 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्यानुसार सन 2020-21 व 2021-22 या कालावधीत पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज महाविद्यालयामार्फत 31 डिसेंबर 2021 पूर्वी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास सादर करावे, असे आवाहन असे आवाहन सहायक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी केले आहे. ***********
ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना तपासून घ्याव्यात - जिल्हाधिकारी एस रामामूर्ती राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम बुलडाणा, (जिमाका) दि. 24: ग्राहकांनी कुठलीही वस्तू घेताना सुरूवातीला तपासून घ्याव्यात. कुठलीही वस्तू भेसळ विरहीत असल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्याला अहितकारक असलेल्या वस्तू खरेदी करू नये. कुठेही फसवणूक झाल्यास संबंधित पोलीस स्टेशन अथवा विभागाला तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज केले. स्थानिक तहसिल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी सहायक पुरवठा अधिकारी व्ही डी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. ताथोड, जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष डी. डी. ढवळे आदी उपस्थित होते. यावेळी सहायक पुरवठा अधिकारी श्री. पाटील यांनी ग्राहकांनी कुठली वस्तू घेताना ती कशाप्रकारे तपासावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच श्री. ढवळे यांनी ग्राहकांची फसवणूक झाल्यास तक्रार कुठे दाखल करावी, याबाबत संबोधीत केले. प्रास्ताविक पुरवठा निरीक्षक प्रशांत खैरनार यांनी केले, तर संचलन किसन केने यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पुरवठा कार्यालय व तहसिल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रामुख्याने महसूल सहायक देवानंद चाळगे, गजानन कोळकर यांनी केले. ********
गावठाणच्या ड्रोन सर्वेक्षणाला आजपासून सुरूवात बुलडाणा, (जिमाका) दि. 24: भूमि अभिलेखच्यावतीने भारतीय सर्वेक्षण विभागाने आजपासून ड्रोनद्वारे गावठाण भूमापनाच्या सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात आली. बुलडाणा तालुक्यातील सुंदरखेड, माळविहीर, सागवण, सावळा, बिरसिंगपूर या गावांमधील गावठाणांचे ड्रोन सर्वेक्षण आज करण्यात आले. या वेळी उपअधिक्षक भूमी अभिलेख व्ही. ए सवडतकर, भारतीय सर्वेक्षण विभागाचे अधिकारी हणमंत हब्बलकर, प्रकाशकुमार, निमतानदार व्ही. आर झनके, ए. आर सोनटक्के, छाननी लिपीक ए.एस जगदाळे, एस एम क्यावल, भूमापक डी. जी नंदरेकर आदी उपस्थित होते. ड्रोन सर्वेमुळे मिळकतीचे वाद मिळणार असून प्रत्येक मिळकतीचा नकाशा तयार होणार आहे. सरकारी जागा गावात किती आहेत याची अचूक माहिती मिळणार आहे. तसेच रस्ता समजणार असून रस्त्याचे वाद मिटणार आहे. या सर्वांमुळे अतिक्रमणाला आळा बसणार आहे. ***** नाताळ सण साधे पणाने साजरा करावा *जिल्हा प्रशासनाचे आवाहन *मार्गदर्शक सूचना जारी बुलडाणा, दि. 24 (जिमाका) : कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गानाचा नविन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन बांधवांनी नाताळचा सण 25 डिसेंबर रोजी अत्यंत साधेपणाने साजरा करावा. याबाबत शासनाने मार्गदर्शक सुचना जारी केल्यसा आहेत. त्यानुसार ख्रिश्चन बांधवांनी नाताळचा सण आरोग्याच्या दृष्टीकोनातून पुर्णत: खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये उपलब्ध आसन क्षमतेच्या 50 टक्के लोकांची उपस्थिती असण्यास परवानगी असेल. चर्चमध्ये गर्दी होणार नाही व सामाजिक सुरक्षा अंतराचे पालन होईल याची काळजी घ्यावी. तसेच मास्क व सॅनीटायझरचा उपयोगावर विशेष लक्ष द्यावे. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. नाताळ सणाच्या दरम्यान चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अश्या काही वस्तू ठेवल्या जातात. त्या पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. त्या ठिकाणी देखील शारिरीक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir) गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा (Choirsters) समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करुन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. चर्चच्या बाहेर अथवा परीसरात दुकाने लावू नये. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित करणारे कार्यक्रमांचे आयोजन करू नये. तरी ख्रिश्चन बांधवांनी नाताळचा सण साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी यांनी केले आहे.

Thursday 23 December 2021

DIO BULDANA NEWS 23.12.2021

शेतकरी कर्जमुक्ती योजनेने फुलविले शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य • महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना • 1 लक्ष 72 हजार 532 खातेदार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करण्यासाठी राज्य शासन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवित आहे. योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांक हा मुलभूत घटक आहे. योजनेमुळे पीक कर्जाचा डोंगर डोक्यावर असलेल्या शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. योजनेच्या अंमलबजावणीमुळे कर्जाचा भार डोक्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी जिल्हयात प्रभावीरित्या करण्यात आली. योजनेनुसार 1 एप्रिल 2015 पासून ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत व्याजासह मुद्दल असलेले 2 लाख रूपये पिक कर्ज माफ करण्यात आले आहे. योजनेतंर्गत जिल्ह्यात 1 लक्ष 72 हजार 532 खातेधारक लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यात 1139.77 कोटी रूपये त्यांच्या जमा करण्यात आले आहे. यामुळे बळीराजावरील कर्जाचे ओझे निश्चितच उतरले आहे. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी केवळ आधार क्रमांक हा मुलभूत घटक मानण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे अधिकचे कागदपत्रे जमा न करता सहजरित्या या योजनेचा लाभ मिळाला. आपल्या जवळच्या महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रावर जावून शेतकऱ्यांना बँकेत कर्जमूक्ती लाभार्थ्यांच्या यादीत नाव असल्यास आधार प्रमाणीकरण करावयाचे होते. अशाप्रकारे जिल्ह्यात 1 लक्ष 76 हजार 033 शेतकऱ्यांनी आपली खाती आधार प्रमाणीकरण केली. त्यापैकी 1 लक्ष 72 हजार 532 कर्जदार खातेधारक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. त्यानुसार आधार प्रमाणीकरण केलेल्या खात्यांमध्ये कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. उर्वरित खात्यांमध्ये कर्जमुक्तीचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे उतरवून मागील दोन वर्षात शासनाने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणण्यासाठी महत्तम प्रयत्न केले आहे. त्यामुळेच आज बळीराज्याच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे हलके होत बळीराजा आपल्या शेतीतून अधिकचे उत्पादन घेण्यासाठी सज्ज झाला आहे. *********** विविध खाजगी क्रीडा संस्था अथवा मंडळांनी अनिवासी क्रीडा प्रबोधिनी करीता प्रस्ताव सादर करावेत बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी निवासी प्रबोधिनीची योजना कार्यान्वीत झालेली आहे. ज्या ठिकाणी निवासी क्रीडा प्रबोधिनीची सोय उपलब्ध नाही किंवा विशिष्ट खेळांसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. अशा ठिकाणी पुढील विहीत अटी व सोयी सुविधा उपलब्ध असणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना अनिवासी क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यास परवानगी देण्यात येईल. सदरची संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अथवा मुंबई धर्मादाय आयुक्त अधिनियम 1960 च्या कायद्यानुसार नोंदणीकृत असावी. सदरच्या संस्थेने २ ते ५ वर्षे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असावे. संस्थेची आर्थिक स्थिती उत्तम असावी त्या पृष्ठ्यर्थ मागील दोन वर्षाचे ताळेबंदपत्रक सनदी लेखापालाने प्राधिकृत केले असले पाहिजे. ज्या संस्थेने ज्या खेळासाठी अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची मान्यता मागीतले आहे. त्याच्याकडे त्या खेळासाठीच्या सर्व पायाभूत व इतर सोयी सुविधा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे व या सोयी सुविधा त्या संस्थेकडे असल्याची खातरजमा संबंधित विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा प्रमाणित करतील. एका खेळासाठी एकापेक्षा जास्त संस्थांची मागणी आल्यास गुणवत्तेनुसार या प्रयोजनार्थ नेमलेली समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहील. अधिक माहितीकरीता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दि.21 सप्टेंबर, 2013 रोजीच्या शासन निर्णयाचे अवलोकन करण्यात यावे. बुलडाणा जिल्ह्यातील आर्थिक सक्षम, सर्व क्रीडा सुविधा उपलब्ध असलेल्या, क्रीडा क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबविणाऱ्या तसेच प्राविण्यप्राप्त खेळाडू घडविणाऱ्या खाजगी क्रीडा संस्था व क्रीडा मंडळे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध असलेला फॉर्म घेऊन आपल्या क्रीडा मंडळ / क्रीडा संस्थेची सविस्तर माहिती भरुन दिनांक 03 जानेवारी, 2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे जमा करावी असे गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे. ****** प्रलंबित बदल अर्जांच्या निपटाऱ्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बुलडाणा येथे अवादांकीत प्रलंबित बदल अर्जांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी 13 ते 24 डिसेंबर दरम्यान विशेष मोहिम राबविण्यता आली. या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद बघता सदर मोहिम 30 डिसेंबर 2021 पर्यंत राबविण्यात येणार आहे. विशेष मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तसेच विश्वस्तांनी आपले प्रलंबित अर्जांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन सहायक धर्मदाय आयुक्त प्र. नि आवळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. *****

Wednesday 22 December 2021

DIO BULDANA NEWS 22.12.2021

नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी… 1 लक्ष 76 हजार 337 शेतकऱ्यांना 102.43 कोटी रूपयांच्या मदतीचे वाटप बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामाच्या सुरूवातीला अवर्षण नंतर अतिवृष्टीसारख्या संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. नैसर्गिक आपत्तीच्या चक्रव्यूहातून शेतकऱ्यांची यावर्षीसुद्धा सुटका होताना दिसली नाही. एक ना अनेक संकटांचे दुष्टचक्र शेतकऱ्यांच्या मागे सुरूच होते. अशा हवालदील परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे शासन उभे राहीले. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या संकटसमयी शासनाने भक्कम मदत दिली. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा केली. जिल्ह्यात यावर्षी 1 लक्ष 76 हजार 337 शेतकऱ्यांना 102.43 कोटी रूपयांच्या मदतीचे वाटप शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये माहे मे 2021 मध्ये तौक्ते नावाचे चक्रीवादळ आले. त्यामुळे 20.60 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले. या नुकसानीपोटी 24 शेतकऱ्यांना 3 लक्ष 62 हजार 900 रूपयांच्या आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे माहे जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेलेल्या बाधितांनाही वाटप करण्यात आले आहे. यामध्ये 287.95 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. या नुकसानीपोटी 439 शेतकऱ्यांना 1 कोटी 7 लक्ष 99 हजार रूपये मदत देण्यात आली. तसेच याच महिन्यात अतिवृष्टीमुळे 548.76 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. या नुकसानीपोटी 1710 शेतकऱ्यांना 37 लक्ष रूपये वितरीत करण्यात आले. तसेच जिल्ह्यात वर्षाच्या सुरूवातीला जानेवारी व फेब्रुवारी 2021 मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे 22178.75 हेक्टरवर शेतीपिके बाधीत झाली. त्यामुळे या 28786 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 18 कोटी 46 लक्ष 90 हजार 570 रकमेचे वाटप थेट बँक खात्यात करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील काही भागात मार्च, एप्रिल, मे मध्ये अवेळी पाऊस व गारपिट झाली होती. त्यामुळे 12735 शेतकऱ्यांचे 8033.59 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले. या बाधीत शेतकऱ्यांना 7 कोटी 97 लक्ष 80 हजार 777 रूपये वितरीत करण्यात आले. तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांचा हातसा घास गेला. शेतकऱ्यांनी पिके पावसाने सडवून टाकली. अशा परिस्थितीत जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन धावून आले. या अतिवृष्टीमुळे 133755.82 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचा फटका 132643 शेतकऱ्यांना बसला होता, त्यांना शासनाने नुकसानीपोटी 74 कोटी 50 लक्ष 38 हजार 176 रूपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. अशाप्रकारे नुकसानीच्या काळात शासनाने संवेदनशील भूमिका घेत जिल्ह्यातील 1 लक्ष 76 हजार 337 शेतकऱ्यांना एकूण 102 कोटी 43 लक्ष 71 हजार 423 रूपये मदतीचे वाटप केले. यामध्ये अजूनही शेतकऱ्यांना मदतीच्या वाटपाचे काम सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या काळात जिल्ह्यात 164825.47 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधीत झाली होती. शासनाने दिलेल्या मदतीमुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. *********** कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 04 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’ एका रूग्णाला मिळाली सुट्टी बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हा वासियांना आज 43 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 04 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 426 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 426 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 32 व रॅपिड टेस्टमधील 394 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 426 अहवाल निगेटीव्ह आहेत. त्याचप्रमाणे आज उपचारांती एक रूग्ण कोरोना मुक्त झाला असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत 744207 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86981 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86981 आहे. आज रोजी 348 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 744207 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87660 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86981 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 04 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ***** जिल्ह्यात नाफेडतर्फे 10 तुर खरेदी केंद्रांना मान्यता, नाव नोंदणी सुरू • शेतकऱ्यांनी संबंधित तूर खरेदी केंद्रावर नोंदणी करावी बुलडाणा, (जिमाका) दि. 22: जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्यावतीने जिल्ह्यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या बुलडाणा, दे.राजा, लोणार, मेहकर, शेगांव, संग्रामपूर, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर केंद्र साखरखेर्डा, ता. सिं.राजा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली केंद्र उंद्री, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी दे.राजा केंद्र सिं.राजा असे 10 तूर खरेदी केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रावर तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झालेली आहे. सदर केद्रांवर शेतकऱ्यांनी आपली तूर विक्री करण्याकरीता पुर्वी नोंदणी करुन घ्यावी. नोंदणी करण्याकरीता चालू वर्षाचा ऑनलाईन 7/12, पिकपेरा, आधारकार्ड, आएएफसी कोडसह आधार लिंक केलेली बँक पासबुक झेरॉक्स, तसेच मोबाईल क्रमांकासह कागदपत्रे नोंदणीवेळी सादर करावी. नोंदणी झाल्यानंतर विक्री करण्याकरीता तूर केव्हा आणायची या बाबत नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस करण्यात येईल. एसएमएस आल्यानंतर तूर केंद्रावर विक्री करण्याकरीता घेऊन यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी केले आहे. ************ मका, ज्वारी व बाजरीच्या शासकीय खेदीसाठी नाव नोंदणीस मुदतवाढ • 31 डिसेंबर 2021 पर्यंत करावी नोंदणी बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : शासनाच्या आदेशान्वये पणन हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाची आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हमी दराने मका, ज्वारी, बाजरी या शेतमालाची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी जिल्ह्यात 14 खरेदी केंद्रांना मान्यताही देण्यात दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात मका, ज्वारी व बाजरी खरेदीसाठी नाव नोंदण्याकरीता 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मुदत होती. मात्र नाव नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. हमी दराने मका शेतमालासाठी 3953, ज्वारीकरीता 3653 असे एकूण 7606 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. जिल्ह्यात तालुका खरेदी विक्री संघ बुलडाणा, दे. राजा, खामगांव, लोणार, मेहकर, संग्रामपूर, मलकापूर, जळगांव जामोद व शेगांव, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी अंजनी खु केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, मा. जिजाऊ कृषि विकास शेतकरी कंपनी नारायणखेड केंद्र सिं.राजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी नांदुरा केंद्र वडी ता. नांदुरा या खरेदी केंद्रांना मान्यता मिळाली आहे. या ठिकाणी ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी आधार कार्ड, सन 2021-22 चा पीक पेरा, बँक पासबुक झेरॉक्स, जनधन योजनेचे बँक खाते असल्यास देण्यात येवू नये, चालु वर्षाच सात बारा अशा संपूर्ण कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील संस्थेशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे. ****** 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने 24 डिसेंबर रोजी जिल्हा पुरवठा कार्यालय व तहसिल कार्यालय, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम तहसिल कार्यालय, बुलडाणा येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी केंद्र शासनाने कन्झ्युमर नो युवर राईट्स अशी संकल्पना निश्चित केलेली आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे. ****** --

Tuesday 21 December 2021

DIO BULDANA NEWS 21.12.21

मोताळा व संग्रामपूर नगर पंचायत निवडणूकीसाठी शांततेत मतदान मोताळा अंदाजे 79, तर संग्रामपूरमध्ये 83.45 टक्के मतदान बुलडाणा, (जिमाका) दि. 21: जिल्ह्यात आज मोताळा व संग्रामपूर नगर पंचायत निवडणूकीसाठी मतदान पार पडले. या दोन्ही नगर पंचायतमध्ये सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला शांततेत सुरूवात झाली. मतदानाला मतदारांनी सकाळपासूनच उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मतदानासाठी मोताळा नगर पंचायतमध्ये 13 व संग्रामपूर नगर पंचायतमध्ये 13 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. कुठेही मतदान प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही. सदर निवडणूक संग्रामपूर व मोताळा नगरपंचायतमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या प्रत्येकी 4 राखीव जागा वगळता अन्य जागांसाठी घेण्यात आली. संग्रामपूर नगर पंचायतसाठी 13 व मोताळा नगर पंचायतकरीता 13 जागांवर निवडणूक झाली. या मतदानाची मतमोजणी 19 जानेवारी 2022 रोजी तहसिल कार्यालयातील मतमोजणी केंद्रावर होणार आहे, अशी माहिती नगर प्रशासन विभागाकडून प्राप्त झाली आहे. मोताळा नगर पंचायतमध्ये अंदाजे 79 टक्के तर संग्रामपूर नगर पंचायतमध्ये 83.45 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. संग्रामपूर नगर पंचायत निवडणूकीसाठी स्त्री मतदार 1965 व पुरूष मतदार 2101 असे एकूण 4066 मतदार होते, त्यापैकी 1798 पुरूष मतदारांनी व 1595 स्त्री मतदार, असे एकूण 3393 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला.तसेच मोताळा नगर पंचायत निवडणूकीसाठी स्त्री मतदार 2968 तर पुरूष 3290 असे एकूण 6258 मतदार होते. त्यापैकी साडेतीन वाजेपर्यंत स्त्री 2141 व पुरूष 2396 असे एकूण 4537 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. *********** कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 05 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’ बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हा वासियांना आज 42 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 05 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 315 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 315 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 125 व रॅपिड टेस्टमधील 190 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 315 अहवाल निगेटीव्ह आहेत. त्याचप्रमाणे आज उपचारांती दोन रूग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत 743781 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86980 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86980 आहे. आज रोजी 351 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 743781 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87660 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86980 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 05 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. *****

Saturday 18 December 2021

DIO BULDANA NEWS 18.12.2021

 जिल्ह्यात लाळ खुरकत लसीकरण मोहीम

बुलडाणा, (जिमाका) दि. १८: जिल्ह्यात  राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत लाळ खुरकत प्रतिबंधात्मक लसीकरणाची दूसरी फेरी १५ डिसेंबर २०२१ ते १४ जानेवारी २०२२ दरम्यान  राबविण्यात येत आहे. जिल्हयासाठी २ लक्ष ९५ हजार ७०० लस मात्रा पुरवठा झालेला आहे. या बाबत शेतकऱ्यांनी अथवा पशुपालकांनी आपल्या जनावरांना लाळ खुरकत लसीकरण करुन घ्यावे,  असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर यांनी केले आहे.
*******

ग्रामपंचायत व नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीवर कारवाई
बुलडाणा, (जिमाका) दि. १८: राज्य उत्पादन शुल्क विभागार्फत विभागीय उप आयुक्त मोहन वर्दै  तसेच अधीक्षक श्रीमती भाग्यश्री प.जाधव यांचे मार्गदर्शनाखाली ०१ डिसेंबर २०२१ ते १८ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये एकूण ४७ गुन्हे नोंदविण्यात आले असून ४३ वारस गुन्हे, ४ बेवारस गुन्हे नोंदवुन ४३ आरोपींना अटक करण्यात आली.  तसेच २ वाहनासह एकुण ५ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यात दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी होणा-या ग्रामपंचायत व नगर पंचायतीच्या निवड णुकांच्या पार्श्वभुमीवर प्र.निरीक्षक आर.आर.उरकुडे, व्हि.आर.बरडे, दुय्यम निरीक्षक एस.जी.मोरे, पी.व्ही.मुंगडे यांचे पथकाने हॉटेल शिवराणा,घुस्सर शिवार ता.मोताळा जि.बुलडाणा देशी मद्य २५.९२ लिटर व विदेशी मद्य ४०.३२ लिटर, बिअर ७०.२ लिटर असा एकुण ६३ हजार ७६०  रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
  आरोपी सावंतसिंग मदनसिंग राजपुत, रा.राणा प्रताप नगर,मलकापुर यांचेविरूध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ ई नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर कार्यवाहीत जवान आर.एच. सोभागे, पी.ई.चव्हाण, ए.पी.तिवाने, आर.ए.कुसळकर, एन. एम.सोळंकी, एम.एस.जाधव सहभागी होते. आपल्या परिसरात अशी अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास विभागास या विभागाचे टोल फी नंबर १८००८३३३३३ वर किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर माहिती कळवावी. तसेच ज्याप्रमाणे वाहन चालवितांना वाहनांचा परवाना आवश्यक आहे त्याप्रमाणे मद्य बाळगतांना,मद्य सेवण,मद्य वाहतुक करतांना या विभागाचा मद्यसेवन परवाना असणे आवश्यक आहे.तसेच अवैध ढाब्यांवर मद्यसेवन करतांना अथवा मद्यविक्री करतांना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल. 
  त्याचप्रमाणे  ९ डिसेंबर २०२१ रोजी हॉटेल निर्सगराज मौजे मलकापुर पांग्रा शिवार ता.सिंदखेडराजा  येथे दारुबंदी गुन्हयांतर्गत छापा मारला असता देशी व विदेशी मद्य आढळुन आले तसेच ग्राहकांना मद्य पुरवठा करुन बसण्या करीता जागा उपलब्ध करुन दिली.  त्यामुळे ढाबाचालक प्रविण मधुकर जाधव यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ ई व ६८ व ८४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तसेच मद्यसेवन करणारे सौरभ मधुकर मिसाळ यांचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ८४ गुन्हा नोंदविण्यत आला आहे, असे अधीक्षक श्रीमती जाधव यांनी कळविले आहे. 

Friday 17 December 2021

DIO BULDANA NEWS 17.12.2021

                      शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळ  सुरू ; अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 17: सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे मार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार  शिष्यवृत्ती  आणि राज्य शासनाची शिक्षण व परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विदयार्थ्यास विभागाच्या https:// mahadbtmahait.gov.in  या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. महाडीबीटीच्या संकेत स्थळावर ऑनलाईन भरण्याची सुविधा माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाडीबीटी संकेतस्थळ शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यंत सुरु राहणार आहे.

            सन 2021-2022 मध्ये प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावे. सन 2021-22 या  शैक्षणिक वर्षाकरीता ऑनलाईन अर्ज 14 डिसेंबर 2021 पासून सुरू झााले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2022 आहेृ तरी सर्व  पात्र विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा वेळेच्या आत लाभ घ्यावा, तसेच विशेष करून सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील विदयार्थ्यांचे अर्ज दुरूस्त करून ऑनलाईन सादर करण्यासही 31 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  जिल्हयातील  विविध  महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज दिलेल्या मुदतीपूर्वी  https:// mahadbtmahait.gov.in  या शासनाच्या महाडीबीटी संकेत स्थळावर ऑनलाइन भरावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

                                                            *****



जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात माजी सैनिकांचा मेळावा उत्साहात

  • ध्वजदिन निधी संकलनाचाही शुभारंभ

बुलडाणा, (जिमाका) दि. 17:  स्थानिक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सभागृहात माजी सैनिकांचा मेळावा व ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम 16 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून एअर कमोडोअर प्रमोद वानखडे, फ्लाईंग लेफ्टनंट रत्नाकर चरडे उपस्थित होते. तर सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान उपस्थित होते.

  यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. गोगटे यांनी शहीद जवान व माजी सैनिकांप्रती मनोगत व्यक्त केले. त्यांनी सैनिकांच्या समर्पण वृत्तीचा उल्लेख करीत सैनिकांमुळे आपण सुरक्षीत असल्याची भावना व्यक्त केली. तसेच प्रमुख पाहुण्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्‍त केले. प्रास्ताविकामध्ये सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. पडघान यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला दीपप्रज्वलन करून चिफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत व शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. तसेच शहीद / सैनिकांच्या कुटूंबियांचा सत्कार व राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या गौरव पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले.  तसेच ध्वजदिन निधी संकलन 2020 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमावेळी माजी सैनिकांच्या पाल्यांना कल्याणकारी निधी अंतर्गत आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास विरपत्नी, विरमाता, विरपिता, माजी सैनिक / विधवा पत्नी व अवलंबित अशाप्रकारे मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते. संचलन भास्कर पडघान यांनी केले.

                                                            ******

             चुकीची माहिती देवून कोविडने मृत्यू पावल्याचे अर्थसहाय्य घेतल्यास फौजदारी गुन्हा..

बुलडाणा, (जिमाका) दि. 17: मा. सर्वोच्च न्यायालयाने कोविड 19 ने मृत्यू पावलेल्या रूग्णांच्या वारसांना राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीमधून 50 हजार रूपये मदत निधी देण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत चुकीची माहिती  देवून अर्थसहाय्य घेतल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरूपाची तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

   कोविड 19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकांना 50 हजार रूपये सानुग्रह अर्थसहाय्य देण्यात येत आहे. त्यासाठी mahacovid19relief.in  या संकेतस्थळावर लॉगीन करावे. त्यासाठी या लिंकचा उपयोग करावा. मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे आधार कार्ड, मृत्यू प्रमाणपत्र, अर्जदाराचे आधार संलग्न बँक खाते क्रमांक, बँक खात्याचा रद्द केलेला धनादेश, रूग्णालयाचा तपशील, आरटीपीसीआर रिपोर्ट, सिटी स्कॅन रिपोर्ट किंवा ज्यावरून त्या व्यक्तीस कोविड 19 चे निदान झाले अशी कागदपत्रे तसेच कुटूंबातील सर्व वारसदारांचे हमीपत्र व स्वयंघोषणापत्र अपलोड करावे.

 कोविड 19 च्या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 50 हजार सानुग्रह अर्थसहाय्य शासन स्तरावरून देण्यात येणार आहे. कागदपत्रांच्या आधारे अर्जदाराला स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरून सहाय्य मिळण्याकरीता लॉगीन करता येईल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमत: मंजूर करण्यात आल्या अर्जानुसार अर्जदाराच्या आधार संलग्नीत बँक खात्यात सानुग्रह सहाय निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.

                                                                                    ******

आता घरच्या घरी मिळवा डॉक्टरांच्या उपचाराचा सल्ला..!

  • ई संजीवनी ऑनलाईन ओपीडी सेवा
  • राज्य शासनाद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धतात
  • दररोज सकाळी 9.30 ते दुपारी 1.30, दुपारी 3 ते 5 वाजेदरम्यान मिळणार सल्ला

बुलडाणा,(जिमाका) दि.17 : भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय टेलिकन्सल्टेशन सेवेद्वारे ऑनलाईन ओपीडी सेवा सुरू केली आहे. नॅशनल टेलिकन्सल्टेशन सर्विसद्वारे रूग्णांना त्यांच्या आजारावर पाहिजे असलेला सल्ला किंवा उपचाराबद्दलची माहिती रूग्णालयात न जाता घरच्या घरी मिळू शकणार आहे. त्यासाठी ई संजीवनी ऑनलाईन ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे.

   सी – डॅक या संस्थेकडून https://esanjeevaniopd.in हे पोर्टल व esanjeevaniopd हे मोबाईल वरील ॲप विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर किंवा ॲपचा उपयोग करून ऑनलाईन उपलब्ध असलेल्या डॉक्टरांशी ऑडीओ – व्हिडीओद्वारे सल्लामसलत करून रूग्ण त्यांच्या आजारावर विनामूल्य सल्ला घेवू शकतात. रूग्णाच्या वेगवेगळ्या आजारांवर या सेवेद्वारे सल्ला दिला जातो. तसेच ई प्रेस्क्रिप्शन दिल्या जाते.

  सध्याच्या कोरोना साथरोगामध्ये ही सेवा खूप उपयोगाची ठरणार आहे. रूग्णाला रूग्णालयात न जाता घरच्या घरी त्यांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांच्या सल्ला घेता येणार आहे. शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे सदर सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते सकाळी 9.30 ते दुपारी 1.30, दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत ई संजीवनी ओपीडी सेवेसाठी उपरोक्त पोर्टल व ॲपवर ऑनलाईन उपलब्ध असणार आहे.

तरी शासनाने जनतेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमाचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांनी केले आहे.

ई. संजीवनी ओपीडीची ठळक वैशिष्ट्ये

रूग्णाची नोंदणी, टोकन निर्मिती, रांग व्यवस्थापन, डॉक्टरांशी ऑडिओ – व्हिडीओ सल्लामसलत, ई प्रेस्क्रिप्शन, एसएमएस / ई मेल द्वारे सूचना, राज्याच्या डॉक्टरांद्वारे विनामूल्य सेवा.

*********

 


                    एकदिवसीय व्यक्तीमत्व विकास व रोजगार मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

बुलडाणा,(जिमाका) दि.17 : कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र अमरावती आणि संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय जिल्हानिहाय एकदिवसीय व्यक्तीमत्व विकास, रोजगार व स्वयंरोजेगार मार्गदर्शन कार्यशाळा  15 डिसेंबर रोजी जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा या ठिकाणी आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेचे उदघाटन संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती चे राष्ट्रीय सेवा योजनेचे  संचालक  डॉ.राजेश बुरंगे यांचेहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ.प्रशांत कोठे होते. तर प्रमुख उपस्थितीत सहायक आयुक्त, विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता

माहिती व मार्गदर्शन केंद्र, अमरावतीच्या सौ.प्रांजली बारस्कर, वाशिमचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.योगेश पोहोकार,  कला महाविद्यालयोच प्राचार्य डॉ.सुरेश बाठे होते. सर्वप्रथम मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

  प्रथम सत्रामध्ये डॉ.राजेश बुरंगे  यांनी "राष्ट्रीय सेवा योजना आणि व्यक्तीमत्व विकास या विषयावर राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत उपस्थित जिल्हयातील सर्व स्वयंसेवक युवक व युवतींना पीपीटी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण आपले व्यक्तीमत्व चांगल्या प्रकारे घडवू शकतो. या माध्यमातून समाजसेवा तसेच देशसेवा करण्याची संधी आपल्या सर्वाना मिळत आहे. याचा आपण अवश्य लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दुसऱ्या सत्रामध्ये सौ.प्रांजली बारस्कर  यांनी महास्वयंम पोर्टलवरील कौशल्य विकास व रोजगाराच्या विविध संधी" या विषयावर मार्गदर्शन केले. महास्वयंम पोर्टलवरील उपलब्ध सुविधांची माहिती सांगून उमेदवारांना या पोर्टलवर रोजगार/स्वयंरोजगाराच्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याबाबत सांगीतले. पोर्टलवर नोंदणी करून उमेदवारांना सेवायोजन कार्ड, कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार / स्वयंरोजगार कसा उपलब्ध करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.  जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील यांनी यांनी "स्वयंरोजगाराचे मार्ग व शासकीय योजना" या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तदनंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर उपस्थित राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांचे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी सांगीतले.  कार्यक्रमाच्या शेवटी कॅप्टन डॉ.प्रशांत कोठे यांनी अध्यक्षीय भाषण केले. संचालन  जिजामाता महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.ज्ञानोबा कांदे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.भरत जाधव यांनी केले. सदर कार्यक्रमाकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा येथील अधिकारी व कर्मचारी तसेच जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा येथील प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

                                                                        *******

                 जिल्ह्यातील 33 मतदान केंद्रांवर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान

  • 21 डिसेंबर रोजी होणार मतदान, 22 डिसेंबर रोजी मतमोजणी

बुलडाणा,(जिमाका) दि.17 : जिल्ह्यात 21 डिसेंबर रोजी तेराही तालुक्यात 33 मतदान केंद्रांवर ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. सदर निवडणूक 123 ग्रामपचांयतींच्या 166 रिक्त जागांसाठी घेण्यात येत आहे.  या निवडणूकीची मतमोजणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे. मतमोजणी ठिकाण व वेळेस जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 11 व ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 चे कलम 7 ई नुसार मान्यता दिली आहे. मतमोजणी सुरू होण्याची वेळ 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता असणार आहे.

 मतमोजणीचे तालुकानिहाय ठिकाण : बुलडाणा-निर्वाचन विभाग, तहसिल कार्यालय बुलडाणा, चिखली : सभागृह तहसिल कार्यालय चिखली, सिं.राजा : निर्वाचन विभाग, तहसिल कार्यालय सिं. राजा, लोणार- तहसिल कार्यालय, मेहकर: सभागृह तहसिल कार्यालय, मोताळा : नविन सभागृह तहसिल कार्यालय, खामगांव : राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह, तहसिल कार्यालय, शेगांव: तहसिल कार्यालय, संग्रामपूर : तहसिल कार्यालय, नांदुरा: पंचायत समिती  येथील कक्ष क्रमांक 1 समोरील खोली, दे. राजा : निर्वाचन विभाग, तहसिल कार्यालय, जळगांव जामोद : निर्वाचन विभाग, तहसिल कार्यालय, मलकापूर : निर्वाचन विभाग, तहसिल कार्यालय.

            तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या व रिक्त पदे : बुलडाणा-ग्रा.पं संख्या 2 व रिक्त पदे 2, चिखली: ग्रा.पं संख्या 11 व रिक्त पदे 15, दे .राजा: ग्रा.पं संख्या 5 व रिक्त पदे 6, सिं. राजा : ग्रा.पं संख्या 4 व रिक्त पदे 4, मेहकर : ग्रा.पं संख्या 17 व रिक्त पदे 32, लोणार : ग्रा.पं संख्या 8 व रिक्त पदे 8, खामगांव : ग्रा.पं संख्या 15 व रिक्त पदे 22, शेगांव: ग्रा.पं संख्या 7 व रिक्त पदे 7, जळगांव जामोद : ग्रा.पं संख्या 8 व रिक्त पदे 14, संग्रामपूर : ग्रा.पं संख्या 7 व रिक्त पदे 10, मलकापूर : ग्रा.पं संख्या 12 व रिक्त पदे 13, नांदुरा : ग्रा.पं संख्या 13 व रिक्त पदे 18, मोताळा : ग्रा.पं संख्या 14 व रिक्त पदे 15.

                                                                                                ****   

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा दौरा

बुलडाणा,(जिमाका) दि.17 : राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे व खार जमिन विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार 18 डिसेंरब रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा फर्दापूर जि. औरंगाबाद येथून मोताळाकडे प्रयाण, सकाळी 11 वा मोताळा येथे आगमन व आठवडी बाजार येथील सभेस उपस्थिती, दु 12.30 वा मोताळा येथून खुल्लोड ता. सिल्लोड जि औरंगाबाद कडे प्रयाण करतील.

                                                            ******