Friday 26 February 2021

DIO BULDANA NEWS 26.2.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 3273 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 391 पॉझिटिव्ह

  • 179 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.26: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3664 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3273 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 391 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 322 व रॅपीड टेस्टमधील 69 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1945 तर रॅपिड टेस्टमधील 1328 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3273 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर शहर : 27, मलकापूर तालुका : दाताळा 2, बेलाड 1, चिखली शहर : 16, चिखली तालुका : शिरपूर 3, कोलारा 1, शेलूद 1, मेरा खु 1, भानखेडा 1, वरखेड 1,  हातणी 2, सवणा 1, अमडापूर 2,  मालगणी 1, नायगांव 1, पळसखेड दौलत 1, खामगांव शहर : 28, खामगांव तालुका : घारोड 1, किन्ही महादेव 1, सुटाळा 1, शिर्ला नेमाने 1, घाटपुरी 2, उमरा अटाळी 1, नांदुरा शहर : 40, नांदुरा तालुका : पोटळी 1, निमखेड 1, नायगांव 1, शेलगांव मुकूंद 2, टाकरखेड 1,काटी 1, वडनेर 1, शेगांव शहर : 14, शेगांव तालुका : भोनगांव 7, माटरगांव 1, आडसूळ 1, जळगांव जामोद शहर : 8, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 4, खेर्डा 2, झाडेगांव 29, कुरणगड 1, मेहकर शहर : 11, मेहकर तालुका : हिवरा साबळे 1, दे. माळी 3, हिवरा आश्रम 3, कळमेश्वर 1, बऱ्हाई 4, दे. साकर्षा 1, शेंदला 5,  लोणार शहर: 8, लोणार तालुका : शिवनगांव 1, आरडव 4, गोत्रा 1,  बुलडाणा शहर : 51, बुलडाणा तालुका : वरवंड 1, मढ 1, पाडळी 1, मासरूळ 1, करडी 1, दुधा 1, रूईखेड 1, धामणदरी 1, येळगांव 1, गिरडा 1, सुंदरखेड 2, मोताळा शहर : 3, मोताळा तालुका : तळणी 1, बोराखेडी 3, तरोडा 3,  दे. राजा शहर : 31, दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 5, अंढेरा 1,  आळंद 1, दे. मही 2, संग्रामपूर तालुका : खिरोडा 1, पळशी झाशी 1, एकलारा 1,  सिं. राजा शहर : 6, सिं. राजा तालुका : लिंगा 1, पांगरी उगले 1, दुसरबीड 2, पिंपळखुटा 1, चिंचोली 1,   मूळ पत्ता वरूड जि. जालना 1, वळसा वडाळा ता. भोकरदन जि. जालना 1, अकोला 4, राजणी ता. जामनेर जि. जळगांव 1, आंबेजोगाई जि. बीड 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 391 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 179 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 30,  बुलडाणा : अपंग विद्यालय 15, स्त्री रूग्णालय 6, दे. राजा : 18, चिखली : 42, मलकापूर : 14, शेगांव : 11, लोणार : 6, मेहकर : 8, सिं. राजा : 9, मोताळा : 3, नांदुरा : 13,

   तसेच आजपर्यंत 130645 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 15258 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 15258 आहे. 

  आज रोजी 7957 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 130645 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 17979 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 15258 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 2529 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 192 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

***********

 

जिल्ह्यात शनिवार व रविवारला संचारबंदी

बुलडाणा,(जिमाका) दि.26: जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता यापूर्वीच नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू आहेत. मात्र शनिवार व रविवारला होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी संचारबंदीचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

  त्यानुसार जिल्ह्यात दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 व सायं 6 ते रात्री 8.30 वाजे पर्यंत नियमितपणे सुरू असतील.  या औषधी सेवा, दवाखाने, रूग्णवाहिका सेवा, एस टी वाहतूक 50 टक्के प्रवासी क्षमतेसह, माल वाहतूक, पेट्रोल पंप 24 तास सुरू असतील. टायर पंक्चरची दुकाने नियमित सुरू असतील. पुर्वनियोजीत परीक्षा वेळापत्रकानुसार होतील. बँकाचे कामकाज त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहील. या व्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठाने बंद राहतील. सदर आदेश प्रतिबंधीत क्षेत्रासाठी 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 पासून व प्रतिबंधीत क्षेत्र नसलेल्या ठिकाणी सायं 5 पासून ते 1 मार्च 2021 चे सकाळी 8 वाजेपर्यंत लागू राहील. या कालावधीत संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरीकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

Thursday 25 February 2021

DIO BULDANA NEWS 25.2.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 2434 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 308 पॉझिटिव्ह

  • 134 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.25: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2753 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2434 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 308 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 242 व रॅपीड टेस्टमधील 66 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1188 तर रॅपिड टेस्टमधील 1246 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2434 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर शहर : 46, मलकापूर तालुका : तांदुळवाडी 2, तालसवाडा 1, चिखली शहर : 34, चिखली तालुका : चांधई 1, पळसखेड 1, अंचरवाडी 1, शेलगांव आटोळ 1, पळसखेड दौलत 1,अमोना 1, भोकर 2, डोंगर शेवली 2, मुरादूपर 1, शिंदी हराळी 3, सावरगांव डुकरे 2, तेल्हारा 1,मंगरूळ नवघरे 1, आमखेड 1,   खैरव 1, शेलूद 2, शिरपूर 2, वळती 1, माळशेंबा 1, कोलारा 3, टाकरखेड हेलगा 1, दहीगांव 1, मेहकर शहर : 3, मेहकर तालुका : डोणगांव 1, सावत्रा 3, हिवरा आश्रम 1, शेंदला 1, जानेफळ 1, बुलडाणा शहर : 37, बुलडाणा तालुका : माळविहीर 1, हतेडी 1, डोंगरखंडाळा 1, सागवन 6, अजिसपूर 1, नांदुरा शहर : 1, खामगांव शहर : 41, खामगांव तालुका : शेलोडी 1,  घाटपुरी 3,  शेगांव शहर : 1, जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : झाडेगांव 1, आसलगांव 11, पिं. काळे 1, सुलज 1, दे. राजा तालुका : वाघोरी वडगांव 1,वाकी 2, डोढ्रा 2, दे. मही 4, सावंगी टेकाळे 2, सिनगांव जहागीर 6, आळंद 3, चिंचोली बुरुकुल 2, दे. राजा शहर : 14, सिं. राजा शहर : 8, सि. राजा तालुका : सवडत 1, पिंपळखुटा 2, वाघोरा 3, राहेरी 1,  सावरगांव माळ 1,  शेंदुर्जन 1, लोणार तालुका : वेणी 3, मोताळा तालुका : बोराखेडी 3, पिं. देवी 1, तळणी 1, सारोळा मारोती 1, खरबडी 1, उऱ्हा 1, वरूड 3,  मूळ पत्ता नागपूर 1, पिंपरखेड ता. तेल्हारा जि. अकोला 1, भंडारा 1, अकोला 1, सांजोळ ता. जाफ्राबाद जि. जालना 1, बीड 2  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 308 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान गोपाल आश्रम, बुलडाणा येथील 75 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 134 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा : अपंग विद्यालय 39, दे. राजा : 12, चिखली : 40, मलकापूर : 14, शेगांव : 19, लोणार : 4, सिं. राजा : 1, जळगांव जामोद : 4, मोताळा : 1.

   तसेच आजपर्यंत 127372 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 15079 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 15079 आहे. 

  आज रोजी 7131 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 127372 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 17588 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 15079 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 2317 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 192 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

***********

 

किमान वेतन अधिनियम च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती सप्ताह

  • 22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान आयोजन

 बुलडाणा,(जिमाका) दि.25 :  किमान वेतन अधिनियम 1948 ची प्रभावी अंमलबजावणी  होण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत 22 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. तसेच किमान वेतन अधिनियम 1948 अंतर्गत विविध आस्थापना, दुकाने, हॉटेल्स, कारखाने, विविध उद्योग व इतर व्यापारी संस्थांतर्गत एकूण 67 अनुचित उद्योगातील कामगारांसाठी किमान वेतन दर निश्चित केलेले आहेत. कलम 12 (1) नुसार कामगारास किमान वेतन देणे बंधनकारक आहे. या संदर्भात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

                                                            ***********

मार्च महिन्याचा लोकशाही दिन रद्द

 बुलडाणा,(जिमाका) दि.25 :  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन मार्च महिन्यात होणार नाही. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सदर लोकशाही दिन दु 1 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येतो. जिल्ह्यात कोविड 19 चा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्याने माहे मार्च 2021 रोजी सोमवार 1 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन रद्द करण्यात येत आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

                                                *******

Wednesday 24 February 2021

DIO BULDANA NEWS 24.2.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 1776 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 368 पॉझिटिव्ह

  • 123 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.24: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2144 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1776 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 368 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 298 व रॅपीड टेस्टमधील 70 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1061 तर रॅपिड टेस्टमधील 715 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1776 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर : 43, चिखली तालुका : हातणी 1, कोलारा 12, अंत्री खेडेकर 1, धोडप 1, दे. धनगर 5, शेलूद 2, मंगरूळ नवघरे 2, इसरूळ 2, मुरादपूर 1, वळती 2, खैरव 3, धोत्रा भणगोजी 1, भाणखेडा 2, अंचरवाडी 2, सवणा 1, खंडाळा 1, मेरा खु 1, वाघोरा 1, सावरगांव डुकरे 3, तेल्हारा 1, भोरसा भोरसी 1, दहीगांव 3, अमडापूर 1, आमखेड 1,  गजरखेड 3, सिं. राजा शहर : 2,  सिं. राजा तालुका : रताळी 1, मोहाडी 1, भरोसा 2, दुसरबीड 1, खैरखेड 1, सातेगांव 1, खामगांव शहर : 27, खामगांव तालुका : हिवरखेड 18,बोथाकाजी 1,बोरी अडगांव 3,अंत्रज 6,  भालेगांव 1, रोहणा 1, सुटाळा बु 1, घाटपुरी 1, पिंप्राळा 1, बुलडाणा तालुका : अजिसपूर 1, माळवंडी 2, बिरसिंगपूर 1, दहीद बु 2, साखळी 1, सागवन 1,गिरडा 1, दत्तपूर 1, मोंढाळा 1, बुलडाणा शहर : 49, शेगांव शहर : 31, शेगांव तालुका : जानोरी 9, जवळा 2, चिंचोली 1,  संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : आरडव 1,  मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : बाऱ्हई 2, जानेफळ 19, हिवरा आश्रम 1, जळगांव जामोद शहर : 14, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 1, कुरणगड 4, दे. राजा शहर : 15, दे. राजा तालुका : वाढोणा 1, चिंचोली बुरूकुल 1, आळंद 1, दे. मही 2, डोढ्रा 1,  नांदुरा शहर : 15, नांदुरा तालुका : पोटळी 1, चांदुर बिस्वा 1, नारखेड 1, माळेगांव गोंड 1,  मोताळा तालुका : मूर्ती 2, सिंदखेड 1,  मोताळा शहर : 1, मलकापूर शहर : 1,   मूळ पत्ता पुसद जि. यवतमाळ 1, जाळीचा देव जि. जालना 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 368 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान तेल्हारा ता. चिखली येथील 65 वर्षीय पुरूष, टाकरखेड वायाळ ता. दे. राजा येथील 67 वर्षीय महिला, धोत्रा भणगोजी ता. चिखली येथील 80 वर्षीय महिला व जाळीचा देव ता. भोकरदन जि. जालना येथील 55 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 123 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  खामगांव : 13, बुलडाणा : अपंग विद्यालय 34, दे. राजा : 21, चिखली : 37, मलकापूर : 14, नांदुरा : 1, मेहकर : 4.

   तसेच आजपर्यंत 124938 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14945 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14945 आहे. 

  आज रोजी 6332 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 124938 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 17280 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14945 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 2144 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 191 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

***********

 

जळगांव जामोद वनपरिक्षेत्रातून अवैधरित्या 210 किलो सालई गोंद जप्त

  • 3 आरोपींना अटक

बुलडाणा,(जिमाका) दि.24 : वनविभागा अंतर्गत जळगांव जामोद वनपरिक्षेत्रात दि. 2 फेब्रुवारी 2021 रोजी वनखंड क्र. 366 मध्ये अवैधरित्या वनातून सालई गोंद वाहतुक होत असतांना 210 किलो (9 पोते) जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात एकुण 9 आरोपी असुन 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित 6 आरोपी फरार आहे. सदर गुन्ह्यातील 3 आरोपी यांना वि. प्रथम वर्ग न्यायदंडधिकारी जळगांव जामोद यांच्या समोर उपस्थित केले असता त्यांना जामीन मिळालेला आहे.

   सदर आरोपी जमानतीवर सुटल्यानंतर त्यांनी संबंधित वनरक्षक इतर कर्मचारी यांना ‘तुमचे जंगल कसे राहते ते पाहुन घेवू’ अशा प्रकारच्या धमक्या दिलेल्या आहेत. या आरोपींना जामिन मिळाल्यापासून अंगारीच्या घटना सुरु झाल्या आहेत. सदर घटनामध्ये 3 आरोपी व 6 फरार आरोपी यांनी वनामध्ये आग लावल्याचा संशय आहे. त्यांचा शोध पोलीस विभागामार्फत व वन विभागामार्फत सुरु असुन आरोपींविरूद्ध चौकशी करुन दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भारतीय राज्यघटनेचे कलम 51 (ए) (जी) नुसार जंगल जलाशये, नद्या, वन्यजीव व नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच आगीपासून जंगल संपत्तीचे संरक्षण करुन निसर्गाचा समतोल राखुन पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तरी वनक्षेत्रात अंगार लागल्यास नागरिकांनी वनविभागाच्या अधिकारी यांच्या भ्रमणध्वनी क्र. 9284335365, 7083637281 संपर्क साधावा.

   एखादया व्यक्तीने वनामध्ये अपप्रवेश केल्यास भारतीय अधिनियम 1927 चे कलम 26 अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी व्यक्ती त्यास सिध्दपराध ठरविणे न्यायालय, वनास पोहोचलल्या नुकसानीबद्दल जी नुकसान भरपाईची रक्कम देण्यास

निर्देशित करील, त्या नुकसान भरपाईच्या रकमेव्यतिरिक्त आणखी एक वर्ष मुदतीपर्यंतचा रक्कम देण्यास निर्देशित करील, त्या नुकसानभरपाईच्या रकमेव्यतिरिक्त आणखी एक वर्ष मुदतीपर्यतचा कारावास किंवा पाच हजार रुपये पर्यंतचा दंड किंवा

या दोन्ही शिक्षेस पात्र राहील. याबाबत नोंद घ्यावी,असे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी कळविल आहे.

आग लावल्याच्या घटना व वनगुन्हे

जामोद वर्तुळात नियतक्षेत्र पश्चिम जामोदमध्ये जळीत क्षेत्र 8 हेक्टर वनगुन्हा 5.2.2021, नियतक्षेत्र कुंवरदेव 2 मध्ये जळीत क्षेत्र 6 हेक्टर वनगुन्हा 6.2.2021, नियतक्षेत्र पश्चिम जामोदमध्ये जळीत क्षेत्र 7 हेक्टर वनगुन्हा 6.2.2021, नियतक्षेत्र कुंवरदेव 1 मध्ये जळीत क्षेत्र 7 हेक्टर वनगुन्हा 8.2.2021, नियतक्षेत्र कुंवरदेव 2 मध्ये जळीत क्षेत्र 2 हेक्टर वनगुन्हा 9.2.2021, नियतक्षेत्र कुंवरदेव 1 मध्ये जळीत क्षेत्र 5 हेक्टर वनगुन्हा 10.2.2021, नियतक्षेत्र कुंवरदेव 1 मध्ये जळीत क्षेत्र 2 हेक्टर वनगुन्हा 11.2.2021, नियतक्षेत्र गारपेठ मध्ये जळीत क्षेत्र 5 हेक्टर वनगुन्हा 13.2.2021, नियतक्षेत्र गारपेठ मध्ये जळीत क्षेत्र 8 हेक्टर वनगुन्हा 14.2.2021. असे एकूण जळीत क्षेत्र 50 हेक्टर आहे.

0000000

घाटबोरी वनपरिक्षेत्रातीत जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री

  • आक्षेप नोंदवायचा असल्यास 10 मार्च पूर्वी सादर करावा

 बुलडाणा,(जिमाका) दि.24 :  वनविभागा अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी, घाटबोरी या परिक्षेत्रामध्ये वनगुन्हा अंतर्गत जप्त व सरकार जमा करण्यात आलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची विल्हेवाट करावयाची आहे. घाटबोरी परिक्षेत्रामध्ये दे. साकर्षा लाकुड आगारात असलेल्या दुचाकी व चारचाकी या भंगार वाहनांची विक्री करावयाची आहे. त्यामुळे या  वाहनांबाबत कोणास काही आक्षेप नोंदवायचे असल्यास दि. 10 मार्च 2021 पुर्वी या कार्यालयास लेखी स्वरुपात कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावे. वाहनाचा प्रकार टाटा 407 वाहन क्र. एम एच 30 बी 2756, चेसिस नंबर 01050621966 इंजिन नंबर टी वाय पी ई 4978 पी 21 जे 10799040, जिप ट्रॅक्स वाहन क्र. एम एच 28 ऐ 8202, हिरो होंडा मोटार सायकल इंजिन नंबर एम बी एल 10 ई ई 89 सी 49434 असा आहे, असे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                                ***********


Tuesday 23 February 2021

DIO BULDANA NEWS 23.2.2021

 मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशिन युनीटकरीता अर्थसहाय्य मिळणार

  • राष्ट्रीय पशुधन अभियान

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्याकरीता राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत मुरघास निर्मिती करीता सायलेज बेलर मशिन युनीट स्थापन करण्यात येणार आहे. या मशिनसाठी जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक संघ, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा, पांजरपोळ, गौरक्षण संस्था यांना सदर योजनेचा लाभ द्यावयाचा आहे. या योजनेसाठी प्रति युनीट 20 लक्ष रूपये खर्चापैकी 50 टक्के 10 लक्ष रूपये केंद्र शासनाचे अर्थ सहाय्य राहणार आहे. उर्वरित 50 टक्के 10 लक्ष रूपये संस्थेने स्वत: खर्च करावयाचे आहे. सदरचा निधी हा सर्वसाधारण योजनेतील असल्याने योजनेकरीता जिल्ह्यामध्ये एक युनीट स्थापन करावयाचे आहे. तरी सर्वसाधारण प्रवर्गातील संस्थांनीच अर्ज सादर करावे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 मार्च 2021 आहे. अर्ज पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे, तरी पात्र संस्थांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. जी बोरकर यांनी केले आहे.

**********

जिल्हाधिकारी कार्यालयात

संत गाडगे बाबा महाराज यांना अभिवादन

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले. श्री. गिते यांनी संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

*********

कोरोना अलर्ट : प्राप्त 1633 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 416 पॉझिटिव्ह

  • 136 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.23 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2049 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1633 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 416 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 334 व रॅपीड टेस्टमधील 82 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 808 तर रॅपिड टेस्टमधील 825 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1633 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : जळगांव जामोद तालुका : झाडेगांव 141, आसलगांव 6, मोताळा शहर : 3, मोताळा तालुका : मूर्ती 4, थड 2, सिंदखेड 2, बुलडाणा शहर : 62, बुलडाणा तालुका : येळगांव 1, केसापूर 1, पाडळी 1, सुंदरखेड 1, देऊळघाट 2, पिंपळगावं सराई 1, सागवन 4, मेहकर तालुका : जानेफळ 1, शेगांव तालुका : जानोरी 7, चिंचोली 1,  तळेगांव 1,  शेगांव शहर : 31, खामगांव शहर : 7, चिखली तालुका : तांबुळवाडी 1, सावरगांव डुकरे 1, अमडापूर 1, मेरा खु 1, भालगांव 1, शेलूद 1, खैरव 1, जांभोरा 2, पळसखेड दौलत 5, पेनसावंगी 1, कव्हाळा 3, तेल्हारा 1, शेलूद 1, दहीगांव 1, मंगरूळ नवघरे 1,  सोमठाणा 1, आमखेड 1, सवणा 1, चिखली शहर : 23, दे. राजा शहर : 22, दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 5, डोढ्रा 2, गारगुंडी 1,  किन्ही 1, दे. मही 5, लोणार तालुका : येवती 6, हिरडव 1,भानापूर 1, नायगांव 1, पिंपळनेर 1, नांद्रा 3, तांबोळा 1, सुलतानूपर 3, वेणी 1,  लोणार शहर : 17, नांदुरा शहर : 1, मलकापूर शहर : 1,  सिं. राजा शहर : 4, सिं. राजा तालुका : कि. राजा 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, बावनबीर 1, वरवट बकाल 1,  मूळ पत्ता बीड 2,  अजिंठा जि. औरंगाबाद 1, संजोळ ता. जाफ्राबाद जि. जालना 1,  सौरभ कॉलनी अमरावती 1  येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 416 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 136 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  खामगांव : 14, बुलडाणा : अपंग विद्यालय 37, दे. राजा : 11, जळगांव जामोद : 1, सिं. राजा : 6, चिखली : 48, शेगांव : 4, लोणार : 6, मलकापूर : 7, नांदुरा : 1,  

   तसेच आजपर्यंत 123462 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14822 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14822 आहे. 

  आज रोजी 5030 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 123162 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 16912 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14822 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1903 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 187 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

***********

                                कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सैलानी यात्रा रद्द

बुलडाणा,(जिमाका) दि.23 : मौजे पिंपळगांव सराई ता. बुलडाणा परिसरात 25 मार्च ते 5 एप्रिल 2021 या कालावधीत सैलानी बाबा यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सदर यात्रेमध्ये देशातील अनेक राज्यांतून 5 ते 6 लक्ष भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. सदर यात्रेमध्ये जमणाऱ्या जनसमुदायामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन कोविड 19 या साथरोगाचा फैलाव होवू नये म्हणून सैलानी यात्रा रद्द करण्यात येत आहे. भारतीय साथ रोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायदा, फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144, मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील तरतूदींनुसार 25 मार्च ते 5 एप्रिल 2021 या कालावधीत होणारी सैलानी यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब या कायद्यांच्या तरतूदीनुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे आदेशात नमूद आहे.

************

जिल्ह्यातील आणखी 8 नगर परिषदांचे  क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत

·        जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद

·        नागरिकांनी कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे

बुलडाणा,(जिमाका)दि.23 : जिल्ह्यातील मेहकर शहर, लोणार शहर, सिं. राजा शहर, शेगांव शहर, जळगांव जामोद शहर, नांदुरा शहर, मोताळा शहर व संग्रामपूर शहर येथे कोरोना बाधीतांच्या संख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात मेहकर, लोणार, सिं. राजा, शेगांव, जळगांव जामोद, नांदुरा, मोताळा व संग्रामपूर  नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. सदर प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी आज 23 फेब्रुवारी रोजी सायं 6 वाजेपासून 1 मार्च चे सकाळी 8 वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिले आहेत.

    या आदेशान्वये प्रतिबंधीत क्षेत्रात  किराणा, स्वस्त धान्य दुकाने, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, पीठ गिरण्या सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत  सुरू राहणार आहेत. दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 व सायंकाळी 6 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारच्या बिगर जीवनावश्यक दुकाने, आस्थापना बंद राहतील. या प्रतिबंधीत क्षेत्रात रात्री 8.30 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. या क्षेत्रात ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरीता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे. ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरीता परवानगी राहणार आहे. सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालये, बँका अत्यावश्यक सेवा वगळून 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू राहतील. सर्व बँका नियमितपणे सुरू राहतील. ग्राहकांनी  दुकानामध्ये खरेदी करण्याकरिता जवळपास असलेल्या बाजारपेठा, अतिपरिचित दुकानदार यांचा वापर करावा. शक्यतो दुरचा प्रवार टाळावा. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधेस परवानगी असणार आहे. लग्न समारंभाकरीता 25 व्यक्तींना तहसिलदारांकडून परवानगी अनुज्ञेय असणार आहे.

    सर्व प्रकारची शैक्षणिक संस्थांमध्ये अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तर पत्रिका तपासणे, निकाल घोषीत करणे आदी कामांकरीता परवानगी असणार आहे. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक अतिआवश्यक कामासाठी संबंधीत क्षेत्रातील पोलीस निरीक्षक यांची पुर्व परवानगी घेऊन अनुज्ञेय असणार आहे.  ठोक भाजी मंडई सकाळी 3 ते 6 या कालावधीत सुरू असणार आहे. मात्र सदर मंडईत किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्ययामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षक गृहे व इतर संबंधीत ठिकाणे ही बंद राहणार आहेत. तसेच सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व स्नेहसंमेलन या कालावधीत बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी पुर्णपणे बंद राहतील. सर्व आठवडी बाजार बंद राहतील.  

    खाद्यगृहे, रेस्टॉरंट हे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र अशा खाद्यगृहे, रेस्टॉरंट मधून केवळ घरपोच पार्सल सेवा देण्याकरीता अनुज्ञेय राहील. सर्व खाजगी वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील. कोणतेही रूग्णालय बंदचा आधार घेवून रूग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही. जिल्ह्यातील ॲम्बुलन्स सेवा 24 तास सुरू राहतील. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांची वाहतुक, वितरण, विक्री व साठवण सुरू राहील. संचारबंदीच्या कालावधीत संपन्न होणाऱ्या पुर्वनियोजित परीक्षा त्यांचे वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. तसेच परीक्षार्थी यांना सदर कालावधीमध्ये परीक्षेचे ओळखपत्र व पालकांना त्यांचे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य असेल. कृषि सेवा केंद्र व कृषि निविष्ठांची दुकाने, कृषि प्रक्रिया उद्योग सकाळी 9 ते दु .3 या वेळेत सुरू राहतील. चिकन, मटन व मांस विक्री, अंडी विक्री दुकाने सकाळी 9 ते दु 3 वाजेपर्यंत सुरू असतील.

       मात्र प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. आठवड्या अखेर शुक्रवारी सायं 5 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बंद राहतील. तसेच दुध विक्रेते, डेअरी यापुढे सकाळी 6 ते दुपारी 3 व सायं 6 ते रात्री 8.30 वाजे पर्यंत नियमितपणे सुरू असतील.  या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरीकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

*********


Monday 22 February 2021

DIO BULDANA NEWS 22.2.21

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 1098 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 350 पॉझिटिव्ह

  • 96 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1448 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1098 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 350 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 291 व रॅपीड टेस्टमधील 59 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 744 तर रॅपिड टेस्टमधील 354 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1098 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 21, खामगांव तालुका : माक्ता 1, नांदुरा शहर : 19, नांदुरा तालुका : वाडी 1, निमखेड 1, टाकरखेड 1, बुलडाणा शहर : 51, बुलडाणा तालुका : केसापूर 1, भादोला 1, तराडखेड 1, दहीद बु 1, माळवंडी 1, सागवन 5, सुंदरखेड 2,  गिरडा 2, टाकळी 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : थार 1, डोणगांव 2, जानेफळ 2, बऱ्हाई 2, कुंबेफळ 1, दे. राजा तालुका : अंढेरा 10, आळंद 2, सिनगांव जहागीर 18, भिवगण 8, दे. राजा शहर : 40, सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : चिंचोली 1, पिंपळखुटा 2, दुसरबीड 1, चिखली शहर : 33, चिखली तालुका : टाकरखेड 1, अंचरवाडी 1, ईसोली 1, पिंपळवाडी 3, हातणी 3, वळती 1, अंत्री कोळी 4,   जांभोरा 3, गुंज 1, मंगरूळ नवघरे 5, केळवद 2, धोत्रा भणगोजी 2,  सवणा 3, पेठ 1, तेल्हारा 2, पिंपळगांव सोनाळा 2, मालखेड 1, गजरखेड 1, भोरसा भोरसी 1, मलकापूर शहर : 37, मलकापूर तालुका : पिंपळखुटा 1, लासुरा 2, जांबुळ धाबा 1, कुंड बु 2,  जळगांव जामोद शहर : 4, जळगांव जामोद तालुका : झाडेगांव 5, मोताळा शहर : 7, मोताळा तालुका : तळणी 1,  लोणार तालुका : पिंपळनेर 1, हिरडव 1, लोणार शहर : 10,  मूळ पत्ता कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव 1, मेरखेडा ता. जाफ्राबाद जि. जालना 1, जाळीचा देव ता. भोकरदन जि. जालना 1, डोलखेडा जि. जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 350 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 96 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  खामगांव : 4, बुलडाणा : सिद्धीविनायक कोविड हॉस्पीटल 2, अपंग विद्यालय 24, स्त्री रूग्णालय 3,  दे. राजा : 9, चिखली : 15, लोणार : 4, शेगांव : 17, जळगांव जामोद : 3, मलकापूर : 5, मेहकर : 9, नांदुरा : 1.

   तसेच आजपर्यंत 121529 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14686कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14686आहे. 

  आज रोजी 3330 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 121529 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 16496 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14686 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1623 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 187 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

***********


बुलडाणा जिल्ह्यातील पाच नगर परिषद क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत

·        जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद

·        आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये

बुलडाणा,(जिमाका)दि.22 : जिल्ह्यातील बुलडाणा शहर, चिखली शहर, मलकापूर शहर, खामगांव शहर व दे. राजा शहर येथे कोरोना बाधीतांच्या संख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात बुलडाणा, खामगांव, मलकापूर, चिखली व दे. राजा  नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. सदर प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी आज 22 फेब्रुवारी रोजी सायं 6 वाजेपासून 1 मार्च चे सकाळी 8 वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिले आहेत.

    या आदेशान्वये प्रतिबंधीत क्षेत्रात  किराणा, स्वस्त धान्य दुकाने, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, पीठ गिरण्या सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत  सुरू राहणार आहेत. दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 व सायंकाळी 6 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारच्या बिगर जीवनावश्यक दुकाने, आस्थापना बंद राहतील. या प्रतिबंधीत क्षेत्रात रात्री 8.30 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. या क्षेत्रात ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरीता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे. ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरीता परवानगी राहणार आहे. सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालये, बँका अत्यावश्यक सेवा वगळून 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू राहतील. सर्व बँका नियमितपणे सुरू राहतील. ग्राहकांनी  दुकानामध्ये खरेदी करण्याकरिता जवळपास असलेल्या बाजारपेठा, अतिपरिचित दुकानदार यांचा वापर करावा. शक्यतो दुरचा प्रवार टाळावा. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधेस परवानगी असणार आहे. लग्न समारंभाकरीता 25 व्यक्तींना तहसिलदारांकडून परवानगी अनुज्ञेय असणार आहे.

  सर्व प्रकारची शैक्षणिक संस्थांमध्ये अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तर पत्रिका तपासणे, निकाल घोषीत करणे आदी कामांकरीता परवानगी असणार आहे. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक अतिआवश्यक कामासाठी संबंधीत क्षेत्रातील पोलीस निरीक्षक यांची पुर्व परवानगी घेऊन अनुज्ञेय असणार आहे.  ठोक भाजी मंडई सकाळी 3 ते 6 या कालावधीत सुरू असणार आहे. मात्र सदर मंडईत किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्ययामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षक गृहे व इतर संबंधीत ठिकाणे ही बंद राहणार आहेत. तसेच सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व स्नेहसंमेलन या कालावधीत बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी पुर्णपणे बंद राहतील. सर्व आठवडी बाजार बंद राहतील.

   मात्र प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. आठवड्या अखेर शुक्रवारी सायं 5 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बंद राहतील. तसेच दुध विक्रेते, डेअरी यापुढे सकाळी 6 ते दुपारी 3 व सायं 6 ते रात्री 8.30 वाजे पर्यंत नियमितपणे सुरू असतील.  या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरीकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

Friday 19 February 2021

DIO BULDANA NEWS 19.2.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 1474 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 271 पॉझिटिव्ह

  • 66 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.19 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1745 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1474 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 271 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 209 व रॅपीड टेस्टमधील 62 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 830 तर रॅपिड टेस्टमधील 644 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1474 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 27, बुलडाणा तालुका : कोलवड 1, सागवन 1,  नांदुरा शहर : 19, नांदुरा तालुका : काटी 1, पिंप्री अढाव 2, खामगांव तालुका : सुटाळा बु 1, टेंभुर्णा 1, माक्ता 1, बोथाकाजी 1,  खामगांव शहर : 17, शेगांव शहर : 19, शेगांव तालुका : जानोरी 6, गायगांव 5, सांगवा 1, पिंपळवाडी 1, मेहकर शहर : 8, मेहकर तालुका : जानेफळ 1,  डोणगांव 1, चिखली शहर : 27, चिखली तालुका : कोलारा 1, पेठ 1, खैरव 2, मंगरूळ नवघरे 3, दहीगांव 1, टाकरखेड वायाळ 1,   करवंड 2, भरोसा 1, केळवद 1,  दे. राजा शहर : 18, दे. राजा  तालुका : आळंद 2, मेहुणा राजा 1, गारगुंडी 1, भिवगन 2, नागणगांव 1, दे. मही 1, सिनगांव जहागीर 17, डोढ्रा 2, पिंळगांव देशमुख 1, जळगांव जामोद तालुका : झाडेगांव 5, वडशिंगी 1, कुरणखेड 2,  जळगांव जामोद शहर :1, सिं. राजा शहर : 4, सिं. राजा तालुका : रुम्हणा 2, जांभोरा 2, दुसरबीड 1, सावळा 1, चिंचोली 1,  साखरखेर्डा 4, आडगांव राजा 1, उमरगांव 1,  मलकापूर शहर : 16, संग्रामपूर तालुका : एकलारा 1, पळशी 2, लोणार शहर : 17, लोणार तालुका : सुलतानपूर 1, मोताळा शहर : 3,   मूळ पत्ता अंदुरा ता. बाळापूर जि अकोला 1, रफाळा ता. जाफ्राबाद जि. जालना 1, परतूर जि. जालना येथील 1, जाफ्राबाद जि. जालना येथील 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 271 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चिखली येथील 50 वर्षीय पुरूष व बुलडाणा येथील 70 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 66 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : मलकापूर : 21, लोणार : 4, चिखली : 11, दे. राजा : 5, जळगांव जामोद : 1,  खामगांव : 6, बुलडाणा : अपंग विद्यालय 15, स्त्री रूग्णालय 2, नांदुरा : 1,    

   तसेच आजपर्यंत 118381 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14395 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14395 आहे. 

  आज रोजी 1513 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 118381 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 15630 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14395 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1052 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 183 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

***********

 

 

                               रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचा दौरा

बुलडाणा,(जिमाका) दि.19 : राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे दि 20 फेब्रुवारी रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वा सिं. राजा येथे आगमन व नगर परिषद येथे सदीच्छा भेट, सकाळी 10 वाजता सिंदखेड राजा येथून शासकीय वाहनाने चांगेफळकडे प्रयाण, सकाळी 10.30 वा चांगेफळ येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती,  सकाळी 11 वा भागवत निवास येथे राखीव, दु 12 वा वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

******************

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

बुलडाणा,(जिमाका) दि.19 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी भुषण अहीरे यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण केले.

********

--

Thursday 18 February 2021

DIO BULDANA NEWS 18.2.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 515 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 134 पॉझिटिव्ह

• 66 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 649 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 515 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 134 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 103 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 31 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 302 तर रॅपिड टेस्टमधील 213 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 551 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर शहर : 15, शेगांव शहर : 5, बुलडाणा शहर : 30, बुलडाणा तालुका : सागवण 2, नांद्राकोळी 1, सुंदरखेड 2,  नांदुरा शहर : 1, जळगांव जामोद तालुका : अकोला खुर्द 1, झाडेगांव 1,  वाडी खु 1, आसलगांव 1,  चिखली शहर : 30, चिखली तालुका : मंगरूळ नवघरे 1, अमडापूर 2, गजरखेड 1, पिंपळवाडी 1, खैरव 2,  अंत्री कोळी 3, धोत्रा भणगोजी 2, तेल्हारा 2, दे. घुबे 1, सावरखेड 1, मोताळा शहर : 2, खामगांव शहर : 12, खामगांव तालुका : सुटाळा बु 1, घाणेगांव 1, दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : भिवगण 1, सिनगांव जहागीर 1, अंढेरा 1, डोढ्रा 2, जांभोरा 1, सिं. राजा शहर : 2, लोणार तालुका : सुलतानपूर 2, मूळ पत्ता माहोरा ता. जाफ्राबाद जि. जालना 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 134 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान अजिसपूर ता. बुलडाणा येथील 62 वर्षीय व उमाळी ता. मलकापूर येथील 84 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 66 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा : सिद्धीविनायक कोविड हॉस्पीटल 27, स्त्री रूग्णालय 1, अपंग विद्यालय 4, नांदुरा : 4,  खामगांव : 7, लोणार : 2, चिखली : 4, दे. राजा : 10, शेगांव : 2, मलकापूर : 3,  सिं. राजा : 2.

  तसेच आजपर्यंत 116907 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14329 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14329 आहे. 

  तसेच 1455 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 116907 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 15359 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14329  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 849 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 181 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

*******


अप्पर जिल्हाधिकारी यांनी घेतली कोविड लस

  बुलडाणा,(जिमाका) दि. 18 : कोविड लसीकरण जिल्ह्यात सुरू असून सध्या 13 ठिकाणी हे लसीकरण होत आहे. प्रत्येक केंद्रावर 100 याप्रमाणे 1300 लसीकरणाचे दररोजचे उद्दिष्ट आहे. कोविड लसीकरणामध्ये दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाईन वर्करमधील व्यक्तींचे लसीकरण सध्या सुरू आहे. त्यानुसार आज अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे आदींनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील लसीकरण कक्षात लस टोचून घेतली. लसीकरणानंतर 30 मिनीटे निरीक्षण रूममध्ये ते होते. या लसीमुळे कुठलाही प्रकारचा त्रास त्यांना झाला नाही. लस ही 100 टक्के सुरक्षीत असल्याचा अनुभव त्यांनी घेतला. यासोबतच महसूल यंत्रणेतील तहसीलदार, नायब तहसिलदार यांनीही आज जिल्हा सामान्य रूग्णालयात लस टोचून घेतली. तरी लसीकरणामधील लाभार्थी व्यक्तींनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता लस घेण्याचे आवाहन यावेळी  अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले.   

Wednesday 17 February 2021

DIO BULDANA NEWS 17.2.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 441 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 199 पॉझिटिव्ह

• 42 रूग्णांना मिळाली सुट्टी, चिखली शहरात आढळले सर्वात जास्त 32 रूग्ण

  बुलडाणा,(जिमाका) दि. 17 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 640 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 441 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 199 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 162 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 37 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 271 तर रॅपिड टेस्टमधील 170 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 441 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 22, बुलडाणा तालुका : गिरडा 1, सागवन 1, डोंगरशेवली 1,  चांडोळ 1, कोलवड 1, येळगांव 2, मलकापूर शहर : 16,   दे. राजा शहर : 21, दे. राजा तालुका : दगडवाडी 1, अकोला देव 1, सिनगांव जहागीर 13, आळंद 1,   पिंपळनेर 2, अंढेरा 1, सरंबा 1, डोढ्रा 1,  जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 2, झाडेगांव 1, संग्रामपूर तालुका : पळशी झाशी 1, एकलारा 1,  सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : रूम्हणा 2, चिखली शहर : 32, चिखली तालुका : अंत्री कोळी 1, अमडापूर 3, पेठ 1, खैरव 2, दहीगांव 1, सवणा 2, अंचरवाडी 3, तेल्हारा 1, नायगांव 1, खंडाळा मकरध्वज 1,  मंगरूळ नवघरे 1, धोत्रा भणगोजी 1, हातणी 1, केळवद 1, मेरा बु 1,  खामगांव शहर : 19, खामगांव तालुका : लाखनवाडा 1, टेंभुर्णा 1, घाटपुरी 2, घानेगांव 1, कदमापूर 3, सुटाळा खु 1, मोताळा तालुका : तळणी 1, माकोडी 1,  मेहकर शहर : 2, शेगांव शहर : 8, शेगांव तालुका : गायगांव 2, आडसूळ 1,   मूळ पत्ता हिवरखेड ता. तेल्हारा जि अकोला 3, डोंगरगांव ता. बाळापूर जि. अकोला 1, जाळीचा देव ता. भोकरदन जि जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 199 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान सोमठाणा ता. चिखली येथील 87 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 42 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  चिखली : 11, दे. राजा : 9, बुलडाणा : अपंग विद्यालय 15, स्त्री रूग्णालय 3, सिं. राजा : 4.

  तसेच आजपर्यंत 116392 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14263 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14263 आहे. 

  तसेच 1145 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 116392 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 15225 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14263  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 783 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 179 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

*******

  

महाडीबीटी पोर्टलवर लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावी

  • कृषि विभागाचे आवाहन

  बुलडाणा,(जिमाका) दि. 17 : कृषी विभागाद्वारे महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी शेतकरी लाभार्थी निवडण्याकरीता लॉटरी पद्धत अंवलबण्यात आली. या लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जावून आपल्या निवडीबाबत पुढील कार्यवाही करावी. महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागातील विविध योजनेंतर्गत अर्ज केलेल्या ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन सोडतील आपली निवड झाल्याबाबत लघुसंदेश प्राप्त झाला आहे.  त्यांनी  महाडीबीटी पोर्टलचे संकेतस्थळ https//mahadbtmahait.gov.in वर जावे.

   संकेतस्थळावर शेतकरी योजना या पोर्टलवर क्लिक करावे. त्यानंतर वापरकर्ता आयडी या पर्यावर क्लिक करावे. वापरकर्ता आयडीवर क्लिक केल्यानंतर वापरकर्ता आयडी, पासवर्ड व त्या खालील प्रतिमेत दर्शविलेले शब्द भरुन लॉग इन करावे. मुख्य मेनुमधील मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण केलेल्या सर्व अर्जाची स्थिती दिसेल. स्थितीमध्ये Upload Document For Under Scrutiny असा शेरा ज्या घटकासमोर असेल त्या घटकासाठी लॉटरीद्वारे आपली निवड झाली आहे असे समजावे.

    मुख्य मेनुमधील कागदपत्रे या पर्यायावर क्लिक करावी. त्यानंतर वैयक्तीक कागदपत्रे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर दर्शविलेल्या स्क्रीनवरील कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करावी. कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कागदपत्रे अपलोड स्क्रीन दिसेल. त्यात नमुद केलेली विहीत कागदपत्रे 15 केबी ते 500 केबी या आकारमानातच आपलोड करुन जतन करा या पर्यायावर क्लिक करावी. तरी लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या व तसा लघुसंदेश प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे सादर करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

***********



जिल्‍ह्यात संचारबंदीचे आदेश पारीत; पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये

  • इयत्ता 5 ते 9 वी पर्यंत शाळा, महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद
  • खाजगी शिकवणी, कोचिंग क्लासेस बंद; आठवडी बाजार दुपारी 4 वाजेनंतर बंद
  • सोशल डिस्टसिंग व मास्कचा वापर बंधनकारक
  • जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी स्वत: केली कारवाई
  • लग्न समारंभासाठी 50 व्यक्तींनाच परवानगी

बुलडाणा,(जिमाका) दि. 17 : जिल्ह्यात 1 ते 15 फेब्रुवारी कालावधीत कोविडचे 971 रूग्ण आढळून आले असून आज सर्वाधिक म्हणजे 199 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यावरून जिल्ह्यात कोविड आजारामुळे बाधीत रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू करणे गरजेचे आहे.  जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. संचारबंदीचे आदेश पारीत होताच जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी स्वत: रस्त्यावर येत कारवाई केली.

     आदेशानुसार शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदी असणार आहे. आदेशान्वये शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने कार्यक्रम, सभा, बैठका यासाठी केवळ 50 व्यक्तिंनाच परवानगी असेल. मिरवणूक व रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

   लग्नसमारंभाकरिता केवळ 50 व्यक्तींनाच उपस्‍थित राहता येणार आहे. या समारंभामध्ये सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. लग्नसमारंभाकरिता रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी अनुज्ञेय असेल. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभाग आवश्यक ती कार्यवाही करणार आहे.  मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती दिसून आल्यास आयोजक व मंगल कार्यालय, बॅंक्वेट हॉल, लॉन मालक यांचेवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.

   लग्न समारंभाच्या नियोजित स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टसिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहील. या ठिकाणी नागरीकांची गर्दी होत असल्याचे आढळुन आल्यास स्थानिक प्रशासनाकडून नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळुन आल्यास संबंधित व्यावसायिक, दुकानदार यांचेवर कारवाई करण्यात येणार आहे.   जिल्ह्यातील सर्व धार्मिक संस्था,  स्थळे यांनी त्यांच्या धार्मिक संस्थानामध्ये, कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच सोशल डिस्टसिंग व मास्कचा वापर बंधनकारक राहील, याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरीकांची गर्दी होणार नाही या बाबत स्थानिक प्रशासन (नगरपरिषद/नगर पंचायत /ग्राम पंचायत) यांनी दक्षता घेवून व आवश्यक पथकाचे गठन करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार आहे. जिल्ह्यामधील इयत्ता 5 वी ते 9 वी पर्यंत असलेल्या सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्द्र, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस दि. 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.

      या कालावधीत ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील. खाजगी आस्थापना, दुकाने या ठिकाणी मास्क , फेस कव्हर असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. तसेच हॉटेलमध्ये सुद्धा मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. या बाबत दर्शनी भागात बॅनर / फलक लावणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळुन आल्यास स्थानिक प्रशासन दंडात्मक कार्यवाही करेल. हॉटलमध्ये तसेच बाहेरील आवारात पार्किंगसाठी गर्दी होणार नाही या बाबत योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात यावे. रांगा व्यवस्थापित करण्यासाठी व सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट खुणा करण्यात याव्यात. तसेच दर्शनी भागात फलक लावण्यात यावा. अतिथी,  ग्राहकांनी वापरलेले फेस कव्हर्स,  मास्क, हातमोजे यांची संबंधीतांनी योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी.

  यापूर्वी कोविड-19 चा प्रादुर्भाव फैलाव होवू नये, या करिता वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेशांचे उल्लंघन होणार नाही या बाबत आवश्यक दक्षता घेण्यात यावी. जिल्‍ह्यातील सर्व आठवडी बाजार दुपारी 4 वाजेनंतर बंद ठेवण्यात येणार आहे.   सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र असणार आहे. सदर आदेश 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.

                                                            ***************

पिंपरखेड गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : बुलडाणा तालुक्यातील पिंपरखेड गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. पिंपरखेड येथील लोकसंख्या 625 आहे. टँकरद्वारे या गावाला दररोज 17  हजार 200 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

                                                                                                **********

Tuesday 16 February 2021

DIO BULDANA NEWS 16.2.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 348 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 82 पॉझिटिव्ह

• 76 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 16 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 430 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 348 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 82 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 56 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 26 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 176 तर रॅपिड टेस्टमधील 172 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 348 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 37, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 1, गिरडा 1, दहीद 1, चांडोळ 1, चिखली तालुका : हिवरा 1, अमडापूर 1, धोत्रा भणगोजी 1, हातणी 1,  चिखली शहर : 11, दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 2, दे. मही 1, दगडवाडी 1, लोणार शहर : 4, सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : रूम्हणा 1, शेंदुर्जन 1, मेहकर शहर : 4, मेहकर तालुका : गुंधा 1, मुंदेफळ 1, डोणगांव 2, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : झाडेगांव 1,  मूळ पत्ता मुर्तीजापूर जि. अकोला 1, माहोरा ता. जाफ्राबाद 2,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 82 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान अंजनी खु ता. मेहकर येथील 55 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 76 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा : स्त्री रूग्णालय 2, अपंग विद्यालय 12, खामगांव : 9, दे. राजा : 17, सिं. राजा : 3, चिखली : 9, शेगांव : 5, मलकापूर : 3,  लोणार : 6, जळगांव जामोद : 1, मेहकर : 8,

  तसेच आजपर्यंत 115951 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14221 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14221 आहे. 

  तसेच 1067 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 115951 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 15026 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14221  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 627 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 178 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

*******




 

कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग’ वाढवावे

-          जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

  • विनामास्क, सोशल डिस्टसिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
  • चाचण्यांचे प्रमाण वाढवा, मोबाईल टेस्टींग युनीट सुरू करा
  • होम आयसोलेशनची सुविधा बंद करावी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 16 : कोरोना संसर्गाचे प्रमाण गत तीन ते चार दिवसांपासून अचानक वाढले आहे. हे प्रमाण नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी पॉझीटीव्ह रूग्णाच्या हाय व लो रिस्क संपर्कातील सर्वांची कोरोना तपासणी करावी. त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज दिल्या.

  कोरोना संसर्ग नियंत्रण कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते.

   कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करून आरटीपीसीआर व रॅपिड चाचण्यांवर भर देण्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, पॉझीटीव्ह रूग्ण असलेल्या गावांमध्ये मोबाईल टेस्टींग युनीट सुरू करावे. यासोबतच प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क वापरणे, हात सॅनीटाईज करणे किंवा स्वच्छ धुणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे या बाबींचा अवलंब करावा. जे कुणी बाहेर पडल्यानंतर मास्क लावणार नाही, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टसिंगचे पालन करणार नाही, त्यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस यंत्रणा दंडात्मक कारवाई करेल. तसेच शहरांमध्ये ज्या दुकानांसमोर सोशल डिस्टसिंग पाळले जाणार नाहीत किंवा तिथे विना मास्क ग्राहक दिसतील, अशा दुकानदारांवरसुद्धा करवाई करावी.

   चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाले, एका पॉझीटीव्ह रूग्णामागे 15 हाय रिस्कमधील व 20 लो रिस्कमधील अशाप्रकारे 35 नागरिकांची तपासणी करावी. जेणेकरून कोरोना संसर्ग थांबविणे शक्य होईल. त्याचप्रमाणे सुपर स्प्रेडर असलेले दुकानदार, भाजीपाला विक्रेते तसेच ज्यांना लोक जास्त भेटतात त्यांच्या 100 टक्के तपासण्या बंधनकारकरित्या कराव्यात. अशा सुपर स्प्रेडरची महिन्यातून दोनवेळा तपासणी करावी. सध्या पॉझीटीव्ह रूग्णांना होम आयसोलेशन दिल्या जाते. ही सुविधा बंद करण्यात यावी. कारण असे रूग्ण बाहेर फिरतांना आढळतात. त्यांच्यामुळेही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आयसोलेशनची पुर्ण व्यवस्था आहे, त्यांनाच होम आयसोलेशन द्यावे. अन्यथा ही सुविधा देवू नये. तालुका स्तरावरील यंत्रणांनी समन्वय ठेवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावे. तालुका स्तरावर कोविड केअर सेंटर सुरू आहेत. तरी पॉझीटीव्ह रूग्णांना आधी कोविड केअर सेंटर येथे दाखल करावे.  कोविड केअर सेंटरमधील मनुष्यबळाला कन्ट्युनेशन द्यावे. दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांची प्राधान्याने तपासणी करण्यात यावी.

  ते पुढे म्हणाले, मलकापूर तालुक्यात पॉझीटीव्ह व मृत्यू दर जास्त आहे. तेथील यंत्रणांनी गांभीर्याने घेत कोरोना संसर्ग रोखावा. शहरात कुठेही हॉटस्पॉट होवू देवू नये. पॉझीटीव्ह आलेल्या रूग्णांची यादी तयार ठेवून त्यांच्या कुटूंबीय, कॉन्टॅक्टमधील नागरिकांची कोरोना चाचणी करावी. अशाचप्रकारे चिखली, खामगांव आदी ठिकाणीसुद्धा कारवाई करावी. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीही आवश्यक त्या सुचना दिल्या. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक आदींसह संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीचे सादरीकरण अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी, तर आभार माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. गोफणे यांनी मानले.

************

शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा

  • जिल्हा प्रशासनाचे आवाहन

  बुलडाणा,(जिमाका) दि. 16 : येत्या 19 फेब्रुवारी 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. मात्र यावर्षी कोविड 19 या साथरोगामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे शिवजयंती उत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनान केले आहे.

  अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड / किल्ल्यांवर जावून तारखेनुसार 18 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येवून शिवजयंती साजरी करतात. मात्र संसर्गजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करावा. कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येवू नये. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. अशा ठिकाणी 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.  

  त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक आदींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवू नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरीया, डेंग्यू आजार व त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. या ठिकाणी सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे व सॅनीटाईज करणे आदींचे पालन करावे.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने व स्थानिक प्रशासनाने विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी दिनेश गिते यांनी कळविले आहे.

*********

आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेचे बक्षीस वितरण

  • जिल्हा सुंदर गाव स्पर्धेत माकोडी गावाला पारितोषीक

  बुलडाणा,(जिमाका) दि. 16 : आर. आर. (आबा) पाटील यांचे पुण्यतिथी निमित्ताने आज 16 फेब्रुवारी रोजी सन 2019-20 अंतर्गत तालुका सुंदर व जिल्हा सुंदर गाव पुरस्कार योजनेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या श्री. छत्रपती शिवाजी सभागृह येथे आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. मनिषाताई पवार, उपाध्यक्ष सौ. कमलताई बुधवत, सभापती रियाजखॉ पठाण, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, पं.स मोताळा सभापती प्रकाश बस्सी आदी उपस्थित होते.

  याप्रसंगी जि.प अध्यक्ष मनिषाताई पवार म्हणाल्या, या स्पर्धेत सहभाग नोंदवित पारितोषिक मिळालेल्या ग्रामपंचायतींपासून अन्य ग्रामपंचायतींनी प्रेरणा घ्यावी. पुढील वर्षी आपली ग्रामपंचायतीला कसे पारितोषिक मिळेल, यादृष्टीने काम करावे. ग्राम विकासाच्या योजना अधिकाधिक प्रभावीपणे राबवून ग्रामपंचायतींनी आपली ग्रामविकासातील भूमिका अधोरेखीत करावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी केले. त्यांनी स्पर्धेची माहिती दिली.

    सन 2019-20 चे उत्कृष्ट कामगिरी केलेले तालुका सुंदर गाव व जिल्हा सुंदर गाव स्पर्धेतील पारितोषिक विजेते ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व विस्तार अधिकारी (पंचायत) यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या पुरस्कार योजनेतंर्गत राज्य शासनाकडून तालुका सुंदर गाव करीता 10 लक्ष रूपये व जिल्हा सुंदर गाव करीता 40 लक्ष रूपये पारितोषिक घोषीत करण्यात आले आहे. त्यानुसार पारितोषिक विजेत्या गावांना पारितोषिक रक्कमेचा धनादेश देण्यात आला.  संचलन चंद्रशेखर जोशी यांनी तर आभार प्रदर्शन सहा. गट‍ विकास अधिकारी भरत हिवाळे यांनी केले.

ह्या ग्रामपंचायती आहेत विजेत्या

जिल्हा सुंदर गाव पुरस्कार विजेती ग्रामपंचायत : माकोडी ता. मोताळा, तालुका सुंदर गाव पारितोषिक विजेत्या ग्रामपंचायती : बुलडाणा – हतेडी खु, चिखली – सावरगांव डुकरे, दे. राजा- खल्याळ गव्हाण, सिं. राजा- आडगांव राजा, मेहकर – आंध्रुड, लोणार – आरडव, खामगांव – वझर, शेगांव – खातखेड, संग्रामपूर- उमरा, जळगांव जामोद- सुनगांव, नांदुरा – खुमगांव, मलकापूर – विवरा, मोताळा – माकोडी.

                                                                                *********