जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत माजी सैनिकांना मोफत न्यायालयीन मार्गदर्शन
बुलडाणा, (जिमाका) दि.
23 : बुलढाणा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व त्यांचे
अवलंबित यांना मोफत न्यायालयीन माहिती देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,
बुलढाणा यांच्या वतीने विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे कोर्ट प्रकरणांबाबत
मोफत कायदेशीर मार्गदर्शन देण्यात येत असून यासाठी अॅड. राहुल दाभाडे व अॅड. संजय
इंगळे हे दर मंगळवार व गुरुवार कार्यालयीन वेळेत उपस्थित राहतात.
माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबितांना कोर्ट केससंदर्भात
कोणत्याही प्रकारच्या अडचणी, शंका किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास त्यांनी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित अॅडव्होकेट
यांच्याकडून मोफत सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलढाणा
यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment