जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा प्रशासनात सांघिक भावना रुजविणार उपक्रम - जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांचे प्रतिपादन

 








बुलढाणा,दि. १६ :  शासकीय कार्यपद्धतीमध्ये सांघिक भावनेने कामकाज केले जाते तसे मैदानी खेळातून या सांधिक भावनेची उजळणी होणे आवश्यक आहे. जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव, उत्तम प्रकृतीमान आणि सांघिक व मित्रत्वाची भावना रुजविणारा उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची उपस्थिती होती. यावेळी  अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रशासनातील दैनंदिन कामकाज पार पाडतांना अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रकृती चांगली राहण्यासाठी तसेच खेळाडूवृत्ती कायम राहावी यासाठी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्पर्धकांना केले.

या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी डॅा किरण पाटील आणि पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी क्रिकेट स्पर्धेत सहभागी होत षटकार लगावले.

कार्यक्रमाचे सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी केले. सूत्रसंचालन तहसिलदार वृषाली केसकर, शिवानंद वाकदकर यांनी केले.

००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या