तृतीयपंथीयांसाठी पोर्टल व हेल्पलाईन सेवा सुरु; सुविधेचा लाभ घ्यावा: सहाय्यक आयुक्त यांचे आवाहन
बुलढाणा, (जिमाका) दि. 14
: केंद्र
शासनाचा ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, 2019 व त्याअंतर्गतचे नियम
2020 संपूर्ण देशात लागू झाले आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीअंतर्गत तृतीयपंथीय व्यक्तींसाठी
केंद्र शासनाने स्वतंत्र पोर्टल व नॅशनल हेल्पलाईन क्रमांक सुविधा उपलब्ध करुन दिले
आहे. या सुविधांचा जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींनी लाभ घ्यावा,
असे आवाहन, सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.
तृतीयपंथीय समुदायासाठी केंद्र शासनाने http://transgender.dosje.gov.in हे पोर्टल
उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथीय व्यक्तींना अधिकृत ओळखपत्र मिळविण्यासाठी
ऑनलाइन अर्ज करता येतो. तसेच नॅशनल हेल्पलाईन क्रमांक 14427 सुद्धा सुरू करण्यात आले
आहे. या हेल्पलाईनद्वारे तृतीयपंथीय व्यक्तींना विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज
प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, येणाऱ्या अडचणींचे निराकरण तसेच तक्रारी नोंदविण्याची सुविधा
उपलब्ध करून देण्यात आली आहे.
00000
Comments
Post a Comment