अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा जिल्हा दौरा; 27 व 28 जानेवारीला घेणार विविध विभागांचा आढावा
बुलडाणा, (जिमाका) दि.
22 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य अॅड. धर्मपाल
मेश्राम हे दि. 27 व 28 जानेवारी २०२६ रोजी बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर
येत आहे. दौऱ्यादरम्यान अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांचा
आढावा घेणार आहे. त्यांच्या दौऱ्यानुसार
मंगळवार दि. 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी
11 वाजता बुलढाणा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल
मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा नगरपरिषदेच्या सभागृह हॉलमध्ये बुलढाणा, मलकापूर,
शेगाव, खामगाव व चिखली नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांचेसोबत जिल्हा परिषदकडे प्राप्त
होणाऱ्या महसूलाचे एकूण 5 टक्के निधी आस्थापना, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या
खर्चाची मागील 5 वर्षाचा आढावा व कामाची तपासणी तसेच नागरी दलित वस्ती, रमाई आवास घरकुल
योजना, लाड पागे योजनेतील प्रलंबित प्रकरणे, अनुकंपा तत्त्वावरील प्रकरणे तसेच अनुसूचित
जातींसाठी प्राप्त होणाऱ्या निधीबाबत तपासणी.
दुपारी 2 वाजता राखीव व दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे पोलीस
अधीक्षक, बुलढाणा यांच्या अंतर्गत लाड पागे समितीच्या नियुक्ती संदर्भातील सर्व प्रलंबित
प्रकरणांबाबत आढावा. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन),
बुलढाणा यांच्यासोबत लाड पागे समितीच्या प्रलंबित प्रकरणांबाबत बैठक. दुपारी 4 वाजता
जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यासोबत तर सायंकाळी 5 वाजता जिल्हा परिषदचे महिला व बाल
विकास अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक, रात्री शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम
करतील.
बुधवार, दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बुलढाणा नगरपरिषद सभागृह हॉल येथे
मेहकर, नांदुरा, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, मोताळा व संग्रामपूर
नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत संबंधित नगरपरिषदांच्या 5 टक्के निधीचा
वापर, आर्थिक दुर्बल घटकांवरील खर्च, नागरी दलित वस्ती, रमाई आवास योजना, लाड पागे
योजनेतील प्रलंबित प्रकरणे, अनुकंपा तत्त्वावरील प्रकरणे तसेच अनुसूचित जातींसाठी प्राप्त
निधीबाबत सविस्तर आढावा व तपासणी, दुपारी 2 वाजता राखीव, त्यानंतर सोयीनुसार मुंबईकडे
रवाना होतील.
Comments
Post a Comment