मागासवर्गीय शेतकरी व महिलांसाठी अनुदान योजना; 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
बुलढाणा, (जिमाका) दि. 02: जिल्हा
परिषद समाजकल्याण विभाग यांच्या 20 टक्के सेसफंड योजनेअंतर्गत सन 2025-26 आर्थिक वर्षासाठी
मागासवर्गीय शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर 5 एच.पी. विद्युत मोटार पंप तसेच मागासवर्गीय
महिलांसाठी शिलाई मशीन पुरविण्याची योजना राबविण्यात येत आहे. इच्छुक शेतकरी व महिलांनी
आवश्यक कागदपत्रासह दि. 15 जानेवारीपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी
गुलाब खरात यांनी केले आहे.
सदर
योजनेसाठीचे अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून देण्यात आले असून, परिपूर्ण अर्ज
व आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्याचे यापुर्वी कळविण्यात आले होते. तथापि जास्तीत जास्त
पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा या उद्देशाने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यानुसार, मागासवर्गीय शेतकऱ्यांनी 5 एच.पी. विद्युत मोटार पंप योजनेसाठी व मागासवर्गीय
महिलांनी शिलाई मशीन योजनेसाठी आपले अर्ज 15 जानेवारी 2026 पर्यंत संबंधित गट विकास
अधिकारी, पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करावेत. अधिक माहितीसाठी पात्र लाभार्थ्यांनी
आपल्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन व जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रमोद यंडोले यांनी
केले आहे.
00000
Comments
Post a Comment