Wednesday 30 June 2021

DIO BULDANA NEWS 30.6.2021

 

नांद्राकोळी येथील सोयाबीन शेतीला निविष्ठा व गुणनियंत्रक संचालकांची भेट

  • बिज प्रक्रिया केलेले सोयाबीन पीक व शेडनेटची पाहणी  

बुलडाणा,(जिमाका) दि.30 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत मौजे नांद्राकोळी तालुक्यातील सुभाष बाबुराव राऊत यांचे शेतावर संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी 27 जुन 2021 रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी शेडनेटची पाहणी व चर्चा केली. त्यामध्ये लागवड करण्यात आलेल्या पिकॅडोर मिरची संदर्भत लागवड तंत्र, खत, एकात्मिक किड व्यवस्थापन, काढणी व्यवस्थापन, विक्री व्यवस्था या संदर्भात चर्चा व मार्गदर्शन केले.

     तसेच सोयाबीन पेरलेल्या शेतामध्ये भेट देवून सोयाबीन वाण एम ए यु एस 158 ची पाहणी केली. यावेळी उगवलेले सोयाबीन बिजांकुर हे निळ्या रंगाचे आढळून आले. या विषयी शेतकऱ्यांशी चर्चेअंती  घरच्या सोयाबीन बियाण्याला कार्बनडेन्झीम व मॅन्कोझेब बुरशीनाशकाची बिज प्रक्रिया केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गावामध्ये कृषी विभागाने घरचे बियाणे वापरणे, उगवण क्षमता चाचणी घेणे व बिज प्रक्रिया मोहीम राबवून त्याचे महत्व शेतकऱ्यांना पटल्यामुळे गावातील जवळपास 90 टक्के शेतकऱ्यांनी बिज प्रक्रिया करुन सोयाबीन बियाणे पेरणी केल्याचे शेतकरी सुभाष बाबुराव राऊत यांनी सांगितले.

  बिज प्रक्रिया मोहीम यशस्वी केल्याबद्दल संचालक यांनी शेतकऱ्यांचे व कृषी सहाय्यक यांचे कौतुक केले. बुलडाणा उप विभागामध्ये बिजप्रक्रियेची 2411 प्रात्यक्षीके राबविली असून त्यामध्ये 17000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त सहभाग दिसून आला. सदर भेटीच्या वेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे, कृषी पर्यवेक्षक आर. जि. देशमुख, आर. टी. पवार, उपसरपंच मनोज जाधव, ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्य कृषी सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे गावातील

इतर शेतकरी उपस्थित होते, असे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*******

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 3559 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 37 पॉझिटिव्ह

  • 55 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3569 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3559 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 37 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 24 व रॅपीड टेस्टमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 684 तर रॅपिड टेस्टमधील 2875 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3559 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : 3, खामगांव शहर : 1, खामगांव तालुका : पारखेड 2, सुटाळा 1, जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : बोराळा 3, सिं. राजा शहर : 1,  सिं. राजा तालुका : मलकापूर पांग्रा 1, वाढोणा 1, दे. राजा तालुका : पिंप्री आंधळे 1,  किन्ही 2, मलकापूर तालुका : उमाळी 4, बुलडाणा शहर : 2, लोणार तालुका : पळसखेड 1, किनगांव जट्टू 1,  देऊळगांव 1, रायगांव 1, भुमराळा 3, चिखली शहर : 2, चिखली तालुका : मुंगसरी 1, मोताळा तालुका : पुन्हई 1, संग्रामपूर तालुका : बोडखा 1,  मेहकर शहर : 1,   परजिल्हा वाडेगांव ता. बाळापूर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 37 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 55 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 573780 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85934 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  85934 आहे.

  आज रोजी 1723 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 573780 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86675 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85934 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 78 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 663 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*******

 

                 कृषि दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद

  • अंजनी बु ता. मेहकर येथील शेतकरी पुरूषोत्तम अवचार यांचा समावेश

बुलडाणा,(जिमाका) दि.30 : रब्बी हंगाम 2020-21 मधील राज्यस्तरीय पीक स्पर्धांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. या विजेत्या शेतकऱ्यांमधून चार निवडक शेतकऱ्यांचा सत्कार 1 जुलै 2021 रोजी कृषी दिनी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मंत्रालय, मुंबई येथे करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विभागातील रिसोर्स बँकेतील एक शेतकरी झूम प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. या सर्व शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील अंजनी बु ता. मेहकर येथील शेतकरी पुरूषोत्तम श्रीपत अवचार यांचा समावेश असणार आहे.  या कार्यक्रमाचे थेट प्रसारण www.youtube.com/C/AgricultureDepartmentGoM या कृषी विभागाच्या युट्यूब चॅनेलवरून करण्यात येणार आहे.

    कार्यक्रमासाठी तालुक्यातील दोन पिकांमध्ये उच्च उत्पादन घेणाऱ्या दोन शेतकरी व पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांना विशेष उपस्थित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कृषी संजीवनी मोहीम समारोप आणि कृषी दिन कार्यक्रम गुरुवार,दिनांक 1 जुलै रोजी दू. 12.30 वाजता मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन लाईव्ह प्रसारण, कृषी विभागाच्या www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM  यूट्यूब चॅनलद्वारे करण्यात येणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी वरील युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून कार्यक्रमाचे थेट प्रसारण पाहावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

*****

 

Tuesday 29 June 2021

DIO BULDANA NEWS 29.6.2021

 मुसळधार पर्जन्यधारांनी जिल्हा चिंब....

  • सिंदखेड राजा, चिखली व मोताळा तालुक्यात दमदार पाऊस
  • कोराडी मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 - जिल्ह्यात 28 जुन रोजी मुसळधार पर्जन्यधारांची बरसात झाली. पावसाने सर्वत्र हजेरी लावत कमी-अधिक प्रमाणात पर्जन्यदान केले. यामुळे निश्चितच खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे.  घाटावरील तालुक्यांमध्ये दमदार पर्जन्यवृष्टी झाली, तर घाटाखालील तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजा उर्वरित पेरण्या करण्यासाठी सज्ज झाला आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सिंदखेड राजा, चिखली व मोताळा तालुक्यात दमदार पावसाची नोंद करण्यात आली आहे.  सिं. राजा तालुक्यातील कोराडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने मेहकर तालुक्यातील कोराडी मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. प्रकल्पाच्या सांडव्यावरून नदी पात्रात पाणी वाहत आहे.

   जिल्ह्यात आज 29 जुन 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची – सर्वात जास्त पाऊस सि. राजा : 48.1 मि.ली (250.7 मि.ली), चिखली : 43.2 (234.5 मि.ली), मोताळा : 36.9 (113.4), बुलडाणा : 30 (130.3), मेहकर : 27.5 (259.9), दे. राजा: 26.3 (149), मलकापूर : 25.8 (69.4), लोणार : 24.2 (151), जळगांव जामोद : 19.4 (43.6), खामगांव : 13.3 (155.3), संग्रामपूर : 12.8 (115.3), नांदुरा : 12.1 (74.8) आणि सर्वात कमी शेगांव तालुक्यात : 6.6 (32.2) मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 326.2 मि.ली पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 25.1 मि.ली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस मेहकर तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस शेगांव तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2021 पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी 136.9 मि.ली आहे.

   बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार कोराडी मध्यम प्रकल्प तुडूंब भरल्यामुळे सांडवा वाहत आहे. रात्री 10.30 वाजेदरम्यान प्रकल्पाच्या सांडव्यावरून नदी पात्रात 10 से.मी उंचीचा 8.76 क्युबीक मीटर प्रति सेकंद विसर्ग होत होता. त्यामुळे नदीकाठावरील मेहकर तालुक्यातील नागझरी, कल्याणा, नेमतापूर, फर्दापूर गावांना प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

********

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 2725 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 26 पॉझिटिव्ह

  • 38 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2751 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2725 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 26 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 15 व रॅपीड टेस्टमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 407 तर रॅपिड टेस्टमधील 2318 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2725 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : संग्रामपूर तालुका : निवाणा 1, पळशी 1, सोनाळा 1, काकनवाडा 1, खामगांव शहर : 4,  खामगांव तालुका : जनुना 1, घाटपुरी 1, सुटाळा 1, दे. राजा तालुका : भिवगण 1, किन्ही 2, चिखली शहर : 1, चिखली तालुका : मेरा बु 1, लोणार तालुका : सावरगांव 1, भुमराळा 1, बिबी 1, पिंप्री खंडारे 1, शेगांव शहर :1, बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : रईखेड टेकाळे 1, जळगांव जामोद तालुका : बोराळा 2,    संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 26 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे उपचारादरम्यान उपजिल्हा रूग्णालय, शेगांव येथे माळीपुरा, शेगांव येथील 75 वर्षीय महिला व स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे मातला ता. बुलडाणा येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 38 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 570221 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85879 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  85879 आहे.

  आज रोजी 1513 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 570221 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86638 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85879 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 96 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 663 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*******

आजी व माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सुट

  • सैनिकांनी लाभ घेण्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.29 : जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक, विधवा पत्नी, विरपत्नी, विरपिता, संरक्षण दलातील शैर्य पदक धारक यांना शासन निर्णया नुसार मालमत्ता करामध्ये सुट देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील बरेच माजी सैनिकांनी या सुटचा लाभ घेतलेला नाही, असे दिसून आले आहे.

      तसेच जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिकांनी करा बाबत सर्व सैनिकांनी एकमेकांना सूचना देण्यात यावी. ग्रामीण भागातील माजी सैनिकांना याबाबत सुचना देण्यात याव्या. आजी सैनिकांना केवळ ग्रामीण भागा मध्ये मालमत्ता करामध्ये सुट देण्यात आली आहे. या सवलतीसाठी त्यांनी युनिट मधून सर्विस करीत असले, तर प्रमाणपत्र सादर करावे. मालमत्ता करात सुट मिळणेकरीता नगरपालिका, नगर पंचायती, ग्रामपंचायती मध्ये मालमत्ता कर भरणा केलेली पावती,  ओळखपत्र, आजी

सैनिकांचे सर्विस प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र तसेच घर माजी सैनिकांच्या पत्नीच्या नावाने असेल तर पी. पी. ओ. सह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात तात्काळ या संधीचा लाभ घेण्या करीता कागद पत्रासह हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

*******

अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

  • वळती येथील शाळा

    बुलडाणा, (जिमाका)दि.29 : चिखली तालुक्यातील वळती येथे नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलांची शासकीय निवासी शाळा आहे. ही शाळा सन 2012-13 पासुन सुरू झालेली आहे.  या शाळेत शैक्षणिक सत्र 2021-22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. शाळेमध्ये वर्ग 6 ते 10 च्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या रिक्त जागांसाठी मोफत प्रवेश सुरू झालेले आहेत. सदर शाळा ही शासकीय असून समाज कल्याण विभागा अंतर्गत संचालीत आहे.

   या शाळेला आय.एस.ओ नामांकन प्राप्त झाले आहे. शाळा ही तीन मजली असून सुसज्ज व स्वचछ वातावरणात आहे. शाळेत मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, पुस्तके यासोबत संगणक शिक्षण, क्रीडा साहित्य, भव्य ग्रंथालय, डिजीटल वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, सुसज्ज जिम साहित्य सुविधा, संगणक प्रशिक्षणासाठी स्वतंत्र संगणक कक्ष, मोफत अंथरून  आदी सुविधा उपलब्ध आहेत. शाळेत विविध क्रीडा व स्पर्धा परीक्षांचे आयोजन व मार्गदर्शन देण्यात येते. तसेच विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांचे आयोजन, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे वैयक्तिक लक्ष देण्यात येते.  प्रवेशासाठी अनु जाती 80 टक्के, अनु जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांग 3 टक्के व एसबीसी 2 टक्के याप्रमाणे आरक्षण आहे. तरी इच्छूक पालकांनी त्वरित कार्यालयीन वेळेत शाळेत संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याध्यापक एम. एस जाधव यांनी केले आहे.

***********

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर

• जुलै ते डिसेंबर 2021 दरम्यानचा कार्यक्रम

बुलडाणा, (जिमाका)दि.29 : माहे जुलै ते डिसेंबर 2021 दरम्यान राबविण्यात येणारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शिबिराच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक व सहायक रोखपाल हजर राहणार आहेत.

       शिबिर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे – जुलै 2021 मध्ये : जळगाव जामोद 5 जुलै, शेगाव 7 व 26 , मेहकर 8 व 28, खामगांव 9 व 30, चिखली 14, नांदुरा 19, मलकापूर 12 व 22, सिंदखेड राजा 23, लोणार 16 व देऊळगाव राजा येथे 15 जुलै रोजी होणार आहे. ऑगस्ट 2021 मध्ये : जळगाव जामोद 3 ऑगस्ट, शेगाव 5 व 26, मेहकर 9 व 27, खामगांव 11 व 30, चिखली 13, नांदुरा 20, मलकापूर 12 व 23, सिंदखेड राजा 24, लोणार 18 व देऊळगाव राजा 17 ऑगस्ट रोजी होणार आहे. सप्टेंबर 2021 मध्ये : जळगाव जामोद 3 सप्टेंबर, शेगाव 7 व 27, मेहकर 9 व 29, खामगांव 14 व 30, चिखली 16, नांदुरा 21, मलकापूर 15 व 22, सिंदखेड राजा 24, लोणार 20 व देऊळगाव राजा 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. ऑक्टोंबर 2021 मध्ये : जळगाव जामोद 4 ऑक्टोंबर, शेगाव 5 व 26, मेहकर 8 व 28, खामगांव 11 व 29, चिखली 13, नांदुरा 20, मलकापूर 12 व 22, सिंदखेड राजा 25, लोणार 18 व देऊळगाव राजा 14 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये : जळगाव जामोद 8 नोंव्हेबर, शेगाव 9 व 26, मेहकर 11 व 29, खामगांव 12 व 30, चिखली 16, नांदुरा 22, मलकापूर 15 व 23, सिंदखेड राजा 25, लोणार 18 व देऊळगाव राजा 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. डिसेंबर 2021 मध्ये : जळगाव जामोद 6 डिसेंबर, शेगाव 8 व 27, मेहकर 9 व 29, खामगांव 10 व 30, चिखली 13, नांदुरा 20, मलकापूर 14 व 22, सिंदखेड राजा 24, लोणार 17 व देऊळगाव राजा 16 डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबत नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती जयश्री दुतोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

Monday 28 June 2021

DIO BULDANA NEWS 28.6.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 979 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 13 पॉझिटिव्ह

• 24 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.28 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 992 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 979 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 13 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 11 व रॅपीड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 369 तर रॅपिड टेस्टमधील 610 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 979 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 3, तालुका : नांद्राकोळी 1, शेगांव शहर : 2, सिं. राजा तालुका : चांगेफळ 1, चिखली तालुका : शेलसूर 1, मेहकर तालुका : भोसा 1, लोणार तालुका : शेलगांव जहागीर 1, खामगांव शहर : 1, खामगांव तालुका : तांबुलवाडी 1, परजिल्हा माहोरा ता. जाफ्राबाद 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 13 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे भंडारी ता. सिं.राजा येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 24 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 567496 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85841 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 85841 आहे.
आज रोजी 1103 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 567496 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86612 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85841 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 110 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 661 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******
कोविडमुळे कुटूंब प्रमुखाचा मृत्यू झालेल्या कुटूंबांना ‘स्माईल’ योजनेचा आधार
• अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटूंब प्रमुख असावा
• महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची योजना
बुलडाणा,(जिमाका) दि.28 : जगात थैमान घालणाऱ्या कोविड 19 या साथरोगामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटूंब प्रमुखाचा मृत्यू झाला असल्यास त्या कुंटूंबियांचे पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मार्फत (support for marginalized individuals for livelihoods enterprie) SMILE स्माईल ही योजना व्यवसायासाठी कर्ज देण्याकरीता अंमलात येत आहे. या योजनेनुसार प्रकल्प मुल्य 1 ते 5 लक्ष रूपये असल्यास कर्ज देण्यात येणार आहे. त्यासाठी एनएसएफडीसी यांचा 80 टक्के सहभाग व 20 टक्के भांडवल अनुदान राहणार आहे. तसेच व्याजदर 6 टक्के असणारआहे.
या योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लक्ष रूपये पर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटूंब प्रमुखाच्या कुटूंबातील सदस्य असावा. कुटूंब प्रमुखाच्या रेशन कार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकाकर आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटूंब प्रमुखाची मिळकत कुटूंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींकरीता नगर पालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र यापैकी एक दस्ताऐवज आवश्यक आहे. तसेच मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधार कार्ड प्रत, उत्पन्नाचा दाखला (3 लक्षापर्यंत), कोविड 19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड व वयाचा पुरवा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटूंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक कार्यालयात अथवा https://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7 या लिंकवर भरण्यात यावी. तरी कोविडमुळे दुर्देवाने कुटूंब प्रमुखाच्या मृत्यू झालेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तींनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम. एस धांडे यांनी केले आहे.
******
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
शेतकऱ्यांना अपघातातील जोखमीसाठी विम्याचे संरक्षण
• अपघाती मृत्यू झाल्यास 2 लक्ष रूपयांची मदत
बुलडाणा,(जिमाका) दि.28 : राज्य शासनाने शेतकऱ्यांना शेती काम करताना अपघाती मृत्यू किंवा कायम अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून विम्याचे कवच प्रदान केले आहे. अशा अपघातांमध्ये जोखमीसाठी विम्याचे संरक्षण यामुळे शेतकरी कुटूंबांना मिळत आहे. या योजनेनुसार शेती करताना अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा धक्का बसणे, रेल्वे व रस्त्यावरील अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, खून, उंचावरून पडून मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यू, दंगलीत होणाऱ्या अपघाती घटनांमुळे होणारे मृत्यू तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो. अथवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटूंबास आर्थिक लाभ देणे आवश्यक असते.
या योजनेमध्ये 7 एप्रिल 2021 ते 6 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा अपघात होवून मृत्यू झाल्यास 2 लक्ष रूपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास 2 लक्ष रूपये, अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास 2 लक्ष रूपये रक्कम देय आहे. तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास त्यासाठी शेतकऱ्यांना कुठलाही विमा उतरविण्याची आवश्यकता नाही. योजनेचा लाभ मिळविण्याकरता मृतक किंवा अपंग व्यक्ती 7/12, 6क, 6 ड (फेरफार) यामध्ये नोंदणीकृत असलेले आणि वय 10 ते 75 वर्ष वयोगटातील शेतकरी पात्र आहेत.
शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास योजने तंर्गत लाभ घेण्यासाठी https://www.auxilliuminsurance.com /insurance_company.html या लिंकवर पुर्वसुचना देण्यात यावी. तसेच संबंधित तालुका कृषि अधिकारी अथवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा व दावा अर्ज कागदपत्रांसह दाखल करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे. तसेच योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. योजनेसाठी विमा सल्लागार म्हणून मे. ऑक्झिलियम इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि, प्लॉट नंबर 61/4, सेक्टर – 28, प्लाझा हटच्या पाठीमागे, वाशी, मुंबई – 400703, दुरध्वनी क्रमांक 022-27650096, टोल फ्री क्रमांक 1800 220 812, ई मेल gmsavy21@auxilliuminsurance.com आहे. विमा कंपनी म्हणून युनिव्हर्सल सोपो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. युनिट नंबर 601-602, 6 वा मजला, रिलायबल टेक पार्क, क्लाऊड सिटी कॅम्पस, ठाणे-बेलापूर रोड, एरोली, नवी मुंबई-400708, दुरध्वनी क्रमांक 022-41690888, टोल फ्री क्रमांक 1800224030 / 1800 2004030, ई मेल vaibhav. shirsat@universalsompo.com व yogendra.mohite@universalsompo.com आहे.
लाभासाठी ही कागदपत्रे आवश्यक
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभाकरीता खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत. तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपलब्ध असलेला मुळ प्रतीतील अर्ज, दावा अर्ज, सर्व मूळ प्रतीतील 7/12, 6 क व 6 ड (फेरफार), नमुना 8-अ, वारसदाराचे बँक खाते पुस्तकाची छायांकित प्रत, अर्जदाराच्या फोटोसह घोषणापत्र अ आणि घोषणापत्र ब, वयाचा दाखल्यामध्ये मतदान कार्ड, पॅन, चालक परवाना, जन्माचा दाखला, पासपोर्ट, शाळेचा दाखल यापैकी एक साक्षांकित केलेली छायांकित प्रत, मूळ प्रतीतील मृत्यूचा दाखला, प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), अकस्मात मृत्यूची खबर, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेष्ट पंचनामा (मरणोत्तर पंचनामा), पोस्टमार्टम रिपोर्ट (शव विच्छेदन अहवाल), वाहन चालविण्याचा वैध परवाना, व्हिसेरा रिपोर्ट.
***********
देयकांवर ‘एफएसएसएआय’ नोंदणी क्रमांक टाकणे बंधनकारक
• अन्न व्यावसायिकांना 1 ऑक्टोंबरपासून सक्ती
बुलडाणा,(जिमाका) दि.28 : अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे 8 जून 2021 च्या आदेशानुसार सर्व अन्न व्यावसायिकांना कॅश रिसीप्ट, पर्चेस, कॅश मेमो व देयक या सर्वांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत प्राप्त 14 अंकी परवाना व नोंदणी क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. ही सक्ती 1 ऑक्टोंबर 2021 पासून लागू करण्यात आली आहे.
या निर्णयामागे ग्राहकांना सदर अन्न व्यावसायिकाबद्दल अतिरिक्त माहिती उपलब्ध करणे व माहितीच्या अनुषंगाने ते एखाद्या अन्न व्यावसायिकाबाबत गरजेनुसार एफएसएसएआय पोर्टलवर तक्रार नोंदविता येणे हा हेतू आहे. त्यामुळे सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सर्व देयकांवर 14 अंकी एफएसएसएआय परवाना/ नोंदणी क्रमांक 1 ऑक्टोंबर 2021 पासून नमूद करावा. अन्यथा अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल, असे सहायक आयुक्त (अन्न) स. द केदारे यांनी कळविले आहे.

Saturday 26 June 2021

DIO BULDANA NEWS 26.5.2021


जिल्हा तिसऱ्या श्रेणीत : 28 जूनपासून निर्बंध लागू

*किराणाभाजीपाला व फळेसर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहणार

सलूनस्पाब्युटी पार्लर पूर्व नोंदणी पद्धतीने 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील                                           बिगर  जीवनावश्यक सेवांची  दुकाने शनिवार व  रविवारी  बंद  असतील                                                       

बुलडाणा, (जिमाका) दि. २६ : राज्य शासनाने कोविड 19 च्या अनुषंगाने डेल्टा प्लस व्हेरिएंट चा धोका वाढल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्याबाबत आदेश दिले आहे.  त्यानुसार  जिल्ह्यात तिसऱ्या श्रेणीतील निर्बंध  सोमवार28 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजे पासून पुढील आदेशापर्यांत लागू करण्यात आले आहे.  असे  प्रतिबंधात्मक आदेश आज  जिल्हा दंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी  पारित केले आहे.

     या आदेशानुसार सर्व किराणा दुकानेस्वस्त धान्य दुकानेभाजीपाला दुकानेफळ विक्रेतेमिठाई दुकानेखाद्य पेय विक्री दुकानेपिठाची गिरणीतसेच सर्व प्रकारची खाद्य पदार्थाची दुकाने (चिकनमटनपॉल्ट्री,मासे आणि अंडी दुकाने)पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकानेतसेच दुध व दुग्धजन्य विक्री पदार्थ (डेअरी) आदी दुकाने५० टक्के आसन क्षमतेसह शिव भोजन केंद्र दररोज सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच दुध व दुग्धजन्य विक्री पदार्थ (डेअरी) दुकानेदुध  संकलन  केंद्रे दूध वितरण  सायंकाळी  ६ ते  रात्री  ८ वाजेपर्यंत  सुरु राहतील.    सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक सेवा अंतर्गत येत असलेली दुकानेप्रतिष्ठाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. ही दुकाने शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील. मॉल्सचित्रपटगृहेनाट्यगृहे  पूर्णतः बंद राहतील.

    हॉटेल्सरेस्टॉरंट व खानावळ 50 टक्के आसन क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार  तसेच अन्य दिवशी दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत केवळ घरपोच सेवेला परवानगी राहील. सार्वजनिक ठिकाणे,  खुले मैदानफिरणे व सायकलिंग साठी सकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत परवानगी असेल. सर्व प्रकारची खाजगी कार्यालये,  सर्व शासकीयनिमशासकीय कार्यालये नियमितपणे  सुरू राहतील. दररोज सकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत खेळांना परवानगी असेल. सामाजिकसांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम स्थानिक प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीने व ५० टक्के आसन

क्षमतेसह घेण्यास परवानगी असेल. असे कार्यक्रम शनिवार व रविवार बंद असतील.

    सर्व केशकर्तनालयेसलुन,स्पा,ब्युटी पार्लर एकूण क्षमतेच्या ५० टक्के पूर्व नोंदणीसह दुपारी ४ वाजेपर्यंत  सुरू राहतील. वातानुकूलित सेवेस परवानगी नाही. लग्न समारंभ बँड पथककॅटरिंग आदींसह पूर्व परवानगीने कोविड  नियमांचे पालन करून  ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. अंत्यसंस्काराला २० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी असेल.सभाबैठका आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीमध्ये घेता येतील.बांधकामावर जर बाहेरून मजूर असतील तर दुपारी ४ वाजेपर्यंत करता येतील. ई कॉमर्स व वस्तू सेवा नियमितपणे सुरू राहतील. सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेसह सुरू राहीलमात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहील. जास्तीत जास्त तीन व्यक्तींच्या परवानगीसह मालवाहतूक नियमितपणे सुरू राहील. आंतर जिल्हा व जिल्ह्याबाहेर प्रवाशी वाहतूक सुरू राहील. मात्र स्तर ५ मधील जिल्ह्यात जाणे येणे होत असल्यास ई पास आवश्यक राहील.

  सर्व खाजगी व सार्वजानिक वैदयकीय सेवापशु चिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा २४ तास सुरु राहतील. सर्व प्रकारचे सहकारी संस्थाखाजगी व शासकीय बँकाविमा व वैद्यकीय सेवा कंपन्यानॉन बँकिंग वित्तीय संस्था सुरू राहतील. वीज  व  गॅस पुरवठा  सेवा एटीएम  आणि  डाक  सेवाकोल्ड  स्टोरेज  आणि वखार  सेवा आदी  नियमित  सुरु  राहतील.जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहील. तसेच  सायंकाळी ५ नंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. सदर कालावधीत नागरिकांना मुक्त संचार करण्यास मनाई राहील. सर्व नागरिकआस्थापनादुकाने यांनी मास्क असणेहात सॅनीटाईज करणे आणि सामाजिक अंतर राखणे या कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे. 

 सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदाभारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे, असेही  आदेशात  नमूद  आहे.

********

 

कोरोना अलर्ट : प्राप्त २७६५ कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर ३१ पॉझिटिव्ह

•             ५१ रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.२६  : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २७९६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २७६५ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ३१ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील २१ व रॅपीड टेस्टमधील १० अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ४११ तर रॅपिड टेस्टमधील २३५४ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे २७६५ अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : २,  चिखली शहर  : २चिखली  तालुका : पेठ १इसरूळ १बेराळा १सवना २,  नांदुरा शहर  : ८नांदुरा  तालुका  : खेडगाव  १,   मोताळा तालुका : पुन्हई  १,  संग्रामपूर तालुका : कोलद १खामगांव शहर : १,  दे. राजा तालुका : भिवगण १पोखरी  १,     जळगांव जामोद शहर : १,  मेहकर  शहर  : ५,  मेहकर तालुका : गांगलगाव १,  परजिल्हा रस्ताळा  ता. जाफ्राबाद  १  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात ३१ रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे उपचारादरम्यान स्त्री रूग्णालयबुलडाणा येथे कोलवड  ता. बुलडाणा  येथील ५९ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज ५१ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत ५६३८५१ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ८५७६७ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  ८५७६७ आहे.

  आज रोजी १३३८ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ५६३८५१ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८६५१५ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ८५७६७ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात ८९ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 659 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहेअशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****



राजर्षी  शाहू  महाराज यांना जिल्हाधिकारी  कार्यालयात  अभिवादन

बुलडाणा,(जिमाका) दि.२६  : सामाजिक  न्यायाचे  प्रणेते   राजर्षी  शाहू महाराज  यांना  आज त्यांच्या  जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी  कार्यालयात  अभिवादन करण्यात  आले . निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश  गिते  यांनी त्यांच्या  प्रतिमेला  पुष्पहार करून  अभिवादन केले. तसेच उपस्थित अधिकारी  व  कर्मचारी  यांनी पुष्प अर्पण करून  अभिवादन केले.


Friday 25 June 2021

DIO BULDANA NEWS 25.6.2021

 



कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा

          - पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे 

*कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि. २५: राज्यात मागील एक ते दीड वर्षापासून कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव सुरू आहे. या दरम्यान दोन संसर्गा च्या लाटा आलेल्या आहेत. मागील लाटेची दाहकता आपण अनुभवली आहे. पुढे भविष्यात आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या लाटेचा धोका ओळखून प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले. 

  कोरोना संसर्ग नियत्रंण आढावा बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. त्यावेळी आढावा घेतांना पालकमंत्री डॉ शिंगणे बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ नितीन तडस, अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, सहायक आयुक्त श्री बोर्डे आदी उपस्थित होते. 

  जिल्ह्यात निर्माणाधीन असणारे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लवकर पूर्ण करून कार्यान्वित करण्याच्या सूचना देत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लवकर कार्यान्वित करावे. जिल्हा प्राणवायू निर्मितीत स्वयंपूर्ण करावा. कुठल्याही आपद कालीन परिस्थितीत प्राणवायू ची कमतरता पडायला नको. 

    ते पुढे म्हणाले, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. कोरोना सोबतच अन्य साथ रोग नियंत्रणा कडे लक्ष द्यावे. दूषित पाण्यामुळे साथ रोग पसरणार नाहीत, याची काळजी घ्यावी. संबधित विभागाने याबाबत सर्वेक्षण करून साथ रोग नियत्रंण करावे. कोरोना चा तिसऱ्या लाटेत संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग सुरक्षेचे नियम काटेकोर पणे पाळावे. कोरोनापासून वाचविण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुवावे किंवा सॅनीटाईज करावे, सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे. या त्रिसूत्री चा उपयोग करावा. कोरोना गेला असे समजून वागू नका, असे आवाहनही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले. याप्रसंगी संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Wednesday 23 June 2021

DIO BULDANA NEWS 23.6.2021

 

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2020 अर्ज आमंत्रित

बुलडाणा, (जिमाका) दि. 23: केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजनेअंतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन

2020 करीता नामांकनाचे प्रस्ताव दि. 30 जुन 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे दोन प्रतीत कायार्लयीन वेळेत सादर करावे एक प्रत dsob ld@gmail.com या मेल वर पाठवावी. सदर पुरस्कारासाठी नामांकणाचे प्रस्ताव सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी 2018, 2019,2020 तीन वर्षामधील उत्कृट कामगिरी असावी, साहसी उपक्रम हे जमिन, पाणी व हवेमधील असणे आवश्यक आहे. खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ठ असणे आवश्यक आहे. त्याबाबतची माहिती दोन ते तिन पानामध्ये हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये प्रस्तावासोबत सादर करावी.

तसेच जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2020 करीता नामांकनाचे प्रस्तावा सोबत आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, कात्रणे इत्यादी सोबत जोडणे आवश्यक राहील असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस,यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

********

पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक योजनेचे फळपिकांना ' विमा कवच '

पुढील तीन वर्षासाठी योजनेस मान्यता
बुलडाणा, (जिमाका) दि. 23: प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना वर्ष 2021-22 करिता जाहीर करण्यात आली आहे. तसेच ही योजना 2022-23 व 2023-24 या वर्षांसाठी मृग बहारमध्ये लागू करण्यात आली आहे. या योजनेतील विम्याचा लाभ मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू, सिताफळ, द्राक्ष, लिंबू व चिकू या आठ फळपिकांसाठी मिळणार आहे. तसेच आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, आंबा, केळी आणि द्राक्ष या फळपिकांकरीता लागू करण्यास 18 जुन 2021 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. तसेच स्ट्रॉबेरी व पपई या फळपिकांकरिता प्रायोगिक तत्त्वावर योजनेचे विमा कवच मिळणार आहे. कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त पाऊस, जादा आर्द्रता, अवेळी पाऊस, कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त तापमान व गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते. फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखल्या जाते.

अधिसुचित क्षेत्रात अधिसुचीत फळपीक घेणारे (कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. ही योजना या वर्षापासून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचीत क्षेत्रातील अधिसूचीत पिकासाठी ऐच्छीक आहे. या योजनेतंर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता 30 टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसुचीत फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे. तसेच अधिसुचीत फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येणार आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा सरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. फळपीक निहाय निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय राहणार आहे. विमा क्षेत्राचा घटक हा महसूल मंडळ राहणार आहे. या योजने अंतर्गत 30 ते 35 टक्के पर्यंतचे अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले असून 35 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी 50 : 50 टक्के प्रमाणे भरावयाचा आहे.

बँकेकडून अधिसूचित फळ पिकांसाठी पीककर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकरी यांना तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची मुदत फळपिकनिहाय आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था / बँक/ आपले सरकार सेवा केंद्र / विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे अथवा शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत मृग व आंबिया बहारासाठी वेगवेगळी आहे. मृग बहारासाठी संत्रा, पेरू, लिंबू या फळ पिकांकरिता 2021 मध्ये 30 जुन व 2022, 2023 करीता 14 जून, चिकू व मोसंबी फळपिकासाठी 30 जुन, तर डाळींब पिकाकरिता 14 जुलै, सिताफळ पिकासाठी 31 जुलै राहणार आहे.

तसेच आंबिया बहारासाठी द्राक्ष फळपिकासाठी 15 ऑक्टोंबर, मोसंबी व केळी 31 ऑक्टोंबर, संत्रा 30 नोव्हेंबर, आंबा 31 डिसेंबर, डाळिंब फळ पिकाकरिता 14 जानेवारी 2022 अंतिम मुदत असणार आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेशी किंवा क्षेत्रीय अधिकारी असलेल्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.

विमा संरक्षीत रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता

संत्रा : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 80 हजार व भरावयाचा विमा हप्ता मृग बाहारासाठी 4800 रूपये, आंबियासाठी 11600 रुपये, मोसंबी : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 80 हजार व भरावयाचा विमा हप्ता मृग व आंबिया करिता 4000 रूपये, पेरु : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 60 हजार व भरावयाचा विमा हप्ता 3000 रूपये, डाळींब : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 1 लक्ष 30 हजार व भरावयाचा विमा हप्ता 6500 रूपये, आंबिया साठी 20800 रुपये, लिंबू : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 70 हजार व भरावयाचा विमा हप्ता 3850 रूपये, केळी : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 1 लक्ष 40 हजार व भरावयाचा विमा हप्ता आंबिया साठी 7000 रूपये, द्राक्ष : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 3 लक्ष 20 हजार व भरावयाचा विमा हप्ता आंबिया बहार करिता 16000 रूपये, सिताफळ: प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 55 हजार व भरावयाचा विमा हप्ता मृग बहार करिता 2750 रूपये, चिकू : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 60 हजार व भरावयाचा विमा हप्ता मृग बहार करिता 13200 रूपये, आंबा : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 1 लक्ष 40 हजार व भरावयाचा विमा हप्ता आंबिया बहार करिता 15400 रूपये,

मृग बहारासाठी समाविष्ट महसूल मंडळ

संत्रा : डोणगाव, हिवरा आश्रम, मेहकर, शेलगांव देशमुख, जानेफळ ता. मेहकर, अंजनी खु, सुलतानपूर ता. लोणार, आडगांव ता. खामगांव, दे.मही, अंढेरा, मेहुणा राजा ता. दे.राजा, बावनबीर, सोनाळा ता. संग्रामपूर, जामोद, जळगाव ता. जळगांव जा. मोसंबी : सिं.राजा, सोनोशी, किनगांव राजा, दुसरबीड, मलकापूर पांग्रा, शेंदूरर्जन, साखरखेर्डा ता. सिं.राजा, म्हसला बु ता. बुलडाणा, चिखली ता. चिखली, पेरू : साखळी बु ता. बुलडाणा, चिखली, चांधई, हातणी, मेरा खुर्द, एकलारा ता. चिखली, चांदुर बिस्वा, निमगांव ता. नांदुरा, पिं. काळे, जळगांव जामोद, वडशिंगी ता. जळगांव जा, डाळींब : पेठ, चिखली, चांधई, हातणी, कोलारा, अमडापूर, शेळगांव आटोळ ता. चिखली, बुलडाणा व धाड ता. बुलडाणा, शेलापूर बु, पिंप्री गवळी, पिं. देवी, मोताळा, धा. बढे, बोराखेडी ता. मोताळा, हिवरखेड, काळेगांव ता. खामगांव, दे.राजा, दे. मही, तुळजापूर, मेहुणा राजा, अंढेरा ता. दे.राजा, जामोद ता. जळगांव जा, नरवेल व जांबुळधाबा ता. मलकापूर. लिंबू : पि. काळे, जामोद, वडशिंगी ता. जळगांव जा, शेलापूर बु ता. मोताळा, आडगांव व पारखेड ता. खामगांव. सिताफळ : शेळगाव आटोळ, कोलारा, मेरा खू ता. चिखली, जामोद, वडशींगी, आसलगाव ता. जळगाव जामोद, संग्रामपूर तां. संग्रामपूर, वरवंड, जानेफळ, नायगाव दत्तापूर, हिवरा आश्रम ता. मेहकर, हिरडव, टिटवी, सुलतानपूर ता. लोणार, किनगाव राजा, शेंदूर्जन, साखरखेर्डा, सि. राजा ता. सि. राजा.
*******************
कोरोना अलर्ट : प्राप्त 2795 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 73 पॉझिटिव्ह
• 54 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.23 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2868 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2795 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 73 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 58 व रॅपीड टेस्टमधील 15 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 450 तर रॅपिड टेस्टमधील 2345 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2795 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 3, बुलडाणा तालुका : रस्ताळा 1, दत्तापुर 2, हतेडी 1, सावंगी 1, शिरपूर 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : नायगाव बू 3, पळसखेड 1, नागनगाव 1, पाटोदा 1, धोडप 1, दे. राजा तालुका : भिवगण 7, सरंबा 2, दे. मही 1, मेहुणा राजा 1, सिं. राजा तालुका : सायाळा 1, निमगाव वायाळ 1, खामगांव शहर : 6, खामगाव तालुका : सुटाळा बू 1, टेंभुर्णा 1, दिवठाणा 1, संग्रामपूर तालुका : चौंढी 2, शेगाव शहर : 2, शेगांव तालुका : चिंचखेड 1, भोनगाव 1, जळगांव जामोद तालुका : धानोरा 4, लोणार तालुका : शिवणी पिसा 1, टिटवी 1, सरस्वती 1, रायगाव 1, तांबोळा 1, अंजनी 1, सुलतानपूर 1, मोप 1, मेहकर शहर : 8, मेहकर तालुका : गणपुर 1, परतापुर 1, मलकापूर शहर :1, मलकापूर तालुका : उमाळी 2, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 73 रूग्ण आढळले आहे. तसेच उपचारादरम्यान पिंप्री गवळी ता. मोताळा येथील 55 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 54 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 554891 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85632 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 85632 आहे.
आज रोजी 1538 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 554891 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86406 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85632 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 118 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 656 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Tuesday 22 June 2021

DIO BULDANA NEWS 22.6.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 2710 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 40 पॉझिटिव्ह

• 49 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2754 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2710 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 40 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 25 व रॅपीड टेस्टमधील 15 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 648 तर रॅपिड टेस्टमधील 2062 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2710 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : येळगांव 1, देऊळघाट 1, रस्ताळा 1, चिखली शहर : 1, चिखली तालुका : गांगलगांव 1, मुंगसरी 1, दे. घुबे 1, मालगणी 2, दे. राजा शहर : 3, दे. राजा तालुका : उंबरखेड 1, भिवगण 1, सिं. राजा तालुका : भंडारी 1, दत्तापूर 2, नागझरी 1, खामगांव शहर : 3, संग्रामपूर तालुका : कोलद 1, शेगांव तालुका : हिंगणा 1, नांदुरा तालुका : दोंडगाव 3, जिगांव 2, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 1, लोणार तालुका : दाभा 1, खुरमपूर 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : उकळी 2, मलकापूर तालुका : घिर्णी 1, उमाळी 2, परजिल्हा जाफ्राबाद जि. जालना 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 40 रूग्ण आढळले आहे. तसेच उपचारादरम्यान किनगाव जट्टू ता. लोणार येथील 48 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 49 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 552096 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85578 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 85578 आहे.
आज रोजी 997 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 552096 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86333 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85578 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 100 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 655 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******

इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी

कामगारांनी नोंदणी करावी
बुलडाणा,(जिमाका) दि.22 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांची मंडळात नोंदणी करून त्यांना विविध कल्याणकारी विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. लगतच्या 12 महिन्यात बांधकाम मजूर म्हणून किमान 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केलेल्या बांधकाम कामगारांची मंडळात नोंदणी करण्यात येवून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ डीबीटी पध्दतीने खात्यात जमा करण्यात येतो.

तसेच जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना नोंदणी व नुतणीकरणाची पावती व स्मार्ट कार्ड प्राप्त करण्याकरिता कार्यालयाद्वारे एसएमएस अथवा फोन द्वारे कळविण्यात येणार आहे. नंतर कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले स्मार्ट कार्ड अथवा नुतणीकरण पावती प्राप्त करुन घ्यावी, कोविड -19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता विनाकारण कार्यालयात कामगारांनी गर्दी करु नये. तसेच सोमवार रोजी कार्यालयात बांधकाम कामगारांची गर्दीमुळे सर्व कामगारांचे कामकाज करणे शक्य नाही. यामुळे विविध ठिकाणाहून आलेल्या कामगारांना आर्थिक, मानसिक होणारा नाहक त्रास टाळण्याकरीता कार्यालयाद्वारे एसएमएस अथवा फोनद्वारे कळविल्या शिवाय पावती अथवा स्मार्ट कार्ड घेण्याकरीता येवू नये.

तालुकानिहाय कार्यालयात येवून स्मार्ट कार्ड अथवा पावती प्राप्त करण्याची कार्यपध्दतीत वरील प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे. याची सर्व बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी, असे सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*******

प्रादेशिक लोकसंपर्क विभागाच्या
सहकार्याने 100 दिवसांची मॅरेथोन योग कार्यशाळा मालिका यशस्वी
बुलडाणा,(जिमाका) दि.22 : माहिती आणि प्रसारण ,मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो (आरओबी) आणि पुण्याच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने संयुक्तपणे आपल्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ‘सामान्य योगाभ्यास नियम’ अंतर्गत थेट योगाभ्यास सत्रे घेण्यास सुरुवात केली आहे. सलग 100 दिवस चालणारी ही सत्रे 13 मार्च 2021 पासून दररोज सकाळी सात ते आठ या वेळेत ऑनलाईन प्रसारित केली जात असून, आंतरराष्ट्रीय योगदिनापर्यंत ही सत्रे सुरु होती. या सत्रांची संकल्पना ‘कल्याणासाठी योग’ अशी आहे.

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या संचालक प्रा. के सत्यालक्ष्मी यांनी या सत्रांविषयी माहिती देतांना सांगितले की, सध्या कोविड महामारीच्या संकटकाळात ही संकल्पना अत्यंत चपखल आहे . “सध्या लोकांना आलेला तणाव, अस्वस्थता आणि निराशेचे वातावरण दूर करण्यासाठी ही सत्रे अत्यंत प्रभावी स्वयं व्यवस्थापन शिकवणारी ठरली, कोविडच्या या आव्हानात्मक काळात लोकांचे कल्याण साधण्यासाठी या सत्रांचा मोठा लाभ झाला.या उपक्रमाचे उद्दिष्ट लोकांना योगाभ्यासाविषयक सर्वसामान्य नियमांची ओळख करुन देणे हेही होते.” असेही त्या म्हणाल्या. ही ऑनलाईन सत्रे आयुष मंत्रालयाने तयार केलेल्या सामान्य योगाभ्यास कार्यक्रमानुसार तयार करण्यात आली आहे. ‘सामान्य योगाभ्यास’ म्हणजे 45 मिनिटांच्या एका सत्रात सर्वसामान्यांना करता येणारी दैनंदिन आसने आणि प्राणायामाचा निश्चित कार्यक्रम आहे.

ही लाईव्ह योगसत्रे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून घेतली गेली आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो च्या (महाराष्ट्र आणि गोवा) तसेच एनआयएन पुणे यांच्या सोशल मिडीया पेजेसवरुन ती थेट दाखवण्यात आली. ही सर्व सत्रे खालील लिंकवर उपलब्ध आहेत. https://www.youtube.com/c/MAHAROB/videos
आरओबी तसेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी याविषयी माहिती देतांना सांगितले. “कोविड महामारीमुळे घालण्यात आलेली बंधने लक्षात घेता, हा उपक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश, लोकांना ऑनलाईन स्वरूपात योगाभ्यास प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा होता. यंदा आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त केंद्र सरकारची संकल्पना, “योगासह रहा, घरीच रहा’ अशी असून हा उपक्रम त्या संकल्पनेशी सुसंगतचा ठरला, असेही त्यांनी सांगितले.

******

जिल्ह्यामध्ये आजपासून 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरु

बुलडाणा, (जिमाका)दि.22 : जिल्ह्यामध्ये आज 22 जून 2021 पासून कोविड ची 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर लसीकरण मोहीमेस आज 5 आरोग्य संस्थांमधून सुरुवात करण्यात आली आहे.

यामध्ये जिल्हा रुग्णालय बुलडाणा, ग्रामीण रुग्णालय जळगांव जामोद, प्राथमिक आरोग्य केंद्र बोराखेडी ता. मोताळा, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकरखेड ता. नांदुरा, प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा ता. दे.राजा आदींचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लवकरच सदर लसीकरण मोहीम कार्यान्वित होईल, असे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ गोफणे यांनी कळविले आहे.

******

अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू
कोलवड येथील शाळा
बुलडाणा, (जिमाका)दि.22 : तालुक्यातील कोलवड येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलांची शासकीय निवासी शाळा आहे. या शाळेत शैक्षणिक सत्र 2021-22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. शाळेमध्ये वर्ग 6 ते 10 च्या रिक्त जागेसाठी मोफत प्रवेश सुरू झालेले आहेत. सदर शाळा ही शासकीय असून समाज कल्याण विभागा अंतर्गत संचालीत आहे. या शाळेमध्ये मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, पुस्तके यासोबत संगणक शिक्षण, क्रीडा साहित्य, डिजीटल ग्रंथालय, डिजीटल वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, निसर्गरम्य स्वच्छ व सुंदर परिसर आदी सुविधा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी अनु जाती 80 टक्के, अनु जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांग 3 टक्के व एसबीसी 2 टक्के याप्रमाणे आरक्षण आहे. तरी इच्छूकांनी त्वरित कार्यालयीन वेळेत शाळेत संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याध्यापक नागसेन वाकोडे यांनी केले आहे.

***********