लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

        बुलढाणा, (जिमाका) दि. 10: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. योजनेचे कर्ज प्रस्ताव जिल्ह्यातील मातंग समाजातील 12 पोटजातीतील अर्जदाराकडून दि. 12 मार्च 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज करावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. 

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालयाला सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता थेट कर्ज योजनेचे 40 उद्दिष्ट  आहे. थेट कर्ज योजनेंतर्गत 1 लाखामध्ये महामंडळाचे अनुदान रक्कम 10 हजार रूपये आणि 5 टक्के लाभार्थी सहभाग हा 5 हजार रुपये आहे. उर्वरीत 85 हजार महामंडळाचे कर्ज राहणार आहे. थेट कर्ज योजनेचे कर्ज प्रस्ताव जिल्ह्यातील मातंग समाजातील 12 पोटजातीतील इच्छुक अर्जदाराकडून मागविण्यात येत आहेत. कर्जाचे अर्ज दि. 12 मार्च 2025 पर्यंत दिले जातील. यातील पूर्ण असलेले अर्ज स्विकारले जातील.

कर्ज प्रकरणासाठी इच्छुक अर्जदाराचे वय 18 ते 50 असावे. वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराचे यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत जिल्हा कार्यालयात स्वत: अर्जदाराने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहुन दाखल करावेत. त्रयस्त किंवा मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दोन फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, घर टॅक्स पावती, कोटेशन, व्यवसायाबाबत जागेचा पुरावा, प्रकल्प अहवाल, ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा शॉप ॲक्ट परवाना, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र, शैक्षणिक दाखला, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर किमान 500 असावा, अर्जदाराचे आधारकार्ड बँकेच्या खात्याशी जोडल्याचे तपशील जोडावा.

थेट कर्ज योजनेंतर्गत प्राप्त अर्जाची लाभार्थी निवड समितीची मान्यता घेवून पात्र अर्जदाराची उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चिठ्ठ्याद्वारे निवड करण्यात येईल. निवड झालेल्‍या अर्जदाराची वैधानिक दस्तऐवज याची पुर्तता झाल्यानंतर कर्जाचे वितरण करण्यात येईल. योजनेचे कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यातील अर्ज दि. 12 मार्च 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत कर्ज प्रस्ताव सादर करावे.

000000

Comments

Popular posts from this blog

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या