news 9.6.2017 dio buldana

राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी.एल स्थूल यांचा दौरा
बुलडाणा,दि.9: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य  सी.एल स्थूल  शनिवार, दि. 10 जून 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 10 जून 2017 रोजी सकाळी 6.08 वाजता मलकापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने शासकीय विश्रामभवन बुलडाणाकडे प्रयाण, सकाळी 7.30 वाजता मोटारीने शासकीय विश्राम भवन बुलडाणा येथे आगमन, सकाळी 9 वाजता सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचेसोबत रूईखेड मायंबा येथील पिडीत महिलेसोबत चर्चा व शासकीय मदत, अन्य बाबींवर चर्चा, सकाळी 11 वाजता बुलडाणा येथून मोटारीने रूईखेड मायंबा येथे घटनास्थळाला भेट व ग्रामस्थांशी चर्चा, सोयीनुसार चिखली/भोकरदनमार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.
                                                

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या