Posts

कारागृहातील बंद्याची क्षयरोग तपासणी

Image
  बुलढाणा, (जिमाका) दि. 23 : कारागृहातील बंद्यामध्ये क्षयरोगाविषयी जागृती निर्माण होण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालय, बुलढाणा व जिल्हा कारागृह, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा कारागृहामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व क्षयरोग तपासणी शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृह अधिक्षक मेघा शंकर बाहेकर या होत्या. जिल्हा क्षयरोग अधिकारी वर्षा गुट्टे, यांनी बंद्यांना क्षयरोगाबाबत जागृतीपर मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या टीमने बंद्यांची आधुनिक एक्स-रे मशिनव्दारे कारागृहातील एकुण 337 बंद्याची क्षयरोग तपासणी करण्यात आली. तसेच क्षयरोग संशयित बंद्यांचे थुंकीचे नमुने घेण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उमेश नाईक, तुरुंगाधिकारी, मिश्रक गोपाल खोंडे, चंद्रकांत महाले, कारागृह शिपाई व जिल्हा क्षयरोग कार्यालयाची टीम डॉ. खिरोडकर, सिध्देश्वर सोळंकी, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी सुभाष राजपूत, अनिल भोके तसेच सर्व कारागृह अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. 0000

केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा

  बुलढाणा,दि.२३ (जिमाका) : केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव हे शनिवारी दि. २४ जानेवारी रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार सकाळी १०. ३० वाजता इलोरा ता. जळगाव जामोद येथील श्री संत सखाराम महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य यात्रा महोत्सवास उपस्थिती, दुपारी १२   वाजता शेगाव रेल्वे स्थानकाच्या ओम साई रेल कोच रेस्टॅारंटच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती, त्यानंतर रिठद ता. रिसोड जि. वाशिमकडे प्रस्थान करतील. 000

महिला बंदीवानांसाठी रोजगाराची नवी संधी ; कारागृहात पापड, लोणचे व मसाला पावडर निर्मिती प्रशिक्षणाचा शुभारंभ

  बुलढाणा, (जिमाका) दि. 23 : कारागृहातून मुक्त झाल्यानंतर महिला बंदीवानांचे पुनर्वसन व स्वावलंबन साधावे, या उद्देशाने बुलढाणा जिल्हा कारागृहात महिलांसाठी पापड, लोणचे व मसाला पावडर निर्मितीचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या संकल्पनेतून व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलढाणा यांच्या सहाय्याने केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या पुरस्कृत जन शिक्षण संस्थान, बुलढाणा यांच्या वतीने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दि. 19 जानेवारी 2026 पासून सुरू झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत महिला बंदीवानांना पापड बनविणे, विविध प्रकारचे लोणचे तसेच मसाला पावडर तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान कच्चा माल निवड, स्वच्छता, प्रक्रिया पद्धती, साठवणूक तसेच विक्रीसाठी आवश्यक मूलभूत माहिती देण्यात येणार आहे. महिला बंदीवानांना रोजगाराभिमुख कौशल्ये देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, भविष्यात समाजात पुनर्वसन झाल्यानंतर स्वतःचा ...

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत माजी सैनिकांना मोफत न्यायालयीन मार्गदर्शन

    बुलडाणा, (जिमाका) दि. 23   :   बुलढाणा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व त्यांचे अवलंबित यांना मोफत न्यायालयीन माहिती देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा यांच्या वतीने विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे कोर्ट प्रकरणांबाबत मोफत कायदेशीर मार्गदर्शन देण्यात येत असून यासाठी अॅड. राहुल दाभाडे व अॅड. संजय इंगळे हे दर मंगळवार व गुरुवार कार्यालयीन वेळेत उपस्थित राहतात. माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबितांना कोर्ट केससंदर्भात कोणत्याही प्रकारच्या अडचणी, शंका किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित अॅडव्होकेट यांच्याकडून मोफत सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे. 00000

सांगवी टेकाळे येथे सिकलसेल आजाराबाबत जनजागृती

  बुलढाणा, (जिमाका) दि. 23 : आयुष्मान आरोग्य मंदिर, डिग्रस बु. अंतर्गत ग्राम सांगवी टेकाळे येथे दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी “ अरुणोदय ” सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत आरोग्य पथकाने घरोघरी गृहभेटी देऊन सिकलसेल अॅनिमिया आजाराची लवकर ओळख, तपासणीचे महत्त्व तसेच उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत ग्रामस्थांना सविस्तर माहिती दिली. अभियानादरम्यान नागरिकांना तपासणीसाठी प्रोत्साहित करून सिकलसेल आजारासंदर्भातील गैरसमज दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला. यामुळे ग्रामस्थांमध्ये आजाराविषयी योग्य माहिती पोहोचून आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मदत झाली. यावेळी जिल्हा परिषद शाळा, सांगवी टेकाळे येथील विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत सहविद्यार्थ्यांना सिकलसेल आजाराबाबत माहिती व समुपदेशन केले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमशील सहभागामुळे जनजागृतीला अधिक बळ मिळाले. कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी गजानन शिंगणे, आरोग्यसेविका संगिता पहाड़, आरोग्यसेवक अंकुश डोके, आशा स्वयंसेविका झोटे तसेच अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या विशेष अभियाना...

सिकलसेल मुक्तीसाठी ‘अरुणोदय’ विशेष अभियान प्रभावी

  बुलढाणा, (जिमाका) दि. 23 : सिकलसेल ॲनिमिया हा आनुवंशिक आजार असून विशेषतः आदिवासी व काही विशिष्ट समाजघटकांमध्ये त्याचे प्रमाण अधिक आढळते. वेळेत निदान व योग्य उपचार केल्यास या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. याच उद्देशाने राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या वतीने “ अरुणोदय ” सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. दि. 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेंतर्गत सिकलसेल आजाराबाबत जनजागृती, मोफत तपासणी, सिकलसेल वाहक व रुग्णांची ओळख, समुपदेशन तसेच आवश्यक उपचार व संदर्भ सेवा देण्यात येत आहेत. ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये आरोग्य पथकांमार्फत गृहभेटी देऊन सिकलसेल सोल्युबिलिटी तपासणी करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात सध्या 317 सिकलसेल पीडित रुग्ण असून 1 हजार 731 वाहक रुग्ण नोंदणीकृत आहेत. या अभियानात शालेय विद्यार्थी, किशोरवयीन मुले, युवक-युवती तसेच प्रजननक्षम वयोगटातील नागरिकांवर विशेष भर देण्यात आला आहे. सिकलसेल हा संसर्गजन्य नसून आनुवंशिक आजार आहे, ही बाब नागरिकांपर्यंत पोहोचवून...

जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

  बुलढाणा, (जिमाका) दि. 23 :   जिल्हा प्रशासनाच्या सुचनानुसार दि. 25 जानेवारी रोजी रविवार सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने शुक्रवारी (दि.23) जिल्हा   माहिती कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्र.जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड,   वरिष्ठ लिपीक प्रतिक फुलाडी, श्रेया दाभाडकर, जयंत वानखडे, प्रेमनाथ जाधव, दप्तरी राम पाटील व वाहन चालक नामदेव घट्टे यांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.    00000