चांडोळ व शेळगाव आटोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट
बुलढाणा, (जिमाका) दि. १७
: चिखली तालुकाअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र चांडोळ
व प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव आटोळ येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी
मंगळवारी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
या भेटीदरम्यान डॉ. गिते यांनी दोन्ही प्राथमिक आरोग्य
केंद्रामधील ऑपरेशन थिएटर (शस्त्रक्रिया कक्ष), डिलिव्हरी रूम, वॉर्ड, लसीकरण कक्ष
आदी विभागांची सविस्तर तपासणी करून संपूर्ण कामकाजाचा आढावा घेतला. तसेच कुटुंब कल्याण,
एनसीडी, निक्षय, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या
अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करत डेटा एन्ट्री वेळेत व अचूक करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच सध्या सुरु असलेल्या सिकलसेल सप्ताह प्रभावीपणे राबविण्याबाबत सुचनाही दिल्या.
यासोबतच आरोग्य विषयक निर्देशांक वाढविण्यासाठी सेवा गुणवत्तेवर भर देण्याचे आवाहनही
त्यांनी केले.
यावेळी चांडोळ येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम तसेच सर्व
आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. तर शेळगाव आटोळ
येथे डॉ. वायाळ, डॉ. पैठणे, डॉ. राजपूत व इतर सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment