सिंदखेड राजा येथे मोफत कॅन्सर निदान व उपचार मार्गदर्शन शिबिर

 


 

बुलढाणा, दि. 24 : महाराष्ट्र शासन मान्य ‘क-दर्जा’ तीर्थक्षेत्र असलेल्या हजरत गौस-ए-आझम दस्तगीर बाबाच्या 46 व्या उर्स शरिफ आणि  निशान निमित्ताने हजरत दस्तगीर बाबा दर्गा, सिंदखेड राजा येथे मोफत कॅन्सर निदान व उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

हे शिबिर गुरुवार दि. २५ डिसेंबर व शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असून मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, येथील नामांकित हॉस्पिटल्स तसेच तज्ज्ञ डॉक्टर शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत. शिबिरात रुग्णांची सखोल तपासणी करून तज्ज्ञांकडून उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

या दोन दिवसीय महा-आरोग्य शिबिरात सर्व प्रकारचे कर्करोग तपासणी व उपचार मार्गदर्शन केले  जाणार आहे. विविध पॅथॉलॉजी टेस्ट, महिलांसाठी मेमोस्कॅन, पीएपी स्मिअर टेस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच पुरुषांसाठी आधुनिक मशीनद्वारे ओरल कॅन्सर, लिव्हर, थायरॉईड व फुफ्फुस तपासणी केली जाणार आहे. यासोबतच हाडे, पाठीचा कणा व सांध्यांच्या समस्यांवर तपासणी व उपचार मार्गदर्शन व नेत्ररोग (मोतीबिंदू) तपासणी व उपचार मार्गदर्शन केले जाणार आहे. या सुविधा पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि कर्करोग शास्त्रज्ञ डॉ. अमजद खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या