जागतिक कौशल्य स्पर्धा 2026; अमरावती येथे बुधवारी विभागीय पात्रता फेरी
बुलढाणा (जिमाका), दि.
23 : शांघाय (चीन) येथे 2026 मध्ये जागतिक कौशल्य स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘इंडिया स्किल्स स्पर्धा 2025’ मोहिमेअंतर्गत
अमरावती विभागातील पात्र उमेदवारांसाठी विभागीय पात्रता फेरीचे आयोजन उद्या, बुधवार
दि. 24 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे.
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत आयोजित
ही स्पर्धा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील डॉ. श्रीकांत जिचकार सभागृहात पार
पडणार आहे. प्राथमिक फेरीतून यशस्वीरित्या निवड झालेल्या उमेदवारांनाच या विभागीय पात्रता
फेरीत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. या फेरीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उमेदवारांची
पुढील स्तरासाठी निवड करण्यात येणार असून, या स्पर्धेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर
भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
प्रथम फेरीत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहून आपले
कौशल्य सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्राचे सहाय्यक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment