राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत जिल्ह्यात तिळाचे 100% अनुदानावर बियाणे वितरण

 


 

Ø  शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन ; पहिल्या अर्जदारास प्राधान्य

 

बुलढाणा, (जिमाका) दि. 8:   देशातील खाद्यतेल आयात कमी करून स्वावलंबन साध्य करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत तेलबिया गळीतधान्य कार्यक्रम अंतर्गत उन्हाळी हंगाम २०२५–२६ करिता तिळाचे प्रमाणित बियाणे 100% अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र शासनामार्फत बुलढाणा जिल्ह्यासाठी हे बियाणे वाटप करण्यात येणार असून शेतकऱ्यांना तिळाचे उत्पादन वाढविण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांनी बियाण्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

देशातील तेलबिया उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच सुधारित वाणांचा प्रसार करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. यानुसार तिळासाठी हेक्टरी 2.5 किलो (रु. 197 प्रति किलो) प्रमाणित बियाणे वितरीत केले जाणार आहे. या योजनेत प्रति लाभार्थी किमान 0.20 हेक्टर ते कमाल 1 हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान मंजूर करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना पॅकिंग साईजप्रमाणेच बियाणे देण्यात येणार असून पॅकिंग साईजमुळे क्षेत्रापेक्षा अधिक बियाणे मिळाल्यास त्या अतिरिक्त बियाण्याची रक्कम लाभार्थ्यांना स्वतः भरावी लागेल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत नोंदणी अनिवार्य आहे. अर्ज प्रक्रिया https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील कृषी विभागातील प्रमाणित बियाणे वितरण, पिक प्रात्यक्षिके, खते-औषधे या टाईलद्वारे करता येईल. लाभार्थी निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर होणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या