सैनिकी सभामंडप भाडेतत्वावर उपलब्ध

 


 

बुलढाणा, (जिमाका) दि. १७:  जिल्हा सैनिक कल्याण्य कार्यालयाचे सैनिकी सभामंडप हे शासकीय व इतर सामाजिक कार्यक्रमाकरीता माफक दरात भाडेतत्वावर उपलब्ध करण्यात आले आहे. नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 

जिल्ह्यातील सर्व नागरीकांसाठी सुविधायुक्त असलेले, सुसज्ज, भव्य आणि शहराच्या मध्यवर्ती भागामधील एस.टी. बस स्टँडपासून केवल २५ मीटर अंतरावर सर्व सोयींनी सुसज्ज असलेले जिल्हा सैनिक कल्याण्या कार्यालयाचे सैनिकी सभामंडप हे लग्न समारंभ, वाढदिवस, शासकीय व इतर सामाजिक कार्यक्रमाकरीता माफक दरात भाडेतत्वावर उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, अवलंबित व शासकीय कर्मचारी यांना विशेष सवलत दिली जाणार आहे. सर्व नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी ७७७४०४३९१९, ९८८१९३०९४२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या