अनोळखी मृतदेह आढळला: ओळखणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन
बुलडाणा,
(जिमाका) दि. 4: पोलीस
स्टेशन बोराखेडी हद्दीत दि. 30 नोव्हेंबर 2025 रोजी अनोळखी महिलेचा रस्ता अपघातात मृत्यू
झाला आहे. या मृत महिलास ओळखणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले
आहे.
प्राप्त
माहितीनुसार, अनोळखी महिलेचे वय 35 ते 40 वर्ष, अंगात निळया रंगाचा सोनेरी काठा पदराची
साडी, गोल्डन रंगाची ब्लाउज, उंची अंदाजे 5 फुट, केस काळे लांब अशा वर्णाची आहे. या
वर्णनाच्या महिलाला कोणी नातेवाईक ओळखत असल्यास पोलीस स्टेशन, बोराखेडी येथे किंवा
पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे 9823607799, पो.हे.कॉ. विजय सुरळकर 9823981101, पो.का.
संदिप ढोले 865213778 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment