योग्यता प्रमाणपत्र तपासणी सहा दिवस बंद राहणार
Ø रोध चाचणी मार्गाचे नूतनीकरण सुरु
बुलढाणा (जिमाका), दि. 24 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलढाणा येथे योग्यता प्रमाणपत्र
तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या रोध चाचणी मार्गाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या
कामासाठी 24 ते 29 डिसेंबर पर्यंत हा रोध चाचणी मार्ग बंद
राहणार असल्याने वाहनधारकांनी योग्यता प्रमाणपत्र नोंदणीसाठी कार्यालयात वाहने आणू
नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच ज्या वाहनधारकांनी या कालावधीतील
तारखांसाठी आधीच अपॉइंटमेंट घेतलेली आहे, त्यांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे
काम 10 व 11 जानेवारी 2026 रोजी करण्यात येणार
आहे. या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन
कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment