जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा · बंद्यांच्या मानवी हक्क व संरक्षणाबाबत जनजागृती
बुलढाणा, (जिमाका) दि. १०: जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय
मानवी हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून या निमित्त जिल्हा कारागृहातील बंद्यांच्या
मानवी हक्क व संरक्षणाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले.
उच्च न्यायालयालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांचे सहमतीने व
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष यांचे आदेशान्वये महाराष्ट्र राज्य मानवी
हक्क व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण
यांच्या संयुक्त विद्यमाने हा आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक निलेश तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी
सुरेश कव्हळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितीन पाटील, पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण
पावरा, कारागृह अधीक्षक मेघा बाहेकर, नायब तहसिलदार विजय हिवाळे उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी बंद्यांना त्यांचे
विविध मानवी हक्क व संरक्षणाबाबत माहिती दिली. त्यानंतर सचिव नितीन पाटील यांनी कैद्यांना
त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक मेघा बाहेकर यांनी
केले. सुत्रसंचालन वरिष्ठ लिपीक अमित मांजरे यांनी केले तर तुरुंगाधिकारी उमेश नाईक
यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीत्येसाठी सुभेदार बबन खंडारे, दरेसिंग
चव्हाण यांचेसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बंद्यांना संविधान उद्देशिकेचे
वाटप करण्यात आले.
०००००

Comments
Post a Comment