गॅस जोडणी नसलेल्या महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची संधी; अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा (जिमाका), दि. 31 : अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
विभागाच्या दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या पत्रानुसार केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला
योजनेअंतर्गत देशभरात 25 लाख अतिरिक्त एलपीजी गॅस जोडण्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला
आहे. या अनुषंगाने जिल्हा उज्ज्वला समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ज्या पात्र महिलांकडे अद्याप गॅस जोडणी नाही, त्यांनी
आपल्या नजीकच्या गॅस एजन्सीकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज तात्काळ सादर करावा, असे आवाहन
जिल्हाधिकारी तथा प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना समिती अध्यक्ष डॉ. किरण पाटील यांनी
केले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या कोणत्याही गॅस एजन्सीशी संपर्क साधावा,
असेही कळविण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे : राशन कार्ड, आधारकार्ड (कुटुंबातील १८ वर्षावरील सर्व व्यक्तीचे),
बँक पासबुक झेरॉक्स (महिला राष्ट्रीयकृत बँकेचे), तीन पासपोर्ट फोटो, आधारकार्ड संलग्न
मोबाईल नंबर, केवायसीसाठी अर्जदार स्वत: हजर असावा, प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेसाठी
14 पॉईटचे हमीपत्र भरुन देणे लाभार्थ्यास आवश्यक आहे.
Comments
Post a Comment