बँकांमधील दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी विशेष शिबिर

 

Ø  29 डिसेंबरला शिबिराचे आयोजन

Ø  जिल्ह्यात 1 लाख 36 हजार खातेदार

Ø  48.72 कोटींच्या दावा न केलेल्या ठेवी

बुलढाणा, दि. 26 (जिमाका): रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनानुसार बँकांमध्ये दीर्घकाळ दावा न झालेल्या ठेवी संबंधित खातेदारांना किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना परत मिळाव्यात, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा अग्रणी बँक कार्यालयामार्फत सोमवार,                      दि. 29 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन भवन, बुलढाणा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.          

या शिबिरामध्ये 10 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून बँक, पेंशन, विमा, शेअर, म्युच्युअल फंड आदी ठिकाणी जमा असून व्यवहार न झालेल्या रकमेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत अशा बेवारस ठेवी संबंधित खातेदारांना किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना परत देण्यात येणार आहेत.

नागरिकांनी उद्यम पोर्टल किंवा संबंधित बँक किंवा संस्थेच्या संकेतस्थळावर आपले नाव तपासून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँक शाखेत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच बुलढाणा जिल्ह्यात एकूण सुमारे 1 लाख 36 हजार 17 खातेदारांच्या दावा न केलेल्या ठेवी असून त्यांची एकूण रक्कम अंदाजे 48 कोटी 72 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे उर्वरित पात्र खातेदारांनी किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांनी विलंब न करता आपल्या जवळच्या संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपली रक्कम परत घ्यावी, असे आवाहन देखील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या