जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईलमध्ये रोजगाराची संधी
बुलडाणा, (जिमाका) दि. 5: राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता
व नाविन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील उमेदवारांना इस्त्राईल देशात बांधकाम नुतनीकरण
या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी
करावी, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.
यामध्ये सिरॅमिक टायलिंगसाठी 1000 जागा,
ड्रायवॉल वर्कर्स 300 जागा व मेसनच्या 300 जागांची भरती करण्यात येणार आहे. या रोजगारासाठी
उमेदवारांस इंग्रजी भाषेचे सामान्यज्ञान, दहावी उत्तीर्ण तसेच वय २५ ते ५० वयोगटाचे
उमेदवार पात्र आहेत. यासोबत उमेदवारांकडे किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व नोंदणीसाठी https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला
भेट द्यावी,अथवा
https://docs.google.com/forms/d/1yI-7iJQeMk1bZYbMrLt1eyBRLQr8TBcYEGRXcEJlVPI/edit
या गूगल फॉर्म वर आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment