महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
बुलडाणा, (जिमाका) दि.
4: महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाने सन 2026 मध्ये आयोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक
आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. तरी उमेदवारांनी
यांची नोंद घ्यावी, असे आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी कळविले आहे.
शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता
आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन-२०२६ मध्ये
घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे
वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापिठे, परीक्षा घेणाऱ्या इतर
संस्था इत्यादीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या
परीक्षांचे वेळापत्रक निश्चित आले आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात
आले आहे.
0000
Comments
Post a Comment