नगरपरिषद निवडणूक मतमोजणीमुळे 21 डिसेंबरचा बुलढाण्यातील आठवडी बाजार रद्द

 


 

बुलढाणा, (जिमाका) दि. 12 : बुलढाणा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया दि. 21 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार आहे. त्यामुळे या दिवशी शहरात भरणारा पारंपरिक रविवारचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे, असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी यांनी जारी केले आहे.

या दिवशी शहरात पारंपरिक रविवारचा आठवडी बाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होणाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मतमोजणी दिनांक 21 डिसेंबर रोजीचा बुलढाणा शहरातील रविवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी उपविभागीय दंडाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.

त्याअनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी यांनी बाजार आणि यात्रा कायदा १८६२ च्या कलमान्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन बुलढाणा शहरामध्ये नगर परिषद, बुलढाणा येथे मतमोजणी करण्यात येणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही, या दृष्टीकोणातून बुलढाणा शहरामध्ये 21 डिसेंबर रोजी रविवार या दिवशी भरविण्यात येणारा आठवडी बाजार रद्द करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या