जिल्ह्यात सिकलसेल प्रतिबंधक जनजागृती सप्ताहाला सुरुवात Ø विविध उपक्रमांचे आयोजन

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 12 : जिल्हा आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात 11 ते 17 डिसेंबर 2025 दरम्यान सिकलसेल प्रतिबंधक जनजागृती सप्ताह उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात येणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्र स्तरावर विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सिकलसेल हा अनुवंशिक रक्तविकार असून त्याविषयी वेळेवर तपासणी, निदान आणि उपचार याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व आदिवासी प्रकल्पांमध्ये तसेच सर्व तालुक्यांत किल तपासणी व जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.

या आठवड्यात राबविण्यात येणारे महत्त्वाचे उपक्रमांमध्ये सिकलसेल रक्त तपासणी शिबिरे, कौटुंबिक समुपदेशन व जनजागृती व्याख्याने,  शाळा-महाविद्यालयांमध्ये आरोग्य शिक्षण कार्यक्रम,  फिल्ड लेव्हलवर घरभेटी, तपासणी व फॉलोअप,  सिकलसेल रुग्णांच्या उपचार व औषध उपलब्धतेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

नागरिकांनी, विशेषतः आदिवासी बांधव व उच्च जोखमीच्या समूहातील व्यक्तींना या आठवड्यात आयोजित तपासणी शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या