बुलढाणा तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
बुलढाणा, दि. 24 :
बुलढाणा तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून
उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी तथा प्र जिल्हा पुरवठा
अधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, तहसीलदार विठ्ठल कुमरे, नायब तहसीलदार शशिकांत वाघ,
अनंता पाटील यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित
होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी ग्राहक संरक्षण
कायद्याची माहिती देत, शासनाच्या विविध योजना व सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध
असल्याचे सांगितले. तसेच डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे नागरिकांनी सायबर
सुरक्षिततेकडेही लक्ष द्यावे. ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असून,
तक्रार आल्यास तत्काळ दखल घेतली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. तहसीलदार विठ्ठल
कुमरे यांनी आपल्या मनोगतात ग्राहक व विक्रेते यांच्यात पारदर्शक व्यवहार होणे
आवश्यक असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस तहसीलदार उर्मिला उरकुंडे यांनी
प्रास्ताविक करताना राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गायत्री सावजी यांनी केले. कार्यक्रमाच्या
शेवटी तुषार पाटील यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे आभार
मानले.



Comments
Post a Comment