लोकसेवा हक्क अधिनियमाची संवेदनशीलतेने अंमलबजावणी करा - राज्य सेवा हक्क आयुक्त एन रामबाबू यांचे निर्देश

 






 

बुलढाणा, (जिमाका) दि. 17: लोकसेवा हक्क अधिनियमाची संवेदनशीलतेने अंमलबजावणी करावी, असे  निर्देश राज्य सेवा हक्क आयोग, अमरावतीचे आयुक्त एन. रामबाबू यांनी विभाग प्रमुखांना दिले.

 

आयुक्त एन. रामबाबू हे बुधवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना त्यांनी विविध विभागांच्या लोक सेवांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, मुख्य वनसंरक्षक सरोज गवस, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशीव शेलार आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

 

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्या सेवांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला पाहिजेत. लोकांच्या कर रुपी प्राप्त पैशांतून शासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन मिळते. त्यामुळे लोकांना सेवा पुरविणे ही प्रशासनाची जबाबदारी असून ती नैतिक जबाबदारी समजून लोकांना शासकीय सेवांचा लाभ द्यावा, असेही आयुक्त एन रामबाबू यावेळी म्हणाले.

 

शासकीय विभागातील सुधारणांविषयी आढावा

प्रशासनात काम करत असतांना कार्यालय किंवा विभागातील सुधारणांविषयी आयुक्त एन रामबाबू यांनी आढावा घेतला. विभागाच्या योजना, कार्यप्रणाली आदी सुधारणांविषयी आपआपल्या विभांगाना प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन देखील आयुक्त एन रामबाबू यांनी अधिकाऱ्यांना केले.

 

००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या