कुष्ठरुग्ण शोध अभियानात जिल्ह्यात ८३ नवीन कुष्ठरुग्ण आढळले
Ø
१७ नोव्हेंबर ते २
डिसेंबर २०२५ दरम्यान व्यापक सर्वेक्षण
बुलढाणा, (जिमाका) दि. 15: राज्य
शासनाच्या आदेशानुसार व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बुलढाणा
जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान दि. १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत
राबविण्यात आले. या अभियानांतर्गत जिल्ह्यात ८३ नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले
असल्याची माहिती सहाय्यक संचालक आरोग्य सेवा यांनी दिली आहे.
या अभियानांतर्गत १,८३६ प्रशिक्षित तपासणी पथकांची नेमणूक करण्यात
आली होती. या अभियान कालावधीत दि. २ डिसेंबर २०२५ पर्यंत जिल्ह्यातील ४,८८,७८५
घरांमधील एकूण २३,३०,०७५ लोकसंख्येची शारीरिक तपासणी करण्यात आली. या सर्वेक्षणाची
आरोग्य केंद्र स्तरावर ३६७ पर्यवेक्षकांमार्फत प्रभावी पाहणी करण्यात येत असून या
तपासणीत जिल्ह्यात एकूण १४,००६ चट्ट्यांचे (संशयित) रुग्ण आढळून आले. या सर्व रुग्णांची
वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सखोल तपासणी करण्यात आली. त्यामधून ८३ नवीन
कुष्ठरुग्णांचे निदान करण्यात करून औषधोपचार सुरू करण्यात आले आहे.
या निदान झालेल्या रुग्णांना ६ महिने ते १ वर्षापर्यंत नियमित
उपचार घ्यावे लागणार असल्याचे सहाय्यक संचालक डॉ. हरी पवार यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्या मार्गदर्शनाखाली
आढळलेल्या सर्व चट्ट्यांच्या रुग्णांची तपासणी १०० टक्के पूर्ण करण्यात आली असून
८३ नवीन कुष्ठरुग्णांना तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात
आली आहे.
00000
Comments
Post a Comment