ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना
बुलढाणा (जिमाका), दि. 30 : ग्रामीण
भागातील शेत व पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी पूर्णपणे यंत्रसामग्रीच्या सहाय्याने
जलद गतीने कामे करण्याच्या उद्देशाने “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना” ही स्वतंत्र योजना महसूल विभागामार्फत राबविण्यास
शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल विभागाच्या दि. 14 डिसेंबर
2025 रोजी जारी करण्यात आला आहे.
या योजनेद्वारे मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद
रस्ते योजनेस पूरक अशी सोपी व सुलभ कार्यपद्धती अवलंबण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभाग/उपविभाग,
प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभाग तसेच वनजमीन असल्यास वनविभाग यापैकी
कोणत्याही यंत्रणेमार्फत रस्त्यांची कामे करता येणार आहेत.
तसेच, संबंधित शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विधानसभा
क्षेत्र समितीचे सदस्य सचिव असलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रशासकीय मान्यतेचे अधिकार
प्रदान करण्यात आले आहेत. योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांसाठी प्रत्येक टप्प्यातील
प्रक्रिया तसेच विविध विभागांच्या जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
तसेच buldhana.nic.in येथे डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी
रोहयो डॉ. जयश्री ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्राव्दारे दिली आहे.
0000
Comments
Post a Comment