जिल्ह्यातील वाळू घाटांचा प्रारूप जिल्हा सर्व्हेक्षण अहवाल जाहीर

 


Ø  एमआरसॅकमार्फत सर्वेक्षण

Ø  अभिप्राय, सूचना अथवा निवेदन सादर करण्याचे आवाहन

बुलढाणा, (जिमाका) दि. 15:   महाराष्ट्र शासनाच्या वाळू/रेती धोरण मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2026-27 या वर्षाकरीता बुलढाणा जिल्ह्यातील वाळू घाटांचे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (एमआरसॅक) मार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार योग्य ठरलेल्या रेती घाटांसाठी तयार करण्यात आलेला प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 हा अहवाल बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://buldhana.gov.in येथे तसेच दिलेल्या क्यू-आर कोडद्वारे पाहता येणार आहे. या अनुषंगाने नागरिकांनी अहवालाबाबत आपले अभिप्राय, सूचना अथवा निवेदने जिल्हा वाळू सनियंत्रण समिती, खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्याकडे 30 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 तसेच नागरिक आपले अभिप्राय dmobul@gmail.com या ई-मेल पत्त्यावरही पाठवू शकतात, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या