प्रवाश्यांच्या समस्या व तक्रार निराकरणासाठी प्रवासी राजा व कामगार पालक दिनाचे आयोजन

 

Ø  राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम

बुलढाणा, (जिमाका) दि. 24: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाकडून प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सुचनांचे आगार पातळीवर जलदगतीने निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात दर महिण्याच्या बुधवारी सकाळी 10 ते 2 या वेळेत “प्रवासी राजा दिन” व दुपारी 3 ते 5 या वेळेत “कामगार पालक दिन” आयोजित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून प्रवाशी आणि महामंडळाच्या कामगारांनी लाभ घेऊन समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे. 

परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतील. तसेच दुपारी 3 ते सांयकाळी 5 दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटना, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्यांचे तत्काळ निराकरण करतील.

बुलढाणा विभागातील बुलढाणा आगार येथे दि. 24 डिसेंबर रोजी तर चिखली आगार येथे दि. 31 डिसेंबर, खामगाव आगार येथे दि. 7 जानेवारी , मेहकर आगार येथे दि. 14 जानेवारी , मलकापुर येथे दि. 21 जानेवारी , जळगाव जामोद येथे दि. 28 जानेवारी  व शेगांव आगार येथे दि. 4 फेब्रुवारी रोजी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एसटी बर प्रवाशी व कामगारांनी या सेवेचा लाभ घेवून आपल्या समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे. 

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या