जिल्ह्यातील 11 नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर

 


 

Ø  भाजपा 4, काँगेस 3, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस 1, शिवसेना (उबाठा) आणि रा.काँगेसचा 1 अध्यक्ष

Ø  भाजपा 89,  काँग्रेस 60, शिवसेना 46 राष्ट्रवादी काँग्रेस 26, शिवसेना (उबाठा) 10, रा. काँग्रेस (श प) 13 सदस्य विजयी

 

बुलढाणा (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या अध्यक्षपद व सदस्यपद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी यश मिळवले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणूकांमध्ये भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे.

 

बुलढाणा नगरपरिषदेत शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड यांनी अध्यक्षपद पटकावले आहे. चिखली नगरपरिषदेत भाजपचे पंडितराव रामराव देशमुख, देऊळगाव राजा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी तुषार शिपणे, जळगाव जामोद नगरपरिषदेत भाजपचे गणेश रामेश्वर दांडगे तसेच खामगाव नगरपरिषदेत भाजपच्या अपर्णा फुंडकर यांनी अध्यक्षपदावर विजय मिळवला आहे.

 

लोणार नगरपरिषदेत काँग्रेसच्या मीरा भूषण मापारी, मलकापूर येथे काँग्रेसचे अतिकुर रहमान शाफिकूर रहमान तर मेहकर नगरपरिषदेत शिवसेना (उबाठा) गटाचे किशोर भास्कर गरोळे अध्यक्षपदी निवडून आले आहेत. नांदुरा नगरपरिषदेत भाजपच्या मंगला सुधीर मुऱ्हेकर, शेगाव येथे काँग्रेसचे प्रकाश एकनाथ शेगोकार तर सिंदखेड राजा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे सौरभ विजय तायडे यांनी विजय संपादन केला आहे.

 

जिल्ह्यातील एकूण 286 सदस्यपदांपैकी भारतीय जनता पार्टीने 89 जागा जिंकत सर्वाधिक संख्याबळ मिळवले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 60, शिवसेनेचे 46 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 26 सदस्य निवडून आले आहेत. शिवसेना (उबाठा) गटाचे 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे 13 सदस्य विजयी झाले आहेत. याशिवाय आघाडीचे 17, अपक्षांचे 12, एमआयएमचे 10, समाजवादी पक्षाचा एक तर वंचित बहुजन आघाडीचे दोन उमेदवार निवडून आले आहेत.

0000

बुलढाणा नगरपरिषदेत पूजा संजय गायकवाड नगराध्यक्षपदी ;  शिवसेनेची एकहाती सत्ता

 

बुलढाणा, दि.21 (जिमाका)  : बुलढाणा नगरपरिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड यांची निवड झाली असून नगरपरिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे. नगरपरिषदेत एकूण 30 सदस्य असून त्यापैकी शिवसेनेचे तब्बल 22 सदस्य निवडून आले आहेत. भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शप गट) आणि आघाडीचे प्रत्येकी दोन सदस्य निवडून आले आहेत.

 

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पूजा संजय गायकवाड यांनी 18 हजार 525 मते मिळवत विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक 1 अ मधून प्रशांत उत्तम जाधव यांनी 1 हजार 428 मते मिळवून सदस्यपदावर विजय मिळवला असून प्रभाग क्रमांक 1 ब मधून सपना अमित मावतवाल यांनी 1 हजार 397 मते घेत यश संपादन केले आहे. प्रभाग क्रमांक 2 अ मधून निसार खान इसाक खान यांनी 781 मते, तर 2 ब मधून परवीन मोहम्मद अजहर यांनी 1 हजार 48 मते मिळवत विजय मिळवला आहे.

 

प्रभाग क्रमांक 3 अ मधून तमिजा बी युनुस खान यांनी 857 मते तर 3 ब मधून अनिल गणेश वर्मा यांनी 842 मते मिळवून विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 4 अ मधून जाकीर हुसैन शेख कादर कुरशी यांनी 1 हजार 609 मते, तर 4 ब मधून मुबशशेरा आयेशा अताउल्लाह खान यांनी 1 हजार 558 मते मिळवत यश मिळवले आहे. प्रभाग क्रमांक 5 अ मधून सविताताई प्यारेलाल हडाले यांनी 1 हजार 430 मते, तर 5 ब मधून गजेंदग शालीग्राम दांदडे यांनी 1 हजार 708 मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे.

 

प्रभाग क्रमांक 6 अ मधून वैशाली राहुल सुरडकर यांनी 1 हजार 419 मते तर 6 ब मधून मृत्युंजय संजय गायकवाड यांनी 1 हजार 437 मते मिळवत विजय संपादन केला आहे. प्रभाग क्रमांक 7 अ मधून सरला सुनील बरडे यांनी 1 हजार 810 मते तर 7 ब मधून सतीश रामभाऊ बरडे यांनी 1 हजार 510 मते मिळवून विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 8 अ मधून वैशाली रामेश्वर वावरे यांनी 1 हजार 238 मते तर 8 ब मधून सचिन विलास गायकवाड यांनी 1 हजार 783 मते मिळवत यश संपादन केले आहे.

 

प्रभाग क्रमांक 9 अ मधून अशोक तुकाराम इंगळे यांनी 1 हजार 109 मते तर 9 ब मधून देविता योगेश परसे यांनी 1 हजार 190 मते मिळवून विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 10 अ मधून इंदुबाई शामराव घट्टे यांनी 1 हजार 303 मते तर 10 ब मधून विजय मधुकर जायभाये यांनी 1 हजार 222 मते मिळवत सदस्यपद पटकावले आहे. प्रभाग क्रमांक 11 अ मधून नयनप्रकाश सुखदेव शर्मा यांनी 761 मते तर 11 ब मधून निलम देवेंद्र खोत यांनी 805 मते मिळवून विजय संपादन केला आहे.

 

प्रभाग क्रमांक 12 अ मधून आकाश विजय दळवी यांनी 979 मते तर 12 ब मधून देवांगना अमित ठाकरे यांनी 993 मते मिळवून यश मिळवले आहे. प्रभाग क्रमांक 13 अ मधून राखी विनोद बेंडवाल यांनी 1 हजार 43 मते तर 13 ब मधून विनोद रमेश बेंडवाल यांनी 1 हजार 154 मते मिळवत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 14 अ मधून मालती आश्रूबा शेवाळे यांनी 1 हजार 300 मते तर 14 ब मधून सोहम पुरुषोत्तम झाल्टे यांनी 927 मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक 15 अ मधून पुष्पा शिवाजी धुड यांनी 1 हजार 294 मते तर 15 ब मधून दिपक दशरथ सोनुने यांनी 1 हजार 120 मते मिळवत विजय संपादन केला आहे.

00000

 

 

चिखली नगरपरिषद अध्यक्षपदी भाजपचे पंडितराव देशमुख; भाजपचे वर्चस्व

 

बुलढाणा, दि.21 (जिमाका)  : चिखली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे पंडितराव रामराव देशमुख विजयी झाले असून नगरपरिषदेत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. नगरपरिषदेत एकूण २८ सदस्य असून त्यापैकी भाजपचे १३ तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे १२ सदस्य निवडून आले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे प्रत्येकी एक सदस्य विजयी झाले आहेत.

 

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंडितराव रामराव देशमुख यांनी १६ हजार २३० मते मिळवत विजय मिळवला. प्रभाग क्रमांक १ अ मधून भाजपच्या सुषमा विलास चव्हाण यांनी १ हजार ३१६ मते मिळवून सदस्यपद पटकावले, तर प्रभाग क्रमांक १ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. मिनल निलेश गावंडे यांनी १ हजार ५०१ मते घेत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक २ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शप गट) चे डॉ. प्रकाश शिंगणे यांनी १ हजार २०८ मते तर २ ब मधून शिवसेनेच्या वैशाली कपिल खेडेकर यांनी ७५५ मते मिळवत यश संपादन केले आहे.

 

प्रभाग क्रमांक ३ अ मधून काँग्रेसच्या सुनिता प्रकाश शिंगणे यांनी ९८७ मते तर ३ ब मधून भाजपचे शेख रफीक कादर यांनी ९५० मते मिळवून विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक ४ अ मधून भाजपचे दिपक विश्वनाथ खरात यांनी १ हजार १३९ मते तर ४ ब मधून काँग्रेसच्या वहिदा बेगम मोहम्मद जकाउल्ला यांनी ९०० मते मिळवत सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ५ अ मधून काँग्रेसच्या सीमा गोपाल देव्हडे यांनी १ हजार ९०४ मते तर ५ ब मधून काँग्रेसचे मोहम्मद इसरार अब्दुल जब्बार यांनी १ हजार ८३४ मते मिळवत विजय मिळवला आहे.

 

प्रभाग क्रमांक ६ अ मधून भाजपचे अमोल सुरेश खबुतरे यांनी १ हजार ५०० मते तर ६ ब मधून काँग्रेसच्या शितल संतोष देशमुख यांनी १ हजार ४१७ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ७ अ मधून काँग्रेसच्या संध्या आनंद बोंद्रे यांनी १ हजार ७६२ मते तर ७ ब मधून काँग्रेसचे खान उबेद अली शब्बीर अली यांनी १ हजार ६४५ मते मिळवून विजय संपादन केला आहे.

 

प्रभाग क्रमांक ८ अ मधून भाजपच्या प्रिया राम बनसोडे यांनी १ हजार ३२८ मते तर ८ ब मधून भाजपचे सुहास रामकृष्ण शेटे यांनी १ हजार ४३ मते मिळवत यश संपादन केले आहे. प्रभाग क्रमांक ९ अ मधून भाजपच्या ज्योतीताई भगवानराव वाळेकर यांनी १ हजार ४९८ मते तर ९ ब मधून भाजपचे गुरुदत्त विनायक सुसर यांनी १ हजार ३६७ मते मिळवून विजय मिळवला आहे.

 

प्रभाग क्रमांक १० अ मधून काँग्रेसचे रत्नदिप यशवंत शिनगारे यांनी १ हजार २४० मते तर १० ब मधून काँग्रेसच्या स्वाती अमोल लहाने यांनी १ हजार १३१ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ११ अ मधून काँग्रेसच्या सरस्वती पुरुषोत्तम वायाळ यांनी १ हजार १६८ मते तर ११ ब मधून भाजपचे दिपक बुलचंद वाधवाणी यांनी १ हजार २२० मते मिळवत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक १२ अ मधून काँग्रेसच्या सुप्रिया प्रशांतकुमार भटकर यांनी १ हजार ५५६ मते तर १२ ब मधून काँग्रेसचे मो. आसीफ मो. शरीफ यांनी १ हजार ७०४ मते मिळवून यश संपादन केले आहे.

 

प्रभाग क्रमांक १३ अ मधून भाजपचे विष्णू येडूजी जोगदंडे यांनी ९८८ मते तर १३ ब मधून भाजपच्या विमल रामदास देव्हडे यांनी ९४५ मते मिळवत सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक १४ अ मधून भाजपच्या अश्विनी विश्वनाथ (बाळू) जाधव यांनी १ हजार ३९७ मते तर १४ ब मधून काँग्रेसचे मोहित धनंजय व्यवहारे यांनी ९६८ मते मिळवून विजय मिळवला आहे.

0000

 

देऊळगाव राजा नगरपरिषद अध्यक्षपदी माधुरी शिपणे; राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक

 

बुलढाणा, दि.21 (जिमाका)  : देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी तुषार शिपणे यांची निवड झाली असून त्यांनी ९ हजार ९८८ मते मिळवत विजय संपादन केला आहे. या निकालामुळे नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगरपरिषदेत एकूण २१ सदस्य असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, भारतीय जनता पार्टीचे ३, शिवसेना (उबाठा) गटाचे २ तर आघाडीचे ७ सदस्य निवडून आले आहेत.

 

प्रभाग क्रमांक १ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिनाबाई सुभाष दराडे यांनी १ हजार ४६८ मते मिळवून विजय मिळवला असून प्रभाग क्रमांक १ ब मधून शिवसेना (उबाठा) गटाचे संदीप कोंडीराम शिंदे यांनी ८०८ मते घेत सदस्यपद पटकावले आहे. प्रभाग क्रमांक २ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली विकास कासारे यांनी १ हजार २०४ मते तर २ ब मधून शेख नमिराबी अतीक यांनी १ हजार २२२ मते मिळवत विजय संपादन केला आहे.

 

प्रभाग क्रमांक ३ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप विठ्ठल वाघ यांनी १ हजार २८५ मते तर ३ ब मधून भाजपच्या वनिता राजेश भुतडा यांनी ९४९ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ४ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खान रुख्साना नजीर यांनी ९०२ मते तर ४ ब मधून आकोट विकास आघाडीच्या शेख अनवर शेख अली यांनी १ हजार ३१ मते मिळवून विजय मिळवला आहे.

 

प्रभाग क्रमांक ५ अ मधून आकोट विकास आघाडीच्या विद्या अतिश कासारे यांनी ६८५ मते तर ५ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विष्णू अर्जुन झोरे यांनी ७१९ मते मिळवून यश संपादन केले आहे. प्रभाग क्रमांक ६ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा दत्तात्रय गिते यांनी ८३४ मते तर ६ ब मधून भाजपच्या निशिकांत छबुराव भावसार यांनी ८७२ मते मिळवत विजय मिळवला आहे.

 

प्रभाग क्रमांक ७ अ मधून आकोट विकास आघाडीच्या शिवाजी हरिभाऊ मेहत्रे यांनी ६०३ मते तर ७ ब मधून शितल अतिश खरात यांनी ७४८ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ८ अ मधून आकोट विकास आघाडीच्या काशिफखान आलमखान कोटकर यांनी ९०६ मते तर ८ ब मधून रंजना अनिल रामाणे यांनी १ हजार १९९ मते मिळवून विजय मिळवला आहे.

 

प्रभाग क्रमांक ९ अ मधून भाजपच्या अलका प्रविण धन्नावत यांनी ७७७ मते तर ९ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नासेर अब्दुल रज्जाक बागवान यांनी ७९० मते मिळवत यश संपादन केले आहे. प्रभाग क्रमांक १० अ मधून आकोट विकास आघाडीच्या दिशा किशोर खांडेभराड यांनी १ हजार ५१५ मते तर १० ब मधून शिवसेना (उबाठा) गटाच्या रंजना गोविंदराव झोरे यांनी १ हजार २८९ मते मिळवून विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक १० क मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र तुकाराम खांडेभराड यांनी १ हजार ४४९ मते मिळवत सदस्यपद पटकावले आहे.

0000

 

जळगाव जामोद नगरपरिषद अध्यक्षपदी भाजपचे गणेश दांडगे विजयी

भाजपचे ९, काँग्रेसचे ५ सदस्य

 

बुलढाणा, दि.21 (जिमाका)  : जळगाव जामोद नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे गणेश रामेश्वर दांडगे विजयी झाले. नगरपरिषदेत एकूण २१ सदस्य असून त्यापैकी भाजपचे ९, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे २ सदस्य निवडून आले आहेत. याशिवाय एक अपक्ष सदस्य असून इतर पक्षांमध्ये एमआयएमचे २ तर समाजवादी पार्टीचा एक सदस्य विजयी झाला आहे. या निकालामुळे नगरपरिषदेत भाजपला सर्वाधिक संख्याबळ मिळाले आहे.

 

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत गणेश रामेश्वर दांडगे यांनी ७५८० मतांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक १ अ मधून भाजपच्या पुष्पा प्रभाकर अंबाडकर यांनी ६८३ मते मिळवून सदस्यपद पटकावले तर प्रभाग क्रमांक १ ब मधून अपक्ष मोहम्मद सलीम मोहम्मद शब्बीर यांनी ४५६ मते मिळवत विजय संपादन केला आहे. प्रभाग क्रमांक २ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे सिद्धार्थ गजानन हेलोडे यांनी ८७६ मते तर २ ब मधून एमआयएमच्या वाजेदा अजुम अब्दुल जहीर यांनी ५७० मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे.

 

प्रभाग क्रमांक ३ अ मधून भाजपच्या रुपाली संतोष डोबे यांनी १ हजार १०३ मते तर ३ ब मधून भाजपचे कैलास मोतीराम पाटील यांनी ७९९ मते मिळवून विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक ४ अ मधून  सपाचे सैय्यद नफीस सैय्यद शफी यांनी ९७४ मते तर ४ ब मधून काँग्रेसच्या  फरजाना बी सैय्यद अफरोज यांनी ८०८ मते मिळवत सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ५ अ मधून भाजपचे राजु मारोती हिस्सल यांनी ६०१ मते तर ५ ब मधून भाजपच्या प्रियंका उमेश येऊल यांनी ९५१ मते मिळवून यश संपादन केले आहे.

 

प्रभाग क्रमांक ६ अ मधून एमआयएमचे शेख गुलाब शेख भिकारी यांनी ६६४ मते तर ६ ब मधून भाजपच्या लता कृष्णराव तायडे यांनी ८२० मते मिळवत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक ७ अ मधून भाजपचे सुनिलसिंग राजपालसिंग रघुवंशी यांनी ६४० मते तर ७ ब मधून काँग्रेसच्या  वैशाली निलेश तायडे यांनी ७६३ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ८ अ मधून काँग्रेसच्या मिना राजेश सातव यांनी ८४७ मते तर ८ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे  खान इरफान हमीद यांनी ६०९ मते मिळवत विजय मिळवला आहे.

 

प्रभाग क्रमांक ९ अ मधून काँग्रेसच्या संगीता विलास भारसाकळे यांनी ८११ मते तर ९ ब मधून भाजपचे परमानंद करणसिंग राजपूत यांनी ६०४ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक १० अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस मोहम्मद अतिकुर रहमान मोहम्मद अर्शद यांनी ७३३ मते तर १० ब मधून भाजपच्या खान शिरन खानम शाकिर खान यांनी ९७८ मते मिळवून विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक १० क मधून काँग्रेसच्या समिना परविन शाकीर खान यांनी ९६४ मते मिळवत सदस्यपद पटकावले आहे.

0000

 

 

 

लोणार नगरपरिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीरा मापारी विजयी

 

बुलढाणा, दि.21 (जिमाका)  : लोणार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मीरा भूषण मापारी यांनी विजय मिळवला असून या निकालामुळे नगरपरिषदेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नगरपरिषदेत एकूण २० सदस्य असून त्यापैकी काँग्रेसचे ८, शिवसेनेचे ५, भाजपचा १, अपक्ष ५ तर इतरांमध्ये एमआयएमचा एक सदस्य निवडून आला आहे.

 

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मीरा भूषण मापारी यांनी ६ हजार ४६७ मते मिळवून विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक १ अ मधून अपक्ष उमेदवार हुमेरा सदफ शेख जमील यांनी ८१३ मते तर १ ब मधून अपक्ष अ. उबेद अ. मुनाफ यांनी ७१० मते मिळवून सदस्यपद पटकावले आहे. प्रभाग क्रमांक २ अ मधून एमआयएमच्या शेख नगमा बी शेख जावेद यांनी ७६७ मते तर २ ब मधून शिवसेनेचे शेख मकसुद शेख उस्मान यांनी ५९१ मते मिळवत विजय मिळवला आहे.

 

प्रभाग क्रमांक ३ अ मधून काँग्रेसच्या मापारी वर्षा संतोष यांनी ९४० मते तर ३ ब मधून शिवसेनेचे गजानन शालिकराम मापारी यांनी ६९५ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ४ अ मधून काँग्रेसच्या सीमा नितीन शिंदे यांनी १ हजार ३१२ मते तर ४ ब मधून काँग्रेसचे आबेद खान मोमीन खान यांनी १ हजार २७१ मते मिळवत विजय संपादन केला आहे.

 

प्रभाग क्रमांक ५ अ मधून अपक्ष गुलाबराव चंद्रभान सरदार यांनी ५०० मते तर ५ ब मधून भाजपच्या शोभा भागवत देसाई यांनी ४४६ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ६ अ मधून काँग्रेसच्या संध्या शाम राऊत यांनी २३२ मते तर ६ ब मधून शिवसेनेचे अक्षय नंदकुमार इंगळे यांनी १८९ मते मिळवत विजय मिळवला आहे.

 

प्रभाग क्रमांक ७ अ मधून काँग्रेसच्या वंदना अरुण जावळे यांनी ७१५ मते तर ७ ब मधून शिवसेनेचे मयुर रमेशचंद्रजी गोलेच्छा यांनी ४१८ मते मिळवून सदस्यपद पटकावले आहे. प्रभाग क्रमांक ८ अ मधून काँग्रेसच्या अनिकेत राजेश मापारी यांनी ४०० मते तर ८ ब मधून शिवसेनेच्या सुप्रिया गजानन मापारी यांनी ४२५ मते मिळवत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक ९ अ मधून अपक्ष साहेबराव मारोती पवार यांनी ४८५ मते तर ९ ब मधून काँग्रेसच्या जुबेदा रमजान परसूवाले यांनी ७३६ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे.

 

प्रभाग क्रमांक १० अ मधून अपक्ष पायल शुभम भगत यांनी ४८८ मते तर १० ब मधून काँग्रेसचे पंढरी पुंजाजी चाटे यांनी ४०९ मते मिळवून विजय संपादन केला आहे.

000


मलकापूर नगरपरिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे अतिकुर रहमान शाफिकूर रहमान विजयी

काँग्रेसचे १४, भाजपचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक

 

बुलढाणा, दि.21 (जिमाका)  : मलकापूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे अतिकुर रहमान शाफिकूर रहमान विजयी झाले आहेत. नगरपरिषदेत एकूण ३० सदस्य असून त्यापैकी काँग्रेसचे १४, भाजपचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना (उबाठा)चा १, अपक्ष २ आणि एमआयएमचे ३ सदस्य निवडून आले आहेत.

 

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अतिकुर रहमान शाफिकूर रहमान यांनी २३,६१४ मते मिळवून विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक १ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला महादेव डोफे यांनी ९४३ मते, प्रभाग २ अ मधून भाजपचे हेमंत रिंढे यांनी १३७९ मते मिळवून सदस्यपद पटकावले. प्रभाग ३ अ मधून काँग्रेसच्या मिनाक्षी मोहन पाचपांडे ७८१ मते, प्रभाग ४ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चव्हाण अ. हबीब अ. सत्तार १०७४ मते मिळवून विजय मिळवला. प्रभाग ५ अ मधून काँग्रेसच्या शमा बानो सैय्यद सलीम १५८६ मते तर प्रभाग ६ ब मधून काँग्रेसचे रईस खान रशीद खान जमादार १७२७ मते मिळवून विजयी झाले.

 

प्रभाग ७ अ मधून काँग्रेसच्या सायमा खानम जमील खान जमादार १५३२ मते, प्रभाग ८ अ मधून एमआयएमच्या असमत अंजुम अब्दुल कहार १७४० मते, प्रभाग ९ अ मधून एमआयएमच्या शकीला बी असतउल्लाशाह १२०० मते मिळवून सदस्यपद मिळवले. प्रभाग १० अ मधून अपक्ष उमेदवार शेख नाजीम शेख करीम १३३७ मते मिळवून विजयी झाले.

 

प्रभाग ११ अ मधून काँग्रेसच्या शबाना परवीन साजीद अहेमद खान १४६६ मते, प्रभाग १२ अ मधून भाजपच्या जयश्री संतोष बोंबटकार ११५० मते, प्रभाग १३ अ मधून काँग्रेसच्या आयेशा मोहम्मद जाकीर १४६९ मते मिळवत विजय संपादन केला. प्रभाग १४ ब मधून भाजपच्या हेमलता ब्रिजलाल मधवानी ११६७ मते, प्रभाग १५ अ मधून भाजपच्या माधुरी सोनाजी खर्चे १११५ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे.

000

 

मेहकर नगरपरिषद अध्यक्षपदी शिवसेना(उबाठा)चे किशोर गारोळे विजयी

 

बुलढाणा, दि.21 (जिमाका)  : मेहकर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे किशोर भास्कर गारोळे विजयी झाले आहेत. नगरपरिषदेतील एकूण २६ सदस्यांमध्ये काँग्रेसचे ११, शिवसेनेचे ९ आणि शिवसेना (उ.बा.ठा.) गटाचे ६ सदस्य निवडून आले आहेत.

 

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत किशोर भास्कर गारोळे यांनी १०,२३९ मते मिळवून विजय संपादन केला. प्रभागानिहाय निकालात प्रभाग १ अ मधून शिवसेना (उ.बा.ठा.)च्या सतीष गोपाळ ताजने ६६० मते मिळवत विजयी ठरले, तर प्रभाग १ ब मधून रुपाली किशोर गारोळे ७१८ मते मिळवून विजयी झाली. प्रभाग २ अ मधून डॉ. दिपीका रविराज रहाटे (शिवसेना) ८९२ मते, आणि २ ब मधून शिवसेना(उ.बा.ठा.) च्या  महेश शेषराव रिंढे १,००६ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग ३ अ मधून काँग्रेसच्या मंगला सुरेश मानवतकर ९६३ मते, आणि ३ ब मधून मुजीब हसन अ. हबीब कुरेशी यांनी ८५० मते मिळवून विजय मिळवला. प्रभाग ४ अ मधून काँग्रेसच्या जमनबाई पीरु गवळी १३५९ मते, ४ ब मधून काँग्रेसच्या मुजिब खॉ वली महमद खाँ १५३९ मते मिळवत यश संपादन केले. प्रभाग ५ अ मधून काँग्रेसच्या अंजुम बानो शेख अख्तर कुरेशी १,१७७ मते, आणि ५ ब मधून काँग्रेसच्या शेख महेबुब शेख जुम्मा गवळी हे १,१८७ मते मिळवून विजयी झाले.

 

प्रभाग ६ अ मधून शिवसेनेच्या नर्मदा सुरेश गायकवाड १,०७७ मते, ६ ब मधून ओमप्रकाश पांडूरंग सौभागे १,१६२ मते मिळवत विजयी ठरले. प्रभाग ७ अ मधून काँग्रेसच्या शबनूर बी शेख रईस कुरेशी १,५०६ मते, आणि ७ ब मधून मोहम्मद अलीम ताहेर यांनी १,८२४ मते मिळवून सदस्यपद पटकावले.

 

प्रभाग ८ अ मधून शिवसेना (उ.बा.ठा.) च्या नितीन रमेश तुपे यांनी ९५८ मते, ८ ब मधून शिवसेनेच्या  सरला मोहन जाधव १,०१७ मते मिळवून विजयी ठरल्या. प्रभाग ९ अ मधून काँग्रेसच्या सुनिता संजय ढाकरके ८०९ मते, ९ ब मधून वैभव गिरीश उमाळकर १,००० मते मिळवत यश संपादन केले. प्रभाग १० अ मधून शिवसेनेच्या अक्का बद्रीनाथ गायकवाड ९९३ मते, १० ब मधून कविता विशाल काबरा ७३० मते मिळवत विजयी ठरली. प्रभाग ११ अ मधून शिवसेना (उ.बा.ठा.) च्या विलास वैजीनाथ चनखोरे १,९८९ मते तर ११ ब मधून आफिया निसार अन्सारी या १,९०५ मते मिळवून विजयी ठरली.

 

प्रभाग १२ अ मधून शिवसेनेचे सुरेश विश्वनाथ वाळुकर ८५८ मते, १२ ब मधून शिवसेनेच्या प्रिती प्रविण शिंगनाथ ६७६ मते मिळवत विजयी ठरले. प्रभाग १३ अ मधून शिवसेनेच्या रुपाली मनोज जाधव यांनी  ७३२ मते तर १३ ब मधून काँग्रेसच्या निलीमा शरद सोमन या  ६१० मते मिळवून विजयी झाल्या.

000

 

नांदुरा नगरपरिषद निवडणूक: भाजपाची सरशी; मंगला मुऱ्हेकर नगराध्यक्षपदी विजयी

 

बुलढाणा, दि.21 (जिमाका)  : नांदुरा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत मोठे यश संपादन केले आहे. भाजपाच्या उमेदवार मंगला सुधीर मुऱ्हेकर यांनी १२,०५० मते मिळवून नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे. एकूण २५ सदस्यांच्या या सभागृहात भाजपाने ११ जागा जिंकून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर आकोट विकास आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी २ जागांवर विजय मिळवला आहे.

 

प्रभागनिहाय सविस्तर निकाल

प्रभाग क्रमांक १ मधून आकोट विकास आघाडीचे अजय सिताराम भिडे (१,२६० मते) आणि अश्विनी दिपक गायकवाड (७०५ मते) विजयी झाले आहेत. प्रभाग २ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या दिव्यता सुनिल तांदळे (१,१२१ मते) आणि संतांष पांडूरंग खराडे (९२४ मते) यांनी यश मिळवले. प्रभाग ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले असून निखत कौसर शेख अन्वर (१,२६१ मते) आणि खा जुबेर खा सफदर खा (१,१०३ मते) निवडून आले आहेत.

 

प्रभाग ४ मध्ये भाजपाच्या हर्षा शिवशंकर हिवाळे (१,०९५ मते) आणि अपक्ष उमेदवार लाला दिनकर इंगळे (१,०१४ मते) विजयी झाले. प्रभाग ५ मधून भाजपाच्या विमलबाई राजाराम वानखडे (१,२५८ मते) आणि आकोट विकास आघाडीचे अजय सिताराम घनोकार (१,०९३ मते) यांनी विजय संपादन केला. प्रभाग ६ मध्ये शिवसेनेचे रोशन अरुन पांडव (७७९ मते) आणि भाजपाच्या माधुरी प्रमोद खोंड (१,४४० मते) विजयी झाले. प्रभाग ७ मधून आकोट विकास आघाडीच्या कल्पना अर्जुन वाकोडे (१,१५० मते) आणि भाजपाचे रामसिंह रमेशसिंह ठाकूर १,०४० मतांनी निवडून आले आहेत.

 

प्रभाग ८ मध्ये भाजपाच्या भावना उमेश इंगळे (१,२०० मते) आणि आकोट विकास आघाडीचे प्रणव राजेश एकडे (९५५ मते) विजयी झाले. प्रभाग ९ मध्ये भाजपाने दोन्ही जागा जिंकल्या असून अनिल कैलास जांगळे (१,३८६ मते) आणि मेघा राहूलकुमार गोठी १,४०२ मतांनी विजयी झाले. प्रभाग १० मधून आकोट विकास आघाडीच्या मेहनाज परवीन मोहम्मद मुजम्मिल फुरकान (९७५ मते) आणि अपक्ष खान आबेदाबी सफदर (८१८ मते) विजयी झाले. प्रभाग ११ मध्ये भाजपाच्या श्रद्वा पवन खैरे (१,२७९ मते) आणि अर्चना संदिप तळोले (१,११२ मते) यांनी विजय मिळवला. शेवटच्या प्रभाग १२ मध्ये आकोट विकास आघाडीच्या शितल हरिष काटले (१,४०३ मते) आणि गायत्री गोकुल खेडकर (१,४३९ मते) विजयी झाल्या, तर प्रभाग १२ (क) मधून शिवसेनेचे विनायक प्रकाश बोडखे (९०९ मते) विजयी झाले आहेत.

000

 

 

शेगाव नगरपरिषद निवडणूक:

काँग्रेसचे प्रकाश शेगोकार नगराध्यक्षपदी विजयी; 15 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष

बुलढाणा (जिमाका): संत नगरी शेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली असून, काँग्रेसचे प्रकाश एकनाथ शेगोकार यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे. त्यांना एकूण 14414 मते मिळाली. नगरपरिषदेच्या एकूण 30 सदस्यांच्या सभागृहात भारतीय जनता पार्टीने 15 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसचे 5, एमआयएम 4, शिवसेना 2, वंचित बहुजन आघाडी 2, शिवसेना (उबाठा) 1 आणि 1 अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

 

प्रभागनिहाय निकालात प्रभाग 1 मधून भाजपाच्या पुजा सचिन खानापुरे 1231 आणि काँग्रेसचे शिवाजी उमाकांत बूरुंगुले 1204 मतांनी विजयी झाले. प्रभाग 2 मध्ये भाजपाच्या वैशाली प्रमोद सुळ 1531 आणि विनोद अशोक मसने यांनी 1248 मतांनी यश मिळवले. प्रभाग 3 मधून शिवसेनेच्या कांचन शैलेश डाबेराव 1422 आणि भाजपाचे आकाश मोहन नावकार 1590 मतांनी विजयी झाले. प्रभाग 4 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सीमा प्रमोदकुमार ओवे 1255 आणि अपक्ष महेश हरी काळे यांनी 1177 मतांनी बाजी मारली. प्रभाग 5  आणि 6 मध्ये भाजपाचे वर्चस्व राहिले असून पल्लवी मोहन बानोले 1483 मते, पवन भिकुलाल शर्मा 1429 मते, लिना रविकांत पाटील 1164 आणि शरदकुमार शंकरलाल अग्रवाल 1084 मतांनी विजयी झाले आहेत.

 

प्रभाग 7 मध्ये काँग्रेसचे पूर्ण वर्चस्व पाहायला मिळाले, जिथे प्रमोद बळीराम इंगळे 1201 आणि शेख सना परवीन शेख राजीक 1019 मतांनी  निवडून आले. प्रभाग 8 मध्ये भाजपाचे रमेश गुलाबराव मोहड 1001 मते आणि अलका संजय खानजोडे 1004 मतांनी विजयी झाले. प्रभाग 9 मध्ये भाजपाच्या सुषमा राजेंद्र भिसे 467 मते आणि काँग्रेसचे आनंदकुमार रतनलाल अग्रवाल हे 621 मतांनी विजय मिळवला. प्रभाग 10 मध्ये भाजपाचे मालती मंगेश ढगे 1259 आणि अंकुश विजयराव देशमुख 1487 मतांनी निवडून आले. प्रभाग 11 मधून काँग्रेसचे रविंद्र हरिदास उमाळे 1343 मते आणि भाजपाच्या सुचिता संदिप काळे 1353 मतांनी विजयी झाल्या.

 

प्रभाग 12 आणि 13 मध्ये एमआयएम पक्षाने वर्चस्व राखले असून शेख मुख्तार शेख बुडन 1624 मते, रेहाना बी मोहम्मद साजिद 1115 , शेख मदीनाबी शेख जब्बार 1062 आणि मुहम्मद नदीम अब्दुल कादर 1377 मतांनी चारही उमेदवार विजयी झाले. प्रभाग 14 मध्ये शिवसेना (उबाठा) चे आशिष दामोदर गणगणे 1127 आणि शिवसेनेच्या मिनाक्षी सेतोष घाटोळ यांनी 978 मतांनी यश मिळवले. शेवटच्या प्रभाग 15 मध्ये भाजपाच्या सुषमा नितीन शेगोकार 1058 आणि वंचित बहुजन आघाडीच्या केसरबाई राजाराम घुले 1480 मतांनी  विजयी झाल्या आहेत.

 

0000

 

सिंदखेड राजा नगरपरिषद अध्यक्षपदी सौरभ तायडे विजयी

 

बुलढाणा, दि.21 (जिमाका)  : सिंदखेड राजा नगरपरिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे सौरभ विजय तायडे विजयी झाले आहेत. अध्यक्षपदी त्यांना 4,287 मते मिळाली. नगरपरिषदेतील 20 सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) चे 8, शिवसेना 5, राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आणि भाजपचा 1 सदस्य निवडून आला आहे. या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.

 

प्रभागनिहाय विजेत्यांमध्ये प्रभाग 1 अ मधून श्रेया उमेश खरात (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.) 649 मतांसह, प्रभाग 1 ब मधून संतोष प्रकाश मेहेत्रे (भाजप) 465 मतांसह, प्रभाग 2 अ मधून कैलास नारायण मेहेत्रे (शिवसेना) 552 मतांसह, प्रभाग 2 ब मधून सोनाली गजानन मेहेत्रे (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.) 522 मतांसह, प्रभाग 3 अ मधून निलेश देविदास ठाकरे (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.) 595 मतांसह, प्रभाग 3 ब मधून सिंधु जगन ठाकरे (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.) 393 मतांसह, प्रभाग 4 अ मधून पुजा मंगेश खुरपे (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.) 505 मतांसह, प्रभाग 4 ब मधून अवेज खान नाजीम खान (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.) 435 मतांसह, प्रभाग 5 अ मधून संगीता किशोर म्हस्के (शिवसेना) 522 मतांसह, प्रभाग 5 ब मधून कैलास नागोराव म्हस्के (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.) 462 मतांसह, प्रभाग 6 अ मधून जासमीन अजिम तांबोळी (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.) 752 मतांसह, प्रभाग 6 ब मधून खान हाजेरा नुजहत फारुक अली खान (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.) 986 मतांसह, प्रभाग 7 अ मधून गौतम प्रकाश खरात (शिवसेना) 510 मतांसह, प्रभाग 7 ब मधून अंबिका कैलास कोरडे (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.) 435 मतांसह, प्रभाग 8 अ मधून पोर्णिमा ओम भुसारे (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.) 490 मतांसह, प्रभाग 8 ब मधून कृष्णा माणिक मेहेत्रे (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.) 379 मतांसह, प्रभाग 9 अ मधून पुष्पा रामदास बारवकर (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.) 517 मतांसह, प्रभाग 9 ब मधून दिलीप नारायण आढाव (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.) 435 मतांसह, प्रभाग 10 अ मधून दिपाली योगेश म्हस्के (शिवसेना) 563 मतांसह, प्रभाग 10 ब मधून संदिप सखाराम मेहेत्रे (शिवसेना) 704 मतांसह विजयी झाले आहेत.

000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या