मागासवर्गीय शेतकरी, महिलांना १०० टक्के अनुदानावर विद्युत मोटार पंप व शिलाई मशीन !
·
जिल्हा परिषदची
सेस फंड योजना
बुलढाणा, (जिमाका) दि. १०: समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा
यांच्या २० टक्के सेस फंड योजनेंतर्गत वित्तीय वर्ष २०२५-२६ साठी मागासवर्गीय शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर ५ एचपी क्षमतेचे विद्युत मोटार
पंप तर मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन वितरित करण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत
जास्तीत जास्त मागासवर्गीय शेतकरी व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी
अधिकारी गुलाब खरात यांनी केले आहे.
या योजनेसाठीचे अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून देण्यात आले असून मागासवर्गीय
शेतकरी, महिला व दिव्यांग लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण भरलेला अर्ज
दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयात सादर
करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त मागासवर्गीय शेतकरी व महिलांना घ्यावा,
असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच जिल्हा समाज
कल्याण अधिकारी डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment