कलव्य इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी 30 जानेवारीपर्यंत अर्ज करावा; एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे आवाहन
ए
बुलढाणा, (जिमाका) दि. 22 : आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य
निवासी शाळेत शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रवेशासाठी परीक्षा दि. 1 मार्च 2026 रोजी
होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज
दि. 30 जानेवारी 2026 पर्यंत प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकांमार्फत सादर
करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.
बुलडाणा
जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या
प्राथमिक व माध्यमिक शाळा, तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये 5 वी, 6 वी, 7 वी, व 8 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित
जमातीचे विद्यार्थी सदर स्पर्धा परिक्षेसाठी पात्र राहतील.
या
सर्व शाळांतील मुख्याध्यापकांनी प्रवेश परीक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांकडून भरुन
घेऊन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला या कार्यालयाकडे सादर
करावे. विहित नमुन्यातील अर्ज संबंधित आदिवासी शासकीय/अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक
किंवा प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्याकडे विनामूल्य
उपलब्ध आहेत. परीक्षेचा अर्ज दि. 30 जानेवारी
2026 पर्यंत प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकांमार्फत सादर करावा.
सदर
अर्जासोबत बोनाफाईड दाखला, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या वार्षिक उत्पन्नाचा तसेच पालकांचा/
विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला आवेदन पत्रा सोबत जोडण्यात यावा. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी
प्रवेश परीक्षा दि. 1 मार्च रोजी स. 11 ते दु. 1 या वेळेत शासकीय आश्रमशाळा,कोथळी,ता.बार्शिटाकळी,
जि. अकोला येथे होईल. इयत्ता सातवी ते नववीच्या
विद्यार्थ्यांसाठी परीक्षा दि. 1 मार्च रोजी सकाळी 11 ते दु. 2 या वेळेत शासकीय आश्रमशाळा,
घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलडाणा येथे होणार आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी यांनी
कळवली आहे.
Comments
Post a Comment